लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग भाग ३५

story of two friends and their marriage

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग

भाग ३५

अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने कामाचे शेअरिंग सुरु झाले .. हिने भांडी घासली कि हा धुवून द्यायचा .. हिने कपडे घासले कि चांगल्या पाण्यातून काढून .. वाळत टाकण्या पर्यंत मदत करायचा .. कधी तिने लिहून दिलेली भाजी आणून द्यायची .. कधी सामान आणून द्यायचा .. असा संसार छान सुरु झाला .. काम करता करता कधी झप्पी , कधी गालावर पप्पी .. कधी पाण्याची रंग पंचमी असे एन्जॉय करत काम असायचे दोघे ..

एकदा तर सावनी ची तब्बेत जरा बरी नसताना .. तिला मऊ खिचडी भात करून त्याने खायला घातला होता .. तो तिचे लाड करायचा आणि ती त्याचे लाड करायची .. असा लाडात संसार चालू होता .. असा इतका रोमँटिक संसार चालू असला कि कशाला आणि कोणाला नाही आवडणार ?? .. सावनी पण खुलत चालली होती त्याच्या बरोबर .. कधी कधी त्याला स्वतःहून गालावर पप्पी मिळायची .. मग काय सुशांत साहेबांना नोबेल प्राईझ वगैरे मिळाल्या सारखे वाटायचे .. तिला हळू हळू त्याने फोर वहिलर पण शिकवली  .. घाबरून घाबरून मॅडम  गाडी चालवायला शिकल्या ... 

छोटे मोठे निर्णय ती घ्यायला लागली होती .. म्हणजे तिला समज तर खूप होती पण कोणताही निर्णय घेण्यासाठी भीती वाटायची .. आता तसे होत नव्हते .मनातली भीती कमी होत होती .. कुणीतरी कारण नसताना आपल्याला ओरडेल अशी जी काही भीती वाटायची ती कमी होत गेली  .. पण तरी भित्री भागू बाई होतीच ती .. सुशांत बरोबर जगाचा विसर पडायचा तिला .सुशांत सुद्धा बंगल्यातून एवढ्या छोट्या फ्लॅट मध्ये राहत होता .. कमी पैशांत घर चालवणे म्हणजे खिशाला किती कात्री लावली असेल याचा काही नेमच नव्हता ... कधीच अशी चणचण, कमतरता त्याने अनुभवली नव्हती .. नाव घेईल ती वस्तू मिळायची त्याला किंबुहना नाव घ्यायच्या आधीच .. त्याच्या साठी पण मेजर चेंज होता .. पण सावनी बरोबर चटणी पण त्याला गोड लागली .. पिठलं भात त्याला मेजवानी वाटली .. डेसर्ट , स्वीट डिश हे असले तर विचारूच नका .. पगार मिळाल्यावर सुद्धा त्याने मजा मारली नाही .. आहेत पैसे आपल्याला पुरवून आणि गरजेच्या वस्तू घेण्यासाठीच वापरावे लागतील या कडे लक्ष दिले .. त्यामुळे हि एक प्रकारची तपस्या च होती .. प्रेमाची तपस्या .. दोघांचीही .. जी ते दोघेही संयमाने देत होते.

कसे आहे ना नुसते प्रेम आहे असे लोक म्हणतात पण जेव्हा काही त्याग करायची वेळ येते .. जेव्हा आपल्या सुख सोयी गमवायची वेळ येते तेव्हा प्रेम कमजोर पडू शकते .. आणि मग त्यातून भांडाभांड .. वाद विवाद होतात .. पण या दोघांच्या बाबतीत असे काहीच घडले नाही .. त्यांचे  प्रेम आणि त्यांचे पवित्र नाते अजून घट्ट होत गेले .. वाढत गेले ..  ऍडव्हान्स बुकिंग म्हणून केलेली लग्नगाठ मजबूत बनत गेली होती ..

https://www.youtube.com/watch?v=NEsX4I4r33E&ab_channel=LyricalEntertainer

गाणे जरूर ऐका

त्यांच्या लग्नाला १० महिने झाले .. आणि सुशांत च्या अंदाजा प्रमाणे अजूनही आपल्या मुलाने आपल्याला कॉन्टक्ट केला नाही या विचाराने त्याच्या आई बाबांना खूप बेचैनी आली होती .. त्यातच त्याच्या कॉलेज कडून त्यांना आणि सावनी च्या बाबांना कॉल गेला होता कि एक्साम चे फॉर्म्स सबमिट झालेत .. तर वेळेत येऊन डॉक्युमेंट्स पूर्ण सबमिट करा .. कॉलेज च्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. सावनी च्या बाबांना मुलगी ने अजूनही अभ्यास चालू ठेवला आहे हे कळल्यावर घरात राहवेना आणि ते तडक उठले आणि सुशांतच्या घरी आले ..

तिथे आल्यावर त्यांना कळले कि दोघेही इथे नाहीत हे ऐकल्यावर त्यांना धक्काच बसला होता .. आणि आता आपली मुलगी कोणत्या तरी प्रॉब्लेम असेल असे वाटू लागले ..  उलट सुशांतच्या वडिलांनी त्यांचा जरासा अपमानच केला " तुमच्या मुलीमुळे माझा मुलगा बहकला .. त्याचे ब्राईट करिअर खराब केले तिने “

तसे सावनी चे बाबा म्हणाले " तुम्ही कॉलेज ला जाऊन चौकशी करा म्हणजे कळेल कि नक्की कोणाचे नुकसान झालेय .. माझि मुलगी टॉप ३मध्ये आहे अजूनही ..

विलास (सुशांत चे बाबा ) " माझा मुलगाही पहिल्या ३ मध्ये आहे .. मला कालच फोन आला होता  कॉलेज मधून "

दिवाकर ( सावनी चे बाबा ) " मला वाटतं .. खूप झाले .. मुलांना माफ करू .. घरी आणू .. म्हणजे मन लावून अभ्यास करतील दोघे "

विलास " मला काही गरज वाटत नाही .. माझा आणि माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही आता .. त्याचं त्याचं तो बघून घेईल "

दिवाकर " पण मला माझ्या मुलीची काळजी आहे .. मी दोघांचाही सांभाळ करू शकतो वेळ आली तर .. मला तेवढा पत्ता मिळवून द्या "

विलास " तो घर सोडून गेल्या नंतर माझा त्याचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये "

दिवाकर च्या डोळ्यात पाणी आले मनोमन देवाला प्रार्थना करू लागला " माझि मुलगी सुखरूप असू दे देवा .. यांचं  काय ? पैशे वाले लोक ?"

विलास " हा एक नंबर आहे .. मला असे वाटतं कि हा नंबर सुशांत चा असावा .. तो महिन्यातून एकदा मिस कॉल देऊन माझा आवाज ऐकतो आणि कट करतो असा माझा अंदाज आहे "

विलास ने त्याला नंबर दिला

दिवाकर " ह्याच नंबर वरून मला पण मिस कॉल येतो .. समोरून कोणच बोलत नाही .. "

विलास " तोच माझाच कार्टा आहे तो .. आपली तब्बेत ठीक आहे कि नाही याचा अंदाज घेतो तो  "

दिवाकर ला एकदम भरूनच आले .. " मला तेवढा पत्ता मिळवून द्या .. मी जातो .. आता नाही राहू शकत मी तिला बघितल्या शिवाय "

विलास " मी पत्ता देतो .. पण तुमच्या मुलीला घरी घेऊन जा .. मी माझ्या मुलाचं लग्न लावून देईन दुसरीकडे "

दिवाकर जरा चिडलाच " खबरदार ! असे काही केलेत तर .. गेले १० महिने माझी मुलगी तुमच्या मुला बरोबर आहे .. "

विलास " हे तर पाहिजे तुम्हां लोकांना .. पैसे  वाला मुलगा फसवायचा म्हणजे बघायलाच नको "

दिवाकर " मिस्टर विलास ... थू  .. तुमच्या पैशाला .. माझी  मुलगी डुंकूनही बघणार तुमच्या पैशाकडे आणि तुमच्या मुलानेच तिला नादवले असणार .. ती मान वर करून पण बघत नाही कोणाकडे "

विलास " माझ्या घरात येउन माझ्याशी असे बोलणारे तुम्ही समजत कोण स्वतःला .. साधे कंपनीत कामगार आहेत आणि माझ्यावर आवाज चढवताय "

दिवाकर " माझ्या  मुली विषयी बोलताना जरा सांभाळून बोला .. म्हणजे हि वेळ येणार नाही "

विलास " हा घ्या  पत्ता .. आणि परत इथे तोंड दाखवायला येऊ नका .. आणि स्वप्न पाहू नका जास्त .. ना मी तुमच्या मुलीला घरात घेणार आहे .. ना तिचा सून म्हणून स्वीकार करणार .. तुम्ही लवकरात लवकर तिला घेऊन जा "

दिवाकर ला साधे पाणी सुद्धा विचारले नाही त्यांनी आणि दिवाकर घरातून बाहेर पडले  ..

डोळ्यांत अश्रू .. आणि सावनीची ही खूप सारी काळजी दिसत होती त्याला .. आता आपल्या मुलीचे काय होणार .. ? याची चिंता लागून राहिली त्यांना

दिवाकर घरी बायकोला म्हणजे सावनीच्या आई नन्दा ला  " उद्या  आपण पुण्याला जातोय .. सावनीला  घेऊन येऊ .. बघू काय करायचं ते नंतर  .. ती कधीच सुखी नाही होऊ शकणार कुठून त्या पोराच्या नादी लागलीय काय माहित ?"

नंदा  " अहो पण त्या मुलाचे प्रेम आहे ना तिच्यावर ?"

दिवाकर " काय माहित ? नाहीतर .. कंटाळा आला कि देईन सोडून तिला .. तो काय ग पैशे वाल्या बापाचा मुलगा आहे .. बाप तर असला आहे ना .. आपण उद्या शनिवार आहे तर जाऊ त्या दोघांकडे .. आपल्या  ला जमेल ती मदत करू "

सावनीच्या बाबांचा पावित्रा एकदम बदलला होता .. आणि कधी एकदा  सावनीला भेटतोय असे झाले होते.

-------------------

इकडे विलास आणि सुधा पण कळीस  आले होते .. कदाचित आता दिवाकर आले नसते तर ते स्वतःहून गेलेही असते त्या दोघांना भेटायला पण दिवाकर आल्यामुळे विलास ला आता हा माणूस सांगतोय म्हणून आपल्या पोराला भेटायला जायचं हे पटेना .. आणि त्याने उगाचच उडवा उडवीची उत्तरे दिली पण  दिवाकर च्या हे लक्षात आले नाही कि ह्या दोघांचा पत्ता विलास कडे होता म्हणजे लांबून त्याचे त्यांच्याकडे लक्ष होते ..

-------------------------

दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सावनी आणि सुशांत ला सुट्टी होती .. आज म्हणून जरा आरामात उठले .. नाश्ता झाल्यावर दोघे अभ्यासाला बसले होते कारण असाइनमेंट द्यायचा बाकी होत्या दोघांच्या .. सावनी आतमध्ये बेड वर बसली होती आणि लिहीत होती तर सुशांत बाहेर सोफ्यावर बसून लिहीत होता ..

काहीतरी मेसेज त्याच्या मोबाईल वर आला आणि तो एकदम कावरा बावरा झाला .. आणि तसाच आत मध्ये उठून आला .. सावनी चे त्याच्याकडे लक्ष गेले तर एकदम रडवेला झाला होता .. अस्वस्थ दिसला

सावनी " काय झाले ? काही प्रॉब्लेम आहे का ?" तिचे वाक्य पूर्ण होतंय ना होतंय तर त्याने तिला घट्ट मिठीत घेतले ..

सुशांत " सानू .. मला सोडून नाही जाणार ना तू .. कधीच .. काहीही कारण असतांना .. कोणीही अगदी जीवन मरणाची तुला शपथ घातली तरी पण .. नाही जाणार ना "

सावनी " अरे .. असे का बोलतोय ? मी कशाला तुला सोडून जाऊ .. आणि हे काय मधेच असे बोलतोय .. तू लिहीत होता ना .. कि झोपला होतास .. काही वाईट स्वप्न बघितलेस का ?

सुशांत " नाही .. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय .. मला खूप भीती वाटतेय .. मला प्लिज सोडून जाऊ नकोस .. "आणि लिटरली त्याच्या डोळ्यांतुन पाणी येऊ लागले

सावनी " सुशांत .. नको असा विचार करू .. आता तुझी माझ्या पासून सुटका नाही .. मी  पण नाही रे तुझ्या शिवाय जगू शकत .. आपल्याला कोणीच नाही वेगळे करू शकत ..कधीच नाही .."

सुशांत " तुझे आई बाबा गेट मधून आत आलेत .. आता दोन मिनिटात घरात येतील .. मला खूप भीती वाटतेय .. त्यांनी तुला ब्लॅकमेल केले तर .. तू मला सोडून नको जाऊ हा प्लिज "

त्याची अशी अवस्था बघून सावनी पण घाबरून रडायला लागली .. सुशांत .. तू  बाहेर नको येऊस .. मी जाते .. माझे बाबा .. तोंडाने नाही हाताने जास्त बोलतात .. तू बाहेर येऊ नकोस उगाच तुला मारतील बिरतील ते .. आणि आता तीच थरथरायला लागली

दोघेही खूप घाबरले होते .. सावनीच्या आई बाबांना कसे फेस करावे हे दोघांनाही कळत नव्हते .. दोघे एकमेकांच्या मिठीत होते ..

सुशांत " सानू .. आपण एक काम करू .. तू प्रेग्नंट आहेस असे सांगू .. तू प्रेग्नन्ट आहेस हे कळले तर ते तुला आणि मला वेगळे करायचा विचार करणार नाहीस "

सावनी " अरे .. नको .. खूप प्रॉब्लेम होईल .. ते लोक लगेच ओळखतील .. मी नाटक करतेय ते "

सुशांत " आता हाच एकमेव मार्ग आहे .. जर तू प्रेग्नन्ट आहेस हे सांगितले तरच आपण एकत्र राहू शकतो "

तेवढयात दाराची बेल वाजली

दोघांनी धडकीच भरली

सुशांत " तू बाहेर येऊ नकोस .. मी बघतो .. मला जर सेफ वाटले तर तुला बोलवतो बाहेर "

सावनी " नको नको .. ते उगाच चिडले तर तुझ्यावर हात उचलतील .. मी जाते "

सुशांत " नको नको .. ते तुला बाहेरच्या बाहेर घेऊन गेले तर .. ती रिस्क नकोच .. आणि त्यांनी तुला मारले तर .. ते नकोच .. तू आतच थांब "

बिचारे दोघे जण .. अशी वेळ आपल्यावर येईल असे वाटलेच नव्हते त्यांना .. दोघेही खूप घाबरले होते

सुशांत " ती पिलो कुठाय .. मी तुला वॅलें टाईन्स  डे ला दिली होती ना .. ती काढ .. ती आपण तुझ्या पोटावर बांधू "

सुशांत ने सगळे कपाट उलथा पालथं करून टाकले तोपर्यंत

सावनी " थांब ना सुश .. काय करतोय तू .. सगळे कपडे खाली का टाकलेस .. इकडे आहे ती पिलो .. आणि हे नकोच .. मला नाही ते नाटक करता येणार .. नकोच "

सुशांत " येईल ग .. TV मध्ये बघत नाहीस का ? हळू हळू चालायचं फक्त "

सावनी चा घसा सुकायला लागला होता .. आणि बाहेर दाराची बेल वाजत होती

सुशांत ने ती पिलो घेतली आणि तिच्या पोटावर तिच्या ओढणीने बांधू लागला

सावनी " थांब रे .. आतून बांधायला पाहिजे .. पोटावर .. "

सुशांत " मग बांध ना कसे ते .. मला काही  सुचत नाहीये .. "

सावनी " तू जा बाहेर .. मी बांधते .. दार उघड .. आणि लांब राहा त्यांच्या पासून "

सुशांत " सावनी .. आपली एक चूक झाली .. मला आता प्रकर्षाने जाणवतंय .. आता तू खरंच प्रेग्नन्ट पाहिजे होतीस म्हणजे प्रश्नच नसता आला "

सावनी " काय बोलतोय ? .. हे करायची खरच गरज आहे का ?"

🎭 Series Post

View all