Login

#हसू की रडू...

कोणतीही नवीन गोष्ट करताना शिकायलाही खुप काही मिळतं
माझ्या मावस जावेचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, अगदी फाइव स्टार हॉटेल मध्ये करण्याचा त्यांनी प्लान केला होता. कोरोना चा काळ अतिशय बिकट होता पण तरीही अगदी मोजक्या माणसांच्या सहवासामध्ये, चिमुकल्या बाळाचं आगमन करायला आई-बाबा तर उत्सुक होतेच पण आजी-आजोबाही सुनेची हौस व्हावी तिला व तिच्या होणाऱ्या बाळाला सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद मिळावे... हा हेतू ठेवून त्यांनी कार्यक्रम करायचं निश्चित केले. अरेंजमेंट तर एवढी सुंदर होती की नयन तृप्त व्हावे... पाहणारा पाहतच राहिला...

फक्त हि दृश्यच नयनरम्य नव्हती, तर फाईव्ह स्टार हॉटेल मधील लिफ्ट त्याला असलेल सेंसर लहान मुलांना तर अचंबित करून सोडायच्या .... मागेच असलेल स्विमिंग टॅंक अतिशय सुंदर... फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायला येणारयाना अगदी स्वप्नात पाहिलेल्या सर्व गोष्टी मिळत असतील....असं आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील लोकांना वाटणं सहाजिकच होतं....

एकाच वेळी फाइव स्टार हॉटेल मध्ये वेगवेगळ्या फंक्शन्स साठी वेगळ्या रूम बुक केलेले असतात. सगळ्यांची वेगळी अरेंजमेंट केलेली... अगदी सुंदर पण त्यांना दिलेल्या रूम एकाच रोमध्ये असल्यामुळे आमची आणि आमच्या सोबत्यांची चांगलीच फजिती झाली... आम्हाला खाली कार्ड देण्यात आलं, हे कार्ड डोर लॉकसमोर पकडून रूम  उघडते मग, फ्रेश वगैरे होउन नाश्ता करून खाली या असं सांगण्यात आलं...

आमचे नातेवाईक लिफ्टच्या समोर उभे राहतात. सेन्सर मुळे दरवाजा आपोआप उघडला. लाईट ऑन होऊन थर्ड फ्लोअर वर ते सर्वजण पोहोचले. ते बाहेर येताच पटापट सर्व रूम समोरील लाईट ऑन होऊ लागल्या. तो लाईटचा दिम प्रकाश एवढा आकर्षक होता त्यामुळे त्या दरवाज्यांची शाईंन आणि तिथलं वातावरण खूप सुंदर वाटायचं...

त्यांनी खोली नंबर 27 समोरील दरवाजाच्या लॉकवर कार्ड पकडलं आणि दरवाजा उघडलाही सगळेजण छान आवरत होते.. पाहुणे आले म्हणून त्यांनी लगेच वेटर कडून स्नॅक्स,कोल्ड्रिंक्स स्वीट्स मागवले. मुलांनाही ज्यूस वगैरे देऊन छान स्वागत केले. आता आवरायचं म्हणून ठरवले तोच वेटर घाईघाईने आला आणि बोलला ते कार्ड बघू,  सॉरी, तुम्ही ज्या कार्यक्रमाला आलात त्यांनी ही रूम बुक केलेल्या रूमपैकी नाही.

आता मात्र सगळेच एकमेकांकडे पाहून हसले. ज्या नवरीची एंगेजमेंट होती तिची ती रुम होती. त्यांना वाटले, आम्ही कुटुंबीय होणाऱ्या नवरीच्या सासरकडचे म्हणून त्यांनी छान पाहुणचार केला... "सॉरी" म्हणून तुमच्या बाहेर आलो पण मनात मात्र खंत होती चौकशी न करता रूम मध्ये प्रवेश केल्याची. अशी ही खोली नंबर 27 ची कधीही न विसरणारी घटना घडली... आज कुठल्याही कार्यक्रमाला गेलो तर रूम मध्ये गेल्यावर आधी चौकशी केल्याशिवाय प्रवेश न करण्याची सवय मात्र त्या प्रसंगापासून कायमची लागली. 

सौ. प्राजक्ता पाटील...
लेख आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि नावासकट शेअर करायला विसरू नका..