लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग

Story of two frends and their marriage

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग

सावनी आणि अवनी दोघी सायकल वरून घरी निघाल्या होत्या .. नुकतेच कॉलेज सुटले होते आणि आता घरी जायचे आणि संध्याकाळी ७ वाजता पुन्हा याचा तिठ्या वर भेटायचं ठरवत होत्या ..

अवनी " काय आज तुझा मूड ऑफ का दिसतोय ?"

सावनी " अग काय सांगू ? अजून एक वर्ष बाकी आहे तरी घरचे आता पासून स्थळ बघायला लागलेत .. पप्पा आणि आई बोलताना   ऐकले कोणीतरी पुढच्या आठवड्यात मला बघायला येणार आहे .. "

अवनी " ओ हो .. मॅडम .. मग जोरदार .. मग काय करतात आमचे जिजाजी ... " अवनी आला चिडवायाच्या टोन मध्ये बोलत होती

सावनी " काय करतो काय माहित ? मला हे सगळं आता नको वाटतंय ग .. आधी शिक्षण तर पूर्ण होऊन द्यायचं ना .. काय घाई आहे ?"

अवनी " अग ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवा मग ?"

सावनी " म्हणजे .. ???

अवनी "मुलगा पसंत करून ठेवायचा .. शिक्षण झाले कि उडवायचा बार "

सावनी " शहाणे .. तुला काय जातंय सांगायला .. किती ऑड वाटतं असे साडी नेसून कोणाच्या तरी समोर जायला .. आणि सगळे लोक आपलेच निरीक्षण करणार .. शी,.. मला तर बाबा लाज वाटते "

अवनी " बरं .. चल मी जाते.. आणि आता तुझे लग्न झाले तर मी काय करू ? तुझ्या शिवाय माझी कोणचं मैत्रीण नाहीये .. मी तुझ्या घरी येऊन तुझ्या आई ला सांगू का सावनी चे लग्न इतक्यात नका लावू   म्हणून "

सावनी " नको .. आई ओरडेल मला .. मी तुला का सांगितले म्हणून .. आणि तू सुद्धा कोणाला सांगू नकोस काय ?"

दोघी एकमेकींना बाय करून आपापल्या घरी निघाल्या

सावनी घरात आली पायावर पाणी घेतले आणि स्वतःला चहा टाकायला गेली .. कारण चहा नाष्टा झाला कि लगेच  क्लास ला जायची ती "

सावनी " आई तुला चहा हवाय का ?"

आई " नाही नको .. मी पडते जरावेळ .. आज खूप काम होते .. आता पाठ लावलीय .. झोपेत म्हणते थोडा वेळ "

सावनी " ठीक आहे "

सावनी जरा नाराजच होती .. बाहेर टेबल वर एक इन्व्हलोप होते .. तिने ते सहज ओपन केले तर त्यात एका मुलाचा फोटो होता .. मिशीवाला मुलगा बघून सावनी ला धडकीच भरली .. मनातच म्हणाली " याक " .. पटकन फोटो पुन्हा होता तसा  ठेवला पण आतून जोर जोरात रडावे असे वाटू लागले .. नकोय मला हे सगळे .. का माझ्या मागे लागलेत हे लोक .. हा एवढा मोठा मुलगा .. मला नाही आवडलाय ... असे तिचे मन तिला जोर जोरात सांगू लागले

सावनी ने चहा नाश्ता केला आणि तिची क्लास ची बॅग घेऊन ती तडक तिठ्या च्या इथे येऊन थांबली

थोड्याच वेळात अवनी आली .. जशी अवनी आली तशी सावनी भळाभळा रडायलाच लागली

अवनी " अग .. काय झालेय काय ?"

सावनी " अग एक ना मी त्या मुलाचा फोटो बघितला आता .. शी अग  त्याला मिशी आहे "

अवनी " मग काय झाले ? मिशी आहे म्हणून कोणी रिजेक्ट करत का ? बावळट ? अग  काय करतो हे तरी बघायचेस ?"

सावनी " जा मी तुझ्याशी आता बोलणारच नाही या विषयावर .. तुला ना मी काय सांगते ते कळतच नाही "

अवनी " नको बोलूस .. चल क्लास ला उशीर होईल "

दोघी क्लास ला येऊन बसल्या

सर त्यांचे नेहमीचेच .. पण आज अवनी चे लक्ष सरांच्या मिशीकडे गेले आणि तिला जोर जोरात हसू यायला लागले

सावनि  " अग काय मूर्ख ...हसतेस काय ? सर ओरडतील ना .. गप्प बस "

अवनी " सरांची मिशी बघितलिस का ?"

सावनी  " शी ... काय ग ? निर्लज्ज .. सरांना कळलं ना तर दोघींना क्लास च्या बाहेर काढतील "

अवनी " कशी बशी तिच्या हसू  कंट्रोल करत होती "

शेवटी सरांनी विचारलंच " एनी प्रॉब्लेम सावनी अँड अवनी ? यु बोथ आर डिस्टरबिंग क्लास "

सावनी " सॉरी सर"

अवनी " सॉरी सर " आणि तोंडावर हात ठेवून हसूच आवरेना तिला "

सर " गेट आऊट "

क्लास सुटल्यावर सावनी बाहेर आली आणि जे तिला खांद्यावर मारू लागली सटासट

सावनी " अग , काय वेड लागलं होतं काय तुला ? काही पण  करतेस  "

अवनी " सॉरी .. सॉरी "

तेवढ्यात त्यांच्याच  क्लास मधला सुशांत आला ..

सुशांत " हाय "

अवनी " हाय "

सावनी काहीच बोलली नाही म्हणून सुशांत तिच्या कडे बघून

सुशांत " हाय सावनी "

सावनी " हाय "

सुशांत " सावनी , मला आज शिकवलेला प्रॉब्लेम कळला नाही ग .. माझी  बॅलन्स शीट टॅली नाही झाली .. नाही म्हणजे तुझी झाली असे तू सरांना सांगितलेस .. मला नोटबुक देतेस का तुझी ?"

अवनी " ए .. सुशांत .. शांत बसायचं काय ? उगाच फालतू ची कारण काढून  इकडे बोलायला यायचं नाही काय ? तुला नाही कळलं तर सरांना विचार ना ? उगाच तिला कशाला त्रास देतोय "

सुशांत " ए अवनी .. मी तुझ्याशी नाही बोलत आहे .. तर तुझे तोंड बंद ठेवायचं काय ? मी तिच्याशी बोलतोय ना .. तिला काही प्रॉब्लेम असला तर ती सांगेल मला "

सावनी राहिली बाजूला ह्या दोघातच जुंपली .. सावनी आपली शांत बसली होती  .. आणि ते दोघे भांडत होते

सुशांत " सावनी , अग बोल कि .. देणार आहे का नोट बुक .. का नाही ? या पोरीच्या नादाला लागायला मला वेळ नाही .. हि काय तुझी बॉडीगार्ड आहे का ?"

अवनी " हो .. मी आहे तिची बॉडीगार्ड .. तुला काय करायचंय रे "

सुशांत " चल .. जाऊ दे मी पण कोणाच्या नादी लागतोय .. मी निघतो "

आणि सुशांत निघून गेला तरीही सावनी थंडच होती .. तिला स्वतःचे निर्णय घेताच येत नाहीत .. नोटबुक सुशान्त ला द्यावी का नाही द्यावी ? ह्या प्रश्नाचे  उत्तर सुद्धा तिच्याकडे नव्हते.

सुशांत जरा तणतण करतच गेला ..

सावनी " काय गरज होती भांडण करायची ? तुला नेहमी ओव्हर रिऍक्ट करायची सवय झालीय .. तुला माहितेय ना तो किती हुशार आणि अभ्यासू मुलगा आहे ..त्याला काहीतरी दुसरे कारण सांगून पण नसती दिली नोटबुक तरी चाललं असते ना .. एवढे भांडून काय मिळवलंस "

अवनी " ए हॅलो .. इथे मी तुझ्यासाठी त्याच्याशी  भांडले  आणि तू वर मलाच झाप "

सावनी " तसे नाही ग ? त्याचे मन दुखावलेस ना तू .. बिचारा सुशांत "

अवनी " एक काम कर .. तुला घ्यायचीय का त्याला वही .. मला त्याचे घर माहितेय आपण जाऊन देऊन येऊ "

सावनी " नको ग .. घरी कशाला .. उगाच काही पण ?"

अवनी " मग काय करायचंय  काय तुला ? हे बघ सावनी एवढी काय टेन्शन घेतेस .. यार थोडी चिल मार .. सगळ्या गोष्टींचे टेन्शन घेते .. तो सुशान्त कोण लागून गेला मोठा .. गेला उडत तो .. चल घरी जाऊ .. उद्या सकाळी भेटू इथेच .. “आणि दोघी त्या तिठ्या पासून आपापल्या घरी गेल्या .

अवनी तिच्या घराच्या रस्त्या कडे जात होतीच तर सुशांत एकटाच तिच्या मागे आला

सुशांत " ए अवनी थांब .. मला बोलायचंय तुझ्याशी ?"

अवनी जरा घाबरली

अवनी " मला वेळ नाही .. "

सुशांत " ए अवनी .. दोन मिनिटे थांब ? "

अवनी सायकल वरून उतरली " बोल पटकन .. मला घरी जायचंय "

सुशांत " तूला काय प्रॉब्लेम आहे ? मी आणि सावनी फेंड्स झालो तर .. तू का आमच्या मध्ये येतेस नेहमी नेहमी ?"

अवनी " मला नाही आवडत तिच्याशी कोणी बोललेलं .. माझी  बेस्ट फ्रेंड आहे ती "

सुशान्त " पण मला आवडते ना ती .. नेहमी तू माझ्या आणि तिच्या  मध्ये येतेस ?"

अवनी " ए येड्या .. उगाच काय पण बोलू नकोस काय तिच्या बद्दल .. "

सुशांत " अरे खरंच .. मला ती आवडते .. आता तुला कसे सांगू "

अवनी "अरे तिचे लग्न ठरलंय ? आणि तिच्या घरचे खूप स्ट्रिक्ट आहेत .. तू उगाच मर खाशील "

सुशान्त एकदम नाराज झाला .. लग्न ठरले ऐकल्यावर त्याचे तर अवसानच गळाले ."

अवनी " चल .. बाय .. मी निघते "

सुशांत ने तिला बाय पण नाही केला इतका नाराज झाला होता

अवनी ला पण तो जरा सावनी च्या बाबतीत सिरिअस च आहे असे वाटला

पुढे असेच चार दिवस गेले सुशांत ना क्लास ला आला ना कॉलेज ला .. अचानक कुठे गायब झाला कोणालाच काही कळले नाही

आज सावनी ला बघायला तो 'मिशीवाला' मुलगा येणार होता .

सावनी खूप नाराज होती .. आणि अवनी ला तिचे दुःख बघवत नव्हते

सावनी ला तिची आई तयार करत होती .. साडी , वेणी घालून देत होती .. चहा नाश्त्याची तयारी केली .

तेवढयात अचानक अवनी मॅडम नि सावनी च्या घरात धाड टाकली .. आणि असे दाखवले कि हिला काही माहीतच नाहीये

सावनीच्या आई ला आता अवनी चे येणे आवडले नाही .. शेवटी ती तिच्याच वयाची आहे ना .. आणि आता मुला  कडची लोक येण्याची वेळ झाली होती.

सावनी ला मात्र आपला बॉडीगार्ड आल्यामुळे आधार आला होता ..

अवनी " काकू द्या मी तिला गजरे लावते ?"

काकू " लाव ? पण ऐक अवनी .. तू बाहेर येऊ नकोस काय ? दोन दोन मुली बघितल्यावर मुले कन्फ्युज होतात "

अवनी " हो चालेल काकू "

सावनी ला एकदम मस्त तयार केली पण तिच्या तोंडावर बारा वाजलेलेच होते

अवनी " तुला एक सांगू का सावनी .. त्याला चहा द्यायला गेलीस ना कि असे डोळे फिरव म्हणजे त्याला वाटेल तुझ्या डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो तुला रिजेक्ट करेल " आणि स्वतः चे डोळे फिरवून ती चकणी बनली होती .. आणि  हसायला लागली .. तिला असे चकणे डोळे करताना बघून सावनी पण हसायला लागली

अवनी " बघ .. बघ हसतेस तेव्हा कशी मस्त दिसतेस .. अशी तर मुळीच हसू नकोस बाहेर .. नाहीतर तो फिदा होईल तुझ्यावर "

क्रमश:

🎭 Series Post

View all