Jun 15, 2021
विनोदी

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग भाग ३

Read Later
लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग भाग ३

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग

भाग ३

 

आशिष " अरे .. तुला मावशी बोलली नाही का ? काल आम्ही एक स्थळ बघायला गेलो होतो .. ते .. तिलाच भेटायला आलोय "

 

सुशांत " कोण ? अवनी का ? " सुशांत ने धीर करून विचारले

 

आशिष बघत होता अवनी कडे आणि बोलला " नाही .. सावनी "

 

सुशांत " काय ? सावनी ?" आणि त्याने सावनी कडे रडवेल्या स्वरात बघितले .. आणि तिने मान खाली घातली

 

सुशांत " मग ? काय ठरलं ? तुला पसंत आहे का ?"

 

आशिष " हो .. म्हणून तर आलोय इकडे "

 

सुशांत " ठीक आहे तुमचं चालू द्या मी निघतो .. आणि सुशांत क्लास रूम कडे जायला निघाला "

 

आशिष " थांब रे .. तूझ्या मैत्रिणी आहेत का या दोघी ?"

 

सुशांत " क्लासमेट्स आहेस .. फार काही नाही "

 

आशिष " चल , मग आपण चौघे माझ्या ऑफिस ला जाऊ .. तुझ्या मैत्रिणींना आपले ऑफिस दाखवू "

 

सावनी " नाही नको .. मला क्लास आहे .. बाबा ... ओरडतील मला "

 

अवनी " हो आम्हांला क्लास आहे आता .. "

 

सुशांत " हो दादा .. मी तर नाही येत आता .. आधीच मी बऱ्याच दिवसांनी आलोय "

 

आशिष " चला रे .. सर्वजण चहा कॉफी तरी घेऊ .. मी काय रोज रोज येतो का ?"

 

अवनी ला आशिष जवळ बोलतच बसावे वाटत होते पण हे दोघे थांबायला तयार नाहीत मग तिची गोची झाली होती

 

अवनी " सावनी यार चल ना .. कॉलेज च्या कॅन्टीन ला बसायला काय प्रॉब्लेम आहे .. तसाही पहिला लेक्चर ऑफ आहे आता " आणि तिने तिचा हात धरला आणि कॅन्टीन कडे निघाली .. आशिष नुसताच गालात हसला आणि त्याने सुशांत ला घेतले बरोबर आणि चौघे कॅन्टीन ला बसले ..

 

आशिष "हा तर सावनी .. तू काय म्हणत होतीस काल .."?"

 

सावनी ची हवा टाईट

 

सावनी "मी ? .. मी  कुठे काय बोलले तुम्हांला ?"

 

सुशांत "अरे दादा , तिला काही बोलू नकोस ना प्लिज "

 

अवनी ने पुन्हा दोन बोटं तोंडात टाकून शिटी वाजवली तसा  वेटर आला

 

अवनी "२ बाय ४ चहा ,, आणि दोन मस्का पाव "

 

आशिष ने तिची स्टाईल बघून जरा आवंढाच गिळला

 

सुशांत "नक्की काय ठरलंय तुमच्या दोघांचे ?"

 

अवनी "काय नाय रे .. काय ठरलेच नाही .. म्हणून तर आलाय तुझा दादा .. तू उगाच जास्त टेन्शन ने मरू नकोस "

 

सुशांत "तू गप ग अवनी .. नेहमी  बडबड करत असतेस .. थोडा वेळ शांत नाही का बसू शकत "

 

आशिष सुशांत ची अवनी वर होणारी चिडचिड बघून हसू लागला

 

आशिष "सुशांत नक्की तुझा काय प्रॉब्लेम आहे .. आज तू अवनी म्हणते तसा टेन्शन मध्ये का वाटतोय ?"

 

सावनी तशी घाबरली आणि जागेवरून उठली

 

सावनी " मी निघते ... मला घरी जायचंय .. माझी  तब्बेत बरी नाहीये "

 

आशिष "का ? काय झालयं ? सुशांत तू सावनी ला काही त्रास दिलास का ?"

 

सुशांत "नाही .. नाही .. मी कशाला तिला त्रास देईन .. ती तर मला ... " आणि अडखळत तो  थांबला कारण सावनी ने डोळ्यानेच त्याला  नको बोलू म्हणून सांगितले "

 

आशिष "अरे यार .. काय नक्की प्रॉब्लेम आहे .. ए अवनी तू सांग ग .. काय मॅटर आहे नक्की .. काहीतरी आहे हे नक्की "

 

अवनी "काय नाही ओ .. तुम्ही जिला बघायला काल गेला होता ती आधीच कोणाच्या तरी मनात आहे .. आणि म्हणून कोणतरी देवदास झालय "

 

आशिष "ओह .. अच्छा ! मग पारो च काय म्हणणं आहे ?"

 

अवनी  " पारो ला अजून माहित नाहीये .. कारण देवदास काय बोललाच नाहीये .. तेवढ्यात पारोला बघायला कोणतरी ठाकूर आलाय .. त्याला बहुतेक पारो आवडली आहे .. आणि त्यामुळे पारो पण टेन्शन मध्ये आणि देवदास पण टेन्शन मध्ये "

 

आशिष "आणि पारोला ला ठाकूर आवडला कि नाही आवडलाय ?"

 

अवनी "पारो ला ठाकूर ची मिशी नाही आवडली .. तिला मिशीचा प्रॉब्लेम आहे .. आणि ठाकूर ला मिशी वर जाम प्रेम आहे असेच दिसतंय नाहीतर आज ठाकूर एवढा चिकना दिसतोय पण पारो साठी मिशी काढून नाही आला .. "

 

आशिष हसू लागला .. अच्छा म्हणजे खरी व्हिलन ठाकूर ची मिशी आहे का ? ठाकूर आहे ?"

 

अवनी "ठाकूर  व्हिलन तर नसला पाहिजे पण देवदास ला अस वाटू शकतं कारण त्याने त्याच्या पारो वर नजर टाकलीय "

 

आशिष "मग आता ठाकूर ने काय करावे असे वाटतंय ?"

 

अवनी "ठाकूर जवळ दोन ऑप्शन आहेत .. एक म्हणजे आपली मिशी काढून टाकावी नाहीतर पारोचं बदलून टाकावी "

 

तेवढयात चहा आला ..

 

अवनी स्वतःच २ बाय  ४ चहा केला ,, मस्का पाव चे चार भाग केले .. आणि खायला सुरुवात केली

 

आशिष ने एकदा सुशांत कडे बघितले आणि एकदा सावनी कडे .. सावनी ने जी मान खाली टाकली होती आणि सुशांत ला तर मी इथे का आहे आज आणि मनातून अवनी ला शिव्या घालत होता .

 

आशिष ने त्याचा चहा आणि पाव उचलला आणि बाजूच्या टेबल वर बसला .. तो अचानक तिकडे का गेला म्हणून तिघे त्याच्याकडे बघू लागले तर त्याने खुणेने अवनी ला बोलावले त्या टेबल वर

 

आशिष "तू काल मला काहीतरी ऍडव्हान्स बुकिंग बद्दल सांगत होतीस .. ते नक्की काय कॉन्सेप्ट आहे मला कळेल का ?"

अवनी च्या तोंडात मस्का पाव होता आणि तो पावाचा घास घश्यात अडकला .. तिच्या गालाला थोडासा मस्का लागला होता .. सुंदर ते ध्यान असे ... आशिष च्या समोर बसले होते ..

आशिष ने तिथलाच टिशू घेतला आणि तिच्या गालाला लागलेला मस्का पुसून काढला

आशिष "तोंडातला घास संपव .. आणि मग बोललीस तरी चालेल .." आणि तो चहा घेऊ लागला

अवनी ने तोंडातला घास संपवला .. त्यावर मस्त चहा संपवला आणि मग

अवनी "हा ते ऍडव्हान्स बुकिंग करुन ठेवायची म्हणजे.. प्लॉट पसंत आहे पण सध्या घेण्यासाठी पैसे नाहीत .. मग काहीतरी टोकन अमाऊंट द्यायची आणि प्लॉट बुक करून ठेवायचा "

आशिष "काय ?काय ? काय ते नीट सांग "

अवनी "जे तुम्हाला कळतंय तेच बोलतेय मी ..

आशिष "देईन एक लावून .. जास्त बोललीस तर .. आता जास्त आढे  वेढे न घेता विचारतो माझ्याशी लग्न करशील का ? उत्तर द्यायचं हो का नाही ?.. नो बकवास "

अवनी " म्हणून तर तुम्हांला ठाकूर बोलले .. तुम्ही फारच चिडके आहात .. पारो तर तुमच्या या टोन मधेच मरून जाईल .. "

आशिष " ठीक आहे चल मी निघतो .. " आणि त्याने चहाचे पैसे पे करून टाकले

अवनी " का हो .. चिडलात ? तुम्हांला राग आला का ? "

आशिष " नाही माझ्या कडे काय टोकन अमाऊंट  तयार आहे पण प्लॉट तयार नाहीये .. त्यामुळे जातो मी .. बघतो दुसरा प्लॉट मिळतोय का ?"

अवनी "हा तसा आजू बाजूला बघितले तर असे बरेच प्लॉट आहेत ईकडे तिकडे .. "

आशिष "ते काय आहे ना ? नुसता मला प्लॉट पसंत पडून उपयोगी नाहीये .. प्लॉट ला पण मी पसंत पडायला पाहिजे ना .. "

आशिष " कॉन्सन्ट्रेट ऑन  स्टडीज.. चल .. बाय "सुशांत कडे बघून  बोलला

आशिष अवनी कडे बघून " अवनी तुला यायचंय का माझे ऑफिस बघायला "

अवनी " का ? ऑफिस ला का ?"

आशिष " ऍडव्हान्स बुकिंग करायचीय ना .. मग टोकन अमाऊंट देऊन टाकतो तिकडेच .पण फार काळ वेटिंग वर नाही राहणार हा मी .. आधीच सांगतो ..मॅक्स १ ईअर"

अवनी एकदम लाजलीच

अवनी " सावनी .. मी जाऊन येते काय ? तू घाबरू नकोस हा .. आणि या सुशांत ला तर मुळीच घाबरू नकोस ?"

आशिष " चल .. आली मोठी तिची बॉडीगार्ड .. आता तिला नवीन बॉडीगार्ड मिळालाय.. तुझी तिला गरज नाही चल .. काय रे हो ना सुशांत "

सुशांत " नाही .. तसे नाही "

आशिष " मग कसं ..आय डोन्ट वॉन्ट इफ्फेट ऑन युअर स्टडीज .. अंडरस्टॅंड ऑल ऑफ थ्री "

सावनी ने मान हलवून होकार दिला .. अवनी  उठून त्याच्या बरोबर जायला निघाली .

अवनी " मला काही अडले तर तुम्ही आहेतच ना .. 

आशिष सुशांत कडे बघून " टेक केअर ऑफ हर .. नाहीतर माझा प्लॉट डिस्टरब होईल इकडे "

तशी अवनी एकदम उडालीच

सुशांत " ते दादा , ऍडव्हान्स बुकिंग म्हणजे तुम्ही काय करणार ?"

आशिष " तेच तर आता हिला ऑफिस ला घेऊन जातो आणि मग ठरवतो नक्की काय करणार ते ... माझे ठरले कि सांगतो तुला ... आता तुला पण तर ऍडव्हान्स बुकिंग करायलाच लागेल ना "

तसे सगळेच हसू लागले ..

आशिष आणि अवनी निघून गेले

सुशांत आणि सावनी अजूनही समोरा समोर बसले होते ..

सुशांत " मग आपली पण ऍडव्हान्स बुकिंग करायची का ?

सावनी " म्हणजे ?"

सुशांत " म्हणजे नक्की काय ते मला पण माहित नाही .. कळेल हळू हळू आपल्याला "

सुशांत “चल जाऊ ?"

तशी सावनी घाबरून "कुणीकडे ?"

सुशांत " ते क्लासरूम मध्ये गेलो असतो .. बॅलन्स शीट टॅली होतेय का ते बघू "

सुशांत ला नक्की हिच्याशी काय बोलावे सुचे ना . सध्या तरी न सुटलेला प्रॉब्लेम बघून घेऊ .. आणि बॅलन्सशीट आधी बॅलन्स करू म्हणजे निदान सुरुवात तरी होईल ..

 

इकडे आशिष आणि अवनी दोघे त्याच्या कार ने त्याच्या ऑफिस ला आले ..

 

अवनी " अरे वाह ! तुमचे ऑफिस तर मोठे आहे .. म्हणजे चांगलेच सेट झालेले दिसताय "

 

आशिष "  नुसते पैसे कमवणे  म्हणजे सेट होणे नसते .. "

 

अवनी " ओह !! मग कधी होतात सेट तुमच्या दृष्टीने "

 

आशिष " आता नुसता प्लॉट बुकिंग करून उपयोग नसतो त्यावर घर पण तर बांधावे लागते ... "

 

अवनी गोड  हसते

 

आशिष " काय घेशील?" चहा कॉफी कि कोल्ड ड्रिंक "

 

अवनी ह्याने बसायला सांगायच्या आधीच त्याच्या समोरच्या चेअर वर जाऊन बसली आणि स्वतः  गोल गोल फिरू लागली.

क्रमश: