लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग भाग १३

story of two friends and their marriage

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग

भाग १३

सुशांत " घाबरू नकोस , मी आहे बरोबर .. डोन्ट वरी .. इकडे बरेच लोक आहेत .. काही घाबरण्याचे कारण नाहीये .. इट्स पब्लिक प्लेस .. आणि आता ९. ३० च झालेत.. फार रात्र नाहीये .. "

सावनी  त्याच्या कडे बघतच बाहेर आली

त्याने गाडी लॉक केली आणि दोघे फूड मॉल च्या आत गेले .. आधी फ्रेश झाले .. तो वॉशरूम च्या बाहेरच थांबला.. एवढी तिची काळजी घेत होता ..  वॉशरूम च्या बाहेर आल्यावर त्याला तिथे पाहून तिला किती आधार वाटला  होता हे तिच्या डोळ्यात त्याला दिसले पण होते ..

दोघांनी स्नॅक्स कम डिनर असे खाल्ले आणि गाडीत पेट्रोल भरले आणि निघाले पुढच्या प्रवासाला

सावनी " पैसे नाहीयेत माझ्याकडे ?'

सुशांत " माझ्याकडे आहेत सध्या .. डोन्ट वरी "

सावनी " मी पण जॉब करेन .. दोघांनी एक वर्ष गॅप घेऊ .. आधी राहण्याची , खाण्याची सोय झाली कि मग फायनल इअर दोघांनी एकदम देऊ .. नक्कीच माझी जवाबदारी तुझ्यावर आहे .. पण थोडीशी जवाबदारी मी पण शेअर करेन "

सुशांत ला तिचे हे स्वतःहून बोलणे म्हणजे तो स्वर्गात आहे असेच वाटू लागले .. ती हळू हळू नॉर्मल होतेय .. एवढा मोठा अचानक झालेला बदल , धक्का त्या मनाने तिने लवकर एक्सेप्ट केला होता .. सुशांत गालातल्या गालात हसू लागला होता ..

सुशांत " बघू आता , कसे जमतंय तसे करू .. कामाची शेअरिंग आणि दोघांनी एकमेकांची केअरिंग करायची .. सगळे आपल्या   दोघांच्या मनासारखं असेल .. मी तर खूप एक्ससाईट झालोय "

सावनी " हमम ... "

हमम ... म्हणजे मी पण ... अबोल लोकांचे बरं असते ना .. त्यांना त्यांच्या भावना पोहचवायला फार कष्ट घ्यावे लागत नाहीत .. अर्ध्या पेक्षा जास्त तर ते डोळ्यांनीच बोलतात आणि तोंडाने फक्त " हमम .. हा ... यातच भागून जाते त्यांचं

सुशांत गाडी चालवत होता आणि उद्या   काय करायचंय त्याचे प्लॅनिंग त्याच्या डोक्यात चालू होते .. आणि सावनी मॅडम चक्क सीट वर मागे रेलून रिलॅक्स झोपली होती .. रडून रडून दमली होती आणि पोटात भर पडली आणि आता तिने सत्य परिस्थिती एक्सेप्ट केली  होती.. हि अशी झोप लागणे म्हणजे तिने सुशांत ला किती एक्सेप्ट केलंय याचा एक पुरावाच होता ..

https://www.youtube.com/watch?v=6dGdvJG5Iww&ab_channel=BollywoodClassics

अश्याच  काहीश्या भावना दोघांच्याही मनात होत्या . गाणे प्लिज ऐका

हमने घर छोड़ा है

रस्मों को तोडा है

दूर कहीं जाएंगे

नयी दुनिया बसाएंगे

तेरे बिना जीना पड़े

दिन वोह कभी भी न आये

कोई भी आँधी हो तुफ़ा कोई

हमको जुदा कर न पाये

बस एक बार किया है

मैंने तुझे प्यार किया है

हम तेरी बाहों में

जन्नत को भुलायेंगे

हमने घर छोड़ा है

रस्मों को तोडा है

छत प्यार की दिल कि जमीन

सपनों की ऊंची दीवारें

कलियाँ मोहब्बत की खिलने लगी

आई मिलन की बहारें

जन्मों की प्यास बुझा दे

मुझको गले से लगा दे

प्यार के इस मंदिर को

चाहत से सजाएंगे

हमने घर छोड़ा है

रस्मों को तोडा है

दूर कहीं जाएंगे

नयी दुनिया बसाएंगे

इकडे आशिष ने अवनी ला जे जे घडले ते फोनवर सांगितले ..

अवनी " तुला खरं सांगू आशिष .. मी या दोघांसाठी खूप खुश आहे .. सुशांत बरोबर ती नक्कीच सेफ आणि सिक्युअर आहे मला खात्री आहे त्याची .. "

आशिष " यार .. आज दिवसात मी त्याला इतक्यांदा चम्या बोललो .. आणि त्याचा त्याने राग धरून बसला .. आपण किती चुकत असतो ना .. किती सहज एखाद्यावर कमेंट पास करतो पण त्या कमेंटचा त्याच्यावर किती खोलवर परिणाम होत असतो .. माझे चुकलेच .. मी सुशांत ला असे नको होते बोलायला "

अवनी " हे बघ .. कदाचित तुझ्या चम्या बोलल्यामुळे त्याला काहीतरी करून दाखवायची हिम्मत झाली असेल "

आशिष " अरे पण हि अशी ? अग एका मुलीला घेऊन पळालाय तो .. अजून किती लहान आहे "

अवनी " अरे काही लहान नाहीये .. डोन्ट वरी ... होईल सगळे ठीक .. मला सावनी ची काळजी वाटते .. तिने तिच्या घाबरट स्वभावामुळे त्याला टॉर्चर केले नाही म्हणजे झाले .. तशीही मॅडम ने अजून दुनिया बघितलंय कुठे ? तिच्या बाबांनी तिच्या वर विश्वास ठेवून कधीच अशी बाहेर कुणीकडे पाठवलीच नाही .. "

आशिष " आणि सुशांत च काय ? नळाला पाणी कुठून विचारलेस तर उत्तर देईल वरच्या टाकीतून  एवढा बहाद्दर आहे तो .. ती सावनी घाबरट असेल पण निदान संसार कसा करतात हे तरी तिला माहित असेल "

अवनी " आशु , चल आपण पण पळून जाऊया .. मला आता जेलस फील होतय .. आपल्या पेक्षा त्यांची लव्हस्टोरी जास्त भारी  वाटतेय  .. कसले भारी वाटत असेल दोघांना "

आशिष " घ्या ! आता तेच राहिलंय माझे करायचे .. "

आशिष " अरे .. मी काकांना सांगतोय .. कि लवकर ऍक्शन घ्यायला पाहिजे .. पण त्यांनी अजिबात ऐकले नाही .. सुशांत ला अजिबातच विश्वास दाखवला नाही कि आम्ही आहोत तुझ्या बरोबर .. त्यामुळेच त्याने हि ऍक्शन घेतली "

अवनी " आणि त्या गब्बर मुळे .. काय म्हणे गावी नेतो आणि लग्न लावून देतो .. अरे काय आहे हे .. तुम्ही मुलाचे/मुलीचे आई वडील आहेत .. मालक नाहीत .. कुत्रा विकत आणून त्याला इन्स्टूक्शन फॉलो करायला लावल्या सारख्या मुलांशी कसे काय वागू शकता .. एका पवित्र नात्याचा अपमान आहे .. मुलगा/मुलगी  मोठा झालाय हे चप्पल पाहून ठरवतात .. मोठया मुलालामुलगीला  तुम्ही ताब्यात न ठेवता प्रेमाने समजवून सांगायला पाहिजे कि नाही ?"

आशिष " मग काय ? माझे आई बाबा बघितलेस ना .. जसे कि माझे मित्र असल्या सारखेच वागतात .. हल्ली हल्ली आई कधी कधी चिडचिड करायची .. कारण मी मुलगी बघायलाच जात नव्हतो .. "

अवनी " आशु , खरं सांगू .. सावनी मुळे आपण दोघे एकमेकांना भेटलोय .. जर सावनीने तुला पसंत केले असते तर .. "

आशिष " हो .. ना "

अवनी " सावनी साठी मला खूप काही करायचं होते .. पण झाले वेगळेच .. सुशांत ने माझी बॉडीगार्ड हि पदवी काढून घेतली रे "

आशिष " आय नो हाऊ मच यु लव्ह हर .. आणि आपली मदत त्यांना लागणारच आहे .. तेव्हा आपण मागे हटणार नाहीये हे आपल्याला पण माहितेय .. मला इतकी काळजी वाटतेय .. जवळ असलेले पैसे संपले कि काय करतील दोघे ? कुठे राहतील ? कसे जगतील ?"

अवनी " आपला चम्या वाटतो तितका चम्या नक्कीच नाहीये .. त्याने काहीतरी नक्कीच या गोष्टीचा विचार केला असणार आहे .. तो चम्या नाहीये तो छुपा रुस्तम निकला "

आशिष " खरं आहे . अरे एवढी डेअरिंग तर माझ्यात पण नाहीये .. मी असा कधीच कोणाला घेऊन पळून नाही जाऊ शकत .. मुळात अशी वेळच मी येऊन देणार नाही .. “

अवनी " हो .. मला पण सरळ लग्नाला विचारलेस .. प्रपोज वगैरे काही नाही " आणि हसायला लागली

आशिष " प्रपोज करा नाहीतर करू नका .. अंतिम ध्येय काय असते .. लग्न .. म्हणून डायरेक्ट लग्नाचेच प्रोपोजल दिले तुला .. आणि खरं सांगू का .. मी एक अत्यन्त साधा , सरळ मुलगा आहे ..हि अशी दुसऱ्याची मुलगी ला फिरवण्यासाठी पण गट्स लागतात .. ते नाहीयेत माझ्याकडे .. मी बायको ला स्वर्ग सुखात ठेवेन हे त्रिवार सत्य आहे पण हे गर्ल फ्रेंड वगैरे आपल्या पचनी पडत नाही "

अवनी " ए .. पण आता मी तुझी गर्ल फ्रेंड आहे .. आणि मला तसेच ट्रीट करायचं "

आशिष " नाही .. मी लवकरच तुझ्या घरी येणार आहे आई बाबांना घेऊन मग आपली एंगेजमेंट करून टाकू .. मग अख्खी दुनिया फिरवेन तुला .. जो पर्यंत हा  विधी होत नाही तोपर्यंत मला तुला घेऊन फिरायला ऑड वाटेल "

अवनी " नाही नको ना .. इतक्यात काय ? मग मला पण  तुमच्या घराण्याची सून म्हणून वागावे लागेल .. मज्जा नाही करता येणार "

आशिष " अरे .. लग्ना नंतर खरी मज्जा असते "

अवनी " शट अप ! "

आशिष " अरे हो .. कोणी च अडवू शकत नाही .. वाटेल ते करू शकता .. नो बाऊंड्रीज "

अवनी " पण जवाबदारी पण येतेच ना तेवढी "

आशिष " कोण म्हटले ? कसली जवाबदारी ?"

अवनी " मग काय ? सुनबाई .. सासुबाई , घराणे , हे असले सगळे मागे लागतं गर्ल फ्रेंड ,बॉय फ्रेंड ला असले काही नसते  "

आशिष "उलट लग्न झाल्यावर आयुष्य भराचे गर्ल फ्रेंड बॉय फ्रेंड बनून जातो "

अवनी " काय रे तू ? बोअर नको करू ?"

आशिष ला जरासा रागच आला .. आता चांगले सांगतोय तर बोअर करतोय  .. आणि एकदम शांतच झाला

अवनी " हॅलो .. राग आला का ठाकूर ? आता एकदम मस्त दिसत असशील .. मी सकाळ पासून ऑबझर्व केलंय .. तू चिडतोस ना तेव्हा ना एकदम हॉट दिसतोस .. ते तुझे कॉलर बोन आहेत ना ते दिसायला लागतात .. आय है .. आय मिस्ड दयाट .. काश कि मी आता समोर असते तुझ्या "

आता एवढी तारीफ केल्यावर पारा चढलेला एकदम मायनस डिग्री टेम्प्टेचर वर सेट झाला होता आणि मोगॅम्बो चा गाल कशाने तरी लालेलाल झाला होता आणि स्वतःच उठून आपला कॉलरबोन आरशात बघू लागला

अवनी " झाले आरशात बघून स्वतःला "

तसा एकदम चपापला कि हिला फोन मधून  दिसतंय कि काय ?"

आशिष " नाही ? कुठे मी बेड वर आडवा आहे .. पडून बोलतोय तुझ्याशी "

अवनी " खोटं .. खोटें .. साहेब तुम्ही आधी बेड वर पडून बोलत होतात .. आता तुमच्या आरशा समोर उभे आहेत .. "

आशिष " कशावरून " ?

अवनी " सांगेन नंतर कधीतरी .. नाहीतर तू मला बदमाश म्हणशील ?"

आशिष " नाही म्हणणार ? सांग ना ? "

अवनी म्हणजे तू आरशा समोर आहेस हे नक्की ना ?"

आशिष " नाही .. असेच काही नाही ?"

अवनी " जाऊ दे मग मी चुक आहे तर कशाला ना उगाच ?"

आशिष " अरे सांग ना आता ? एवढे इंपेशण्ट करते ना तू मला "

अवनी " तू बोलतोय ना तर तुझ्या श्वासाच्या गती वरून तू पटकन झोपलेला उठलास हे कळले मला "

आशिष " बदमाश !!"

अवनी " बघ .. म्हणून मी सांगत नव्हते "

आशिष " आणि नेहमी असे इंपेशण्ट बवायलाच पाहिजे का मला ?"

🎭 Series Post

View all