मोगरा फुलला आणि क्षणात ऋतु बहरली,
लक्ष्मीच्या पावलांनी जेव्हा तू घरात आली..
सुखाला आसुसलेलं होते हे मन,
जणू कुठे हरवलं होतं हे जीवन,
सरली रात्र, आणि सुंदर पहाट झाली,
लक्ष्मीच्या पावलांनी जेव्हा तू घरात आली.
मोहक रुप तुझं पाहुन, भान मी हरवलो,
स्तब्ध होऊन क्षणभर बघतच राहिलो,
आणि गालांवर तुझ्या मग पसरली लाली,
लक्ष्मीच्या पावलांनी जेव्हा तू घरात आली.
आता जन्म भराच्या आहे हृया गाठी,
तुझ्या आणि माझ्या सुंदर आयुष्यासाठी,
देवानं पहा कशी किमया घडवली,
लक्ष्मीच्या पावलांनी जेव्हा तू घरात आली.
मोगरा फुलला आणि क्षणात ऋतु बहरली,
लक्ष्मीच्या पावलांनी जेव्हा तू घरात आली.