लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग भाग ४

storie of two frends and their marrige

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग

भाग ४

आशिष " कोल्ड ड्रिंक सांगू ?"

अवनी " हा .. काहीही .. तुम्ही द्याल ते  काहीपण चालेल मला "

आशिष मनातच " टेरर आहे .. कायम दोन अर्थ निघेल असे बोलते "

अवनी " मग किती क्लाएंट आहेत तुमच्याकडे "

आशिष " ते समोरचे कपाट आहे ना ते भरलंय क्लाएंट्स नि .. "

अवनी " ओके .. "

आशिष " मग आता पुढे काय ?"

अवनी " कशा बद्दल बोलताय ते कळेल का ?"

आशिष " च्यायला हि मलाच अडकवतेय ?"

अवनी " तुम्हाला एक आयडिया सांगू का ?"

आशिष " बोल.. त्यासाठीच इकडे आणलय तुला .. म्हणजे नक्की तुझे काय म्हणणे आहे ते तरी मला कळू दे "

अवनी " सावनी च्या घरी फोन करून सांगा कि मला सावनी पसंत आहे .. पण मी एक वर्षां नंतर लग्न कारेन .. तोपर्यंत सावनी CA होऊन जाईल "

आशिष " आणि असे मी का मी सांगावे ? सावनी ला तर मी आवडलो नाहीये ना "

अवनी " हो .. पण आता जर तुम्ही रिजेक्ट केले तर उद्या तिचे बाबा दुसरं स्थळ घेऊन येतील .. आता सगळे काय तुमच्या सारखे नसतील .. आणि सावनी च्या तोंडातून बाबांच्या पुढे शब्द पण निघणार नाही .. मग तुमचा होकार आला कि निदान एक वर्ष तिला बघायला दुसरा कोणी येणार नाही .. म्हणजे सावनी जरा रिलॅक्स होईल "

आशिष " ओके .. आणि याचा  मला काय फायदा ?"

अवनी " याचा तुम्हाला पण आहेच कि फायदा .. म्हणजे  माझ्या साठी एक वर्ष तसेही तुम्ही थांबणार आहेतच ना .. ते तुम्ही दाखवायचं कि तुम्ही तिच्यासाठी थांबलेत .. तोपर्यंत आपले बंधू पण CA होतील आणि लग्नासाठी उपवर होतील ..मग त्या दोघांचे आणि मग आपल्या दोघांचे "

आशिष " काय ?"

अवनी " लग्न हो .. "

आशिष " या पेक्षा मी तुझ्या घरी येतो आणि तुला मागणी घालतो .. आपण लगेच लग्न करू .. म्हणजे त्या दोघांचा मार्ग मोकळा "

अवनी " पण सावनी च्या बाबानी दुसरा कोणी उभा केला तर .. ? मग आपला देवदास खरा देवदास बनेल आणि माझी सावनी कोणत्या तरी मिशीवाल्या ठाकूर ची बायको बनेल .. बिचारी "

आशिष " मग असे करतो मी उद्या मिशी काढतो आणि तिला होकार देतो .. तिला माझ्या मिशीचाच प्रॉब्लेम आहे ना .. मग मी मिशीच काढून टाकतो ना .. तशी मला सावनी पण पसंत आहेच ना " मुद्दामून तिला छेडतो .

अवनी " पण नाही ओ .. तुमच्या पर्सनल्यालिटीला मिशी नसलेली शोभणार नाही .. "

आशिष " हो का ? पण हि मिशी माझ्या लग्नच्या आड येतेय ना "

अवनी " पण एक वर्ष थांबायला काय प्रॉब्लेम आहे .. एवढी  काय घाई लागलीय .. मी करणार आहे ना तुमच्याशी लग्न "

आशिष " पण एक वर्ष मी काय करू ?"

अवनी " अहो .. आता ते पण मीच सांगू का ? "

आशिष " पण तू तर म्हणते सावनी ला होकार द्या .. तिला नको असताना तिच्या बाबांनी तिला माझ्या गळ्यात बांधली मग काय करू ?"

अवनी " नाही ना बांधणार .. अशी वेळ आली तर आपण पळून जाऊन लग्न करू ?"

आशिष " घ्या असले फालतू चे प्लांनिंग तुझे ? आता पळून जायचं वय आहे का माझे ?"

अवनी " बाय द वे .. किती वय आहे तुमचं ?"

आशिष " २९ "

अवनी " म्हणजे ६ वर्षांनी मोठे माझ्या पेक्षा .. बाबो .. तरीच"

आशिष " तरीच मी सांगतोय .. माझे आता लग्नाचे वय झालेय "

अवनी " एक मिनिट ..आधी सांगा .. तुमचा ब्रेक अप वगैरे तर नाही ना झालाय आधी .. आणि किती गर्ल फ्रेंड्स  होत्या ?"

आशिष " ए गप ए ..  अभ्यास एके अभ्यास करत बसलो म्हणून अजून राहिलो बिन लग्नाचा "

अवनी " मग ठीक आहे "

आशिष " म्हणजे ?"

अवनी " म्हणजे मला रिजेक्टड प्लॉट नको पाहिजे "

आशिष " तुझ्या तर आता .. आणि तिची चेअर त्याच्या चेअर जवळ ओढून घेतली त्याने "

अवनी " सॉरी ...  सॉरी .. "

आशिष " बरं  चल .. मी काय सांगतो ते पटतंय का बघ .. ऍडव्हान्स बुकिंग म्हणजे दोन्ही पार्टीला माहित असले पाहिजे कि नक्की  कोण कोणाला भेटणार आहे .. बरोबर .. आपण दोघे तुझ्या घरी जाऊ .. मी तुझ्या वडिलांना सांगतो कि मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय .. पण ते पुढल्या वर्षी .. मग तुझे बाबा म्हणतील एक वर्ष असे कसे ठरवून ठेवायचं .. आपण साखरपुडा उरकून टाकू .. आणि जर आपला साखरपुडा झाला तर त्याला म्हणतात ऍडव्हान्स बुकिंग "

अवनी " पण मग सावनी आणि सुशांत चे काय ?"

आशिष " हे बघ आधी मी माझा प्रॉब्लेम सोडवतो आणि मग सुशांत कडे बघेन "

अवनी "नको ना .. जर सावनी च्या घरी कळलं कि तुमचं आणि माझे जुळले तर .. सावनी ला ठोकून काढतीलच पण मला पण ठोकून काढतील "

आशिष " ओह गॉड ... तुझ्या डोक्यात काय काय चाललेलं असते ग "

अवनी " अहो माझी एकुलती एक फ्रेंड आहे ती .. तिला असे वाऱ्यावर सोडून मी कसे फक्त माझा विचार करू तुम्हीच सांगा ना .. "

आशिष " अग .. गधडे .. सुशांत ने अजून तिच्याशी मैत्री केली नाही .. तो कधी मैत्री करेल .. कधी प्रपोज करेल .. आणि कधी ते लग्न करतील .. तोपर्यंत आपण काय वाट बघत बसायचं का ?"

अवनी " हमम .. पॉईंट टू बी नोटेड .. "

पाच एक मिनिटाची शांतता

अवनी " या दोघांना .. "

आशिष " सोडून देऊ त्यांच्या हाल वर "

अवनी " नाही .. हे काय सोल्युशन झाले

आशिष " मग ?"

अवनी " मग थांबू सगळेच एक वर्ष .. तुम्ही सावनीच्या बाबांना कसे पटवता ते बघा .. त्यांना पटवा कि पुढल्या वर्षी लग्न करतो .,, एक वर्षा नंतर एकाच मांडवात दोन लग्न करू ?. "

आशिष " आणि सुशांत आणि सावनी चे जमलेच नाही तर .. “

अवनी " तुम्ही फारच निगेटिव्ह बोलता .. न जमायला काय झाले .. जमेलच ना .. "

आशिष " तुझ्या ना डोक्यात काय ऍडव्हान्स बुकींग च भूत बसलाय काय माहित .. कोण आहे तो तुझा गुरु ?"

अवनी " माझी मीच गुरु आहे "

आशिष " अग .. सगळ्या गोष्टी अश्या डोक्याने नसतात खेळायच्या .. काही गोष्टी हृदयाने खेळायच्या असतात "

अवनी " म्हणजे ?"

आशिष " म्हणजे ? वाघाचे पंजे ?"

अवनी : सांगा ना "

आशिष " म्हणजे तू लग्न ह्या गोष्टीला एक व्यवहार म्हणून बघतेय ..  हि पसंत नाही म्हणून दुसरी असे नसते .. किंवा ह्याच्या  जवळ नाही जमत म्हणून त्याच्याशी जमवायचं असे पण नसते .. "

अवनी " मग कसं ? तुम्ही तर तसेच करताय ना पण ? आणि मला का कन्फ्युज करताय "

आशिष " हे बघ .. वर करणी तुला असे दिसतंय पण तसे नाहीये .. "

अवनी " मग कसे आहे ?"

आशिष " इकडे बघ माझ्या डोळ्यात काय दिसतंय तुला ? तुला मी इकडे का आणली असेल ?"

अवनी ने त्याच्या डोळ्यात बघितले आणि म्हणाली "हा बरोबर बोलताय तुम्ही तुमच्या डोळ्यांत फक्त लग्न दिसतंय "

आशिष " कपाळ माझे "

अवनी " मग काय बोलताय .. मला काहीच काळात नाही "

आशिष " तुला काल टेरेस वर पहिली आणि मला तूच दिसतेय सगळीकडे .. सावनी इज गॉन .. शी इज vanished "

अवनी " मग आता .. ?"

आशिष " मग आता मला फक्त तूच वाचवू  शकतेस ?"

अवनी "  मी काय करू म्हणजे तुम्हांला बरे वाटेल ?"

आशिष मनातच " आशिष , तेरे बहोत बुरे दिन आ गये है अभि .. 'तेरी तो वाट लागने वाली है .. इसको तो प्यार क्या है मालूम नहीं है "

आशिष ने ग्लास मधले पाणी  प्यायले ..

आशिष " अवनी समजा , माझे लग्न सावनी शी झाले तर चालेल तुला ?"

अवनी " अजिबात नाही .. आणि ती जोर जोरात मान नाकाराच्या दृष्टीने हलवू लागली .. आशिष ला थोडे बरे वाटले

आशिष " का ? का नाही आवडणार ? सांग बघू ? " तो अगदी कॉन्फीडंन्स मध्ये बोलू लागला .. त्याला वाटले हिला आपला मुद्दा काळाला

अवनी " कारण सावनी ला मिशी वाला मुलगा नकोय .. आणि तुम्हाला मिशी आहे .. "

आशिष " गाढव .. जरा वेळ सावनी ला बाजूला ठेवशील का ? इट्स अबाऊट मी अँड यु "

अवनी " ते कोल्ड ड्रिंक येणार होते ते विसरलात का ?"

आशिष ला कुठे डोके आपटू असे झाले होते .. आणि त्याने डेस्क वर डोके खाली ठेवले .. एकतर त्याचा मुद्दा तिला कळत नव्हता आणि तो इंपेशण्ट होत होता .. तेवढयात कोल्ड ड्रिंक आले .. .. अवनी ने आवडीने कोल्ड ड्रिंक प्यायले ..

अवनी " आता मला गेले पाहिजे "

आशिष " सॉरी तुझे लेक्चर्स माझ्या मुळे मिस झाले .. चल तुला कॉलेज ला सोडतो "

अवनी " उठली .. चला जाऊ "

आशिष ला आता बहुदा हे दोन्ही प्लॉट सोडून देऊन थोडा ब्रेक घेऊन नवीन प्लॉट शोधावा लागेल अशी चिन्ह त्याला दिसली होती .. आणि तो कमालीचा नाराज होता ..

अवनी इकडे तिकडे बघत चालली होती .. मधेच वर बघत होती .. मध्ये मागे पुढे बघत होती ..

अवनी " केबिन मध्ये CCTV नाही का लावलेत ?"

आशिष मनात " बाकीच्या नको त्या चौकश्या भारी पडल्यात हिला  .. "

आशिष " नाही .. बाहेर आहेत फक्त.. माझ्या केबिन ला नाहीत  "

अवनी " गुड "

आशिष " का ? त्यात काय गुड ? पुढल्या महिन्यात बसवणार आहे "

अवनी " ऍडव्हान्स बुकिंग चं राहिलंच नाही का शेवटी " आणि हसू लागली

आशिष " शट अप ! .. अशी काही ऍडव्हान्स बुकिंग नसते "

क्रमश:

🎭 Series Post

View all