लग्नानंतरचं प्रेम
©️®️शिल्पा सुतार
अतिशय सुंदर लाल लेंहेंग्यामध्ये प्रियाच रूप खूप खुलल होतं. हातावर सुंदर मेहंदी होती. हिरवा चुडा भरलेला होता. सुंदर ज्वेलरी, माफक मेकअप. निरागस चेहेरा, ज्यावर आज खूप टेंशन होत.
मैत्रिणी चिडवत होत्या. "नाही नाही म्हणता म्हणता तूच लग्नासाठी पहिला नंबर लावला प्रिया."
ती चिडली होती. "जा ना ."
"आता चिडून काय होणार आहे? दोन तासात तुझ लग्न आहे."
आईने येवून नजर काढली. "असा काय चेहरा केला आहेस? हस जरा."
"आई मला काही सांगू नकोस. मला हे लग्न करायच नाही. मला जमणार नाही. " प्रिया चिडचिड करत होती.
" मूर्खपणा पुरे आता प्रिया. हळू बोल जरा. कोणी ऐकेल."
"मला काही फरक पडत नाही समजल ना. मी त्या आशिषला सांगेल माझ लग्न जबरदस्तीने झाल आहे." ती मुद्दाम मोठ्याने ओरडत होती.
" प्रिया अस करू नकोस. आशिष खूप चांगला आहे. विश्वास ठेव माझ्या वर. तू खूप आनंदी होशील बघ." खाली काम होत. मैत्रिणींना तिच्यावर लक्ष द्यायला सांगून त्या खाली गेल्या.
आता ती शांत होती. आशिष कसा आहे काय माहिती? आई म्हणते तस चांगला निघाला तर बर आहे. नाहीतर मला कराटे येतात. तिला मनातून आनंद झाला. बर झाल आधी कराटेचा क्लास लावला होता.
पंधरा दिवसापासुन त्यांच्या घरात लग्ना विषयी बोलण सुरू होत. तीच अगदी झटपट लग्न जमलं होत. आशिष परदेशात नोकरी करत होता. तो महिना भर सुट्टी घेवून आला होता. लग्न झाल्यावर ते लगेच वापस जाणार होते.
बोल्ड प्रियाचा मुळातच अरेंज मॅरेज वर विश्वास नव्हता. अनोळखी मुला बरोबर तिला बोलायला ही आवडत नव्हत. कस काय त्याच्या सोबत डायरेक्ट आयुष्य सुरु करणार. पण घरच्यां पुढे तिच काही चालल नाही.
प्रिया नुकतीच इंजिनियर झाली होती. तिला पुढे शिकायचं होत. मास्टर्स साठी ऍडमिशन घ्यायची होती. त्यासाठी तिची धावपळ सुरू होती. परदेशात ॲडमिशन मिळालं तर खूप चांगलं होईल. या साठी तिने बर्याच कॉलेज मधे एप्लाय केल होत.
मावशीच्या नात्यातला आशिष उच्चशिक्षित होता. परदेशात नोकरी करत होता. तिकडच स्थळ आलं. सगळे आनंदात होते. तस ही प्रियाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायच होत. लग्न करून तिकडे राहील, शिकेल ही असा घरच्यांनी विचार केला. प्रियाचा नकार होता.
घरच्यांनी विचारलं, "तुला कोणी दुसरा मुलगा पसंत आहे का?"
"नाही आई बाबा."
"मग हे लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे?"
"एवढ चांगल स्थळ आल आहे. हिचे नखरे सुरू आहेत." आई आजी खूप रागवत होत्या.
"आता खूप झालं शिक्षण. त्या सोबत थोडसं काम तरी शिक. लग्न करायच आहे तुझ. नंतर म्हणशील आईने काही शिकवलं नाही. "आई बोलली.
" बाबा तुम्ही सांगा ना. "
" प्रिया तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. "
"हो बाबा. "
" हे लग्न कर आशिष खूप चांगला आहे. तू सुखी होशील."
"बाबा माझ शिक्षण. "
" मी प्रॉमीस करतो मी मदत करेन. सगळ होईल. ही चांगली संधी आहे. सोन कर त्याच. "
तिने होकार दिला.
रोज स्वयंपाकाचे धडे सुरू झाले. हुशार प्रियाने लगेचच आत्मसात केल. एकदा दोनदा जरी रेसिपी सांगितली तरी ती एकदम छान स्वयंपाक करत होती. नुसताच पास्ता, मॅगी करू नको आपला पारंपारिक स्वयंपाकही यायला हवा आणि तुला तोच आवडतो. आणि तिकडे परदेशात कोणाची मदत ही मिळत नाही.
खूप घाई गडबड झाली. लग्नानंतर लगेच ते दोघ वापस जाणार होते. तिच्या व्हिसाच काम सुरू होत. त्याच्या घरी ही खूप काम होत. दोघांच तसं विशेष बोलणं झालं नाही. एकदा दोनदा आशिषचा फोन आला होता. तेव्हा ही दोघांना काय बोलाव सुचल नव्हतं.
खूप घाई गडबड झाली. लग्नानंतर लगेच ते दोघ वापस जाणार होते. तिच्या व्हिसाच काम सुरू होत. त्याच्या घरी ही खूप काम होत. दोघांच तसं विशेष बोलणं झालं नाही. एकदा दोनदा आशिषचा फोन आला होता. तेव्हा ही दोघांना काय बोलाव सुचल नव्हतं.
लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले. तेव्हा ही आजुबाजूला खूप लोक होते .
प्रिया विचार करत होती. अनोळखी नवरा अनोळखी देश कस होईल?
नवरदेव आला मैत्रिणी वरुन वरात बघत होत्या.
"चल प्रिया तुला बोलवत आहेत." ती खाली आली. आशिष रूबाबदार दिसत होता. त्याने पुढे होवुन तिला हात दिला. लग्न लागल. फेरे, पूजा झाली. जेवणाच्या पंगतीत ही खूप मजा आली. निघायची वेळ झाली. तीच मन भरून आल होत. किती कठिण आहे हे अस आपल घर सोडून जाण. ती खूप रडत होती. आई, बाबा, आजी ही खूप इमोशनल झाले होते. सासरची मंडळी ही तिला समजावत होती.
ती सजवलेल्या कार मधे येवून बसली. आशिष तिच्या कडे लक्ष देवून होता. ती जरा तठस्थ होती. बाजूला सरकून बसली होती. नुसत इथल्या इथे नाही परदेशात जाव लागेल. मी आई बाबां पासून कधीच दूर राहिली नाही. ती परत रडत होती. आशिष बघत होता. "प्रिया रडू नकोस. मी आहे तुझ्यासाठी." तिने डोळे पुसले. ती बाहेर बघत होती.
घर आल स्वागत झाल. बाकीचे कार्यक्रम झाले. खूप मजा येत होती. त्याच्या वहिनी खूप छान होत्या. आशिषला ती पाहिल्यांदा इतक बोलतांना बघत होती.
प्रिया तिच्या रूम मधे होती. आशिषच्या आई तिची काळजी घेत होत्या. दुसऱ्या दिवशी पूजा झाली.
"आज तू शिरा कर." ती कस करू विचार करत होती. आशिषने वहिनीला मदतीला पाठवल. नुसत तिच्याशी नाही तर घरच्या बाकीच्या लोकांशी तो खूप प्रेमाने वागत होता.
तिने बघितलं आशिष तिला सगळ्या गोष्टीत तिला खूप सपोर्ट करत होता.
"तुम्ही दोघ फिरून या." घरचे बोलले.
"नाही तिकडे आम्ही एकटे राहू. इथे फॅमिली सोबत थोड राहू." प्रियाला ही गोष्ट पटली.
आज त्या दोघांची पहिली रात्र होती. प्रिया खूप छान दिसत होती. वहिनी चिडवत होत्या. वहिनी प्रियाला रूम पर्यंत सोडून गेल्या. ती दाराजवळ उभी होती. काय करू आत जावू का? माझ्या कडून होणार नाही हे.
आशिष लॅपटॉप वर काहीतरी काम करत बसला होता. त्याला प्रिया आली ते समजल. "प्रिया आत ये." त्याने आवाज दिला. वेगळाच अवघडलेला पणा होता. प्रिया टीव्ही बघत होती. आशिष तिच्या शेजारी येवून बसला. कोणी काही बोलत नव्हत.
"मला माहिती आहे आपली विशेष ओळख नाही." तो बोलला.
ती काही बोलली नाही. मला ओळख वाढवायची ही नाही. याने मला हात लावला ना तर असे कराटे दाखवेल ना. याला माहिती नसेल मी किती डेंजर आहे.
"प्रिया काय विचार करतेस. मी म्हणतो आहे आपली विशेष ओळख नाही. आपण मैत्री करू या का? " तो परत बोलला.
प्रिया थोडी रीलॅक्स झाली.
"थोड तुझ्या बद्दल सांग." त्याने विचारल.
ती गप्प होती.
"ठीक आहे मी माझ्या बद्दल सांगतो." तो कॉलेज बद्दल सांगत होता.
"मला तुमच्या सोबत रहायच नाही. " ती एकदम बोलली.
" काय? " त्याने विचारल.
" मला इथेच माझ्या आई बाबां जवळ रहायच आहे."
"पण आपल लग्न झाल ना?"
"तुम्ही मला माझ्या घरी सोडून द्या. "ती बोलली.
" प्रिया अस करुन कस चालेल? तुझ कोणा दुसर्या वर प्रेम आहे का?" त्याने घाबरत विचारल.
"नाही."
"मग काय प्रॉब्लेम आहे?"
" मला पुढे शिकायचं होत. घरचे बोलले तुझ्या घरी जाऊन शिक. "
" ठीक आहे. आपण तस करू या. "
" म्हणजे?"
"आपण राहतो त्या भागात छान युनिव्हर्सिटी आहेत. तिथे तुझ अॅडमिशन घेवू. तू हव तेवढ शिक. "
" मी एक दोन ठिकाणी एप्लाय ही केल आहे. "
"कोणत्या युनिव्हर्सिटी? " त्याने विचारल. तो हळू हळू तिला बोलत करत होता.
" ती मोबाईल मधे डिटेल्स दाखवत होती."
" टॉप च्या युनिव्हर्सिटी आहेत ह्या. गुड चाॅइस. "
" लवकर समजेल एडमिशन मिळाल की नाही ते. "
" मग येणार ना माझ्या सोबत तिकडे परदेशात. "त्याने हळूच विचारल.
ती हो बोलली. थोडी लाजली होती. ती खुश वाटत होती.
नक्की?
" हो तुम्ही चांगले आहात."
" मला आशिष म्हण. "
" चालेल अस. "
हो.
" माझ स्वप्न आता पूर्ण होणार." ती छान बोलत होती. तिचा निरागस चेहरा, खूप बोलण छान होत. तो तर बघता क्षणी तिच्या प्रेमात पडला होता.
"आपण कधी जायच तिकडे? त्या आधी मला आईकडे जायच आहे माझे कपडे घ्यायला. "
" हो आपण दोघ जावू. "
ते परदेशात निघाले एअरपोर्ट वर सगळे सोडायला आले होते. इमोशनल झाले होते. ते त्यांच्या घरी आले. खूप छान वातावरण होत. प्रिया सगळी कडे फिरून बघत होती.
आता आशिष प्रिया मधे चांगली मैत्री झाली होती. युनिव्हर्सिटी कडून एडमिशनचा ईमेल आला. प्रिया खूप खुश होती. तिला हव ते कॉलेज मिळाल होत. आशिष ऑफिस मधून आला. प्रिया वाट बघत होती. ती पळत आली. त्याला एकदम मिठी मारली. तो गोंधळला. ती खूप खुश होती. "मला एडमिशन मिळाल."
"तुझ खूप अभिनंदन."
"पण फी खूप आहे."
"असु दे आपण करू. जास्तीत जास्त काय होईल आपल सेव्हिंग होणार नाही."
तीच कॉलेज सुरू झाल.
त्या दोघांमध्ये मैत्री अजून घट्ट झाली होती. तरी पती पत्नी म्हणून त्याच नातं व्यवस्थित सुरू झाल नव्हतं. आशिषला घाई नव्हती. त्याच्यावर विश्वास ठेवून प्रिया एवढ्या लांब आली होती. तो शक्य तितकं तिला कंफर्टेबल ठेवत होता.
प्रिया बघत होती त्याच व्यवस्थित वागणं. तो कधीच त्याची लिमिट क्रॉस करायचा नाही. घर कामालाही व्यवस्थित मदत करायचा. तिला अभ्यासाला वेळ मिळायचा. तिला त्याच्याविषयी प्रेम वाटत होतं. सांगणार कसं. ती गप्प होती.
आज केवळ याच्यामुळेच मला माझ्या शिक्षणाच स्वप्न पूर्ण झालं. मला आशिष सोबत रहायच आहे.
ती कॉलेज हून येत होती. सासूबाईंचा फोन आला. पुढच्या आठवड्यात आशिषचा वाढदिवस होता त्या सांगत होत्या. तिने ठरवलं पण हा वाढदिवस स्पेशल करायचा.
तिने आधी थोडी तयारी केली. सकाळी तिने अस दाखवल नाही की वाढदिवस आहे. तो ऑफिसला गेल्यावर डिनर बनवल. घर सजवल. ती साडी नेसून सुंदर तयार झाली.
नेहमी प्रमाणे तो घरी आला. दिवस भर बर्थडे साठी फोन येत होते. त्याला तिच्या कडून अपेक्षा होती. पण तिला काहीच माहिती नाही म्हणून तो गप्प होता.
तो आत आला. एवढा अंधार? प्रिया कुठे आहेस? बाहेर गेली की काय ही? त्याने लाइट लावला. ती केक हातात घेवून उभी होती.
एवढी सुंदर. तो तिच्या कडे बघत होता.
"हॅप्पी बर्थडे आशिष." ती येवून भेटली.
तो खुश होता. त्याने केक कापला. तिने त्याला एक लेटर दिल. त्यात तिने प्रेम व्यक्त केल होत. तो खूप खुश होता.
"हे माझ बेस्ट बर्थडे गिफ्ट आहे थँक्स." त्याने तिला मिठीत घेतल. डिनर झाल.
"आशिष मला तुझ्या सोबत रहायचा आहे. " तिने हळूच सांगितल. त्याने तिला उचलून आत नेल. दोघांनी सोबत वेळ घालवला. ती अतिशय आनंदी होती. दोघ फिरायला जावून आले.
प्रिया कॉलेज हून घरी येत होती. आईचा फोन आला.
" आई तू बरोबर बोलत होतीस. आशिष खूप चांगला आहे. मी त्याच्या वर खूप प्रेम करते. लग्न करायचा निर्णय योग्य होता."
"तु खुश आहेस ना अजून आम्हाला काय हव."
ती पटकन घरी निघाली. आशिषच्या आवडीची भेंडीची भाजी करायची आहे. जेवण झाल्यावर आज आम्ही मुव्ही बघणार आहोत. उद्या शॉपिंगला जाणार आहोत. ओह माय गॉड वेळच नाही. आशिष येईलच आता. चहा ठेवायला हवा. प्रिया लाजली होती.