लाखात एक माझी मामी

Maintain the relation is very hardful..our nature is fully depend upon the maintaining...

लाखात एक माझी मामी...

मी तेव्हा सहाव्या वर्गात शिकत होते,जेव्हा मामा अन् मामीच लग्न झालं होतं...परंतु मला आज देखील पूर्ण आठवीते,.. ज्यावेळी मामांनी पहिल्यांदा मामीला बघितलं..मुलगी बघण्याचा कार्यक्रम चालू होता,अन् मामांनी मामीला बघता क्षणी होकार दिला..

मी मात्र त्यावेळी मामांकडे बघतच राहिले,मामा दिसायला छान अन् मामी...म्हणजेच मामीचा सावळा रंग पण नकी डोळी चांगल्या...पण माझ्या ईवलास्या मनाला मामी काही भाळली नव्हती,त्या वयात मला फक्त मामीचा रंग दिसला...स्वभाव नाही....

आणि माझ्या इवलास्या मनाने मामाला स्पष्ट शब्दात सांगितले...

मामा...मला मामी पसंत नाही,तुम्ही नका करू लग्न...

मामा काहीही न बोलता हसले,आणि मला हसतच म्हणाले का ग सोनू...तुला आवडली नाही का मामी...

नाही न....

ते मन कोवळे त्या वयात काहीच कळत नव्हते अन् बालिश मनाने मामीला नकार दिला होता,फक्त रंगावरून मी मामीला नाकारलं,.. माझा ही तर रंग सावळा च होता...पण तेव्हा कुठे काय कळले होते...

माझ्याकडे दुर्लक्ष करत सर्वांनी म्हणजेच आई,बाबा,आजी व मामा यांनी मामीला पसंती दिली,व झाले लग्न मामाचे...आल्या मामी घरी...

लग्न आनंदाने पार पडले,,मामा ही खूप आनंदी होते,..एकदा नवीन नवीन लग्न झाल्यानंतर मामा व मामी आमच्या घरी आले..आई ने त्यांना पाहुणचार वैगरे केला,मामिकरिता एक साडी देखील घेतली...मामींनी मोठ्या आनंदाने साडी घातली,मामी नवीन असून सुद्धा घरात सर्वांशी मनमोकळे पणाने बोलत होती,..माझ्याशी देखील मामी बोलल्या...

मामींनी माझ्याकरिता एक ड्रेस आणला होता,मला दिला अन् तो ड्रेस मिळाल्याबरोबर मामी मला आवडली...काय करणार बालिश मन ते....थोडंसं लालची,पण लहानपणी एखादी वस्तू मिळण्याचा आनंद हा जगावेगळा असायचा...

मग काय मामी आपली बेस्ट झाली...

मला आज ही आठवण होते जेव्हा आम्ही म्हणजेच मी आणि माझे भाऊ मामाकडे जायचो,तेव्हा मामी केव्हाच आम्हाला दुख्वत नसे,,आम्ही गेलो की नवनवीन पदार्थ करायची...सतत विचारायची काय खाणार तुम्ही सांगा...आणि लगेच जो पदार्थ सांगितला की मोठ्या उत्साहाने ती करायची...

मी तर जेव्हा केव्हा मामिकडे गेली तेव्हा मामीने एकही काम मला करू दिले नाही,,..सर्व काही हातात,,अन् एखादं काम करते म्हटलं की नको राहू दे म्हणत स्वतः करायची...

अगदी खूप म्हणजे खूपच लाड केला मामीने माझा आणि माझ्या भावांचा,या जगात अशी मामी मिळायला भाग्यच लागतं...

सुखा दुःखात कायम मामी सोबत,कधीच तिने आम्हाला दूर केले नाही...

माझा मोठा भाऊ वारला तेव्हा मामी ने आधार दिला,...माझ्या लग्नात देखील सर्वात आधी येऊन सर्व कामे मोठ्या हौसेने केले,आणि मन भरून नाचल्या देखील...आणि मला ,माझ्या आईला देखील नाचविले...लहान भावाच्या लग्नात देखील सर्व हातभार मामींनी लावला,आणि त्याच्या लग्नात देखील मनसोक्त होऊन मामी नचल्या...

येवढेच काय तर माझे डोहाळ जेवण माझ्या माहेरी होते त्यावेळी सुध्दा मामी आल्या होत्या,आणि मामिनेच माझी तयारी करून दिली,मस्त पैकी मामा आणि मामी ने पाळणा सजविला...किती हौसी माझी मामी...सर्वकाही आईच्या सोबतीने उत्साहाने करत होती...

माझ्या मुलाच्या बारशाला मामी आली होती,मुलाची तब्येत अचानक बिघडली त्यावेळी मामीला पण तेवढेच दुःख झाले होते...माझ्या व माझ्या आईच्या डोळ्यातील अश्रू पाहून मामी ही रडत होती....आमच्या प्रत्येक सुख दुखत मामी केव्हाही बोलावलं तरी येतेच...

आजही आम्हाला आमच्या मामीचा खूप आधार वाटतो आणि हक्काने आम्ही मामीला बोलावतो...आजच्या काळात मामी हे पात्र थोडे दूरचे पण आम्हाला येवढी प्रेमळ मामी मिळाली म्हणजे आमचे भाग्यच थोर म्हणायचे....

खरंच लाखात एक आहे माझी मामी....अशी मामी सर्वांना मिळो...


Ashwini Galwe Pund...