नाते तुझे नी माझे अंतिम... १२

love after marrige

मागच्या भागात आपण पाहिले दुसरी मुलगी झाली... आता बाळ आणि आई घरी आली आता बघूया पुढे कसे हसरे होते त्यांचे चौकौनी कुटुंब....

दुसरी मुलगी झाल्यावर तिला वाट्त असते आता हे लोकं काय म्हणतील दुसरीही मुलगीच झाली... पण तसे काहीच नाही सगळ्यांना तेवढाच आनंद झालेला असतो.. समीर तर त्या तीघींची खूप काळजी घेत होता... अगदी दॄष्ट लागावी असा संसार सुरू असतो...

मुली मोठ्या होतात... आणि यांचे प्रेम अगदी जुने आणि घट्ट होत जाते... त्यांच्याकडे बघून सगळ्यांना वाटत असे की खरच " मेड फॉर इच आॅदर " कपल आहे... 

दोघेही एकमेकांना स्वातंत्र्य देत होते, समजून घेत होते... त्यामुळे त्यांचे नाते मोकळे होते... तें एकमेकांना कधीच बंधनात ठेवत नव्हते... 

दुसरी मुलगी मोठी झाली तसे सोनमने परत कॉलेज जॉइन केले... आई बाहेर असल्यामुळे आणि समीरसुद्धा कोणत्याच कामाची लाज न बाळगता घरात काम करत असे त्यामुळे मुलींना सुद्धा छान वळण होते...

अधून मधून बारीक सारीक भांडण होत होती... पण दोघांना जरा सुद्धा अबोला सहन होत नसे त्यामुळे  भांडण जास्त वाढत नसे.... 

संसाराला एवढी वर्षे झाली तरी सुरुवातीच्या आठवणीत हरवायला दोघानाही आवडत असे... आणि आपण कसे भांडायचो ते आठवून दोघे हसत.... त्यामुळे त्यांचे प्रेम अगदी ताजेतवाने वाटत असे.... तीच्या मैत्रिणी तर तिला खूप त्रास द्यायच्या काय सीक्रेट आहे आम्हाला तरी सांग... तेव्हा सोनम मात्र लाजुन चूर व्हायची... 

काळ पुढे सरकत होत्या... आणि ह्यांचा एकमेकांसाठी असलेला वेडेपणा म्हणजे गोड बरं का?? वाढत होता... काही झाले तरी प्रत्येक एनिवर्सरीला दोघेच एकांतात जाणे, कॅन्डल लाईट डिनर करणे... थोडक्यात काय तर खरच एकमेकांसाठी मॅड झाले होते....

मोठ्या मुलीचे लग्न झाले... सारं काही छान पार पडले... आणि मुलगी सासरी गेल्यावर काय अवस्था असते तें त्याला आता समजत होते... परत एकदा जुने दिवस आठवून सोनमची माफी मागितली त्याने... सोनम म्हणाली आता जावई आलाय आपल्याला... आता हा वेडेपणा कमी करायला हवा...

त्यावर समीरने  सांगितलं आता तर खरी सुरुवात आहे राणी, आता आपला सेकंड हनिमून सुरु होणाऱ आहे.. सोनम लाजुन त्याच्या मिठीत शिरली.... आणि हळूच त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले... ऐन पन्नाशीत त्यांचे प्रेम परत नव्याने फुलले होते....

तेवढ्यात फोन वाजला, मुलीचाच होता.. भांडण झालंय असे वाटले तिच्या बोलण्यावरून,तिने फ़क्त उद्यां येते एवढच बोलुन फोन ठेवला....

ती घरी येईपर्यंत सोनम आणि समीरला काळजी वाट्त होती... आल्यावर तिने सांगितलं सर्व... तसे ते दोघे हसायला लागले... ती म्हणाली, बाबा मला तुझ्यासारखा नवरा पाहिजे.... तुम्ही कसे " मेड फॉर इच आॅदर कपल " आहात.... 

तशी सोनम म्हणते, आग राणी अरेंज मॅरीज झाल्यावर प्रत्येक जण यातून जात असतो,पण ही तुमची पिढी म्हणजे, सतत वाद घालून नाही पटत म्हणून वेगळी होते... पण 'मेड फॉर इंच अॉदर' होण्या आधी ' मॅड फॉर इंच अॉदर' व्हायला लागतें...तेव्हाच ते नाते टिकते...त्या साठी समजून घ्यायला हवी ती एकमेकांची "प्रेमाची भाषा...."

प्रेमाची भाषा??? म्हणजे काय? मुलगी म्हणाली....


सोनम आणि समीर म्हणतात सांगतो सगळे सांगतो... म्हणुन त्यांचे किस्से सांगतात... मुलीला हे सर्व नवीन असते कारण तिने आपल्या आई- बाबांना नेहमीं अगदी " मेड फॉर इच आॅदर कपल " म्हणूनच पाहिले असते...

सोनम म्हणते,
प्रत्येक कपल ची प्रेमाची भाषा वेगळी असते....अंडरस्टॅण्डिंग वेगळे असते.....चेमिस्री वेगळी असते....

समीर म्हणतो,
असो प्रत्येक वयात प्रेमाची भाषा बदलत जाते....

तर नवीन असताना एकमेकांना बघणं म्हणजे प्रेम....

हळू हळू थोड्या थोड्या होणाऱ्या स्पर्शा साठी झुरणे म्हणजे प्रेम.... आणि लग्न झाले की मग  निसर्गाचे ते गुपित उलगडते...तेव्हा एकमेकांसाठी झुरणे म्हणजे प्रेम अजिबात विरह सहन नाही होत त्या वेळेस.....

सोनम म्हणते,

मग् नवी नवलाई संपते....रुटीन सुरू होते....तरी पण वीक एन्डला वेळ देणे, मूवी, आऊटींग.... आणि मग् चाहूल लागते ती बाळाची..... आणि मग् प्रेमाची भाषा म्हणजे तिची काळजी, दवाखान्यात जाणे....अपॉइंटमेंट लक्षात ठेवणं.....

बाळ झाले की आयुष्यात बदल येतात.....दोघानाही वेळ मिळत नाही अशा वेळेस.... तिला बदल म्हणून बाळाला झोपवण, अंघोळ घालण, भरवण.....हे सुद्धा प्रेमच असते....

तिला किचन मध्ये मदत करण, कधी तरी चहा बनवून देणे....हे सुद्धा प्रेम असते....

मुलगी अगदी मन लावुन ऐकत असते...

समीर म्हणतो,

मुले मोठी होतात....बाकीचे खर्च वाढतात.....अशा वेळेस ती तिच्या हौस, मौज याना मुरड घालून गप्प बसते...मग् ओव्हर टाइम करून तिला नवीन बांगड्या देणारा तो....तें सुद्धा प्रेम नाही का????तिच्या वाढदिवसाला हळूच साडी हातांत ठेवणारा ....., कधी तरी गजरा देणारा, रात्री बायको,मुले झोपली की त्यांच्या अंगावर पांघरूण घालण हे सुद्धा अव्यक्त प्रेम असतंच की.....

जसे लग्नाचे वय वाढते, तसे प्रेमाचे रूप बदलून जाते, भाषा बदलत जाते...नाते लोणच्या सारखे मुरतं...

ती सुद्धा, त्याला हवे नको तें बघणं, किती भांडण झालं की नुसते बोलते मी काही करणार नाही....तरीही डबा, रुमाल, रोजच सर्व रुटीन न बोलता करत असते....कारण प्रेम असते म्हणूनच ना..... सकाळी उठल्या पासून त्याला असे लागतें, ही भाजी आवडत नाही, काय करू....असे विचार करताना त्या विचारात प्रेम असतेच ना.....काय रे कपाट हे???????  मी नाही लावणार परत....आणि संध्याकाळी घरी येई पर्यंत तिने सर्व आवरून लावले असते....

एकमेकांना सांभाळत, भांडत, गृहीत धरून, काळजी करत दोघंही संसार करत असतात....

आणि त्यातून त्याचं प्रेम बहरत असत हेच खरे.....

म्हणून कोणीही आपल्या प्रेमाची तुलना दुसऱ्याच्या प्रेमाशी करू नये..... प्रत्येक कपल वेगळे असते....त्यांचे प्रेम व्यक्त करायची पद्धत वेगळी असते....म्हणून त्या दोघांच्या भांडणात कधीच कोणी पडू नये....आणि त्याची बायको अशी, आणि तिचा नवरा असा, तें दोघे बघ कसे वागतात असे कधीही बोलू नये....

आताची पिढी हे सर्व बघते....त्यामुळेच भांडण वाढते आणि एका वर्षात वेगळं होतात.....

अरे तें काही वस्तू आहे का आवडली नाही, पटले नाही दुसरी घ्या....

नवरा किंवा बायको बदलून काही उपयोग नाही हो...बदलायला हवाय तो एकमेकांकडे बघण्याचा द्रॄष्टीकोन...जाणून घ्यायला हवे ती एकमेकांची प्रेमाची भाषा.....

सगळे ऐकून मोठ्या झालेली चिऊ बाई लगेच आपल्या नवऱ्याला फोन करते आणि सासरी परत जायची तयारी करते....

सोनम आणि समीर त्यांचे काय?असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना ?

अहो तें गेले सेकंड हनिमूनला.... राहिलेले क्षण जगायला....

लग्नानंतरचे प्रेम असेच असते नाही का??


अरेंज मॅरीज झाल्यावर प्रत्येक जण यातून जात असतो,हे दाखवायचा प्रयत्न मी या कथेमधुन केला आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे, आजु बाजूला जे बघायला मिळते त्यावरून सुचली आहे...माझ्या वैयक्तीक जीवनाशी त्याचा काही संबंध नाही....

हल्ली ची पिढी ही सतत वाद घालून नाही पटत म्हणून वेगळी होते... पण 'मेड फॉर इंच अॉदर' होण्या आधी ' मॅड फॉर इंच अॉदर' व्हायला लागतें...तेव्हाच ते नाते टिकते...
समीर आणि सोनम सुद्धा या चुकांमधुन शिकत गेले आणि त्यांचे नाते फुलत गेले...

कशी वाटली कथा?? प्रेमाची भाषा समजून घेणार ना??

नक्की सांगा अर्थात तुमच्या कंमेंट मधून...खूप प्रोत्साहन मिळते... असेच प्रेम राहू दे... 

साहित्य चोरी हा गुन्हा आहे. 
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी. 
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

© अनुजा धारिया शेठ

🎭 Series Post

View all