लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग भाग २५

story of two friends and their marriage

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग

भाग २५

सुशांत " आपले सगळे ठीक झाले .. सेट झाले ना कि आपण दोघे आधी तुझ्या घरी जाऊ .. तुझ्या बाबांना भेटायला .. मग माझ्या घरी जाऊ आई बाबांना भेटायला .. आपण खुश आहोत हे त्यांना कळले कि त्यांना आपली चिंता नाही लागून राहणार .. राग नाही गेला तरी चालेल पण चिंतेने आजारी नको पडायला कोणी हीच ईच्छा आहे माझी "

सावनी " बरं .. बर  .. आता तयार रहा .. तुला कधीही आत जावे लागेल "

आणि आतला  मुलगा बाहेर आला तसा सुशांत आत मध्ये गेला

आत मध्ये एक साधारण ५० ते ५५ वयाचे गृहस्थ होते ..

सर " प्लिज सीट "

सुशांत बसला " थँक यु "

सर " बाहेर काय चाललं होते ? कोण आहे ती मुलगी ?"

सुशांत ने मागे बघितले तर आतून काचेतून सावनी त्याला दिसत होती

सुशांत ने खुणेनेच विचारले " ती ... "

सर " हो तीच .. जी तुझ्या मुळे रडत होती .. "

सुशांत " ती माझी बायको आहे "

सर " काय ? मग काय  तिला  इंटरव्यूह ला पण घेऊन फिरतोस कि काय ? "

सुशान्त " नाही .. आज पहिल्यांदा आलीय ती माझ्या बरोबर .. माझ्या नंतर ती पण  इंटरव्यूह  देणार आहे "

सर " दोघेही सेम पोस्ट साठी ?"

सुशांत " हो "

सर " काय पळून लग्न केलेस का ?"

सुशांत " हा प्रश्न खूप पर्सनल आहे .. नाही उत्तर दिले तर चालेल का ?"

सर " ठीक आहे .. सांग तुझ्या बद्दल "

सुशांत " माय नेम इज ....

सर " मी मराठीत विचारलंय ना तर मराठीच बोल "

सुशांत ने त्याचा इंट्रो मराठीत दिला

सर " काय नाव म्हणालास वडिलांचे " मिस्टर विलास सरदेशमुख "

सुशांत " ते नामांकित वकील आहेत .. तेच का ?"

सुशांत " सर .. मी निघतो .. मला नाही दयायचा इंटरव्यूह " आणि सुशांत उठून निघू लागला

सर " केबिन च्या बाहेर पाय जरी टाकलास तर तुझ्या वडिलांना माझा कॉल गेलाच समजा ..बस चल पटकन .. मला सगळे सांगायचं "

सुशांत "मी तुम्हाला काही सांगायला बांधील नाही .. "

सर " हे बघ .. तू मला तुझा मित्र समज .. तुझे वडील माझ्या ओळखीचे आहेत .. करोडपती बापाच्या मुलाला नोकरीला ठेवणे म्हणजे रिस्क आहे . त्यामुळे मला सगळे माहित असणे गरजेचं आहे ."

सुशांत " काय माहिती पाहिजे तुम्हांला? "

सर " तुला नोकरीची काय गरज पडली .. नक्कीच तुला ऑफिस टाकून दिले असते तुझ्या बाबांनी .. "

सुशांत " सर .. नक्कीच वडिलांनी माझ्या साठी खूप केलय आणि अजून केलेही असते .. पण त्यांना ती बाहेर आहे  ना ती मुलगी सून म्हणून नको होती .. आणि मला हीच हवी होती .. मग मी माझे प्रेम स्वीकारले .. आणि आता माझा आणि त्यांचा काही संबंध नाहीये .. "

सर " मुली च्या आई बाबांनी केस नाही का टाकली ?"

सुशांत " ती आणि मी सदज्ञान आहे .. दोघांचे प्रेम आहे .... काय करू शकतात तिचे बाबा ?"

सर " बॅलन्स शीट टॅली करता येते का ?"

सुशांत " हो .. पण कधीतरी वेळ लागतो "

सर " इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करता येतो का ?"

सुशांत " हो "

सर " 80c  80D काय काय आहेत माहितेय का ?

सुशांत “80C allows deduction for investment made in PPF , EPF, LIC premium , Equity linked saving scheme, principal amount payment towards home loan, stamp duty and registration charges for purchase of property, Sukanya smriddhi yojana (SSY) “

Section 80D provides for tax deduction from the total taxable income for the payment (by any mode other than cash) of medical insurance premium paid by an Individual or a HUF. “

सर " इम्पेसिव्ह .. गुड "

सर " किती सॅलरी पाहिजे तुला ?"

सुशान्त " सर .. मी  २५००० टू ३००००/-  एक्सपेक्ट करतोय "

सर " एवढा .. तुला काहीच कामाचा अनुभव नाहीये पण "

सुशांत " तो मला दोन दिवसात येईलच ना .. बाकी हजरो गणित मी सोडवलेत अभ्यास करताना "

सर " प्रॅक्टिकल काम वेगळे असते "

सुशांत काहीच बोलला नाही .. पण मनातून थोडा नाराज झाला .. काय उपयोग ९८ परसेन्टेज मार्क्स मिळवून जर ऍव्हरेज पगार मिळणार असेल तर "

सर " हे बघ तुझे cA  फायनल इअर पण बाकी आहे .. तुला कामाचा काहीच अनुभव नाही .. त्यामुळे ३०००० तर नाहीच पण मी २००००/- पर्यंत देऊ शकतो .. तयार असलास तर २ नंबरच्या केबिन मध्ये जाऊन तुझे अपॉइंटमेंट लेटर घेऊन टाक "

सुशांत " थँक यु सर .. सध्या नोकरी मिळवणे गरजेचे आहे .. मी तयार आहे "

सर " गुड .. तुझा परफॉर्मन्स आवडला तर मी नक्की वाढवून देईन नंतर "

सुशांत " थँक यु सर "

सर " यु मे गो "

सुशांत " सर एक रिकवेस्ट होती "

सर " काय ?"

सुशांत " आता इंटरव्यूह ला माझी बायको येणार आहे .. तिला प्रेमाने प्रश्न विचारा ..तीचा  आज पहिला इंटरव्यूह आहे .. आणि जरा घाबरट आहे ती .. पण एकदम हुशार आहे अभ्यासात .. माझी चुकलेली बॅलन्सशीट मला टॅली करून देते ती "  हे सांगताना एकदम गोड हसला ..

सर म्हणजे  खडूस च म्हणायचा पण तो पण हसला

सर " अजून काही "

सुशांत " अजून एक .. हि माझी आणि माझ्या बायकोची प्रेमाची लढाई आहे ती दोघांनाही जिंकायची आहे म्हणून प्रयत्न चालू आहेत .. तर माझ्या वडिलांना कॉल करून उगाच त्यात व्यत्यय आणू नका "

सर " या विषयवर आपण बोलू नंतर .. मला खूप काम आहे .. तू खूप वेळ घेतलास माझा .. तू जाऊ शकतोस "

सुशांत बाहेर निघून गेला

सावनी बाहेर उठून उभी राहिली .. तिने डोळ्यानेच त्याला विचारले ? कसा होता इंटरव्यूह ?"

सुशांत " हो ठीक झालाय .. तू जा आत.. आणि घाबरु नकोस .. खूप चांगले सर आहेत .. बिनधास्त इंटरव्यूह दे " आणि त्याने तिला आत मध्ये पाठवले "

सर " बसा "

सावनी ची मान खालीच मान होती .. मनातून खूप घाबरली होती ... दिसत होते सरांना .. त्या गडबडीत ती थँक यु पण बोलली नाही आणि बसली

सर " पाणी पियू शकतेस तू .. मग बोलू आपण "

सावनी चे डोळेच पाण्याने भरले होते .. आणि तशातच तिने पर्स मधून पाणी बॉटल बाहेर काढली आणि पाणी पियू लागली .. हात थरथरत होते लिटरली

सर " पहिलाच इंटरव्यूह का ?"

सावनी ने होकारार्थी मान हलवली

सर " नाव काय तुझे ?"

सावनी " सावनी .. सुशांत .. " पुढे काही बोललीच नाही .. तिला  आडनाव आठवेच ना .. माहेरचं सांगायचं का सासरचं .. यातही कन्फयुज दिसत होती "

सर " मला वाटतं  तू इंटरव्यूह साठी तयार नाहीयेस .. तू जाऊ शकतेस "

सावनी " नाही नको .. सॉरी .. मी देईन इंटरव्यूह "

सर " ठीक आहे .. मग वर बघून बोलू शकतेस तू .. मी तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे .. घाबरायचं काही कारण नाहीये .. तू घरात वडिलांना घाबरतेस का ?"

झाले .. सरांनी तिच्या दुखऱ्या नसेवरच पाय ठेवला होता अजाणते पणे "

सर " ओके व्हॉट इज डेप्रीसिएशन ?"

सावनी " In accountancy, depreciation refers to two aspects of the same concept: first, the actual decrease of fair value of an asset, such as the decrease in value of factory equipment each year as it is used and wears, and second, the allocation in accounting statements of the original cost of the assets to periods in which the assets are used

सर " पॅन कार्ड चा उपयोग आहे का ? का फक्त आय डी प्रूफ आहे ते ?"

सावनी " PAN Card is important for taxpayers as it is necessary for all financial transactions and is used to track the inflow and outflow of your money. It is important when paying income tax, receiving tax refunds, and receiving communication from the Income Tax Department. ... PAN Card also serves as a proof of identity."

सर " गुड "

सर " ह्या CA चा नक्की काय जॉब असतो तुझ्या मते ?"

सावनी "As a chartered accountant you'll give advice, audit accounts and provide trustworthy information about financial records. This might involve financial reporting, taxation, auditing, forensic accounting, corporate finance, business recovery and insolvency, or accounting systems and processes."

सर " तुझ्या नवऱ्याला कितीचे पॅकेज मिळावे असे वाटते तुला ?"

सावनी " सर .. हे तुमचं अख्ख ऑफिस तो एकटा सांभाळू शकतो .. तुमच्या फर्म चा सगळा प्रॉफिट एवढं तो कमवू शकतो .. पण सध्या अजून तो हि लहान आहे .. शिक्षण पूर्ण होयच आहे .. कामाचा अनुभव नाही .. तरीही ५ लाखाचे पँकेज तर त्याला कॅम्पस मधून नक्कीच मिळाले असते "

सर " आणि तुला ?"

सावनी " सर मी जरा घाबरट आहे .. मला मुळात अनोळखी लोकांचीच भीती वाटते .. त्यामुळे अजून थोड कॉन्फिडन्स वरं काम करावे लागणार आहे .. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या ... "

सर " तू १००००/- हजरात सुद्धा काम करायला तयार होशील का ?"

सावनी " नक्कीच .. ज्या माणसाकडे कामाचा अनुभव नाही आणि ज्याला नोकरीची गरज आहे त्याने चांगला पगार मिळण्या साठी घरी बसून राहण्या पेक्षा मिळेल तिथे काम सुरु करावे याने मनी रोटेशन सुरु होते आणि अनुभव वाढत जातो .. असे माझे वडील नेहमी म्हणायचे "

सर " मग असे चांगले संस्कार करणाऱ्या वडिलांना सोडून या च्या मागे का आलीस ?"

सावनी एकदम शांत झाली मनातच ( तसेही त्यांना माझ्या लग्नाची घाई झालेली होती .. कोणीतरी गावातला अपरिचित माणसाशी लग्न करण्या पेक्षा ज्याच्यावर माझे प्रेम आहे त्याला मी स्वीकारलय यात काय चूक?)

सावनी " सर .. काही वेळेला परिस्थिती अशी असते कि कोण चुकीचे आहे आणि कोण बरोबर आहे हे आपण नाही ठरवू शकत .. माझ्या हातावरून मला दिसणारा 6 नंबर तुम्हांला 9 दिसतो .. याचा अर्थ दोघेही बरोबर आहेत .. "

सर " ठीक आहे .. तूला मी शॉर्ट लिस्ट करतो .. अजून बाकीच्या कॅन्डीडेट चे इंटरव्यूह बाकी आहेत "

सावनी " थँक यु सर "

क्रमश:

https://www.irablogging.com/blog/lagngath-the-advance-booking-bhag-5_6812

https://www.irablogging.com/blog/lagngath-the-advance-booking-bhag-6_6827

🎭 Series Post

View all