लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग
भाग १४
अवनी " असाच इंपेशण्ट झाल्यावर आपण लग्न करू .. नाहीतर सगळं पाहिजे तसे झाले ना कि त्यात काही स्पेशल वाटत नाही "
आशिष " तर मॅडम ला स्पेशल फिलींग अजून आली नाही असे वाटतंय म्हणजे "
अवनी " नाऊ यु गॉट माय पॉईंट .. कसे आहे ना तूच माझा जीवनसाथी आहेस हे तर मला आणि तुला कळलंय पण तू माझ्यासाठी किती स्पेशल आहेस हे अजून मी तुला सांगितले नाही .. लग्न करायला उद्या लग्न करायला आपल्याला कोण नको म्हणतय .. we आर लकी इनफ इन दयाट केस .. पण म्हणजे याचा अर्थ आपली लव्ह स्टोरी एकदम चमी नसली पाहिजे .. त्यातला इंटेन्स कमी नाही झाला पाहिजे .. हे म्हणजे असे झाले सॅलरी पॅकेज डिक्लेअर झाले कि कामातला इंटरेस्ट निघून जातो तसे नको होयला .. समजे ठाकूर "
आशिष " तुला माहितेय का कि तू एक अँटिक पीस आहेस ते "
अवनी " येस .. आय एम .. "
आशिष " मग आता काय आज्ञा आहे मॅडम ची "
अवनी " मेक मी फील स्पेशल .. ट्राय टू रिच माय वीक पॉईंट्स .. आय अल्सो वॉन्ट समवन हू कॅन लिव्ह ऑल द वर्ल्ड अँड ऑल द ऐषोआराम फॉर मी .. "
आशिष मनातच " काय खरं नाही .. या सुशांत चा इम्पॅक्ट माझ्या प्लॉट वर चांगलाच पडलाय आणि जे सरळ आहे ते तिला कॉम्प्लिकेटेड करून हवंय .. असे काहीसे आशिष ला वाटू लागले
आशिष " ओके .. ठीक आहे .. आता जोपर्यंत तू म्हणत नाहीस ना कि आपण लग्न करू तोपर्यंत आपण लग्न काही करायचं .. नाऊ आय वॉन्ट यु बी इंपेशण्ट फॉर मॅरेज "
अवनी " रिअली .. आय एम सो एक्ससाईटेड "
आशिष ने इकडे कपाळाला हात मारून घेतला मनातच " ओह गॉड शी इज हैप्पी .. नॉर्मली मुली लग्नच्या मागे लागतात .. इकडे सगळे वेगळंच आहे
आशिष " चल .. गुड नाईट .. झोपतो .. आज खूपच दमलोय .. आणि काय काय अनुभवलंय .. आय नीड सम रेस्ट .. "
अवनी " गुड नाईट "
आशिष " गुड नाईट "
अवनी च्या मनात मात्र कोलाहल सुरु झाली होती .. आता पर्यंत सावनी शिवाय एक दिवस पण जात नव्हता आणि उद्या पासून माझी सावनी मला भेटणार नाही .. मग मी आता कोणाची काळजी घेऊ .. कोणावर दादागिरी करू ? तिच्या इतके महत्वाचे अजून तरी कोणीच नाहीये माझ्या आयुष्यात .. आणि ती गेली मला सोडून .. मला एक साधा फोन पण नाही केला तिने .. तिला माझी आठवण पण नाही आली .. माहित आहे सुशांत वर प्रेम आहे पण सुशांत च्या आधी पासून म्हणजे अगदी पाचवीत असल्या पासून ती माझी बेस्ट फ्रेंड आहे .. आणि चक्क मला विसरून गेली .. सगळ्या गोष्टी मला विचारून करणारी सावनी एवढा मोठा निर्णय घेताना तिला माझी आठवण पण नाही आली ..
आज मन दुखले होते तिचे .. आता तिला विना कारण जोर जोरात रडावे असे वाटू लागले होते जरी ती सावनी साठी खुश आहे .. तिचे चांगल होणार आहे म्हणून खुश आहे पण आता तिची आणि सावनी ची ताटातूट झालीय हे तिला सहन होई ना .. मैत्रीच्या नात्याला आपण कधी एवढं मनावर घेत नाही पण त्यात सुद्धा खूप साऱ्या भावना असतात .. पझेसिव्ह नेस असतो .. अवनी ने सावनीशी कोणालाच बोलू दिले नाही कारण ती पझेसिव्ह होती तिच्या बाबतीत .. तिची काळजी तर वाटायचीच पण ती फक्त माझी आहे अशी एक भावना होती मैत्रीण म्हणून "
सावनी च्या आठवणीत अवनीच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला आणि तेवढयात दाराची बेल वाजली .. एवढया रात्री बारा वाजायला आले आणि आता कोण आले म्हणून अवनी च्या आई ने दार उघडले आणि तिच्या मागे मागे अवनी आलीच
बाहेर आशिष आला होता
आशिष " हाय .. झोप डिस्टरब केली का ?"
अवनी " तू .. आता ? कसा काय ?"
अवनीची आई " या ना .. या ना आत मध्ये ..” आशिष आत मध्ये आला .. आणि सोफ्यावर बसला
अवनी " काय ? सगळे ठीक आहे ना ? मधेच इतक्या रात्री आलास "
अवनी ने बोलता बोलता त्याला पाणी दिले .. कॉफी घेशील का कोल्ड कॉफी .. काय करू सांग "
आशिष " नकोय मला काहीच "
अवनी " घे ना .. काहीतरी .. पहिल्यांदा आलायस तर "
आशिष " चल ना येतेस का आता बाहेर .. एक राऊंड मारून येऊ .. मला अन इझी होतंय "
अवनी " आता ? थांब आई ला विचारते "
आशिष " पाहिजे तर मी विचारतो .. पण चल आता "
अवनी " ओके .. अवनी आत मध्ये गेली आणि आईशी काहीतरी बोलून बाहेर आली ते जीन्स आणि टॉप घालून "चल " अर्ध्या तासात परत येऊ पण
आशिष "आई ला बाहेर बोलावं .. मला एक मिनिट बोलायचय त्यांच्याशी "
अवनी ची आई बाहेर आली
आशिष " सॉरी रात्री डिस्टरब केलं .. अवनी ची काळजी करू नका .. शी इज सेफ विथ मी .. "
अवनी " सॉरी काय ? माझे सकाळीच तुमच्या आईशी बोलणे झालय .. आता लवकरात लवकर अवनी ला तुमच्या घरी घेऊन जावा .. म्हणजे असे रात्रीचे यायला नाही लागणार "
आशिष " हा आता माझा विचार तर तसाच आहे पण अवनी ची अजून तयारी झाली नाहीये मनातून "
अवनी ची आई " तिचे बोलणे फार काही मनावर घेऊ नका .. ती जरा वेगळ्याच विश्वात असते .. आता मगाशी मला म्हणत होती " आई आता मला जेवण बनवायला शिकव .. आशिष ला गोड .. तिखट दोन्ही आवडते खायला .. फुडी आहे "
अवनी " आई .. आपल्यातले सिक्रेट बोलणे त्याला कशाला सांगतेस .”.आणि जराशी लाजली
अवनी ची आई " अरे बापरे !! माझ्या लेकीला लाजायला पण होते .. मलाच माहित नव्हते .. आशिष ह्या सोसायटीतले पोरं ना तिला बघितले कि घरात पळतात.. बॉस आला म्हणून “
आशिष एकदम खळखळून हसला
अवनी ची आई " सावनी चे जरा चुकलंच नाही का ? असे अचानक पळून गेली ? काय त्या आई वडिलांनी करायचं ?"
आशिष " हो ना .. काय बोलायचं .. मला पण म्हणूनच टेन्शन आलय "
अवनी ची आई " तुमचा भाऊ आहे ना तो "
आशिष " हो .. त्याच्या आई बाबांना पण मोठा शॉक लागलाय .. "
अवनी " बरं चल .. आता जाऊ .. नाहीतर इथेच सकाळ होईल "
दोघे कार मध्ये बसून हाय वे ला लागले ..
अवनी " कुणीकडे जातोय आपण ?"
आशिष " आय डोन्ट नो .. मला फक्त आता तू जवळ पाहिजे होतीस .. खूप अस्वथ वाटत होते म्हणून आलो "
अवनी " आपण आईस क्रिम खाऊया ?"
आशिष " ठीक आहे "
आशिष एक शॉप माहित होते तिकडे गेले आणि आईस क्रिम घेतले आणि दोघे बाहेर गप्पा मारत खाऊ लागले
-------------
१२ साडे बारा च्या दरम्यान सुशांत मित्राच्या फ्लॅट च्या इथे आला .. त्याने जशी सोसायटी च्या आत गाडी घेतली तशी सावनी ला जाग आली
सुशांत " पोहचलो आपण "
सावनी च्या डोळयांत पुन्हा भीती दिसायला लागली होती .. प्रेशर दिसत होते.. आता नक्की कोण कोण असेल तिकडे ? कसे असेल ? तिकडे असलेलं काय म्हणेल आपल्याला .. अशी कशी हि पळून आली ह्याचा बरोबर असे काहीसे विचार चक्र सुरु झाले
सुशांत " रिलॅक्स डिअर .. घाबरू नकोस .. "
सावनी " नाही .. घाबरले नाही "
सुशांत " डोळे बघ .. लगेच भीतीने भरून येतात तुझे "
पार्किंग मध्ये गाडी बंद केली
सावनी " सुशांत .. मला एकटीला सोडून जाऊ नकोस हा कुठे ? कुणीकडे पण जायची वेळ आली तरी माझ्या बरोबर थांबशील .. प्लिज .. मला इथले काहीच माहित नाहीये "
सुशांत " होय .. मी कुठेही तुला सोडून जाणार नाहीये .. मलाच तू माझ्या डोळ्या समोर हवीय .. मी कशाला सोडून जाईल तुला.. सो जस्ट रिलॅक्स "
सुशांत गाडी मधून खाली उतरला ..इकडून ती पण उतरली .. सामान तर काही नव्हतेच दोघेही रिकामेच आले होते
सुशांत लिफ्ट कडे जायला जरासा पुढे गेला असेल तर सावनी ने मागून येऊन त्याचा हात पकडला
सावनी "सुशांत, मला भीती वाटतेय "
सुशांत " डोन्ट वरी .. मी आहे ना .. नको घाबरू .. काही होणार नाही .. यु आर सेफ विथ मी .. आणि एक सेकंड सुद्धा तुला नजरे आड नाही करणार आहे मी .. "
दोघे लिफ्ट मधून वर गेले आणि सर्वेश च्या दाराची बेल वाजवली .. दोन वेळा बेल वाजवल्या वर पण कोणी दार उघडले नाही मग त्याने सर्वेश ला फोन केला
सुशांत " सर्वेश , अरे कुठे आहेस ? दार उघड ?"
सर्वेश " अरे तू आलास का ? एक काम कर बाजूला लेटर बॉक्स आहे बघ .. त्याच्या खालच्या कप्प्यात चावी आहे .. तू जा आत मध्ये .. मी एका पार्टीला आलोय .. थोडा लेट होईल "
सुशांत " ओके "
सुशांत ने चावी घेतली आणि दार उघडले
सुशांत " घाबरू नकोस .. तो नाहीये घरी "
दोघे आत मध्ये फ्लॅट मध्ये आले तर सगळे जोरात ओरडले " सरप्राईझ ... "
अचानक झालेल्या आवाजाने सावनी एवढी घाबरली कि रडतच त्याला बिलगली
तेवढ्यात कोणीतरी लाईट्स ऑन केले ..
एक सेकंद सुशांत च्या पण हृदयाचा ठोका चुकला .. आणि नंतर सुखद धक्का च होता अचानक मिळालेला .. घरात त्याचे पुण्याच्या मित्र मैत्रिणी बघून आनंदला .. पण तिने जे घट्ट डोळे मिटले होते भीतीने कि आता नक्की काय होणार ते तिने अजून उघडलेच नव्हते
सुशांत " इट्स ओके .. माझे सगळे फ्रेंड्स आहेत .. बाकी कोणी नाही .. घाबरू नकोस .. ती जरी त्याला बिलगली होती तरी त्याने तिला हातही लावला नव्हता .. "
रिया " ओय होय .. रोमिओ जुलियट .. हा एकदम चिपक के बैठे है "
तशी तिने डोळे उघडले आणि मग पटकन बाजूला झाली पण हात अजून हातातच होता
क्रमश:
https://www.irablogging.com/blog/lagngath-the-advance-booking-bhag-5_6812
https://www.irablogging.com/blog/lagngath-the-advance-booking-bhag-6_6827
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा