लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग भाग ३२

story of two friends and their marriage

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग

भाग ३२

सुशांत " आला माझा सवत ... हा आला ना कि माझे जाम डोकं सणकत "

सावनी " सुश .. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना "

सुशांत " यार सानू .. इट्स नॉट अबाउट यु .. इट्स अबाउट हिम .. आय डोन्ट लाइक हिम .. तो मित्र नाहीये आपला .. तो उगाच मित्र असल्या सारखा का वागतो ?"

सावनी ने आदित्य ला फोन लावला

सावनी " गुड मॉर्निंग सर ..

आदित्य " गुड मॉर्निंग ..  सावनी .. कम ऑन  यु आर वेस्टिंग माय टाईम"

सावनी " सर .. सॉरी आज मी नाही येत आहे .. जमलेच तर हाफ डे येईन .. "

आदित्य चा स्वर एकदम बदलला " हॅलो ..  सावनी .. काही प्रॉब्लेम आहे का ? आय मिन अचानक सुट्टी घेत नाही ना तुम्ही .. तब्बेत बरी आहे का ?"

सावनी " सर .. एव्हरी थिंग इज  ऑल राईट .. आय जस्ट नीड सम टाईम .. आणि एक सर .. आज पासून मी माझी येत जाईल ऑफिस ला .. "

आदित्य " ओके फाईन .. "

सुशांत ने तिला मागून मिठीत घेतले " सॉरी ना .. तू चिडली का माझ्यावर ? .. मला खूप जेलस होत होते रे .. तो तुझी काळजी घेतो यार "

सावनी " खड्ड्यात गेला तो .. माझ्यासाठी तू महत्वाचा आहेस .. तुझा आनंद माझ्या साठी महत्वाचा आहे .. “

सुशांत " पण आता आज तू दांडी मारतेय का ?"

सावनी " नुसती मी नाही .. तू पण .. हाफ डे घे ... आपण जरा शांत बसून ठरवू .. नक्की आपल्याला काय करायचेय ते .. उगाच चिडचिड नको "

सुशांत " सॉरी ना ..". लाडात येऊन

गेल्या आठ महिन्यात खूप बदल झाले .. सुशांत चा ऑफिस मध्ये चांगला जम बसला .. सावनी चे ट्रेनिंग झाले  पण तिची पोस्टिंग स्वारगेट ला झाली ... थोडे दिवस ती बस ने गेली पण ऑफिस ला पोहचायला तिला १० वाजू लागले .. मग आदित्य जो कि तिचा बॉस होता तो तिच्या टॅलेंट वर .. साधे पणावर attract म्हणण्या पेक्षा त्याच्या मनात तिच्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार झाला होता .. तो तिला चांगला सपोर्ट करत होता .. शिकवत होता .. ट्रेन करत होता .. जबाबदारी देत होता .. इथं पर्यंत सगळे ठीक होते पण आता तिच्या काळजीने तो तिला पीक अप आणि ड्रॉप करू लागला ... हि गोष्ट सुश ला पसंत नाही पडली आणि रोज तो आला कि ह्याची चिडचिड होयची .. तरी त्याला विचारूनच तिने होकार दिला होता ह्या गोष्टीला .. तेव्हा सुशांत ला वाटले कि बस ने एकटी प्रवास करण्या पेक्षा हे बरं राहील .. आणि तो हो बोलला .. आणि ह्या गोष्टीला एक महिना झाला .. आणि आता त्याला आपला हा निर्णय चुकलाय असे वाटू लागले होते ..

सुशांत ने पण त्या च्या रिपोर्टींग मॅनेजर ला कॉल करून सांगितले कि हाफ डे येईल

सावनी सोफ्यावर बसली होती .. हा आला आणि तिच्या मांडीवर डोके ठेवून बसला .. तिचा हात हातात घेतला .. बोटांमध्ये बोटं गुंफून ..  

सुशांत " तू चिडली नाहीस ना ..  "

सावनी " नाही रे .. तुझ्या वर मी कशी चिडेन .. तुझ्या शिवाय मला कोण आहे का तरी ?"

सुशांत " मला पण ना .. तुझ्या शिवाय कोण नाहीये .. "

सुशांत " हे बघ .. आठ महिन्यात आपण फक्त महिना १० हजारतच भागवल.. आणि माझी सॅलरी सगळी तशी आहे .. १ लाख च्या वर पैसे साठलेत .. आपण तुझ्या साठी स्कुटी घेऊ या का ? "

सावनी " ऐक ना .. मी सायकल सोडली तर कधीच कोणतेच वाहन चालवले नाही .. त्यात आपल्या घरा पासून ऑफिस किती लांब आहे .. मला जमेल का ?"

सुशांत " जमेल ग .. मी शिकवेन ना तुला ? कारण हा जायचा यायचा प्रश्न नीट सोडवावा लागेल .. बस ने खूप रश असते .. मग मला ते पण टेन्शन लागून राहतं "

सावनी " बरं .. ठीक आहे .. पण मला येईल ना ? "

सुशांत " अग सायकल पेक्षा सोपी असते स्कुटी .. "

सावनी " ठीक आहे .. मी काय म्हणत होते आणि .. ते मंगळसूत्राचे पैसे पण सर्वेश ला देऊन टाकु .. म्हणजे हे मंगळसूत्र तुझ्या पैशाने घेतल्या सारखं होईल "

सुशांत " ठीक आहे .. मग आधी आपण स्कुटी घेऊ ते जास्त महत्वाचं आहे .. सर्वेश चे पैसे द्यायची काही घाई नाहीये "

सावनी " हो .. त्याचे बाकीचे पैसे जमेल तसे देऊ .. पण मंगळसूत्राचे तेवढे लवकर देऊ "

सुशांत " ओके .. चालेल .. "

----------------------------------------------------------------------------------

इकडे आठ महिन्यात आशिष आणि अवनीचा आधी घरातल्या घरात टिळा तर झालाच होता… मग एका छोट्याशा हॉल मध्ये एंगेजमेंट झाली ..दोघे खुश होते .. कधी लॉन्ग ड्राईव्ह .. कधी डेट .. कधी सिनेमा .. कधी अभ्यास ,असे एकत्रच होते .. आशिष च्या कामात ती त्याला मदत करू लागली .. अवनी जेवण शिकू लागली .. खरच डाएट करू लागली होती .. आणि डाएट मुळे आणि योगा मुळे आणि आशिष च्या प्रेमामुळे अजूनच सुंदर दिसायला लागली होती .. अवनी त्याला म्हणाली होती कि ट्राय टू रिच माय वीक पॉईंट्स .. तसे बऱ्या पैकी दोघेही एकमेकांच्या वीक पॉईंट्स पर्यंत पोहचले होते .. त्यांचे दोघांचे नातं इतकं घट्ट झाले होते कि कोणीही कितीही प्रयत्न केला मध्ये खो घालायचा तरी काहीही फरक पडणार नाही .. मजबूत प्रेमाचे मजबूत रेशमी बंध जेकी  फार सुंदर होते ..           

आज आशिष पहिल्यांदा तिला त्याच्या मित्र मैत्रिणींना भेटवायला एका पार्टीला नेणार होता .. आशिष नेच एक पार्टी वेअर ड्रेस तिला आणला होता .. अवनी गोरी असल्याने काळ्या ड्रेस मध्ये अजूनच सुंदर  दिसत होती .. आणि अवनी बरोबर आशिष ने पण ब्लॅक शर्ट मॅच केले होते .. दोघे एकदम खटाखट तयार होऊन पार्टी ला निघाले

अवनी " आशिष , मी तुला सांगितले ना कि तू मला जास्त महाग गिफ्ट्स आणत नको जाऊस .. मग का आणलास इतका महाग ड्रेस ?"

आशिष " अवनी ... यार प्लिज डोन्ट स्पॉईल माय मूड नाऊ .. गेल्या आठ महिन्यात एकही गिफ्ट तू माझ्या कडून घेतली नाहीस .. आता झाली ना एंगेजमेंट .. आता तरी मला काहीतरी करू दे ना तुझ्यासाठी "

अवनी " आता आहे शेवटचे .. बाकी सगळे लग्ना नंतर दे "

आशिष " बघू आता . आता पार्टी एन्जॉय कर "

अवनी " आशु .. बाय द वे .. मी कशी  दिसतेय ते पण नाही सांगितलं तू "

आशिष " आता गाडीत बसल्यावर बोलणारच होतो तर तुझे नको ते रामायण सुरु झाले .. मग कधी सांगू ?"

अवनी " सॉरी "

आशिष " येस .. यु शुड बी .. "

अवनी " चल मीच सांगते तू कसा दिसतोय ते .. " तू ना एकदम हॉट दिसतोय .. उफ्फ .. हे ब्लॅक शर्ट .. त्यातले त्यातून दिसणारे तुझे कट्स .. "

आशिष गालातल्या गालात हसू लागला

अवनी " आणि असा गालातल्या गालात हसलास ना तर काय माझे हाल होतात .. असे बेजार करू नये रे कोणाला ?"

आशिष " बस झाला मस्का .. गेलाय माझा राग .. पुन्हा जर मला तुझ्यासाठी काही करताना अडवलेस ना तर मग मी बघच काय करतो ते .. उचलून घरी घेऊन  जाईन .. आणि तुला तुझ्या घरी सोडणारच नाही "

अवनी " वाह .. एवढी प्रेमळ शिक्षा "

आशिष " तू ना .. मला काही सुचूच देत नाहीस .. मला पण आता काहीतरी अस्त्र शोधून ठेवलं पाहिजे तुला ब्लॅकमेल करायला .. "

बोल बोलता दोघे पार्टी हॉल ला आले

शशांक ने दोघांचे स्वागत केले .. " या या . आशिष .. आणि अवनी .. प्लिज वेलकम "

आशिष अवनी हातात हात घालून पार्टी मध्ये वावरत होते .. एका टेबल वर दोघे बसले .. आशिष ची नजर इकडे तिकडे जातच नव्हती .. तिच्या चेहऱ्यावरून नजर हटतच नव्हती आज

अवनी " आशु ... नको ना असा बघू माझ्याकडे .. मला कसे तरी होतंय "

आशिष " अरे काय ? आता मी बघायचं पण नाही का तुझ्या कडे ?"

अवनी " तसे नाही .. तुझे सगळे मित्र काय म्हणतील .. तू जाऊन त्यांना भेटून ये ना .. मी बसते इथे ?"

आशिष " चल .. तुझी ओळख करून देतो "

दोघे हातात हात घेऊन त्याच्या मित्रां जवळ गेले

आशिष " हे गाईज . मीट अवनी .. माय वूड बी "

सुरज " हॅलो अवनी ... नाईस टू मीट यु .. काँग्रट्स आशिष .. "

विनीत " हॅलो "

समीरा " हॅलो अवनी .. छान दिसतेय .. मस्त ड्रेस .. आशिष काय म एकदम चिकणी बायको मिळवळीस .."

विराज " हे .. काँग्रट्स बोथ ऑफ यु .. आशिष मग काय लव्ह मॅरेज कि अरेंज मॅरेज "

आशिष आणि अवनी ने एकमेकांकडे बघितले ..

आशिष " शी इज माय सोलमेट बाकी काहीच माहित नाही मलापण आणि तिला पण "

सगळे " ओह्ह... डीप इन लव हा "

सुरज " साल्या आशिष .. आम्हाला वाटले कुवराच राहतो कि काय तू ? मुलींची जशी काय ऍलर्जी होती ना तुला ? आणि आता इतका रोमँटिक .. हात हात घेऊनच फिरतोय "

आशिष " अरे असे काही नाही .. जस्ट ट्राईन्ग टू मेक हर कंफर्टेबल "

विराज " ओह .. "

समीरा " काय पण हा आशिष .. खूप ब्युटीफुल आहे तुझी बायको "

आशिष " थँक यु "

विराज " मग कधी आहे लग्न ?"

आशिष " में महिन्यात . डेट काढली कि सांगेनच "

तेवढ्यात इव्हेंट मॅनेजमेंट वाला आला .. आणि वेग वेगळे गेम्स घेऊ लागला .. अवनी तशी अजून लहानच होती .. ते पुढे चाललेले गेम्स बघून तिला खूप आनंद होत होता .. आणि एकदम मन लावून गेम्स बघत बसली .. आशिष ला कुठेतरी हे कपल डान्स .. कपल गेम्स म्हणजे फारच बोअर वाटायचे ..

क्रमश:

https://www.irablogging.com/blog/lagngath-the-advance-booking-bhag-5_6812

https://www.irablogging.com/blog/lagngath-the-advance-booking-bhag-6_6827

🎭 Series Post

View all