लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग भाग २०

story of two friends and their marriage

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग

भाग २०

अवनी " माझ्या मैत्रिणीला जर त्रास दिलास ना तर गाठ माझ्याशी आहे .. "

सुशांत "वाहिनी साहेब ! हिम्मत कुठे  आहे तेवढी माझ्यात .. तुमच्या आज्ञेबाहेर जाण्याची "

तसे सगळेच हसायला लागले

अवनी " आशु .. किती छान दिसतायत ना दोघे "

आशिष " हो ना .. बोथ आर क्युट टुगेदर .. असेच सुखी रहा रे "

सुशांत आणि सावनी ने आशिष ला नमस्कार केला ..

आशिष " सावनी ... काय मग खुश का ?"

सावनी ची मान खाली होती आणि खाली मान  घालूनच होकारार्थी हलवली

आशिष " सुशांत काय खरं नाही बाबा तुझे .. तुझ्याशी तरी बोलते ना ... " आणि हसू लागला

सुशांत " इशारो इशारोमें "

अवनी " अरे सावनी .. आता मोकळी हो जरा .. एक्सप्रेस होत जा .. सुशांत ला त्रास देऊ नकोस काय ?"

सावनी " मी कुठे ग ?"

आशिष " आला बाबा आवाज बाहेर एकदाचा "

सावनी " मी बोलते ..थोडी ओळख झाली कि मग "

आशिष " सुशांत शी ओळख झालीय ना "

तसे सगळेच हसले ..

सुशांत ने सगळ्यांची ओळख करून दिली .. ग्रुप फोटो काढला

रिया " दादा , बरं झाले तू आलास ... सुशांतची कळी खुललीय .. हि इज फॅमिली मॅन "

आशिष " म्हणूनच आलो .. "

अमित " चला आता सर्व जण हॉटेल ला जेवायला जाऊ .. "

आशिष " ठीक आहे गाईज यु कॅरी ऑन .. आम्ही दोघे निघतो "

अवनी ला जावेसे वाटतच नव्हतं ..

सर्वेश " दादा .. आता जेवून जा ना .. नंतर फ्लॅट पण बघून घे .. कुठे राहणार आहे ते पण बघून घे "

सुशांत " हो दादा .. इथेच बी बिल्डिंग मध्ये फ्लॅट नंबर  ३०४  आहे "

आशिष " ठीक आहे .. पण आता निघतो आम्ही .. मी फक्त एकदा भेटायला आलो .. सुशांत काही वाटले तर लगेच कॉल करशील .. " आणि त्याने एक पॅकेट गिफ्ट रॅप केलेलं त्याला दिले " विष यु अ हैप्पी मॅरीड लाईफ ... ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर "

अवनी " बाय .. निघतो आम्ही .. काळजी घ्या दोघांनी एक मेकांची "

रिया .. सोनल .. प्रिया सगळ्या एकदम " दादा आणि अवनी जेवून जा ना .. "

सुशांत " हो ना दादा "

आशिष " नको रे .. आता  भेटलो ना .. मग आता मी निर्धास्त  झालो .. आता जातो "

सावनी " दादा  थांबा ना ... जेवून जा ना प्लिज "

सगळे जोर जोरात हसले

सगळे " आता हाय कमांड करून ऑर्डर आली दादा आता थांबावेच लागेल तुम्हांला "

आशिष आणि सुशांत दोघे एकमेकांकडे बघून हसले ..

अवनी " चला रे .. भूख लागली आता मला " आणि आशिष च्या हातात हात घालून त्याच्याकडे बघून डोळ्यांनीच रिक्वेस्ट करू लागली " थांबू ना अर्धा तास "

सावनी " दादा .. मला जाऊ बाई कधी घेऊन येणार ?"

सुशांत " बघ .. आता बोलायला लागली कि मला गप्प बसायला लावेल ती "

सावनी " असे काही नाही .. मी बोलले तरी बोलता तुम्ही सगळे "

आशिष " हा आता तुमच्या मैत्रिणीला सांगा कि लवकर तयारी करा .. मग येईलच जाऊ बाई तुला "

अवनी " ए सावनी .. तुला तर माहितेय ना .. तू काय बोलते ? आणि एक… दोघेही परीक्षा देणार आहेत आधीच सांगते मी .. "

सुशांत " माझे माहित नाही पण सावनी नक्कीच परीक्षा देईल "

सावनी " नाही दोघेही देऊ .. हेच धेय आहे ..बघू आता कसे होतंय ते "

नंतर हाँटेल ला जाऊन जेवण जेवले .. दोघांना घास भरवायला सांगितला ..

मग हसत खेळत जेवण , खूप सारे फोटोज  झाले

आशिष ने सर्व मित्रांना मनापासून थँक यु दिले आणि हॉटेल चे बिल पण पे केले .. दोघांना आशीर्वाद देऊन बाय करून पुन्हा घराकडे गेले

म्हणतात ना एकदम दणक्यात  तसे लग्न झाले ..

रिया ने तिला घरात येताना वाट अडवली .. नाव घ्यायला शिकवून मग घ्यायला लावूनच घरात घेतले .. दोघं नवरा बायकोला ओवाळून माप ओलांडून घरात घेतले.

रिया " आता सगळे जरा अराम करा .. उद्या घरी सत्य नारायणाची पूजा करू .. जेवण झाल्यावर मग आपण सारस बागेतील गणपतीला जाऊ .. तिथूनच  मग महा लक्ष्मीच्या देवळात जाऊ .. "

सर्वेश " मग तुम्ही सगळे मला सोडायला एअर पोर्ट ला या .. मला बाय करायला "

प्रिया " हो आणि मग आपण आपल्या आपल्या घरी जाऊ "

सोनल " येस "

अमित " ग्रेट .. मस्त प्लांनिंग केलेस रिया "

सुशांत " खरंच अरे तुम्ही सगळ्यांनी खूप केलंत .. मी थँक्स पण म्हणू नाही शकत "

सर्वच " सुशांत ... बायको समोर मार खायचाय का ? असे उचलून धोपटून काढू ना आता जास्त बोललास तर "

रिया सावनी ला आत घेऊन गेली .. " चला ग जरा वेळ आराम करू या .. अमित आता तुम्ही लोक पण अराम करा रे "

सगळे जण फ्रेश होऊन जरा वेळ झोपले .. सगळे झोपले पण दोन माणसं ठक्क जागे .. कोण असतील सांगा

सुशांत आणि सावनी ... काय होतय .. नक्की मनात .. आनंदाने मन भरारी मारत होते .. मधेच वरून  झोपाळ्यावरून खाली येताना कसे धस्स होते तसेही वाटत होते .. सावनी  तर अंगावर पांघरूण घेऊन आत मध्ये आपले लग्न झालेय या विचारानेच लाजत होती .. सुशांत मनात विचार करत होता दादाने मला ऍडव्हान्स बुकिंग सांगितले असते तर कदाचित हि स्टेप मी घेतली नसती .. जाऊ दे .. शेवटी काय माझा प्लॉट मी मिळवलाच .. त्याला याहू ... असे जोरात ओरडावे असे वाटत होते .. सावनी ला खांद्यावर उचलून घेऊन नाचावेसे वाटत होते .. कधी हे सगळे जातील कधी मला तिच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारता येईल असे वाटून तो हि मनात मांढे खात होता

सावनी ला  वाटू लागले कि ह्या सगळ्या मित्रांनी किती किती केलंय आपल्यासाठी .. आणि आता लगेच तर नक्कीच काहीच करत येणार नाही त्यांच्यासाठी .. आणि त्यात सर्वेश उद्या दोन वर्षांसाठी दुबई ला जाणार म्हणजे त्याची भेट होईल कि नाही ?.. अर्धा एक तास तिने आराम केला आणि फ्रेश होऊन सगळ्यांसाठी चहा टाकला .. मस्त आल्याच्या चहा चा वास आला तसा एकेक जण उठू लागले ..

प्रिया " अरे सावनी तू कशाला करतेस ? आज तर नाहीच ? आज तू नवी नवरी आहेस "

सावनी " एक ना प्रिया , मला जेवण बनवता येते .. प्लिज आज मला आपल्या सर्वांसाठी जेवण बनवू द्या "

सोनाली " ओके .. ओके .. प्लिज डोन्ट से प्लिज .. तू म्हणजे ना लगेच आत रडशील कि काय असे वाटते यार .. थोडी चिल मार.. अशी इतकी हायपर का होतेस ? "

प्रिया " अग .. ती नवीन आहे .. होईल तिला सवय आपली .. हळू हळू "

ह्या दोघी एकमेकींशी बोलत होत्या  तोपर्यंत तिने चहा कपात ओतला पण ..

सावनी " आता सर्वांना द्याल का तुम्ही दोघी प्लिज "

प्रिया " ओके .." आणि तिने चहाचा ट्रे घेतला आणि बाहेर गेली . उभ्या उभ्याच तिने सर्वेश ला पायाने मारले " उठ रे .. चहा आणलाय .. उठ लवकर "

सर्वेश " शट अप प्रिया .. झोपू दे ना यार ... लाथ काय मारतेस .. डॉंकी "

प्रिया " यु डॉंकी .. लवकर उठलास तर चहा मिळेल .. बाय द वे आजचा चहा स्पेशल आहे .. सावनी ने बनवलाय "

अमित " चल दे मला .. दोन कप ... यार या रिया ला चहा बनवता येत नाही .. माझ्याच हातचा चहा पियुन कंटाळलोय मी .. आज नक्कीच चहा चांगला मिळेल "

सुशांत आपला गप उठला आणि फ्रेश होयला गेला .. आणि मनातच विचार करू लागला .. "हिला पण ना नको तिथे शहाणपणा करायला कोण सांगतो काय माहित ? आत ह्या लोकांना जर हिचा चहा नाही आवडला तर तोंडावर बोलतील आणि हिला ते सहन नाही झाले तर रडत बसेल .. आ बैल मुझे मार "

सुशांत फ्रेश होऊन पाणी प्यायला म्हणून किचन मध्ये गेला तर मॅडम .. पीठ मळायला बसल्या होत्या

सुशांत मनात " घ्या अजून टेन्शन .. आता जेवण करायला बसली .. हे लोक माहित नाहीत तिला अजून .. "

सुशांत ने फ्रिज मधून बाटली काढून पाणी घेतेले .. पण तिला जे ऑकवर्ड झाले कि तिने जे चेहरा फिरवला  ते त्याच्या कडे बघितलेच नाही .. उगाच बाहेर कोणाला काही वाटू नये म्हणून त्याच्याशी बोलणेच टाळले तिने ..

अमित " अरे सुशांत , यु आर लकी  .. कसला भारी चहा केलाय तुझ्या बायकोने .. मस्तच .. एकदम अमृततुल्य .. लै भारी "

रिया " ह्या बोक्याला आवडला म्हणजे नक्कीच चांगला असेल रे .. ए प्रिया मला पण दे एक कप "

सगळ्यांनी घेतला .. पण सुशांत घेई पर्यंत कप उरला नाही .. सगळे अह्हा .. मस्त ... भारी .. असे म्हणून झुरके मारून चहा घेत होते आणि चाय वाली ने ज्याच्यासाठी चहा बनवला त्याला नाही मिळाला "

सुशांत " अरे ए !! अमित  झालेत २ कप तुझे .. एक मला ठेव "

अमित " नाही रे .. मला खूप आवडलाय .. तू आतून घेऊन ये जा .. तुझी बायको देईल तुला "

सुशांत आत येऊन  "चहा आहे का ?"

तिने तिच्या साठी जो ठेवला होता तो कप तिने त्याला दिला ..

सुशांत " तू घेतलास ?"

सावनी ने होकारार्थी मान हलवून विषय मिटवला ..

सुशांत ने कप घेतला पण अर्धा चहा तिच्या साठी ठेवून आला .. न बोलता .. दोन मिनिटाने तिचे लक्ष गेले तर कपात चहा आहे म्हटल्यावर तिला हसूच आले आणि पटकन चहा पियुन टाकला तिने

.. मग काय त्या दिवशी सावनी ने सर्वांसाठी जेवण केले .. रिया , प्रिया , सोनल होतीच तिच्या मदतीला

पुरी , बटाटायची  भाजी , वरण भात .. आणि गुलाब जामून केले .. सगळ्यांनी जेवणावर ताव मारला .. सगळ्यांनी तिचे कौतुक केले .. फार बोलत नाही पण  काम करायला लागली कि एकदम स्पीड ने करते .. हळू बाई नाही असे रियाचे मार्किंग मिळाले

🎭 Series Post

View all