लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग भाग ४०

story of two friends and their marriage

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग



भाग ४०



सावनी " नाही रे .. असेच मला खूप भीती वाटतेय आत्ता .. "



सुशांत " हे बघ .. सॉरी मी आता नाहीये तिकडे .. तू काही टेन्शन घेऊ नकोस .. आपल्या मध्ये कोणी येऊ नाही शकत .. आणि आलेच ना तर आपण आपला हात सोडायचा नाही .. आपलं ठरलंय ना .. मग "



सावनी " नाही म्हणजे आता पुढच्या महिन्यात परीक्षेला आपण आपल्या गावी गेलो कि तुझे आई बाबा पण असतील तिथे आणि त्यांनी तुला पाहिल्यावर तुला एकट्याला घरात घेऊन गेले तर .. मी .. " आणि तिला हुंदकाच फुटला .. पुढे बोलताच येत नव्हते



सावनी " आणि .. त्या तुझ्या बाबांना ज्या मुलीशी तुझे लग्न लावून द्यायचं होते .. तिच्याशी लग्न लावून दिले तर .. "



सुशांत " सानू .. किती रडतेय ... अरे कशाला एवढा टोकाचा विचार करतेय तू "



सावनी " मला .. मला खरं प्रेग्नंट बनायचंय .. म्हणजे तुझे आई बाबा आपल्याला दूर नाही करवणार "



सुशांत मनातच " मेलो च्यायला .. काय नक्की डोक्यात खूळ गेलंय आज सकाळ सकाळी काय माहित .. घरात तर ठीक होती "



सावनी " तूच म्हटलास ना तुझे बाबा लगेच ओळखतील खरं बोलतेय का खोटे ते .. मग आपली तयारी पाहिजे ना "



सुशांत " अरे पण .. "



सावनी " मग तिकडे गेल्यावर ते भेटतील च ना आपल्याला .. माझ्या बाबांनी जसे तुला एक्सेप्ट केलं ना तसे मी प्रेग्नन्ट राहिले तर ते मला पण एक्सेप्ट करतील "



सुशांत " हे बघ ..आपण घरी आल्यावर शांतपणे बोलू आणि ठरवू .. कि तिकडे गेल्यावर नक्की काय सांगायचंय आणि काय करायचंय ते .. आणि आज बाबांची काय एवढी भीती वाटतेय तुला "



सावनी " ते आलेत इथे माझ्या ऑफिस ला .. मला  दोन बॅग भरून पैसे दिले आणि म्हणाले सुशांतच्या आयुष्यातून निघून जा "



सुशांत " व्हॉट ? काय बोलतेय तू .. आणि आता सांगतेय हे सगळे ?"



सावनी " सुश .. मला खूप भीती वाटतेय .. मी काय करू .. मी इकडे वॉशरूम मध्ये थांबलेय .. ते अजूनही आदित्य सरांच्या केबिन मध्ये आहेत .. मी तुला हे सांगितले म्हणून माझा राग राग करतील .. तू लगेच कॉल नको करुस त्यांना "



सुशांत " ओह .. सानू .. ! सॉरी यार ... सॉरी फॉर धिस चिप बेहेवियर फ्रॉम माय बाबा  ... तू टेन्शन नको घेऊस .. मी हॅन्डल करतो सगळे बरोबर .. ठीक आहे "



सुशांत ने लगेच घरी आई ला फोन लावला



सुशांत " आई .. मी येतोय .. सुनेच्या स्वागताची तयारी कर " आणि फोन कट



दोघांनी तशीही एक्साम साठी रजा टाकल्याचं होत्या दोन दिवसांनी ते घरून अभ्यास करणार होते .. अचानक मेडिकल रिझन टाकून दोघे दुपारीच घरी आले



सुशांत " बॅग्स भर .. आपण चाललोय आपल्या घरी .. लगेच "



सावनी " नको ना .. मला खूप भीती वाटतेय "



सुशांत " त्यांनी काही ऍक्शन घ्यायच्या  आधी आपण तिकडे जाऊ .. ऐक माझे .. तशीही आता एक्साम आहे .. घरात बसून तर अभ्यास करायचा आहे .. वेळ आली तर दादाची आणि अवनीची  मदत घेता येईल .. "



दोघांनी पटापट सामान भरले .. सावनी ला मात्र खूप टेन्शन आले होते .. साडी घालू .. का ड्रेस .. कोणता वगैरे वगैरे



सुशांत " जीन्स घाल .. काहीही घाल यार .. काहीही फरक पडत नाही यार .. "



सावनी " आला मोठा जीन्स वाला .. मी पहिल्यांदा आपल्या घरी जातेय आणि तू मला असे करतोय .. "



सुशांत " अरे यार .. रडू नको ना सानू .. मला पण तर टेन्शन आहे ना "



सावनी " हो ना .. मग मला भीती वाटते .. त्यांनी मला .. मला .. बाबा म्हणतात तसे हाकलून लावले तर .. आणि तुझे लग्न लावून दिले तर "



सुशांत " शु ... असे काही होणार नाहीये बाळा .. आता थोडे तरी ते चिडणारच ना .. कदाचित बाबा मला हाकलून लावतील पण तुला नाही काही करणार .. तुला माहित नाहीत ते "



सावनी अजूनच थरथरायला लागली " मी .. नाही राहणार तुझ्या शिवाय आधीच सांगते .. माझा हात अजिबात सोडायचा नाहीस .. सांगून ठेवते .. " घाबरट मुलीकडून गोड धमकी



दहा महिन्या नंतर सुशांत आणि सावनी इकडचे घर प्रॉपर बंद करून पुन्हा त्यांच्या गावी निघाले .. टेन्शन तर होतेच .. पण आता घरी जाऊन सानू ला तिचा अधिकार मिळवून देण्याची वेळ आली होती



सावनी " मी पोटावर उशी बांधू का ?"



सुशांत " अग राणी .. आजच सकाळी बाबांनी तुला नॉर्मल पाहिलेय ना "



सावनी " अरे हो .. मी ते विसरूनच गेले "



सुशांत त्याने तिचा चेहरा हातात घेतला " हे बघ .. तू घाबरू नकोस .. मी वेळ आली तर पुन्हा तुला घरातून पळवून आणू शकतो .. त्यामुळे तुला आणि मला वेगळे करणे सोप्पे नाहीये .. आपले ठरले होते कि आपण एक चान्स आपल्या आई वडिलांना आपल्याला समजून घेण्यासाठी देणार आहोत .. बरोबर .. बाबा आता असे का वागतायत सांगू का .. त्यांना त्यांची पॉवर दाखवायचीय आपल्याला .. त्यांना बेसिकली हे सहन होत नाहीये कि आपण गेले दहा महिन्यात त्यांच्याकडे पैशांसाठी सुद्धा हात पसरले नाहीत .. आणि आता त्यांचा अंत पहिला तर आपल्याला चांगलेच रडकुंडीला आणतील .. म्हणून आपण आपल्या घरी जाऊ .. त्यांना बेसिकली आता मला भेटायचंय .. पण माझ्याशी कोणतीही डील करायची नाहीये कारण त्यांना माझ्या पुढे हरल्या सारखे वाटेल .. म्हणून मग ते डायरेक्ट तुझ्याकडे आले .. तर आता ते घरी पोहचायच्या आत आपण घरात जाऊन बसायचे .. ट्राय टू बी नॉर्मल .. अगदीच एक्सट्रीम काही प्रॉब्लेम झाला तर माझा बॅक अप प्लॅन तयार आहे .. आपला शेवटचा पेपर झाला कि आपण दोघेही बाहेर येऊ .. तेव्हा कल्टी मारायची .. मग तुला अशा ठिकाणी हनिमून ला नेईन ना कि माझा बाप पण तिथे पोहचू शकणार नाही .... "



सावनी " नक्की ना "



सुशांत " हो नक्की .. हनिमून ला च नेणार आहे "



सावनी " अरे .. ते नाही विचारत आहे .. हे जे काही तू आता सांगतोय ना तसेच होईल ना "



सुशांत " होयला तर तसेच पाहिजे .. आणि बाकी तू आहेस तशी रहा .. त्यांना आपोआपच कळेल कि तू किती छान आहेस ते .. माय डार्लिंग आपले नाणे खणखणीत असताना आपण कशाला घाबरायचं .. मला सांग .. आपण काही चूक केलीय का ? लग्न केलंय तेही सेफ्टी साठी .. जे कि माझा बाप वकील आहे त्याला सुद्धा मानावे लागेल .. आपल्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आहे "



सावनी " माझा बाप .. माझा बाप .. काय चालवलय.. बाबा म्हण ना  प्रॉपर .. मला नाही आवडत असे डिस रिस्पेक्टफुल बोललेलं .. "



सुशांत " आणि एक .. मला जाम शिव्या पडतील घरात .. आई तर रट्टे च देईल तर प्लिज माझे आई तेवढं घाबरून नको जाऊस .. रात्री तुझ्या प्रेमाचं मलम लाव "



सावनी " चल .. नालायक नुसता .. मी इथे घाबरलीय आणि तुला काय मजाक सुचतोय "



सुशांत " सानू .. एक किस देना .. तिकडे गेल्यावर चान्स  नाही मिळाला तर "



सावनी ने हातातली बॅग उचलून फेकून मारली त्याला ..



सुशांत " अरे ए .. अत्याचार आहे हा .. सकाळी म्हणत होती मला हनिमून ला ने .. आणि साधा किस पण देत नाही .. घोर अत्याचार आहे नवऱ्यावर "



सावनी त्याच्या मागे .. मागे त्याला मारायला पळत होती आणि तो पुढे पळत होता 



----------------------------------------------



सावनी ने बॅग्स भरल्या .. तिच्याकडे असलेल्या चार पाच साड्याच घेतल्या .. एक दोन  चुडीदार घेतले .. स्वतः एक मस्त आंबा केशरी रंगाची प्लेन  साडी ..त्याला लाल काठ .. नेसत होती .. पण अजून साडीची प्रॅक्टिस नसल्यामुळे साडी नीट जमेना .. अर्धा तास झाला अजून हि तयार कशी झाली नाही म्हणून शेवटी



सुशांत " सानू .. अग यावर ना पटकन .. किती वेळ लावतेय आज "



सावनी " हो .. झालेच आहे माझे .. आलेच .. आल्या तश्याच निऱ्या ठेवून दिल्या आणि आधी केसांची छान वेणी घालून घेतली .. आणि तयार झाली



सुशांत " मी येऊ का आत .. मला ते माझे चेक्स चे शर्ट पाहिजे "



सावनी " हो चालेल आलास तरी .. "



सुशांत आत आला " अरे वाह ! साडी .. तरीच म्हटले हि नक्की  करते काय ?.. पण नेहमी पेक्षा नाहीतरी बिघडलंय का ?"



सावनी " अरे होना .. कितीदा मी निर्या काढल्या बसतच नाहीयेत .. लग्नाच्या वेळेला हि साडी रिया ने नेसवली होती .. मला जमतच नाहीये "



सुशांत " मी काही मदत करू का ?"



सावनी " बरं .. ठीक आहे .. मी एकदा निऱ्या काढते मग खाली नीट करशील का तू ?"



सुशांत " ठीक आहे .. जमले तर करतो " आणि  कपाटात त्याला काय पाहिजे ते शोधू लागला



सावनी ने पुन्हा निऱ्या काढल्या



सावनी " हे बघ .. सुशांत .. एक एक निरी वर पासून खाल पर्यंत ओढशील म्हणजे नीट बसेल .. " सावनी सांगेल तसे तो करत गेला आणि फायनली सावनी ची साडी नीट झाली "



सुशांत " हा आता ठीक वाटतेय .. "



सावनी " थँक यु .. "



सुशांत आणि सावनी गाडीत बसले…. घरी निघाले .. वाटेत चहा प्यायला थांबले तर त्याने आशिष ला मेसेज टाकला



" पारो ला घेऊन घरी निघालोय .. काही प्रॉब्लेम झाला तर तुझी मदत लागेल .. बडी ठाकुरायण ला सरप्राईझ द्यायचे आहे .. दोघींना भेटवू .. पारो ला आठवण येतेय "



आशिष " ग्रेट .. भेटू लवकरच .. काही वाटलेच तर सांगशील .. पाचव्या मिनिटाला हजर असेल मी "



चार तासाचा प्रवास करून दोघे सुशांतच्या घरी आले



सुशांत मोठ्या गेट मधून आत गाडी घेतली .. तसा त्यांचा कुत्रा मॅक्स .. जोर जोरात भुंकायला लागला .. सुशांत ने गाडी पार्क केली .. आणि बाहेर आला तसा  मॅक्स त्याच्या अंगा खांद्यावर चढू  लागला .. लिटरली .. १० महिन्या नंतर त्याला सुशांत दिसला होता त्याचा आनंद त्या मुक्या जिवाच्या ओरडण्यात . हालचालीत दिसत होता .. सुशांत पण त्याचे तोंड हातात घेऊन " मॅक्स ... रिलॅक्स .. मॅक्स ..रिलॅक्स .. म्हणत त्याचे लाड करत होता .. सुशांत ला  मॅक्स ची आतुरता बघूनच भरून आले होते ..  .. "



क्रमश:



https://www.irablogging.com/blog/lagngath-the-advance-booking-bhag-5_6812



https://www.irablogging.com/blog/lagngath-the-advance-booking-bhag-6_6827



प्रथमतः लग्नगाठ ऍडव्हान्स बुकींग का कथेला तुमच्या येणाऱ्या लाईक्स आई छान छान कंमेंट वाचून खूप आनंद होत आहे .. मला सर्वांना पर्सनली थँक यु म्हणायला आवडते .. किंवा कॉमेंट ला रिप्लाय द्यायला पण आवडते .. पण काल  पासून फेसबुक मधून कॉमेंट ला रिप्लाय करता येत नाहीये .. त्यांनी माझा हा ऑप्शन सध्या बंद केलाय कारण माझी लिमिट एक्सिड झालीय .. त्यामुळे मला रिप्लाय करता येत नाहीये .. पण मी प्रत्येक कंमेंट नीट वाचते आणि त्याची पावती म्हणून लाईक करेन ..





थँक्स यु वन्स अगेन ..





स्विकार नवीन कथा प्रो ब्लॉग्स मध्ये सुरु केलीय .. तर वाचनाचा आनंद घेण्यासाठी ईरा चे नवीन फिचर प्रो ब्लॉग ला सब्स्क्रिईब करा ..


🎭 Series Post

View all