लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग भाग ३९

story is of two friends and their marriage

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग

भाग ३९

अवनी " तू नेहमी असाच करतोस .. दादागिरी करतोस माझ्यावर ?"

आशिष " अरे ए .. एक दिवस चीड चीड झाली तर लगेच लेबल च लावून टाकलेस तू .. चल ना .. राणी . आईस क्रिम घेऊन येऊ "

अवनी " ठीक आहे चल "

अवनी " आई .. आम्ही दोघे आईस क्रिम आणायला जातोय .. तुला कोणता फ्लेवर आणू ? "

मालती " नको ग मला .. तुम्ही खाऊन या "

अवनी चे तोंड परत पडले .. दोघे कार ने जात होते

आशिष " बोला मग .. आमच्या राणी ला कोणता विषय त्रास देतोय ?"

अवनी " आशु .. मी सासरी गेल्यावर आई एकटी पडेल रे .. आता पर्यंत ती नेहमी माझ्या बरोबर होती .. आता ती एकटी पडेल रे .. आता पण बघितलिस ना .. आईस क्रिम तिला पण आवडते तरी म्हणाली नको म्हणून "

आशिष "हमम ... आहे खरा मोठा गहन विषय "

अवनी " आणि आज सकाळी मी झोपले होते ना तर शेजारच्या काकू आणि  ती बोलत होत्या .. आई त्यांना सांगत होती कि .. अवनी चे लग्न झाल्या वर मला खूप कठीण पडणार आहे .. अजून सर्विस चार वर्ष आहे .. विचार करतेय लवकर रिटायरमेंट घेऊन मामाकडे गावी शिफ्ट होऊ का ?"

आशिष " कशाला ? आई इथे असली पाहिजे यार .. आपण त्यांना असे काही करण्या पासून थांबवलं पाहिजे .. इथे असतील तर आपण रोज येऊ शकतो ना त्यांना भेटायला .. दोन एक दिवसातून राहायला हि येऊ शकतो .. "

अवनी " हो ना .. आशु मी काय विचार करत होते .. आपण ना तिचे लग्न लावून द्यायचं का ?"

आशिष जे गाडी चालवता चालवता शॉक झाला ..  त्याने करकचून ब्रेकचं मारला "

आशिष " अरे .. तू काय वेडी झालीय का ? एवढ्याश्या मेंदू मध्ये काय काय विचार करत असते "

अवनी " अरे .. हा म्हणजे हा विचार विअर्ड आहे .. पण तिला पण कोणी तरी हक्काचा माणूस मिळेल ना .. सोबत होईल .. आताशी ५५ वय आहे तिचे .. उद्या  आपले लग्न झाले .. आपली मुलं बाळ झाली कि मला तिला तेव्हडा वेळ देता येणार नाही .. मी माझ्या संसारात रमणार .. ती खूप एकटी पडेल .. "

आशिष " प्रॅक्टिकली स्पिकिंग .. त्यांना हा विषय अजिबात आवडणार नाही .. तू उगाच जास्त विचार करतेय .. आपण आहोत ना ..पाहिजे तर आपण आपल्या घरी घेऊन जाऊ त्यांना .. आपले घर मोठं आहे .. राहू शकतात त्या "

अवनी "  नाही येणार तिकडे कायमची राहायला "

आशिष " म्हणून काय या वयात लग्न लावून देशील तू .. मॅडम आपण इंडियात आहोत .. आणि माझ्या पेक्षा तुच  तुझ्या आईला जास्त ओळखतेस? मला नाही वाटत त्या असले काही करतील "

अवनी " हो ना .. ती नक्कीच तयार नाही होणार .. पण काय सोल्युशन काय ?"

आशिष " सोल्युशन त्यांना आपल्या घरी किंवा आपल्या घरा जवळ शिफ्ट करू ? येता जाता दिसतील अशा ठिकाणी ?तू त्यांना तुझ्या जवळ ठेवायचा विचार कर ना .. तुझ्या पासून लांब पाठवायचा कशाला करते .. मुलगी म्हणून तुझेही कर्तव्य आहेच कि .. जरी संसार असला तरी आपल्या आईला सांभाळणे हा हि एक संसाराचा च भाग आहे .. " आणि आशिष ने तिच्या केसांतून हात फिरवला

अवनी " हमम .. तेही आहेच .. "

आशिष " जशी तू माझ्या घरातला एक अविभाज्य घटक बनणार आहेस .. माझ्या आई वडिलांना आपले आई वडील मानून त्यांचे बघणार तसे मी हि बांधील आहेच कि तुझ्या आई ला माझि य समजून त्यांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहेच कि "

अवनी " हमम .. "

आशिष " तू गाडीत थांब .. नाईट ड्रेस वर आलीस ना .. मी घेऊन येतो आईसस्क्रिम  कोणता फ्लेवर हवाय तुला ?"

अवनी " तोच आपला नेहमीचा .. "

आशिष उतरून आईस क्रिम पार्सल घेऊन आला

अवनी " हे काय ? इथे नाही खायचं का ? "

आशिष " नाही .. घरी जाऊन खाऊ .. आई साठी पण घेतलंय "

अवनी " थँक यु .. आशु .. " केवढी मोठी वाली स्माईल आली मॅडम च्या चेहऱ्यावर

आशिष " कीप दयाट स्माईल .. आय लव्ह इट .. अवनी .. तू आई चा एवढा विचार करतेय हि चांगलीच गोष्ट आहे .. पण एवढी टोकाची भूमिका नको घेऊस .. दुसरे लग्न , वृद्धा आश्रम हे सगळे अगदीच कोण नसेल तर असते .. अजूनही तुझ्या आई ला माहेर आहे .. तू आहेस .. जावई म्हणून मी आहे .. जो कि मुलगाच असल्या सारखा आहे .. डोन्ट वरी जान .. आय एम आल्वेज देअर .. ओके .. आणि आपल्या पोरांना  खेळवायला दोन दोन आज्या पाहिजेत ना .. .. लग्न झाले कि सगळ्यांना कामाला लावायचं आहे आपल्याला .. नातवंडांची  लंगोट धुवून धुवून हात दुखवायचे आहेत.. त्यात तुझी आई आहेच कि .. मी धरलीय त्यांना  "

अवनी जोर जोरात हसू लागली

आशिष " लग्न झाले कि मी काय थांबणार नाहीये .. आधीच सांगतोय तुला .. जे एक वर्ष लग्न झाल्या नंतर तुला द्यायचे होते ते तू आधीच घेतले आहेस सो नंतर टीर टीर लावायची नाही "

अवनी " आशु .. आता बास .. मला लाज वाटतेय "

दोघे घरी आले आणि तिघांनी मिळून गप्पा मारत मस्त आईस्क्रिम फस्त केले

-------------------------------

सुशांत सावनी खूप मन लावून अभ्यास करत होते .. काही अडले तर स्वतः बॉस ला सुशांत विचारत असे .. आदित्य पण काही लागले तर सांगायचा .. एक दिवस सावनी ऑफिस मध्ये तिच्या स्कुटी वरून आली .. हळू हळू यायची म्हणून जरा उशीरच झाला होता .. आदित्य ला उशिरा येणाऱ्यांचा खूप राग यायचा पण आपल्या गोड गोजिर्या सावनी मॅडम थोडीशी सूट मिळाली होती

आल्या आल्या ती आदित्य च्या केबिन मध्ये गेली अर्थात आधी सुशांतला कॉल झाला कि मी पोहचले वेळेत मग कमाला सुरुवात

आदित्य च्या केबिन मध्ये एक गृहस्थ बसले होते .. मस्त ब्लेझर घालून .. मागून बघितल्यावरच कळत होते कि कोणीतरी साहेब असावे असे ..

सावनी ने दार नॉक केले

आदित्य " कम इन "

सावनी आत गेली " गुड मोर्निंग सर .. मला बोलावत तुम्ही ?"

आदित्य " हा .. ते .. हे आपले गेस्ट आहेत .. त्यांना तुला भेटायचंय ?"

सावनी ला नवीन कोणाला भेटायचं म्हणजे ती थरथरायची हे आदित्य माहित झाले होते .. आणि सुशांत ने स्पेशली भेटून आदित्य ला सांगितले होते कि तिच्यावर आवाज चढवू नको .. ती पॅनिक होते म्हणून ..

आदित्य " रिलॅक्स .. ह्याव सम वॉटर .. "

सावनी ने थरथरत्या हाताने तिथल्याच ग्लास मधले पाणी प्यायले .. आणि त्या गृहस्थांकडे पाहिले .. एकदम चेहरा ओळखीचा असावा असे वाटले तिला .. "

सावनी ने हात जोडून नमस्कार केला .. एक नजर टाकली आणि पुन्हा मान खाली

आदित्य " हे मिस्टर विलास सरदेशमुख "

सावनी " हॅलो सर .. " आणि एक मिनिट स्तब्ध झाली .. विलास सरदेशमुख म्हणजे .. सुशांत चे बाबा .. म्हणजे तिचे खुद्द सासरे समोर होते "

सावनी ला काही कळेना ना काय बोलू .. काय करू ... "

आदित्य " तू ला कळले ना हे कोण आहेत ते "

सावनी ने भरल्या डोळ्यांनी आदित्य कडे पाहिले आणि मान होकारार्थी हलवली

आदित्य " यांना  तुझ्याशी काहीतरी बोलायचंय .. तू थांब इथे मी बाहेर आहे .. आणि आदित्य निघून गेला बाहेर

सावनी ने पटकन ते खुर्ची वर बसलेले तिथे जाऊन त्यांच्या शूज घातलेल्या पायाला स्पर्श केला आणि नमस्कार केला

विलास "माझ्या मुलाच्या आयुष्यातून जाण्यासाठी काय घेशील ? डायरेक्ट पहिलाच प्रश्न त्यांनी तिला विचारला

सावनी ची मान खालीच होती पण डोळ्यातून पूर वाहू लागला

विलास ने दोन बॅग्स ओपन केल्या .. दोन बॅग्स आहेत .. बघून घे .. इतके पैसे तू कधीच पाहिले  नसशील .. या दोन्ही बॅग तुझ्या .. शिवाय दर महिन्याला तुझ्या अकाउंटला १ लाख रुपये मी स्वतः ट्रान्फर करेल .. कायद्याने कॉन्ट्रॅक्ट बनवू आपण तसे पाहिजे तर .. लवकरात लवकर त्याला मोकळा कर.. अजून काय हवंय ते तू मोकळे पणाने सांग .. मागशील ते सगळे देईन मी तुला .. शिवाय माझा एक मित्र आहे लंडन ला त्याचा मुलगा तिकडेच सेटल आहे .. त्याच्या मुलाशी  मी लग्न लावून देईल तुझे .. फक्त सुशांत च्या आयुष्यातून कायमचे निघून जा "

सावनी " सॉरी .. तुम्ही चूक करताय .. सुशांतचे तुमच्यावर खूप प्रेम आहे .. हे जे तुम्ही करताय हे जर त्याला कळले ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल .. मी आणि सुशांत आता कधीच वेगळे नाही होऊ शकत .. सॉरी .. तुम्ही जाऊ शकता .. हे माझे ऑफिस आहे .. इथे या काम साठी पुन्हा येऊ नका .. "

विलास " का हे कमी झाले का तुला ? "

सावनी " खरं तर .. अजून तुम्ही मला अधिकार दिला नाहीये पण मी आता म्हणतेच   " बाबा .. अशी चूक करू नका .. तुमचा मुलगा माझ्या शिवाय नाही जगू शकणार .. मी तर त्याच्यासाठी हसत हसत मरायला पण तयार आहे पण त्याच्यासाठी मी जगणार आहे .. या कामात मी तुमची काहीच मदत नाही करू शकत "

आणि सावनी केबिन मधून बाहेर निघून आली .. वॉशरूम मध्ये जाऊन जोर जोरात रडू लागली .. थोडा वेळ रडून घेतले आणि तिने सुशांत ला फोन लावला

सुशांत " सानू ... काय माझ्या शिवाय करमत नाही का आज ?"

सावनी " हो . ना .. आपली हनिमून ची टिकेट्स लवकर बुक कर आता .. ती वेळ आलीय जवळ "

सुशांत " अरे .. काय हे मी काय ऐकतोय काय .. पण अजून आपलीही परीक्षा नाही झाली ना शोना ... एक्साम होऊ दे ना मग जाऊ ना .. "

सावनी " नको नंतर फार उशीर होईल .. आता मला जायचंय "

सुशांत " काय प्रॉब्लेम झालाय .. आय डोन्ट फाईंड इट नॉर्मल .. ?"

सावनी " मला आता तू माझा झालेला पाहिजेस .. फक्त माझा .. तुला कोणी तरी माझ्या पासून दूर घेऊन गेले तर .. अशी भीती वाटतेय मला "

सुशांत " मी येऊ का तिकडे आता ?कोण काही बोललोय का तुला ?"

सावनी " नाही .. कोणीच नाही .. "

सुशांत " बरं .. ठीक आहे .. तो साला आदित्य ने काही बोलला का तुला ?"

क्रमश:

https://www.irablogging.com/blog/lagngath-the-advance-booking-bhag-5_6812

https://www.irablogging.com/blog/lagngath-the-advance-booking-bhag-6_6827

🎭 Series Post

View all