लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग भाग ८

Story of two friends and their marriage

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग

भाग ८

विलास " काय रे ? आशिष .. तुझे काय झाले ? तू काल पोरगी  बघायला गेला होतास ना "

आशिष " हो .. करेन आता मी लवकरच लग्न .. मुलीने होकार दिला तर "

विलास " अरे तू पण इतके दिवस का थांबलास ? आता पुढल्या वर्षी झालेच पाहिजे .. वेळ काढू नकोस एकदा तिशी पार झाली कि घोड नवरा होशील .. एक वेळ लवकर झालेलं परवडेल पण उशिर नाही झाला पाहिजे "

आशिष " हो काका .. झालाच जरा उशीर माझ्या कडून "

विलास " ठीक आहे .. चल ठेवतो .. "

आशिष " काका ? एक विचारू का ?"

विलास " विचार ना बेटा राग  नको मानूस .. मला सुशांत सारखाच आहेस बाळा तू पण .. काळजी पोटी बोललो '

आशिष " हो नक्कीच काका .. सुशांत माझा लहान भाऊच आहे .. मी नेहमी तसाच बघत आलो त्याच्याकडे .. "

विलास " बरं विचार ? काय विचारणार  होतास ?"

आशिष " काका .. मी जे बोलत होतो ते सुशांत बद्दलच बोलत होतो .. तो जरा टेन्शन मध्ये आहे .. काल मी ज्या मुलीला बघायला आलो होतो ती त्याच्या क्लास मध्ये आहे आणि त्याला आवडते ती .. आणि मुलीचे बाबा जरा स्ट्रिक्ट आहेत .. कदाचित तिचे एक दोन लग्न लावायचा विचार चालू आहे त्यांचा .. आता काय करायच आपण ? मुलीला पळवून आणू का ? मी आणि सुशांत त्या मुलीच्या घराच्या खालीच आहे "

विलास " काय ? काय वेडे पणा आहे ?"

आशिष " हा पळवणे वगैरे जरा जास्तच होईल पण आता पर्याय नाहीये .. तुम्ही दोघांना घरात आसरा द्याल का ?"  तसा मी माझ्या कडे ठेवू शकतो त्याला बाबा आणि आई ला सुशांत मुला सारखाच आहे "

विलास " एक काम करा .. आता तसेही रात्र झालीय .. ७ वाजलेत .. तुम्ही आपल्या घरी या .. आपण डिस्कस करून मार्ग काढू.

आशिष " ठीक आहे ".. येतोच घरी .. "

विलास " सुशांत आहे का ? तुझ्या बरोबर ? "

आशिष " हो .. आहे .. देऊ का ?त्याच्याकडे फोन ?"

विलास " नाही नको ? घरी या मग बोलू निवांत .. त्याला सांग .. जास्त टेन्शन घेऊ नको "

फोन स्पीकर वरच होता .. हे वाक्य ऐकून थोडीशी स्माईल दोघांच्याही चेहऱ्यावर  आली

विलास " आणि एक .. थँक्स आशिष .. मोठ्या भावाचे कर्तव्य अगदी छान बजावलेस तू ? मला वेळेत सांगितलेस ते बरे केलेस "

फोन ठेवल्यावर सुशांत ने बसल्या बसल्याच त्याच्या दादाला मिठी मारली

सुशांत " थँक्स दादा .. बाबांना सांगितलेस म्हणून आता गोष्टी इझी होतील "

आशिष ने लगेच अवनी ला कॉल केला

आशिष ने फोन सुशांत कडे दिला आणि त्याला सांगितले कि सावनी ला विश्वासात घे आणि स्वतः गाडीतून खाली उतरला म्हणजे त्याला बोलयाला मोकळीक मिळेल

सुशांत " हॅलो अवनी .. सावनी शी बोलायचंय मला देतेस का तिला फोन "

सुशांत " हॅलो .. सानू .. एक ना .. कशी आहेस ? तू घाबरू नकोस काय ? आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत .. तुझे शिक्षण पण थाम्बणार नाही आणि लग्न पण इतक्यात होणार नाही यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय .. माझे बाबा तुझ्या बाबांशी बोलतील लवकरच .. तू काळजी नको करुस ?"

सावनी " हमम .. सॉरी माझ्या मुळे तुला खूप त्रास झाला ना "

सुशांत " नाही ग असे काही नाही .. तुझा कसला त्रास .. सानु .. माझे प्रेम आहे तुझ्यावर ... कधी सांगितले नाही पण आज आता सांगतो .. लग्न करेन तर तुझ्याशी च कारेन .. आणि कोणीच सपोर्ट नाही केला तर आपण आपला संसार आपल्या बळावर करू .. दादा नि अवनी आहेतच आपल्याला मदत करतील ते .. तुला मला वाऱ्यावर पडून नाही देणार .. "

सावनी " माझे बाबा ऐकतील ना पण .. त्यांनी नाही ऐकलं तर "

सुशांत " ऐकतील ना सानू .. का नाही ऐकणार ? एकच तर वर्ष मागतोय आपण त्यांच्याकडे .. "

सावनी " ठीक आहे .. पण मी पळून नाही येणार .. बाबा कडक आहेत पण माझ्यावर जीव आहे त्यांचा "

सुशांत " हो चालेल .. आपण बघू काय मार्ग निघतोय ते .. ठीक आहे .. काळजी घे आणि काही वाटले तर निदान मला तरी सांगशील का ? मला कसे कळणार तुझ्या मनात काय आहे ते ?"

सावनी " आता पर्यंत अवनी माझ्यासाठी ढाल म्हणून उभी राहिली .. ती नसती तर .. " तिला रडूच कोसळले

सुशांत " सानू .. रडू नको ना यार .. आम्ही येऊ का आता तुझ्या घरी सांग .. आता येतो "

सावनी " नको आता नको .. बाबा यायच्या आत अवनी ला घरी घेऊन जा .. बाबा आता येतील कधी  पण "

सुशांत " एक काम कर .. हा मोबाईल तुझ्या कडे ठेवतेस का आज ? म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तर रात्री मला मेसेज टाक .. मी येईल लगेच "

सावनी " नाही नको .. त्याही काही गरज नाही पडणार .. बाबा आहेत ते माझे .. काय झाले एखाद्या वेळी रागात हात उचलला तर .. त्यांना नाही आवडत असे कोणत्या मुला बरोबर बोलत उभे राहिलेलं "

सुशांत " बरं ठीक आहे .. तू काळजी घे ... आणि मी आता घरी बाबांना आपल्या बद्दल सांगतोय "

सावनी " आपले प्रेम आहे असे सांगितलेस तर बाबा कधीच परमीशन देणार नाहीत.. "

सुशांत " मग ? काय सांगू ?"

सावनी " तसेही आज आपली मैत्री झालीय .. इतक्या दिवसात आज आपण पहिल्यांदा बोललो "

सुशांत " मग ? काय सांगू घरी ? नक्की तुझे काय म्हणणे आहे ?"

सावनी " हे बघ सुशांत , तू राग नको मानुस .. माझ्या मुळे कोणाला त्रास झालेला मला नकोय .. तू अजूनही वेळ गेली नाही तू मोकळा आहे .. कदाचित नुसती मत्रीण म्हणून माझ्या कडे बघत असशील आणि उगाच माझ्या बाबांच्या मुळे गोष्टी लग्ना पर्यंत न्यायला नको "

सुशांत " मग तुला दादा पसंत आहे का ?"

सावनी " नाही .. ते खूप चांगले आहेत पण माझ्या साठी नाहीत "

सुशांत " आणि मी ?"

सावनी ला जरा धस्स झाले ..     

सुशांत " हॅलो .. सानू .. सांग ना .. आता मला किती गॅस वर ठेवणार आहेस .. मी आवडतो कि नाही तुला ? आज घरी गेल्यावर बाबा मला निक्षून विचारतील .. मला तू आवडतेस ग पण तुला मी आवडतो कि नाही मला अजून माहित नाहीये "

सावनी  काहीच बोलत नव्हती .. एकदम शांतता

सुशांत " शोना ! माझ्याशी तरी बोल ना .. "

तेवढयात अवनी ने फोन घेतला आणि सांगितले " तुझी शोना ! लाजून दातखिळी बसलीय तिला

सुशांत " ए .. तू का ऐकतेस आमचे बोलणे .. तिला दे ना फोन .. आता कुठे मला तिच्याशी बोलायला मिळतंय "

अवनी " अरे नाही रे आता मला खाली येऊ दे .. नाहीतर डॉन आया  तो मैं भी फस जाऊंगी "

सुशांत " बरं .. लास्ट एक मिनिट .. बाय  बोलतो तिला .. आणि स्पीकर वर नको ठेवूस फोन .. सिक्रेट टॉक "

अवनी " बरं बाबा नाही ऐकत मी .. मला माहितेय न तू काय बोलशील ते .. शोना ... लव्ह यु " हो ना "

सुशांत " अवनी .. यार प्लिज डोन्ट मेक फन ऑफ माय फिलिंग्स "

अवनी " सॉरी सॉरी .. घे देते तिला फोन आणि मी बाहेर जातेय बोल बिनधास्त .. मी किचन मध्ये जाऊन पाणी पियुन येते "

सुशांत " थँक यु .. वाहिनी "

तशी अवनी पण लाजली आणि तिने सावनी कडे फोन दिला

सुशांत " सावनी .. आर यु देअर "

सावनी " हो .. "

सुशांत " तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस .. लवकर दे ना ग "

सावनी " हो .. " आणि लाजून पाणी पाणी झाली होती ..

सुशांत " मी आवडतो ना .. या प्रश्नाचे उत्तर दिलेस ना ?"

सावनी " हो .. "

सावनी म्हणजे गाळांतरे भरत होती आणि एका वाक्यात उत्तरे देत होती तरी सुशांत ला तिच्या मुख कमालातून आलेला होकार म्हणजे मोठा निबंध असल्या सारखा आनंद देत होता

सुशांत " यु लव्ह मी  ना "

सावनी " हो "

सुशांत गाडीतच उद्या मारू लागला आणि गाडी हलू लागली  तसा आशिष धावत आला तर हा ठोंब्या एकटाच हसत गाडीत उद्या मारत होता .. आपण कुठे आहोत .. वेळ काय ? सिचवेशन काय ? काही फरक नाही .. तो आता हवेत होता ..

आशिष "  हॅलो ... तुझ्या आनंदावर विरजण नाही घालायचंय पण खरा मोगॅम्बो आला ना तर सगळे तोफेच्या तोंडा  समोर असू .. जरा आवरतं घे "

सुशांत " ओके बाय .. टेक केअर .. "

सावनी " हुम्म्म ... "

हमम म्हणजे तू म्हणालास तेच मला म्हणायचंय हे आता सुशांत ला सांगावे लागले नाही ..

अवनी खाली आली .. सुशांत ला आशिष ने घरी सोडला ..

सुशांत " दादा .. तू चल ना .. बाबा आले कि बरं पडेल "

आशिष " आलो .. आलो हिला घरी सोडून सोडून येतो .. "

आशिष आणि अवनी ला फायनली थोडासा एकांत मिळाला

अवनी " आशु , आपली गाडी जरा जास्तच फास्ट पळाली का ? काल संध्याकाळी मी तुला पहिले काय आणि आज आय एम विथ यु "

आशिष " हो ना .. माझी लग्न गाठ  तुझ्याशी जुळायची होती आणि तिची वेळ आली होती म्हणून सगळे पटापट घडले .. "

अवनी " हमम .. "

आशिष " आता तुझ्या आई ला नाही भेटत .. आज खूप दमलोय .. मस्त फ्रेश मूड मध्ये भेटायला येईल .. पाहिजे तर आई बाबांना घेऊन येईन म्हणजे तुला घरी काही प्रॉब्लम नाही होणार "

अवनी " चालेल .. केव्हाव्ही आज अचानक नकोच .. "

आशिष " पण मला भेटशील ना उद्या "

क्रमश:

🎭 Series Post

View all