लता मंगेशकर: भारताची स्वर सम्राज्ञी

The Life Of Bharat Ratna Late Lata Mangeshkar
स्वरसम्राज्ञी: लता मंगेशकर


       काल सरस्वती पूजन झाले आणि आज गान सरस्वतीने आपला रियाज आटोपता घेतला…..!
      लता नावाचा स्वर्गीय आवाज अनंताच्या प्रवासाला निघून गेलाय……!!
        अनेक पिढ्या येतील जातील पण लतादीदी कायम अजरामर राहतील…..!!!



           गेली 7 दशके 36 भाषांमधील हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये जवळपास 30 हजार गाणी गायलेला ,या गानं कोकिळेला आजवर अनेक पुरस्कार आणि मानसन्मानाने गौरविण्यात आलं आहे. 1974 ते 1991 या दरम्यान सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या म्हणून त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आणि अखेर आज 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

           लता मंगेशकर यांचा जन्म 29 सप्टेंबर 1929 मध्ये मध्यप्रदेशच्या इंदूर शहरात झाला. त्यांचे माई मंगेशकर या गृहिणी तर वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. या दाम्पत्याने आपल्या या पहिल्या अपत्याचे नाव \"ह्रृदया\" असं ठेवलं पण नंतर भावबंधन या नाटकांनी प्रभावित होऊन तिचे नाव बदलून \"लता\" हे ठेवलं. लता नंतर आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ ही मुलं त्यांना झाली. पंडित दीनानाथ हे नाट्य कलावंत असल्यामुळे सतत फिरतीवर असत. त्यामुळे माहीत नाही आपल्या चार मुलांना सांभाळत संसाराचा गाडा हाकला. दीनानाथ यांना पैसे काही फार चांगले मिळत नव्हते. लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी तिने वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बालकलाकार म्हणून कामाची सुरूवात केली.

         1942 मध्ये लता अवघ्या 13 वर्षांची होती तेव्हा दीनानाथ यांचे हृदयविकाराने निधन झालं. तेव्हा मंगेशकरांचे एक नातेवाईक आणि नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. वडिलांच्या निधनानंतर छोट्याला त्यावरच कुटुंबीयांची जबाबदारी होती. त्यामुळे तेराव्या वर्षीच तिने मायक्रोफोन समोर गायला सुरुवात केली. वसंत जोगळेकरांच्या \"किती हसाल\" या मराठी चित्रपटासाठी सदाशिवराव नेवरेकर यांनी संगीतबद्ध केलेलं \"नाचु या गडे\",\"खेळू सारी मनी हौस भारी\"ही गाणी गायली. पण ही गाणी चित्रपटातून वगळली गेली. कोणत्याही नव्या गायकाची सुरुवात व्हावी अगदी तशीच लताची ही सुरुवात झाली. निराशा आणि उपासमार अशा दोन्हीच्या कात्रीत मंगेशकर कुटुंब अडकलं होतं. त्याच वर्षी मात्र विनायकांनी लताबाईंना नवयुवक च्या \"पहिली मंगळागौर\" या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली या चित्रपटात त्यांनी \"नटली चैत्राची नवलाई\" हे दादा चांदेकर यांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले.

       1945 मध्ये जेव्हा मास्टर विनायक यांनी आपल्या कंपनीचे कार्यालय मुंबईला नेलं, तेव्हा लता सुद्धा त्यांच्यासोबत मुंबईला आली. ती उस्ताद अमानत अली खान (भेंडीबाजारवाले ) यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागली आणि इथेच तिला हिंदी गाण्याची पहिली संधी मिळाली. 1940 आली तिने वसंत जोगळेकरांच्या \"आप की सेवा में\" या हिंदी चित्रपटासाठी \"पा लागू कर जोरी\" हे गाणं गायलं. 1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अली खान भेंडीबाजारवाले हे पाकिस्तानला गेल्यानंतर लतादीदी अमानत खाॅं साहेब देवासवाले आणि पंडित तुलसीदास शर्मा यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. मास्टर विनायक यांच्यामुळे लताची ओळख गुलाम हैदर यांच्याशी झाली.

           त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई यासारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या. याशिवाय अनेक गीतकार हे मुस्लीम असल्यामुळे गाण्यांमध्ये उर्दू शब्द अधिक असत. मराठमोळ्या लताला हे सर्व शब्द जमत नसत. एकदा दिलीप कुमार म्हणाले की , \"लताच्या गाण्यात वरण भाताची चव आहे\", झाले हा टोमणा आपल्यावर होत असलेला आणखी एक घणाचा घाव समजून लतादीदींनी शफी नावाच्या मौलवीकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले. सुरुवातीला नूरजहाँचं अनुकरण करणाऱ्या लताने मग स्वतःची शैली निर्माण केली. 1949 मध्ये \"महल\" आला आणि त्यातील \"आयेगा आनेवाला\" गाण्याने इतिहास रचला. बारीक आवाज म्हणून ज्या ज्या लोकांनी त्यांना हिणवलं ते सर्व रांगा लावून लतादीदींच्या तारखा मागू लागले. पंडित नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू आणणारी ही स्वरगंगा आजतागायत गात होती. नायिका बदलल्या, गायिका बदलल्या, या गाण्याचे रंग-ढंग बदलले, पण संगीतातीलच नाही तर भारतातील कोणत्याही व्यक्तीला अभिमान वाटावा अशी का संगीत कारकीर्द त्यांनी घडवली. स्वतः \"आनंदघन\" या नावाने मराठी हिंदी मध्ये संगीतरचना केल्या.

     

        2001 साली लतादीदींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला लतादीदी आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी ,त्यांच्या सुरांच्या रुपाने त्या नक्कीच आपल्या स्मृतीत चिरंतन राहतील.

   शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते
 एक सूर्य
 एक चंद्र
 एक लता मंगेशकर…!
    आज खऱ्या अर्थाने सुर मुके झालेत .….
       भावपूर्ण श्रद्धांजली


ता.क. गानकोकिळा लता मंगेशकर अर्थात दीदींच्या जन्मदिवसानिमित्त साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी 28 सप्टेंबर 1964 रोजी लिहिलेल्या \"मराठाच्या\" अग्रलेखातील काही गोळी उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही.

  शब्दप्रभू आचार्य अत्रे लिहितात.


         \"स्वर्गीय माधुर्याचा या इहलोकीतील मूर्तिमंत अवतार असलेल्या लता च्या वाढदिवसानिमित्त तिला केवळ लोखंडाच्या निफातून उतरलेल्या शाईच्या शब्दांनी वृत्तपत्राच्या जाड्याभरड्या कागदावर अभिवादन करणे म्हणजे एखाद्या अप्सरे च्या स्वागतासाठी तिच्या मृदृ चरण कमला खाली जाड्याभरड्या गोणपाटाच्या पायघड्या अंथरण्या इतके विशोभीत आहे, कारण लताच्या कंठातील अलोकिक कोमल त्याला साजेसे अभिवादन तिच्या जीवनातील या शुभदिनी जर तिला करायचे असेल तर त्यासाठी प्रभात काळाची सूर्यकिरणे दवबिंदू मध्ये भिजवून बनवलेल्या शाईने तंतूच्या लेखणीने लिहिलेले मानपत्रच गुलाब कळीच्या करंडक आतून तिला अर्पण करायला हवे. लताचा आवाज म्हणजे मानवी ध्वनीच्या सृष्टीतील एक अद्भुत चमत्कार आहे. सरस्वतीच्या वीणेचा झंकार ,उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि श्री कृष्णाच्या बासरीची साथ हे सारे एकवटून विधात्याने लता चा कंठ घडविला असला पाहिजे. सूर ,लय ,ताल ,सिद्धी आणि प्रसिद्धी या गोष्टी इथे एकत्र येतात त्या जागेला आपण लता मंगेशकर असं म्हणावं. कारण संगीतातील सात सूर म्हणजे फक्त आणि फक्त आपली

   \"ल ता मं गे श क र\"
  

  संदर्भ - नेहल कराडे यांचा लता मंगेशकर यांच्यावरील ब्लॉग.

   इतर माहिती व फोटो साभार गुगल.