लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग भाग ३०

story of two friends and their marriage

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग

भाग ३०

शान्त .. दोघेही शांत .. आशिष ला सुद्धा खूप वाईट वाटले ..  हि जी प्रवृत्ती आहे ना ती किती घातक  आहे .. लहान निरागस मुलीना सुद्धा सोडत नाहीत

आशिष " यु नो अवनी .. आतापर्यंत च्या माझ्या आयुष्यात मला भेटलेली तू सर्वात सुंदर तर आहेसच पण ब्रेव्ह गर्ल आहेस .. मला अभिमान वाटला  तुझा ..  तुझ्यावर होणाऱ्या अन्याया  विरुद्ध तू आवाज उठवलास .. आणि तेच तू सगळ्यांना शिकवत असतेस .. सांगत असतेस .. आणि कोणी मागे पडत असेल तर मागे खंबीर उभी राहतेस .... तूझा रौद्र अवतार बघून मला खरंच महिषासुर मर्दिनी आठवली .. " तिच्या डोक्यावर थोपटत तो बोलत होता

अवनी " आशु .. आता हा विषय निघालाच आहे तर माझ्या कडून मला काही गोष्टी स्पष्ठच  करायच्या आहेत .. अजूनही वेळ गेलेली नाही .. तू तुझा निर्णय बदलू शकतोस .. राग मानू नकोस .. मी तुझा आणि तुझ्या घराण्याचा विचार करूनच हे बोलतेय .. कसे आहे ना नंतर या गोष्टीचे ओझे घेऊन जगण्या पेक्षा वेळेत तुला  मोकळे केलेलं बरं .. सुरुवातीला थोडा त्रास होईल पण नंतर फायदाच होईल "

आशिष " याचे उत्तर मी तुला आताही  देऊ शकतो पण आज साठी खूप झाले .. या पेक्षा जास्त नको आता .. "

अवनी " चिडलास का ? मला माहितेय माझे शब्द काट्या सारखे टोचले असतील तुला .. पण हेच सत्य आहे ..  मोठी व्हिक्टीम होता होता मी त्यातून वाचलेय .. "

आशिष " चल .. तुला घरी सोडून येतो "

अवनी " का ?"

आशिष " तुला चालेल ना मी तुझ्या आयुष्यात नसलेला ?.. "

अवनी " तुला जर मी नको असेल तर असे मी म्हटले .. "

आशिष " पण मी नसलेलो चालेल ना .. हे पण तर सत्य आहे ना "

अवनी " हो आहेच .. मला तुझी लाईफ खराब करायचे नाही "

आशिष "आणि मग ऍडव्हान्स बुकिंग च काय ? तेव्हा तर म्हणत होतीस कि एकदा मी ऍडव्हान्स बुकिंग केली कि मी कॅन्सल करणार नाही .. एक वेळ जीव घेईन पण ऍडव्हान्स बुकिंग कॅन्सल करणार नाही .. त्याचे काय ?"

अवनी तशी गालात हसली .." ठाकूर !! "

आशिष " मग आता बडी ठाकुरायन नाही होयचं का तुला ?"

अवनी " होयचंय "

आशिष " मग नाटकं कशाला करतेस? "

अवनी " सॉरी .. सॉरी ना "

आशिष " ते काय आहे ना ऍडव्हान्स बुकिंग चा रेग्युलर हप्ता न दिल्यामुळे असे प्लॉट बुकिंग कॅन्सल होईल कि काय असे वाटायला लागतं .. आता दुसरा हप्ता घेण्याची वेळ झालीय .. तुमचं काय लक्षच नाही गरीबा  कडे"

अवनी शांत पडून त्याच्या शर्ट च्या बटनाशी खेळत होती ..

आशिष " काय ग ? हप्ता देतेस का ? घेऊ मी माझा माझा ?"

अवनी कडून काहीच रिप्लाय दिला नाही अजूनही..

आशिष " बोल ना "

अवनी " थांब ना .. असेच पडून रहावेसे वाटतंय ना मला .. इथे सेफ वाटतंय .. इथे रिलॅक्स वाटतंय .. "

आशिष " बरं .. ठीक आहे .. झोप मग नीट झोप .. मी काहीतरी पार्सल मागवतो डिनर च "

अवनी " का ? "

आशिष " आज आई बाबा पार्टी ला गेलेत .. मला बाहेरून जेवून यायला सांगितले होते .. आता बाहेर जेवायला जायचा मूड नाहीये .. तर आपण घरात काहीतरी ऑर्डर करू ? बोला मॅडम काय जेवायचं आहे आज ?"

अवनी " मी करु का काही ? मसाले भात , पुलाव वगैरे .. किंवा मग डाळ खिचडी "

आशिष " आज नको आता .. तू अराम कर .. नेक्स्ट टाईम मी माझ्या पोटावर अन्याय करून घेईल काय ?"

अवनी " आशु .. मला खिचडी येते चांगली बनवता "

आशिष " मी कुठे काय म्हणतोय ? तू बनवशिल ती गोड मानून खाईल  मी "

अवनी " तू ना .. जा आता मी शिकणारच नाही जेवण ?"

आशिष " थँक यु हा .. "

अवनी " जा आता आज हप्ता कॅन्सल.. चालला होता विचार माझा "

आशिष " आज तुझ्या विचारांवर नाहीच आहे …हप्ता घेतल्या  शिवाय  आज सोडणारच नाहीये मी "

अवनी " गुड नाईट "

आशिष " अग बोल .. काय ऑर्डर देऊ .. "

अवनी " शेजवान नूडल्स , फ्राईड राईस .. चॉकलेट आईस क्रिम .. आणि .. एक कोक "

आशिष " बकवास .. त्या पेक्षा डाळ  खिचडी ऑर्डर करू का ?"

अवनी " नको ना .. बोअर होते रे ... मला चायनीज खायचय आज "

आशिष " ठीक आहे मग फ्राईड राईस च्या ऐवजी डाळ खिचडी ऑर्डर करतो .. म्हणजे माझि पण सोय होईल "

अवनी "  तुला नकोच असेल चायनीज तर मागव जे तुला पाहिजे ते .. मी खाईल ते "

आशिष " नको .. मी फक्त फ्राईड राईस च्या ऐवजी डाळ खिचडी मागवतो "

अवनी " ठीक आहे "

आशिष ने रेस्टोरंट ला फोन करून ऑर्डर देऊन टाकली .. तोपर्यंत अवनी रिलॅक्स बसली होती ..

आशिष " तुला आज घरी जायचा अटॅक अजून आला नाही वाटतं .. "

अवनी " का ? तुला माहित नाहीये का ?"

आशिष " म्हणजे ?"

अवनी " म्हणजे .. आज आई चे ट्रेनिंग आहे तर आई कोल्हापूर ला गेलीय .. मी आज इथेच राहणार आहे .. आई ने सकाळीच काकूंना फोन केला होता .. नॉर्मली अशी वेळ आली कि सावनी च्या घरी राहायला जायचे .. पण आता माझे ते हक्काचे घर गेलंय ना .. "

आशिष " आयला .. मला का सांगत नाहीस तू अशी इतकी महत्वाची गोष्ट.. अरे .. यार तू.. मी काही तरी छान प्लॅन केला असता ना ..

तेवढ्यात आशिष ला त्याच्या आई चा फोन आला

आशिष " हा आई "

प्रतिभा " अरे आशिष मी विसरुनच गेले बघ .. आज अवनी आपल्याकडे राहायला येणार आहे .. तू जा आधी आणि तिला घेऊन ये .. या पार्टीच्या नादात  मी विसरून गेले .. सकाळीच मालतीचा कॉल आला होता मला .. आणि एक तिला घेऊन बाहेर जेवूनच ये .. मला आणि बाबांना यायला रात्री ११ वाजतील .. गेस्ट रूम मध्ये बेड खाली बेडशीट आहेत त्यातली एक चांगली बेडशीट घालून तिची झोपायची सोय कर "

आशिष " काय आई ? एवढी महत्वाची गोष्ट तू कशी काय मला नाही सांगितलीस .. ?"

प्रतिभा " अरे विसरले ना आता काय करू ?"

आशिष " ठीक आहे .. ठेवतो मी आता "

आशिष ला उड्या च मारू कि काय असे झाले होते ..

अवनी " काय रे ? काय झाले ?"

आशिष " कुठे काय .. चल तुला तुझी रूम दाखवतो "

अवनी " ए हॅलो ... हीच माझी  रूम आहे .. मी  गेस्ट रूम मध्ये वगैरे झोपणार नाहीये .. आधीच सांगते "

आशिष " अरे वाह ! किती गोड आहेस ग तू ? आज पहिल्यांदा कोणत्या तरी चांगल्या कारणासाठी तू माझ्याशी भांडतेय .. आय डोन्ट माईंड टू शेअर बेड विथ यु .. मस्त कुशीत घेऊन तुला झोपायचंय  मला"

अवनी " हॅलो ... इतकी पण मी चांगली नाहीये रे ... गेस्ट रूम मध्ये तू झोपायचेस .. आज मी याच तुझ्याच बेड वर झोपणार .. तुझेच पांघरूण अंगावर घेणार .. "

आशिष " काय यार .. पोपट करते तू माझा ?"

अवनी " अरे पण आतासे ८ वाजलेत ... आज पण जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत खूप साऱ्या गप्पा मारू शकतो ना .. "

आशिष " आणि आई बाबा पण ११ वाजता येणार आहेत म्हणजे ... "

अवनी " म्हणजे ... तर खूपच मज्जा .. आपण अजून जोर जोरात खूप जास्त भांडू शकतो "

आशिष " तू भांड मी तुला बघतोच आता .. आज मेरे इलाके में हो तुम .. समजे क्या ?"

अवनी " इलाका किसीका भी धमाका तो हमारा हि होता है मेरी जान"

आशिष " चल आता जास्त वेळ घालवू नकोस .. हप्ता देऊन टाक पटकन .. "

अवनी " नो नाय नेव्हर "

आशिष " अरे झाला ना आता टिळा आपला …  एस .. एस .. अँड एस .. "आणि आशिष ने तिचा हात पकडला

अवनी " ठाकूर !! बदमाश नको बनू .. आणि ती हात सोडवून पळू लागली .. आणि तो तिच्या मागे .. तिने बेड वरच्या उशा एकेक करून त्याच्यावर फेकल्या आणि पळतच हॉल मध्ये गेली .. मग हॉल मधल्या उशा  एकेक करून त्याच्यावर फेकल्या .. तेव्हड्या सगळ्या उशा त्याने चुकवल्या आणि तिला गाठलंच .. आणि तिला खांद्यावर उचललं "

आशिष " नालायक .. आधीच दम काढते .. "

अवनी " अरे ठाकूर .. सोड ना खाली .. "

आशिष " काय हे घराचा  अवतार झालाय बघ .. आई आली तर दोघांना फटकावून काढेल "

अवनी " सॉरी .. सॉरी .. चल आवरून ठेवू दे .. नाहीतर सासूबाई भडकायच्या माझ्यावर उगाच "

आशिष ने तिला खाली उतरवली आणि भिंतीला टेकवून दोन्ही हात तिच्या आजूबाजूला ठेवून तिला ब्लॉक करून टाकले

अवनी " हे बघ ठाकूर .. मी तुला आधीच सांगितलंय कि ऍडव्हान्स बुकिंग चा फायदा फक्त मी घेणार .. तू घ्यायचा नाही .. "

आशिष " अरे यार !! आणि आशिष तिथून बाजूला झाला .. आणि उशा आवरून ठेवू लागला "

अवनी " ती पण उशा आणि सगळे इकडे तिकडे पडलेलं सामान उचलायला लागली "

तेवढ्यात बेल वाजली .. बाहेर पार्सल आले होते ..

अवनी " हू .. हू.. मी प्लेट्स लावते .. "

आशिष " घे .. " आणि पार्सल तिच्या हातात दिले

मग दोघ मिळून एकत्र जेवले .. गप्पा गोष्टी तर चालू होत्याच .. अवनी ने त्याला विषय बदलवून परत काहीतरी कारणाने हसवलेच .. मग मस्त गप्पा मारत जेवले .. प्लेट्स वगैरे आवरून ठेवले .. मग आशिष ने तिकडच्या रूम मध्ये बेड तयार केला ..

अवनी " आशु .. काहीतरी गेम खेळूया .. पत्ते किंवा scrabble  खेळायचं का ?"

आशिष " अरे यार .. अवनी .. मला आधी माहित असते तर मी आणून ठेवले असते .. आता असले खेळ खेळणारे कोणी नाहीये ग घरी म्हणून नाहीये काहीच "

अवनी " ठीक आहे .. "

आणि अवनी बेड वर आडवी पडली .. तिच्या बॅग मधली नोट बुक आणि पेन घेऊन बसली आणि

अवनी " चल .. फुली का गोळा खेळू "

आशिष " नको यार .. त्या पेक्षा टेरेस वर जाऊ .. मस्त गार हवेत बसू गप्पा मारत .. वरती झोपाळा पण आहे .. तुला आवडेल "

अवनी " ओके .. ठीक जाऊ मग वर .. "

क्रमश:

https://www.irablogging.com/blog/lagngath-the-advance-booking-bhag-5_6812

https://www.irablogging.com/blog/lagngath-the-advance-booking-bhag-6_6827

🎭 Series Post

View all