लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग भाग १९

story of two friends and their marriage

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग

भाग १ ९

आशिष " बरं बास बास हा विषय आता .. आपण अल्मोस्ट पुण्यात आलोय .. त्याचा एक क्लोज फ्रेंड आहे सर्वेश आपण आधी त्याच्याकडे जाऊया .. त्याला नक्कीच काहीतरी माहित असेल "

अवनी " ऐक ना .. मी ठीक दिसतेय ना .. मी कॉलेज ला जायच्या हिशोबाने तयार झाले .. "

आशिष " अरे एकदम  चिकणी दिसतेय .. फक्त ते केसांचे बघ .. जरा जास्तच टाईट बांधले आहेस .. त्यांना नीट कर "

अवनी " हो ते करते रे .. ते हवेत उडले कि फ्रिझी होतात म्हणून बन बांधलाय "

आशिष " अरे पण सुशांत च्या फ्रेंड समोर तुला का छान दिसायचंय ?

अवनी " आपले कसे आहे ना इम्प्रेशन खराब नाही पडणा मंगता "

आशिष " कपाळ माझे ? "

अवनी " अरे तसे नाही रे .. आता तुझी गर्ल्फ्रेन्ड शोभली पहिजे नाही का ? आता तू एवढा हॉट मग मी कोल्ड दिसून चालणार नाही .. "

आशिष " बाई .. मी कसा काय तुला हॉट दिसतो काय माहित ? अक्खी कॉलेज लाईफ एकट्याने काढली मी " आणि हसायला लागला

अवनी " नजर होनी चाहिये हिरे को पहचान नेकी "

आशिष " कोणत्याही विषयावर तू तास दोन तास असे बोलू शकते ना .. ग्रेट टॅलेंट आहे रे हे .. किधर थी  तू इतके दिन "

अवनी " तेरे हि इंतेजार में थी । ठाकूर !!"

आशिष " बरं ऐक ना .. तुला बघून सावनी नक्की रडेल .. तिला काय टिप्स द्यायच्यात त्या दे आणि पटकन आपण निघून जाऊ .. जास्त वेळ नको थांबूया तिकडे .. आणि तू रडू नको तिथे .. कळलं का ? तिला आपण  स्ट्रेंग्थ द्यायला आलोय .. इमोशनली सपोर्ट म्हणून "

अवनी " ठाकूर !! तुम ये मत भुलना कि मी बडी ठाकुरायन आहे .. मी कशाला रडेल .. मी तर सगळ्यांना नाचवणार माझ्या तालावर "

आशिष " तुझ्या तर आता .. " आणि तिच्या मानेला मागून पकडून मान  हलवू लागला

अवनी " ठाकूर .. नको रे मानेला हात लावूस  असा अचानक शहारा येतो माझ्या अंगावर .. हे बघ . माझे गुसबम्प "

आशिष " म्हणजे काहीतरी इफेक्ट आहे म्हणायचा माझा .. "

बोल बोलता दोघे सर्वेश च्या घरी म्हणजे लग्न घरी खाली सोसायटीत पोहचले ..

----------------------------

सगळ्यांचा चहा नाश्ता झाल्यावर सुशांत ला आणि सावनीला त्याच्या मित्रांनी हळद लावली .. जरासे नाचले  काय आणि सुशांत ला पण सावनी चा हात हातात घेऊन नाचायला लावले .. अख्या घरभर हळद झाली होती ..

सावनी च्या हातावर मेहंदी चा रंग चढू लागला होता .. हळदीने चेहऱ्यावर पिवळट सर रंग आला होता .. पोरींनी तिच्या हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला  .. रिया आणि अमित दोघे नवरा बायको होते .. रिया जरी मॉडर्न दिसत असली तरी ट्रॅडिशनल सगळ्या गोष्टी आवडायच्या तिला .. अमित आणि रिया ने बरोबर प्लॅनिंग करून त्यांचे लग्न लावून देत होते ..

लगेचच अंघोळ घालून तिला बनारसी शालू नेसवला .. केसांची सागरवेणी घालून  त्यावर खूप सारे मोगऱ्याचे गजरे लावले .. नवरी तर सुंदर दिसत होती आणि नवरीचे रूप आणि साज एकदम भारी वाटू लागला होता .. इकडे सुशांत पण काही कमी हँडसम दिसत नव्हता .. मस्त मरून कलर ची शेरवानी .. डोक्यावर फेटा .. आणि पायात मोजडी .. नवरदेव तयार

सुशांत " सर्वेश .. अरे इतकी तयारी कशाला केलीस ? आपल्याला एकदम साधेपणात करायचे होते सगळे ? "

अमित " सुशांत , मार हवाय  का तुला ? आता एन्जॉय कर ना .. कशाला नको तो विषय काढतोस ..  आज आणि उद्या काही बोलू नकोस .. एक जरी विधी मिस झाला ना तर रिया नाराज होईल .. तुला माहितेय रिया नाराज झाली तर मला काय काय करावे लागेल .. तर आता गप्प बसायचं आणि आम्ही करतोय ना ते सगळे करून द्यायचं "

सर्वेश " बरोबर .. बोललास अमित "

पुढे मित्रांनी मिळून सोसायटीच्या हॉल मध्ये सर्व विधी व्यवस्थित पार पाडून या दोघांचे लग्न लावून दिले .. रिया आणि अमित ने कन्या दान केले .. सर्वेश ने त्याचा कान पिळला.. प्रिया आणि सोनल ने त्याचे शूज लपवले .. काय काय मज्जा करत होते ..

सप्तपदी .. सात फेरे .. सुशांत ने तिच्या भांगेत कुंकू भरले तेव्हा मात्र तो सुद्धां जरासा शांत झाला होता .. हा क्षण आपल्या आयुष्यात अशा पद्धतीने येईल असे त्यालाही वाटले नव्हते .. सर्वेश ने त्याच्या हातात एक छोटे मंगळसूत्र दिले .. त्याने भटजीने सांगितल्या वर  मंगळसूत्र  तिच्या गळ्यात घातले .. आनंद तर होताच आपले सर्व जिवलग आपल्या बरोबर आपल्या महत्वाच्या घटनेत सहभागी नाहीयेत .. कुठे तरी दोघेही आपापल्या आई वडिलांना मिस करत होते .. आशिष अवनी ला मिस करत होते ..

सावनी ने आता ठरवले होते कि अजिबात रडायचे नाही सुशांत समोर नाहीच नाही आणि आज तर अजिबातच नाही .. नाहीतर त्याला वाटेल कि तो एवढे करतोय तरी मी खुश नाही त्यामुळे ती तिच्या सर्व भावना मनात दडवून बसली होती ..

दोन भटजींनी मिळून आंतरपाठ धरला आणि मंगलाष्टके म्हटल्या .. सर्व फ्रेंड्स नि अक्षता टाकल्या आणि दोघांनी एकमेकांना हार घालायच्या वेळी अमित ने सुशांत ला वर उचलले ..

सावनी बिचारी आता तिला कोण उचलणार .. म्हणून सुशांत " अरे .. खाली ठेवा .. ती कशी घालेल हार .. तेवढा वेळ पण त्याला सहन होत नव्हता .. तेवढ्यात सर्वेश आला आणि सावनी ला विचारून तिला त्याने उचलले ..

सर्वेश " सावनी चा भाऊ असताना हा प्रश्न पडतोच कसा तुम्हांला ?.. सावनीने सुशांत च्या गळ्यात फायनली हार  घातला .. मग सुशांत ने पण हार घातला  .. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या

अमित " नाऊ यु आर ऑफिशिअली हजबंड अँड वाईफ .. अँड टू  सेलेब्रेट धिस .. यु मे किस द ब्राईड "

प्रिया " येस .. कम ऑन सुशांत .. यु कॅन डू इट "

सोनल " अरे ए .. काही हि काय .. ती आधीच लाजरी बुजरी आहे .. आणि तिला कशाला त्रास देताय "

प्रिया " सुशांत ... सुशांत ... "

अमित " सुशांत .. सुशांत "

सर्वेश " सुशांत .. सुशांत "

सुशांत ला काय करावे समजेना .. तो नको नकोच म्हणत होता आणि सावनी कडे बघत होता तर ती ची मान जी खाली होती ती खाली च .. पण थरथरणारे हात बघूनच त्याला कळले होते कि किती घाबरली असेल .. किस तेही एवढया सगळ्यां  समोर म्हणजे सावनी ला हार्ट अटॅकचं येईल.

सुशांत ने रिया कडे बघितले .. रिया जरा समजूतदार होती . कारण रिया या सगळ्यां पेक्षा दोन वर्षांनी मोठी होती .. अमित रिया पेक्षा दोन वर्षांनी लहान असताना देखील त्यांनी लग्न केले होते

रिया ने सुशांत च्या कानात काहीतरी सांगितले  तसा सुशांत एकदम गोड हसला .. किती मना पासून धन्यवाद दिले होते त्याने तिला

सुशांत ने सावनी ला स्वतःकडे वळवले ... सावनी ने त्याच्या कडे एक नजर पाहिजे .. आणि नजरेतूनच त्याला ती सांगत होती " नको ना .. प्लिज नको ना "

सुशांत ने तिच्या डोळ्यांत बघत तिचा चेहरा त्याच्या दोन्ही हातात घेतला आणि आता हा काही थांबणार नाही हे तिला जाणवल्यावर तिने घट्ट डोळे मिटले आणि  साडीचा पदर हातात घट्ट पकडून उभी राहिली

सगळे फ्रेंड्स मिळून " सुशांत .. सुशांत .. असे ओरडत होतेच "

सुशांत हळू हळू जवळ गेला आणि तिच्या कपाळावर त्याने किस केले ..

सगळे फ्रेंड्स " ओह्ह .... " पण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या अगदी भटजींनी सुद्धा

बराच वेळाने सावनी ने डोळे उघडले पण डोळ्यांत पाणी होते .. आणि ती त्याला सगळ्यांसमोरच बिलगली .

मग जोरदार फोटो सेशन .. मुद्दामून तिच्या खांद्यावर हात ठेव .. असा हात ठेव .. तसा हात ठेव करून करून फोटो काढले ..  त्याने नुसता खांद्यावर हात ठेवला तरी लाजाळू च पान मिटल्यासारखीच तिची अवस्था .. कधी आता हे सगळे संपतंय असेही तिला वाटत होते..

आशिष सर्वेश च्या मोबाईल वर कॉल करून करून थकला पण तो अननोन नंबर म्हणून कॉल उचलेना .. सुशांत चा फोन वाजत होता पण फोन त्याच्या जवळ नव्हता .. त्यामुळे आशिष सोसायटी मध्ये तर पोहचला होता पण हॉल पर्यंत पोहचला नव्हता

तेव्हड्यात अवनी ने वॉचमन ला विचारले " काही प्रोग्रॅम चालू आहे का कुणीकडे ? म्हणजे लग्न वगैरे .. काही माहितेय का काका?"

वॉचमन " हो ते सोसायटी च्या हॉल मध्ये लग्न चालू आहे .. सर्वेश साहेबांचे कोणीतरी नातेवाईक आहेत ना त्यांचे "

अवनी मोठ्याने ओरडलीच " आशिष ... चल सोसायटी हॉल मध्ये लग्न चालू आहे .. चल पटकन "

आशिष ने सोसायटी हॉल चा रस्ता विचारला आणि दोघे धावतच हॉल कडे निघाले

फोटो सेशन चालू असताना आशिष आणि अवनी हॉल मध्ये आले .. अवनी ने लांबूनच दोघांना पाहिले आणि डोळे भरूनच आले तिचे

अवनी " आशु .. माझि सावनी बघ किती सुंदर दिसतेय .. "

आशिष " आणि माझा भाऊ बघ कसला रुबाबदार .. हँडसम हन्क दिसतोय ते "

आशिष ने अवनीचा हात हातात घेतला " रडू नको प्लिज .. आय कॅन अंडरस्टॅंड .. इव्हन माझे पण हार्टबीट्स वाढलेत ..

दोघे जाऊन सर्वेश जवळ उभे राहिले

सर्वेश आणि अमित दोघांना जाम चिडवत होते .. आणि सर्वेश ने अचानक आशिष कडे बघितले तसा सर्वेश ओरडला

सर्वेश " सुशांत ... मागच्या दाराने पळ ... तुझ्या घरचे आले आणि त्याने दादाला घट्ट आपल्या हाताने पकडून ठेवले होते

आशिष " अरे येड्या सोड मला ... "

सर्वेश " अरे सुशांत घुम्या सारखा उभा काय राहिलास .. पळ .. पळ  लवकर .. हि घे बाईक ची चावी " आणि त्याने बाईक ची चावी त्याच्याकडे टाकली

सुशांत  शांतच उभा .. इकडे अवनी आणि सावनी दोघी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून रडत  काय होत्या ... ओरडत काय होत्या .. चेहऱ्यावर हसू पण डोळ्यातून अश्रूंच्या धारा .. मिश्र भावनांचा पाऊस होता

सुशांत " सर्वेश .. सोड त्याला .. तो भेटायला आलाय "

सर्वेश ने त्याला सोडले " सॉरी दादा .. मला वाटले ... "

आशिष तिथेच उभा होता .. सुशांत धावतच आला आणि दादाला घट्ट मिठी मारली त्याने

दोघे चालत सावनी आणि अवनी जवळ गेले .. अवनी एवढी इमोशनल झाली होती तिने पटकन सुशांत ला मिठीच मारली

क्रमश:

https://www.irablogging.com/blog/lagngath-the-advance-booking-bhag-5_6812

https://www.irablogging.com/blog/lagngath-the-advance-booking-bhag-6_6827

🎭 Series Post

View all