लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग भाग ३३

story of two friends and their marrige

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग

भाग ३३

इव्हेंट मॅनेजमेंट  वाला " आता एक  गेम खेळणार आहोत आपण .. आपल्या आपल्या पार्टनर ला घेऊन पुढे या ..तेवढ्यात शशांक आला आणि त्याच्या सगळ्या फ्रेंड्स ला  हाताला  धरून गेम खेळायला पार्टनर ला घेऊन पुढे नेऊ लागला

विराज , सुरज आपल्या बायकोला घेऊन पुढे आले .. शशांक पुढे काही चालेच ना .. समीरा ला पण तिच्या नवऱ्याला घेऊन पुढे बोलावले ..

शशांक " आशिष . चल ना तू पण "

आशिष " अरे नको .. पुढल्या वर्षी .. अजून आमचं लग्न नाही झालंय "

अवनी ला तर खेळायला जायचं होते .. पण आशिष ला नाही जायचंय हे कळल्यावर " हो नको .. आम्ही इकडून बघतो " म्हणून विषय मिटवत होती

शशांक " अरे .. काय चल ना .. मी पण येतो माझ्या बायकोला घेऊन .. मज्जा येईल " आणि तो आशिष ला हाताला  धरून ओढूच लागला

आशिष " बरं चल .. तू पुढे हो .. मी आलोच हिला घेऊन "

आशिष " अवनी .. काय वाटतं तुला ? जायचं का पुढे ?"

अवनी " तू ठरव .. मला काहीही चालेल "

आशिष " एक काम करू पुढे जाऊ .. आणि मग नको वाटलं तर कल्टी मारू "

आणि दोघे जाऊन पुढे उभे राहिले बाकीच्या जोडप्यानं बरोबर

इव्हेंट मॅनेजर " तर आता आपण एक वेगळाच गेम खेळणार आहोत .. आपल्या पार्टनर ला पाठीवर बसवून पुश अप्स काढायच्या .. जो जास्तीत जास्त पुश अप्स  काढेल त्या कपल ला  परफेक्ट कपल चा क्राऊन दिला जाईल "

अवनी " आशु .. चल नको जाऊया .. मी खूप हेल्दी आहे .. उगाच पचका नको .. "

आशिष " पण .. मी तयार आहे .. आणि कोण बोललं तुला कि तू मला झेपणार नाहीस? "

अवनी त्याच्या कानात " आशु .. एक प्रॉब्लेम आहे .. मी तुला सांगतले नाही .. "

आशिष " काय ?"

अवनी " मी जरी बारीक दिसत असले ना तरी माझे बोन मध्ये खूप ताकद आहे ..मी हलकी नाहीये वजनाला मी ६० kg असेल लेटेस्ट माहित नाही मला "

आशिष " काय ? ६० kg .. बापरे  एवढे .. डोन्ट वरी डार्लिंग .. आय कॅन कॅरी माय स्वीट लिटिल ६०kg वाइफ "

बाकीचे राहिले बाजूला ह्या दोघांचे तिथेच कानात खुसुरपूसर चालू झाले

एक दोन कपल आधीच गेम च्या बाहेर गेले

शशांक , सुरज , विराज आणि आशिष अजूनही तिथेच होते

शशांक " अरे यार .. मला माहित नव्हते आता हा गेम खेळायचा आहे .. मला वाटले कि फुगे बिगे फोडायचे असले काहीतरी असेल "

तसे सगळे हसायला लागले

विराज " मेल्या !! आता हिला उचलले नाही तर घरी जाऊन ती मला उचलून पटकवून टाकेल "

सुरज " नाहीतर काय ?"

समीरा " आशिष लुक्स कॉन्फीडंड "

सुरज " अरे त्याचे बरं आहे .. अजून लग्न होयचंय .. आमची पण अशीच बारीक होती लग्ना आधी .. आता बघा "

इव्हेंट मॅनेजर " त्या आधी एका गाण्यावर कपल डान्स होईल आणि मग  गेम खेळला जाईल .. सो होल्ड युअर वाईफ इन युअर आर्मस अँड स्टार्ट "

https://www.youtube.com/watch?v=v5ZIgx6YXMk&ab_channel=ChataddaRoot

 (गाणे जमले तर नक्की ऐका ..)

आपापल्या पार्टनर ला बरोबर घेऊन सर्वांनी डान्स केला .. आशिष आणि अवनी .. दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवूंन गेले .. प्रेमात आकंठ बुडाले होते ते .. गाणे संपल्यावर लगेचच पुश अप्स चा गेम सुरु झाला .. एकेक जण आपल्या पार्टनर ला घेऊन पुश अप काढू लागले

बाकीचे सर्व जण टाळ्या वाजवत होते .. शशांक ने पहिला नंबर लावला आणि कशा बशा ५ पुश अप्स काढल्या .. विराज , सुरज ने प्रत्येकी ७ आणि ५ काढल्या .. समीराच्या नवऱ्याने तिला घेऊन १० पुश अप्स काढल्या आणि आता आशिष चा टर्न आला होता .. आणि अवनी नकोच म्हणत होती .. तिला आपल्या वजनाने नर्वसनेस आला होता ..

आशिष ने त्याचा ब्लेझर काढला .. ब्लॅक शर्ट .. बॉडी फिटिंग शर्ट आणि त्याचे कट्स चांगलेच दिसत होते .. अवनी ने त्याला बघून डीप श्वासच घेतला .. नुसता त्याला असा बघूनच तिला काटा आला होता ..

बाकीचे " ओह्ह .. आशिष .. स्मार्ट हा .. अभि भी कॉलेज वाली फिटनेस मेंटेन .. "

आशिष चे लक्ष फक्त अवनी कडे होते .. जसे अजुर्नाचे लक्ष माशाच्या डोळ्याकडे होते तसे ह्याचे लक्ष त्याच्या हरणी च्या डोळ्यातच अडकले होते .. आधीच रोमँटिक गाण्याने प्रेमाच्या भावना  ओथंबून वाहत होत्या .. अवनी ला त्याच्या डोळ्यांत बघायला होत नव्हते

आशिष ने काही न बोलता पुश अप्स ची पोझिशन घेतली ..

बाकीचे " अवनी .. अवनी .. ओरडू लागले .. "

नाईलाजाने  अवनी त्याच्या पाठी वर बसली .. एरवी त्याच्या खांद्यावर .. पोटावर कितीदा बसली असेल पण इतक्या सगळ्यांसमोर तिलाच कसे तरी वाटत होते ..

आशिष ने एक पुश अप्स काढली आणि तिला उतरायला सांगितले

आणि त्याच्या फुल स्लीव्हज च्या बाह्या फोल्ड केल्या आणि पुन्हा तीला बसायला सांगितले ,, आणि जे पुश अप्स सुरु झाल्या .. बाकीचे काऊंटिंग करत होते .. १ ... २... ३... असे करत करत त्याने १५ पुश अप्स काढल्या ..  सर्वांनी टाळ्या वाजवल्या .. आणि बेस्ट कपल चा क्राऊन मिळवलाच त्याने .. सर्व जण टाळ्या वाजवत होते..  आशिष ने पटकन अवनी च्या गालावर किस केला ते सुद्धा सर्वांच्या समोर .. तशी अवनी आधी जरा लाजली पण तिला रागच आला होता ..

मग काय पुढल्या सगळ्या कार्यक्रमात सेन्टर ऑफ attraction हे दोघेच होते .. जेवण वगैरे झाले .. शशांक आणि बाकीच्या फ्रेंड्स ला बाय करून १२ वाजले म्हणून हे दोघे निघाले तिथून ..

हॉटेल च्या बाहेर आल्या आल्या " तू सगळ्यांसमोर किस का केलेस ?" अवनीचा नाराजीचा स्वर

आशिष " अरे यार .. इतके काय लोड घेतेस .. आणि गालावरच केला ना .. मला तर अजून काय काय करावेसे वाटत होते .. असा काही विचार करून नाही केले मी . ते अचानक आपोआप झाले माझ्या कडून "

अवनी " पण मी तुला आधीच सांगितले ना .. कि ऍडव्हान्स बुकींग चा फायदा तू नाही घ्यायचा "

आशिष " अवनी .. यार .. ह्यात काय फायदा वगैरे शब्द नको ना वापरू .. तुला मी तुझा फायदा घेईन असे वाटतं का ?"

अवनी " हा आय मिन फायदा असे नाही म्हणायचं मला .. पण पुन्हा असे नको करुस .. मला सगळ्यांसमोर किती लाज वाटली "

आशिष " ठीक आहे .. आता नाराज  नको होऊ ना प्लिज पिल्लू  .. " बोलत बोलत ते पार्किंग मध्ये आले होते ..

अवनी " ठीक आहे .. सॉरी मी चुकीचा शब्द वापरला .. आशु .. ह्या हिल्स मुळे माझे पाय दुखायला लागलेत .. मी काढू का ?"

आशिष लगेच खाली बसला आणि तिच्या पायातल्या हिल्स चे बेल्ट्स काढू लागला

तेवढ्यात एक जण आला आणि अवनीच्या गळ्यावर चाकू ठेवला

गुंड " हॅन्ड अप .. चल  लवकर दे .. जे जे काय आहे ते दे .. पैसे , दागिने .. घड्याळ .. जे  जे काय आहे ते पटकन द्यायचे .. नाहीतर तुझ्या या पिल्लू ला कापून टाकेन "

अवनी जशी ओरडायला लागली तसा त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला ..

आशिष " इझी ... इझी टेक इट इझी .. मी सगळे देतो .. तिला सोड .. तिला हात नाही लावायचा .. आशीष पण जरा घाबरलाच होता कारण तो धारदार चाकू त्याने तिच्या गळ्याच्या अगदी जवळ ठेवला होता ..

गुंड " काढ रे पटपट .. ते घड्याळ काढ .. गळ्यातली चेन काढ "

आशिष ने घड्याळ काढले खाली ठेवले .. चेन काढली खाली ठेवली

आशिष " तिला सोड .. माझ्या कडे भरपूर पैसे आहेत .. मी सगळे तुला देईन ..तिला सोड "

गुंड " कसली भारी आहे रे तुझी हि पिल्लू आणि त्याने एक हात तिच्या दंडावर फिरवला ..

आशिष  जोरात ओरडला " ए ... हात लावू नकोस तिला.. आयविल किल यु बास्टर्ड " जाम भडकला होता तो

गुंड " माझ्या हातात दे ते सगळे उचलून .. आवाज चढवू  नकोस.. जास्त शहाणपणा केलास ना तर हिला पण घेऊन जाईन .. कडक माल आहे एकदम "

हे वाक्य ऐकल्यावर अवनी मॅडम चे डोके सणकले आणि इकडे आशिष पण तापला .. त्याने तेच घड्याळ उचलले आणि त्याच्या डोक्यात फेकून मारले .. तो जरासा मार बसल्या मुळे त्याचा अवनी भोवतालचा हात लूज झाला .. आणि त्याचाच फायदा घेत अवनीने ने त्याला कोपर मारले ..  दुसऱ्या मिनिटाला त्याला मानेला पकडून जमिनीवर आडवा पाडला.

आशिष तर बघतच बसला

अवनी ने त्याच्या दोन पायांच्या मध्ये तिच्या हिल्स च्या पायाने अशी जोरात मावाशीगिरी किक  मारली कि तो असा कळवळला .. पुन्हा एक फ्रंट किक .. मारली ..  कि बघायचा नको

आशिष ने त्याला बकोटी पडकून वर उचलले आणि " मी सांगितले होते तिला हात लावू नकोस .. तू ऐकले नाहीस .. आणि अशी एक जोरात कानफटात मारली कि त्याचा  दातच पडला .. एकदा हि .. एकदा तो .. दोघांनी मिळून त्याला धु धु धुतला .. अर्धमेला झाला होता

आशिष चे डोळे आग ओकत होते आणि अवनीच्या डोळ्यात पाणी होते ..

आशिष ने पोलिसांना कॉल करून बोलावले .. त्याला पोलिसांच्या हवाली करून त्याच्या दोघे गाडीत बसले.. दोघे एकमेकांकडे बघत होते ..

आशिष च्या हाताला लागले होते .. तिने टिशू पेपर ने त्याच्या हाताचे रक्त पुसले

आशिष " तू ठीक आहेस ?"

अवनी " हो .. "

आशिष " कराटे .. नुसतेच शिकली नाहीस तर वापरतेस पण चांगले ..  तिच्या डोक्यावरून हात फिरवला त्याने " यु आर रिअली ब्रेव्ह ..

आशिष " सीरिअली यार .. खूप घाबरलो होतो मी .. साला हरामखोर .. मसणात जाईल ..नरकात जाईल तो .. माझ्या बायकोला कडक माल बोलतो .. आणि त्याने स्टेअरिंग वर जोरात हात आपटला "

अवनी " आशु .. कसला चिडला होतास तू ..

आशिष " अरे मला तर त्याचा जीवचं घ्यायचा होता ... लिटरली आशिष मुठी आवळत होता .. उदया बघच पोलीस स्टेशन ला जाऊन नाही त्याची अजून उतरवली तर बघच .. असा थर्ड डिग्री लावायला लावतो ना त्याला .. साला पुन्हा कोणत्या मुलीकडे बघणार नाही .. 

अवनी "आता तर नाहीच बघणार .. त्याला नको तिथे लाथा घातल्यात मी "

आणि दोघे हसू लागले ..आशिष ने तिला गाडीत बसल्या बसल्याच त्याच्या कडे ओढली आणि स्वतःच्या मांडीवर घेतली .. आणि तिला किस करू लागला ..

🎭 Series Post

View all