लक्ष्मणरेषा

its a story of Kalyani and her sister in law.


कल्याणी विचारात होती. आत्ताच प्रोजेक्ट मॅनेजर तिला सांगून  गेला होता कि काही झालं तरी या वीकएंड  पर्यन्त हे काम झालंच पाहिजे. कल्याणाची १ आठवडा  सुट्टी झाली त्यामुळे तिला खूप टेन्शन आल होत हे काम या एक आठवड्यात कस पूर्ण करायच. इतक्यात तिचा फोन वाजला- 

नलिनी- " ग कल्याणी, तू जरा दहा दिवस सुट्टी कडून गावी जाऊन ये. आईची तबियत बरी  नाही. मीच गेले असते ग पण इथे सोसायटीत अक्षु चा  डान्स  आहे. "

कल्याणीला  जास्त बोलता येत न्हवता ऑफिस मधून म्हणून तिने  हम्म  म्हणून फोन ठेवला. आता तीच डोकंच फिरलं. 

नलिनी कल्याणाची नणंद . अक्षु   नलीनीच्या २ वर्षाचा मुलगा.  नलीनीला फार घाण सवय होती. सतत कल्याणीला फोन करून कस वागावं, काय करावं हे सांगायची.  कल्याणीला आता कंटाळा आला होता.  मागचाच आठवडा सुट्टी कडून ती गावी जाऊन अली होती. गेल्यावर तिला कळलं कि सासू बाई काही आजारी नाहीत. त्यांना फक्त आजूबाजूच्या घरच बघून असं वाटायची कि आपली सून पण इथे आपल्या हाताखाली कामला हवी.  म्हणून हि शक्कल त्यांनी  लावली होती. त्यांना माहित होत आजारी एव्हडं ऐकलं तरी कल्याणी धावत येईल. ती खूप हळवी आहे हे पुरत जाणत होते.  पण आता कल्याणीला हि कळून चुकलं होत कि  हे आपल्या स्वभावचा फायदा घेत आहेत. 

ऑफिस च काम संपवून ती घरी अली. मनीष आधीच आला होता.  तिच्या डोक्यातून अजून तो विचार गेला न्हवता . 
ती रागाने मनीष ला म्हणाली. 

कल्याणी- " मनीष मला सांग, ऑफिसची' डेडलाईन महत्वाची  कि २ वर्षाच्या मुलाचा सोसायटीला तला डान्स "

मनीष- " हे काय बोलत आहे "

कल्याणी- " नाही आधी तू सांग. "

मनीष - "ऑफिसची डेडलाईन "

कल्याणी - " मग. तुझ्याबहिणीला एवढी कळत नाही का? "

मनीषा- "काय झालाय मला नीट सांगशील का?'

कल्याणी- " नलीनीचा दुपारी फोन आला होता. आईंची तबियत बिघडली आहे तू आजून १० दिवस सुट्टी कडून जा म्हणाली.  मला सांग ती काय माझ्या घरची कंपनी आहे का  कि कधी पण सुट्टी घ्या कधी पण काम करा.  ऑलरेडी मागच्या आठवडा सुट्टी घेतल्याने माझ्यावर कामाचा लोड वाढला  आहे. सरानी  या वीकएंड पर्यन्त मला काहीही करून ते सगळं पूर्ण करायला सांगितलं आहे.  कस करू सांग. आणि वर मला म्हणते  मीच गेले असते पण अक्षु चा सोसायटीमध्ये डान्स आहे. आता मला सांग तो डान्स खरंच  महत्वाचं आहे का. ? २ वर्षाचं बाळ ते. त्याला काय आहे त्याच.  आता हिला कळू नये आईची तब्येत महत्वाची कि डान्स ते.  "

कल्याणी ला शांत करत मनीष ने पाणी दिले . पाणी पिऊन कल्याणी पुन्हा बोलू लागली. 

कल्याणी-  "आणि करायला हि काही नाही माझं. पण मला सांग मी तिथं जाऊन काय त्या बऱ्या होणार आहेत का?
 मी तिथं जाऊन काय उपयोग. तिथं डॉक्टर्स नाहीट्स . मेडिकल सेवा नाही. त्यापेक्षा त्या इथे आल्या तर मी त्याची सेवा आणि माझं काम दोन्ही नीट करू शकेन.  शिवाय इथे त्यांना चांगली मेडिकल ट्रीटमेंट हि मिळेल. पण नाही त्यांना इथे यायचाच नाही. . मी पर्वा गेले तर त्यांना  काही त्रास होत न्हवता. त्याना  फक्त तिथे काम करणारी सून हवीय.  पण मग असं होत तर लग्न करताना सांगायचं ना. तेव्हा काय म्हणाल्या. ? मला नोकरी करून मुलाला हातभार लावणारी सून हवीय. मी ते करतंय तर मग त्यांचा हा अट्टाहास का?  तस जर हवं असल तर मग त्यांनी इथं येऊन राहावं. मी कधी नाही म्हणलं आहे. का? इथे तर त्या काहीच काम करत नाहीत. चहा पिलेली काप बशी सुद्धा  सिंक मध्ये  ठेवत नाहीत. मग मिळतो ना इथं अराम मग  राहावं इथं. ते पण नाही. "

मनीष ने तिला मोकळं होऊ दिला. कल्याणीने  हि तिला  होत असलेली घुसमट बोलून दाखवली. 

मनीष- " तुझं बरोबर आहे. पण तुला माहिती  आहे का हे का होत आहे. कारण तू काही बोलत नाहीस म्हणून ते तुला ग्राह्य धरतात. नलीनीच्या स्वभाव मलाही माहिती  आहे.  ती लहानपणापासूनच दुसर्यांना अक्कल शिकवते पण स्वःता त्यातील कधीच काही करत नाही. तू जोपयंत त्यांना बोलत नाहीस तोपयंत हे असच चालू राहणार.  आपल्याला काही भांडण करायचं नाही आहे ,त्यांच्याशी . शांतपणे बोलायचं. "

कल्याणीला मनीष च बोलणं पटलं . तिने घरी सासूबाईंना फोन केला.  आणि सांगितली कि

 " आई, मला आता लगेच सुट्टी मिलाळायची नाही.. त्यापेक्षा तुम्हीच एकडे  या. आपण इथे चांगल्या हॉस्पिटल ला तुम्हला दाखवू. "

सासूबाईंनी हो नाही म्हणत फोन ठेवून दिला. हॉस्पिटलचं नाव घेताच त्या एकदम बऱ्या झाल्या होत्या. 

 दुसऱ्या दिवशी नलीनीच्या फोन आला परत कल्याणीला . 

नलिनी- " अग तू जात नाही आहेस म्हणे. अग ऑफिस महत्वाचं कि आईची तबियत. "

कल्याणीला मनीष बोलत आठवत होत . भांडायचं  नाही पण शांत पणे आपला  मुद्धा  मांडायचा. 

कल्याणी- " हो ना. मग तस तर सोसायटीला डान्स महत्वाचा कि आईची तबियत "

नलिनीला काय उत्तर द्यावं कळेना. आता तिच अडकली होती तिच्या बोलण्यात. 

नलिनी- " हो पण , अक्षुला कोण समजावर.  नाहीतर मीच गेले असते तुला सांगितलंही नसत . सासूसाऱ्यांची काळजी आपणच घ्यावी लागती हे तुला कळायला पाहिजे " ( कुत्सितपणे म्हणाली.  )

आता मात्र कल्याणीच्या पारा चढला . 

कल्याणी- " दोन वर्षाच्या मुलाचा हट्ट तू काय मला सांगतेस. त्याला तर काही माहित हि नसेल त्याबद्दल.  आणि सासू सासरीची काळजी सुनेचं घ्यावी असं का आहे. तू पण त्यांची मुलगी आहेस ना. इतर वेळी हक्काने वस्तू मागायला, लाड करून घायाला  माहेरी येतेस. तस  त्यांची काळजी करायला, सेवा करायला यायची वेळ आली कि तुला सून आठवते का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे सासू सासऱ्यांची काळजी कशी घायची हे मला तुझ्याकडून शिकायची गरज नाही.  एकाच शहारत असून नवऱ्याला वेगळं राहायला तू लावलास. त्यांच्या एकुलत्या एक मुलाला त्यांच्यापासून तू दूर केलस. तू मला सांगतेस ? आम्ही निदान कामानिमित्त तरी बाहेर आहोत पण असं आम्ही एका शहरात असतो तर तुझ्यासारखं वेगळं घर मी कधीच केलं नसत.  आणि मला हे हि महिती आहे कि आता तुला माहेरची गरज नाही उरली.  इतके दिवस तू माहेरी सतत येत होतीस कारण तुला सासरी एकत्र  राहायचं न्हवत. निवांतपणा  हवा असायचा . माहेरशिवाय तुला दुसरं घर न्हवत. पण आता एक महिन्यापूर्वी तुम्ही नवीन घर घेऊन तिथे फक्त तुम्हीच राहायला गेल्यावर  आता कशाला हवाय महेर. तिथंच मिळतो ना निवंतपणा.  मग कसे आठवतात आई आणि बाबा. पण मी तशी नाही आहे. 
 आणि एक. जेव्हा आपण दुसर्यांना चार गोष्टी शिकवतो ना तेव्हा त्यातील आपण किती आपल्या आयष्यात हे केलं आहे ते एकदा बघावं. मग बोलावं. "

कल्याणी ला बोलून मोकळं वाटलं. नलीनीला पण जे कळायचं होत ते कळलं. 
 असच होत आपल्या आयुष्यात. आपल्याला  लोक कस वागायचं, काय करायचं हे सतत शिकवत असतात पण त्यांच्या वर जेव्हा वेळ येते तेव्हा ते त्यांना जे योग्य वाटत तेच करतात आणि आपण मात्र बाकीच्यांचं विचार करून स्वतःच मत डावलून ते सांगतील तस करत बसतो. जो पर्यन्त आपण काही बोलत नाही ना तोपर्यन्त लोक आपला, आपल्या स्वभावाचा फायदा घेत राहतात.  म्हणून कुठं तरी लक्ष्मणरेषा आखावी लागते.