Feb 24, 2024
राज्यस्तरीय करंडक कविता

सुखाची परिभाषा..

Read Later
सुखाची परिभाषा..
शीर्षक : सुखाची परिभाषा..
कवितेचा विषय : सुखाची परिभाषा
राज्यस्तरीय करंडक कविता स्पर्धा (फेरी २) 


तुला पाहता कबूल करते जीवही जडला होता
जन्माच्या साथीदारातच मित्रही दडला होता 

मान्यच नव्हते कधी कुणाला मधूर अपुले नाते
पण मी केवळ तुझ्यामधे आकंठ बुडाले होते 

प्रेमाचे हे नाते अपुले स्वर्गातच ठरले होते 
नाकारुन मी जगास साऱ्या तुलाच वरले होते 

तुझ्या साथीने आजपावेतो क्षण क्षण हसला आहे
विरोध करणाऱ्यांना पुरता चापच बसला आहे 

प्रेमाइतके पवित्र नाते लिहिली सुंदर गाथा 
तुझ्यासोबती वचन पाळते कधी न अंतर आता

झुगारून या समाजास मी वसा घेतला नवासा 
उदंड सुखाची हीच मानते सहज सोपी परिभाषा 


© तनुजा प्रभुदेसाई 

जिल्हा : रायगड - रत्नागिरी. 
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

T

.

.

//