May 15, 2021
नारीवादी

लक्ष्मीपुजन

Read Later
लक्ष्मीपुजन

लक्ष्मीपूजन

दिवाळी आली की चटकन आठवते ते लक्ष्मीपूजन, लक्ष्मी कोणती तर एक मातीची मूर्ती तिच्या सोबतीला धनलक्ष्मी पण सामान्य लोकांजवळ धन तरी किती एखादं मंगळसूत्र, एखादी अंगठी, किंवा मुठभर सिक्के त्यांच्या पूजेसाठी फुले आणायचे, मुर्ती आणायची, प्रसाद आणायचा म्हटल म्हणजे प्रश्न पडतो तो धनाचा. पण दिवाळी म्हटली की हे आलेच, ते करावेच लागणार, भलेही उसणवारी झाली तरी चालेल.

ही पूजा ही लक्ष्मी वर्षातून एका दिवसाची सोबती, एक दिवस आनंद देणारी, पण वर्षभर झिजून आनंद देणाऱ्या गृहलक्ष्मीचा विचार होतो का कधी? घरातील सर्वांत मोठे अपत्य म्हणून ते भाऊ घरची परिस्थिती एकदम बेताची दोनवेळच्या जेवणाचीही सोय नाही. कमवणारे हात कमी आणि खाणारे मुलेबाळे जास्त त्यात भाऊ मोठे त्यांना हे सारे सहन होत नव्हते म्हणून ते शहरात आले, घरुन पळून. गरीबीला कंटाळून मिळेल ते काम करायचे आणि शिकायचे.

वर्षामागून वर्ष गेले. परिस्थिती थोडी बरी झाली, भाऊंना नोकरी मिळाली. दोन पैसे घरी पाठवता येवू लागले राहायला एका छोटयाश्या झोपडीची सोय झाली. भाऊंना मग लहान बहीन भावांचा विचार? त्यांच्या जवळ एक-एक येवून राहू लागले शिकू लागले अशातच भावाचे लग्न झाले. घरात गृहलक्ष्मी आली. खेडयाचीच परिस्थिती आता शहरात जाणवू लागली कमवणारे एकटे भाऊ आणि शिकणारे खाणारे घरात पाच-सहा माणसं कसा भागायचा खर्च, घराचे घरपण राखता राखता लक्ष्मीची तारांबळ व्हायची दोन पैशाची मदत होईल म्हणून ती पण कामावर जावू लागली. भाऊंच्या कुटूंबाची जबाबदारी आता तिच्यावरही आली होती. दिरांचे-नंदाचे करता करता जिव मेटाकुटीला यायचा दिवसभर कामाच्या खस्ता आणि रात्री उदयाचा विचार, कुणाचे प्रेमाचे. मायेचे दोन शब्द नाही की कुणाचा आधार नाही. भाऊ हो भाऊ असायचे पण एवढयाश्या झोपडीत नंदा-दिरांसमोर भाऊ सोबत बोलणारतरी कसे भरल्या घरात दामपत्यांला जरुरी एवढा एकांतही कधी मिळत नसे. पण लक्ष्मीने कधी कुरबुर केले नाही आहे. त्याच परिस्थितीत ती संसाराचा गाडा रेटत राहिली. ती पण आता चिल्यापिल्यांची आई झाली भाऊ व लक्ष्मीवरील जबाबदारी अधीकच वाढली. भावांचे शिक्षण बहीनचे लग्न यातच भाऊ कर्जबाजारी झाले परिस्थितीशी चार हात करता करता भाऊंना दारुचे व्यसन लागले खरंच दारुने दु:ख कमी होतात का? होत ही असतील कदाचित म्हणून तर बरेच भाऊ त्यांचा आधार होतात. पण लक्ष्मीचे काय आजपर्यंत कधी कुण्या लक्ष्मी व्यसनात बडून व्यापापासून अलिप्त होता आलं नाही ते तीला स्वता:च्या सयंमात सहनशक्तीनेच सहन करावं लागते.

    नंदासाठी आईच्या रुपाने मिळालेली लक्ष्मी दिरांना आधार देणारी

    लक्ष्मी भाऊंना सावरणारी लक्ष्मी, मुलांना वाढवणारी लक्ष्मी

किती रुपे लक्ष्मीचे आपण आपल्या याचं लक्ष्मीची पूजा नको का करायला.