लहानपणी साजरी केलेली हरितालिका

Haritalika is the traditional women festival

लहानपणी साजरी केलेली काजळती....

लहानपण दे गा देवा,
मुंगी साखरेचा रवा,
खरच लहानपण म्हणजेच बालपण जर पुन्हा मिळालं तर सर्वांना च बालपणात पुन्हा जायला खूप आवडेल,कारण बालपणात मिळालेल्या सुखाची गणना कशातच होऊ शकत नाही,आणि त्या आठवणी सर्वांना हव्ाहव्याशा वाटतात,,,माझेही काहीसे तसेच मला माझ्या बालपणातील काजाळती म्हणजेच हरितालिका पूजन खूप आवडायचे....

माझी आई थोडी धार्मिक स्वभावची असल्यामुळे ती खूप छान हरितालिका पूजन करत असे,,,,आजही करते,तिची काजळतीची पूजा बघण्यासाठी आमच्याकडे खूप बायका यायच्या,,अन् माझ्या आईच्या पूजेला खूप छान कॉमेंट देत असे,,...मला मात्र त्यावेळी आईचे खूप च कौतुक वाटायचे,खूपच उल्हसाने आई पूजा करायची,अन् त्यात माझ्या आजीची ही तिला पूर्ण साथ मिळायची...

काजळति च्या दिवशी सर्वात आधी मी माझी आई व आमच्या आजूबाजूच्या काकू,तसेच माझ्या मैत्रिणी आम्ही सर्वजणी छान नदीवर जायचो,मग नदीवर मज्जाच मज्जा तिथे मस्त नदीत आंघोळ,अन् खूप वेळ नदीत च आम्ही सर्व मुली खेळायचो,...माझी आई व काकू वैगरे नदीमधून च वाळू ची पिंड काढून आणायच्या....

घरी आल्यानंतर त्या पिंडीला स्थापित करण्यात येत असे,,,आणि त्या नंतर मग आम्ही सर्व मुली वनस्पती गोळा करायला जात असे, सोळा प्रकारच्या वनस्पती वेगवेगळ्या झाडाच्या तोडून आणण्यात खूप मज्जा यायची...नंतर त्या वनस्पती सोळा सोळा मोजून ठेवण्यात येत असे...या सर्व गोष्टी मध्ये आम्हाला खूपच मजा यायची...

मग आई त्या सोळा वनस्पती वाळू च्या पिंडीवर वाहून विधीपूर्वक पूजा करत होती,पूर्ण वनस्पती वाहून झाल्यावर हरितालिका पूजनाचे पुस्तक वाचत असे,ती कहाणी मी ,माझी आजी,काकू आम्ही मन लाऊन एकत होतो,...आईची कहाणी वाचून झाली की आरती करून सुहासिनी बायांना बोलावून आई त्यांना हळदीकुंकू लावायची...

मग हळदीकुंकू मध्येच बराच वेळ जायचा,त्यानंतर आम्ही मुली छान पैकी साड्या नेसून एकमेकींच्या घरी जायचो,आणि त्या रात्री आम्ही सर्वजणी जागरण करायचो,,,,जागरण करतांना धम्माल मस्ती करायचो,कुणी छान छान नाटक करायचे,तर कुणी एकमेकींच्या नकला,...अन् आम्ही मुली मुली मस्त पैकी डान्स करायचो....खूप मज्जा यायची जागरण करतांना,असे वाटायचे ती रात्र संपू च नये ..

खरच किती छान होते ते लहानपण,,आणि त्यातील प्रत्येक सण,,आता ती मजा रहलीच नाही...मला आजही ती काजाळति जशीच्या तशी आठविते,...तो साजशृंगार,तो काटेकोर उपास,ते हळदीकुंकू,,, खरंच त्या दिवसांना तोड नाही,,आजही सर्व सण केले जातात पण तो आनंद मात्र आता उरला नाही....

Ashwini Galwe Pund...