Login

#जलद कथा लेखन स्पर्धा#मे #लग्नाची बेडी#लक्ष्मी भाग २

धनुच्या दादाच्या एका महत्वाच्या निर्णयाने कुटुंब झाले सुखी

सगळं कसं छान मनासारखं झालं होतं.

बोलवलेली सगळी मंडळी आनंदात सहभागी झाली

होती. आणि प्रत्येकानेच नवीन जोडप्याच तोंड

भरून कौतुक केलं होतं. 

          दुसऱ्या दिवशी पूजा आणि गोंधळाचा

कार्यक्रम होता. तो ही कार्यक्रम छान पार पडला.
आता नव दाम्पत्याला जेजुरीला दर्शनाला पाठवायचे
होते पण त्या आधी वधूच्या माहेरी नवदाम्पत्याच्या
हस्ते पूजा ठेवली. मग सकाळी सकाळीच दोघं
आवरून माहेरी गेली. बाकी पाहुणे मंडळी निवांत होती. सगळ्यांनाच नवीन सूनबाईच्या माहेरी आमंत्रण होतं. तिथला कार्यक्रम पार पडला, सगळी मंडळी घरी आली. सूनबाईने दादाला हळूच बाजूला नेले आणि म्हणाली,"मी चार पाच दिवस इथेच राहते." दादा हिरमुसला. पण त्याने परवानगी दिली. काय करणार?? इलाजच नव्हता. बिचारा नाराजीनेच घरी परतला. 
         दोन तीन दिवसा नंतर तो सूनबाईला आणायला गेला. जरा वेळ गप्पा टप्पा मारून दोघं घरी यायला गाडी वरून निघाले. अर्ध्या रस्त्यात आले तर चार पाच तरुणांनी त्यांना घेरलं. दादाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तीच त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहिली आणि तिने सांगितलं की,"माझं या तरुणावर प्रेम आहे. मी ह्याच्या बरोबरच संसार करणार. मला नाही यायचं तुमच्या बरोबर." दादा तर हे सगळं ऐकून हैराणच झाला. त्याला काय बोलावं तेही सुचेना. सगळं अकल्पितच होतं. तरी त्याने समजावण्याचा खूप प्रयत्न केला की घरच्यांना काय वाटेल, तुझ्या मम्मी पप्पांना काय वाटेल याचा विचार कर....आपण घरी जाऊन बोलू शांतपणे...मग ठरवू काय करायचं.... पण नाही......त्यांचा निर्णय झालेला होता. ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते नवीन सूनबाई ला घेऊन गेले. 
दादा शॉक मधेच घरी आला... सूनबाई नव्हती म्हणून सगळेच विचारायला लागले. पण तो काहीच बोलत नव्हता. कुठे तरी एकटक नजर लावून बसला होता. घरच्यांना तर काहीच कळत नव्हते. "अरे दाद्या काय झालं?? असा का बसला? अन् वहिनी कुठंय??" धनु विचारात होती. पण दादा होता तसाच मख्ख बसून होता.... आबा अन् माई आले त्यांनी खोदून विचारलं पण दादा काहीच बोलेना. "अरे गेली कुठं सूनबाई ? पडली का सूनबाई गाडी वरून ? झालं तरी काय??" माईने व्याकुळ होऊन विचारलं. लग्न होऊन चारदोन दिवस सुद्धा झाले नव्हते. नाना विचार माई आबांच्या मन:पटला वर उमटले. घायकुतीला आले बिचारे. दादा फक्त म्हंटला,"ती नाई आली." 
       आता नवनवीन तर्क वितर्क सुरू झाले. सगळेच दादाला का नाही आली, तिला कोणी काही बोललं का? काय झालं तरी काय?  नाराज झाली का ती? असे असंख्य प्रश्न विचारू लागले. शेवटी तो, "मला एकट्याला सोडून द्या" असं म्हणत आत जाऊन दार लाऊन बसला. 
सौ. मंजुषा गारखेडकर