लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग भाग १५

story of two friends and their marriage

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग

भाग १५

सुशांत " हे गाईज ,, तुम्ही सगळे इथे आता ?"

प्रिया " मग आमच्या  मित्राचे लग्न आहे उद्या .. तयारी नको का करायला .. "

सोनल " मेहंदी .. डान्स .. गाणी ,, शॉपिंग .. सगळे करायचं आहे  .. फक्त आम्ही नवरा नवरीची वाट बघत होतो "

सर्वेश " अरे त्याला जरा  श्वास तर घेऊ द्या .. "

अमित " चलो चलो .. गरमा गरम कॉफी ले लो .. "

 तिघींनी दोघांच्या भोवती गराडा घातला

रिया "सुशांत, तू जशी तिचं वर्णन करायचास ना त्या पेक्षा किती तरी सुंदर आहे रे हि .. "

सोनल " अरे बघू ना चेहरा .. तिच्या हनुवटी वर तीळ आहे का ? खरंच आहे .. "

अमित " अरे ते राहू दे .. आधी तिचे केस तो सांगायचा तसे लांब आहेत का ते बघा "

सुशांत " गाईज .. प्लिज फर्स्ट मेक हर कंफर्टेबल "

प्रिया " अरे सॉरी सॉरी .. "आणि तिने सावनी ला फ्रेश होयला बेडरूम मध्ये नेऊ लागली तर सावनी ने अजून त्याचा हात घट्ट पकडला होता

सुशांत " आपण कॉफी घेऊया का आधी .. मग बोलू "

सर्वेश " हा प्लॅन चांगला आहे " .. सगळे तिथेच खाली चटई वर बसले ..

आणि कॉफी घेऊ लागले ..  सावनी चा हात मात्र थंड पडला होता . आणि सुशांत ला तिची धडधड जाणवत होती

सुशांत ने कानातच तिला सांगितले " रिलॅक्स .. माझे सगळे क्लोज फ्रेंड्स आहेत .. डोन्ट वरी "

सावनी ने होकारार्थी मान हलवली ..

अगदीच सगळे नवीन चेहरे होते त्यामुळे थोडीशी बावचळली होती ती

रिया " सावनी .. यार डोन्ट वरी .. आता आमची वाहिनी आहेस तू आणि तुझ्या सेवेला आम्ही सगळे हजर आहोत .. तुला काय काय पाहिजे ते फक्त सांग "

सोनाली " आणि आता थोडी फ्रेश हो .. मग आपण तुझ्या हाता पाया वर मेहंदी काढणार आहोत "

प्रिया " तुझी लग्नाची साडी पण तयार आहे "

सर्वेश "सुशांत तुझी शेरवानी पण तयार आहे "

अमित " भटजी सकाळी १० वाजता येणार आहे .. सोसायटीच्या हॉल मध्ये लग्न करायचे .. आपली अजून सगळी गँग पण येणार आहे "

सुशांत " अरे कशाला ? इतकि तयारी केलीत "

सर्वेश " सुशांत , यार तू कधी पासून असा बोलायला लागलास .. इट्स लाईक ड्रीम कम ट्रू आहे .. सावनी ... तुला सांगतो .. रात्र रात्र पकवायचा आम्हाला .. माझी सावनी अशी ? माझी सावनी तशी ? आणि यु नो व्हॉट .. हि  लव्हज यु लाईक क्रेझी .. बारावी त असल्या पासून त्याच्या तोंडून तुझे नाव ऐकतोय आता आलाय तर तुला पळवून  आणलंय .. क्रेझी फेलो "

सावनी सुशांत कडे एक टक पाहत होती .. आणि आपली चोरी पकडल्या गेल्या सारखा त्याचा चेहरा झाला होता.

रिया " ओये सुशांत , कोणी पळवून नेत नाहीये तुझ्या बायकोला .. हात सोडायचा आता गप पणे .. आता आज कि रात .. तुम दोनो साथ नही रहोगे.. आपकी अमानत हमारे पास सही सलामत रहेगी .. "

सुशांत ने तिच्याकडे बघितले तर तिने डोळ्याने च खुणावले " चालेल " मग त्याने हात सोडला

रिया ,प्रिया आणि सोनल तिला आत मध्ये घेऊन गेल्या

रिया " हे बघ डार्लिग .. हे वॊर्डरॉब मध्ये ह्या साईडला तुझ्या साठी कपडे आहेत .. मी आणि प्रिया ने शॉपिंग केलीय .. सो यु नो नीड टू वरी at ऑल "

 प्रिया " सेम इकडे सुशांत ची शॉपिंग पण केलीय .. अमित आणि सर्वेश ने केलीय ..सो इच अँड एव्हरी थिंग आहे "

बेड आणि बेडिंग्स अल्सो न्यू .. बेड च्या खाली स्टोअरेज आहे .. ते पाहून घेशील नंतर

सोनाली " चल , आता तुला किचन दाखवते .. किचन थोडे छोटे आहे .. पण ट्रॉली आहेत तर त्यात सगळे राहील एवढंच सामान आहे .. वन मन्थ पुरेल एवढी ग्रोसरी भरलेली आहे ..  

सावनी फक्त मान हलवून उत्तर देत होती .. कसे रिऍक्ट करावे तेच कळत नव्हते .. पण त्याच्या मैत्रिणींनी तिला थोडे मोकळे केले एवढे नक्की

इकडे सुशांत पण जरा रिलॅक्स झाला .. मित्रांचा सपोर्ट काय आहे हे त्यालाच माहित झाला होता ..

अर्धा एक तास फॉर्मल गप्पा झाल्यावर रिया , प्रिया ने  आणि सोनल ने तिघींची मिळून सावनी शी गप्पा मारून तिला थोडे मोकळे केले .. ती फार  काही नाही .. मधेच एखादी छोटोशी स्माईल देऊ लागली होती .. त्या सुशांत वरून तिला चिडवत होत्या आणि त्याचा रंग तिच्यावर हळू हळू चढत होता ...

रिया " ए यार , सावनी .. गो अँड चेंज युअर क्लोथ्स .. फ्रेश हो आपण तुझ्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात करू .. उद्या लग्न आहे ना मग तुझी थोडी झोप पण झाली पाहिजे .. "

आणि तिला लिटरली बाथ घ्यायला पाठवले .. आणि मग तिघींची मिळून तिच्या दोन्ही हातावर आणि पायावर मेहंदी काढली ..

सुशांत बाहेर जोर जोरात गप्पा मारताना तिला आवाज येत होता .. त्याला पण त्याच्या मित्रांनी चिडवून चिडवून भन्डाळुन सोडलं होते .. ब्लश करून करून गाल दुखला त्याचा .. आणि आपण काही तरी मोठा पराक्रम केलाय असे काहीसे त्याला वाटू लागले होते ..

---------

आशिष आणि अवनी ने  आईस क्रिम  घेतले आणि गाडीच्या बोनेट वर अवनी बसली होती आणि आइस क्रिम चा आस्वाद घेत होती ..

आशिष "  शान्त कशी काय ? मॅडम .. एनी प्रॉब्लेम "

अवनी " हो रे .. मला सावनी ची खूप काळजी वाटतेय .. सुशांत तिला नीट ट्रीट करेल ना .. ती ना एक नंबर ची घाबरट आहे .. जर एकदा सुशांतची पण भीती जर बसली ना तिच्या मनात तर बिचारी जशी बाबांना घाबरून घाबरून जगायची ना तशीच जगेल .. तिला ना हळू हळू समजून घेऊन फुलवायला पाहिजे .. सुशांत इथे असता ना तर त्याला मी समजावले असते .. पण हा पठ्ठ्या खरंच खाली मुंडी पातळ धुंडी निघाला "

आशिष " यार .. मला पण खूप टेन्शन आलय .. तसा लहान आहे ग तो .. कसे करणार आहेत ते दोघे .. आणि रागाने मुद्दामून एक पैसा पण घेऊन नाही गेलाय .. शिवाय  आता सानू ची जवाबदारी .. राहण्या पासून ची सोय करायची , शिक्षण राहू दे आधी पहिले पोटा पाण्याचे बघायला लागेल .. कसे करतील यार दोघे .. इथे असते तर मी होतो .. नक्कीच काहीतरी ऑप्शन काढला असता .. मला सुद्धा त्याने नाही सांगितले ..

अवनी " सावनी माझि पाचवी पासूनची बेस्ट फ्रेंड आहे .. तिच्या शिवाय मी कधीच शाळा कॉलेज मध्ये गेले नाही .. आणि .. " तिला बोलताना एकदम रडूच कोसळले " उद्या पासून माझि सावनी माझ्या बरोबर नसणार आहे ... मी कशी जगणार आहे तिच्या शिवाय ... सावनी शिवाय मला लाईफ माहित नाही .. "

आशिष " अरे .. अनु .. रडू नको ना .. यार मी आधीच थोडा लो फील करतोय .. म्हंटले तुझ्या जवळ आलो कि थोडा पॉसिटीव्ह वाइब्स मिळतील तर आता तू पण रडते "

आशिष तिच्या जवळच उभा होता .. अवनी रडतच त्याच्या मिठीत गेली आणि जोर जोरात रडू लागली " आशु , मला खूप खाली खाली वाटतंय .. उगाच धडधड होतेय .. ती .. ती काही प्रॉब्लेम मध्ये नसेल ना "

आशिष पण बोलता बोलता तिच्या खांद्यावर रब करत होता

आशिष " जेवढा मी त्याला ओळखतो तो नक्कीच पुण्याला गेला असेल .. त्याचे बरेच फ्रेंड्स पुण्यात आहेत .. आधी मावशी काका पुण्यात राहत होते .. मग सुशांत १२ वीला इकडे आला .. "

अवनी " तुला माहित असले तर आपण उद्या जायचं का पुण्यात .. त्यांना भेटायला ?"

आशिष " खरं सांगू .. माझ्या मनातले बोललीस तू ? तू येशील का माझ्या बरोबर ? मी रात्री घरी गेलो कि त्याच्या कोणत्या मित्राचा काही कॉन्टॅक्ट मिळतोय का बघतो .. पण आपण पुण्यात जातोय असे माझ्या घरी पण नाही आणि तुझ्या घरी पण नाही सांगायचं .. कारण आता लगेच जर काकांना कळलं तर त्याला लिटरली फरफटवत घरी आणतील .. मावशी मला सांगत होती कि काकांना  मित्रा च्या मुली जवळ लग्न लावायचे होते .. सावनी ला ते एक्सेप्ट करणार नाहीत .. आणि खरं सांगू ह्याची सुशांत ला पूर्ण कल्पना होती म्हणूनच त्याने हि स्टेप घेतली .. "

अवनी " आय विश आपण दोघे असतो त्यांना सपोर्ट करायला .. "

आशिष " हो ना .. माझ्या पण मनात हेच गिल्ट येतंय .. कि कुठेतरी मी त्याला चम्या घाबरट बोलून त्याला दुखवलेय .. त्याच्या प्रेमाच्या नाजूक भावनांना मी समजून नाही घेतले "

अवनी " पण मी समजून घेतले होते .. तू बघायला आलास त्या आधीच मी सावनी ला सांगितले होते कि सुशांत चे तुझ्यावर प्रेम आहे .. तुझे पण असेल तर याला आपण कटवू म्हणून "

आशिष " नालायक .. म्हणजे माझा पत्ता  बघायच्या आधीच कट केला होतात तुम्ही दोघीनी "

अवनी " अरे पण हे माझे आणि तिचे आधी बोलणे झाल्यामुळे .. मला तू भेटलास नाही का ?"

आशिष " यार अनु .. आज तू मला भेटलीय .. आणि असे वाटतंय कि मी तुला फार आधी पासून ओळखतोय "

अवनी " हो ना .. मलाही  असे वाटते कि मी तुला लहान पणा पासून ओळखते . .. आपल्यात अजिबातच परके पणा राहिला नाही ना "

आशिष " कारण तू आहेस .. " आणि त्याने तिचे दोन्ही गाल हातात घेऊन ओढले " तू मला तुझ्यात लगेच सामावून घेतलेस .. तू आर माय सोलमेट "

अवनी पण लगेच त्याचे दोन्ही गाल हाताने ओढून " आता तू आहेसच एवढा गोड .. माझा स्वीट स्वीट ठाकूर "

आशिष " यार सुशांत मात्र देवदास नाही निघाला .. देवदास सारखा घरच्यांना घाबरून  पारोला सोडून नाही गेला .. "

अवनी " त्याचे नाव काय ठेवायचं ?"

आशिष " प्रेम वीर "

🎭 Series Post

View all