Nov 30, 2021
माहितीपूर्ण

लता मंगेशकर

Read Later
लता मंगेशकर

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
लता मंगेशकर

लता मंगेशकर या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गायिका आहेत. त्यांना भारताची गानकोकिळा म्हणून ओळखला जाते.
लतादीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्यप्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य संगीताचे प्रसिद्ध गायक होते. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर हे त्यांचे सख्खे भाऊ असून प्रसिद्ध गायिका आशा भोसले व उषा मंगेशकर या त्यांच्या बहिणी आहेत.
५० च्या दशकात त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर पुढील सहा दशके त्यांनी आपल्या मधुर, मखमली आवाजाच्या जादूने अवघ्या भारताला वेड लावले.
त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली. त्यांची \" ए मेरे वतन के लोगो \" सारखे देशभक्तीपर गीत तसेच \" गुमनाम है कोई \", \" लग जा गले \", \" कही दीप जले कही दिल \", \" जब प्यार किया तो डरना क्या \", \" मन क्यू महका \", यांसारखी हिंदी भावगीते लोक आजही आवडीने ऐकतात.
\" मोगरा फुलला \", \" अरे अरे ज्ञाना झालासी पावन \", \" भेटी लागी जीवा \", \" आजि सोनियाचा दिनू \" सारखे मराठी अभंग आणि \" सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या \", \" मी कात टाकली \", मेहेंदीच्या पानावर \" इ. मराठी गीतेही अतिशय लोकप्रिय झाली.
त्यांनी विसाहून अधिक भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली.

मध्य प्रदेश शासनाद्वारे दरवर्षी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना  " लता मंगेशकर पुरस्कार  " दिला जातो. यावरून त्यांच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती येते.

महत्त्वाचे पुरस्कार :

१. फिल्मफेअर पुरस्कार ४ वेळा जिंकले.

२. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ( ३ ) - १९७२, १९७४, १९९०

३. दादासाहेब फाळके पुरस्कार - १९८९

४. महाराष्ट्र भूषण - १९९७

५. पद्म विभूषण - १९९९

६. भारतरत्न - २००१

अशा आपल्या महाराष्ट्राची, संपूर्ण भारताची शान असलेल्या आपल्या आदरणीय लतादीदी मंगेशकर यांना ९३ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्या अधिक दीर्घायुषी होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

असे माहितीपूर्ण लेख आणि उत्तमोत्तम मराठी कथा वाचण्यासाठी ग्रुपला भेट द्या - https://www.facebook.com/groups/758165158061766/permalink/993360487875564/?app=fbl

@ प्रथमेश काटे

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Prathmesh Kate

Writer

Like to writing