Nov 26, 2020
स्पर्धा

आतला प्रकाश.... अंतिम

Read Later
आतला प्रकाश.... अंतिम

सुनीता बाई वय ६० वर्षे, कसलीच गोळी नाही, मस्त फिरून, हसत खेळत दिवस घालावयाचा असे त्यांचे रुटीन. मुलगा, मुलगी परदेशी होते, इथे हे दोघेच असायचे....

अचानक एक दिवशी त्यांना ब्लड ींग होऊ लागले डॉक्टरांकडे चेक करायला गेल्या, तर पिशवी काढावी  लागेल पिशवीचा कॅन्सर....

त्यांचे यजमान अगदी खचून गेले पण ह्या वयात पण त्या खंबीर होत्या, त्या म्हणाल्या तुम्ही काही काळजी करू नका मला कुठेतरी आशेचा दीप दिसतोय, सगळं नीट होईल, डॉक्टरांना पण आश्चर्य वाटलं आणि कौतुक पण....


ऑपरेशन थोड critical होते पण सुनीता बाई एकदम खंबीर होत्या आणि ऑपरेशन successfull झाले. आता कोणताही धोका नव्हता... थोड्या दिवसात त्या हिंडु फिरायला लागला.... कशात ना कशात स्वतःला गुंतवून ठेवू लागल्या... त्या म्हणाल्या माझे हे नव्याने भेटलेले आयुष्य मी अजून छान जगणार... डॉक्टर, नातेवाईक... त्यांचे यजमान या सर्वांना त्यांचे कौतुक वाटले आणि त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वानी स्वागत केले... काही दिवसातच त्यांनी श्रावणक्वीन या स्पर्धेत भाग घेतला.... आणि त्या विजयी झाल्या..।

मिसेस 'श्रावणक्वीन' हा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्यावर, त्या अगदी भरभरून बोलत होत्या, मला इथे या वनपीसमध्ये बघून सगळ्यांना वाटत असेल, साठी बुद्धी नाठी झाली की काय हिची? पण खरच माझे वय फक्त १६, म्हणजे त्याच्या उलट बरं का?

आमची दोन्ही मुले परदेशी असतात, त्यामुळे इथे आम्ही दोघेच, म्हणून जे क्षण निसटून गेले, ते जगण्याचा प्रयत्न करतो, जे आहे तें सुंदर कसे बनेल याचा विचार करतो.

आज त्यातलेच एक स्वप्न पूर्ण झाले, माझ्या बरोबरीच्या सर्व बायकांना मी एवढंच सांगेन, आपल्याला हे आयुष्य एकदाच मिळतं, त्यामुळे तें भरभरून जगा,लोकं काय म्हणतील? या वयात हे शोभतं का? असा विचार न करता राहिलेली सगळी स्वप्न पूर्ण करा.

म्हणूनच मी एवढंच म्हणेन ''ना उम्र की सीमा हो.......''
ह्या वाक्यावर जोरादार टाळ्या वाजतात.......


आजारपणावर मात केलीच पण त्याच बरोबर नव्याने भेटलेले आयुष्य त्यांनी अजून सुंदर केले..."आतला प्रकाश" या कथामालिकेत दाखवलेल्या सगळ्या उदाहरणांमधुन आपण बघितलं कि जीवनात कितीही चढ-उतार आले तरी खचून न जाता कुठेतरी आपल्याला आपला आत असलेला मनाच्या तेजावर विश्वास ठेवून हे आयुष्य जगायला हवे.... तरंच तें सुंदर होते.

जीवन जगताना आवश्यक असणार्या खूप गोष्टी आहेत.... आपल्या मुलभूत गरजा आहेतच याशिवायही पैसा, प्रसिद्धी आणि समाजात असलेली प्रतिमा टिकवण्यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो परंतू प्रत्येक गोष्टींमध्ये कुठे थांबायचे हे ज्याला कळते तो नक्कीच यशस्वी होतो आणि समाधानी सुद्धा... कारण प्रत्येक यशस्वी माणूस हा समाधानी असतोच असे नाही पण प्रत्येक समाधानी माणूस हा जीवनात नक्कीच यशस्वी होतो....

म्हणूनच चांगली असो किंवा वाईट प्रत्येक गोष्टीत ठराविक वेळेत थांबायला हवे कारण "अती तेथे माती" अन हे ज्याला कळते तो नक्कीच आनंदी आणि समाधानी जीवन जगतो....

एक स्त्री जेव्हा घरात असते, तेव्हा त्या घराला घरपण असते, कितीही संकट आली तरी ती खंबीर होऊन त्याचा सामना करते कारण कुठेतरी तीच्याआत तेवत असणारा तो प्रकाश, तीच्या आतला आवाज तिला सांगत असतो की, सगळं नीट होईल तू खंबीर रहा.....

संसार ह्या रथाला दोन चाके असतात म्हणतात एक स्ञी आणि एक पुरुष, एक चाकाची साथ जरी सुटली तरी हा रथ कोलमडतो...... म्हणूनच मी म्हणेन,

संसार रूपी रथाचे चाक म्हणजे तो आणि ती....
किती आले पाठीला बाक तरी देतात एकमेकांना साथ आणि कायम राहतात सोबती.......


कसा वाटला माझा प्रेरणादायी कथांचा संग्रह नक्की सांगा.....

©® अनुजा शेठ


 

Circle Image

Anuja Dhariya-Sheth

housewife n Phonics Teacher

लेखनाची आवड होतीच... पण आता खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला... आयुष्यात अनेक गोष्टी घडत गेल्या आणि लेखणी बनून कागदावर उतरत गेल्या...