स्वरा आणि आर्यन. दोन वेगवेगळ्या जगातील, पण नियतीने गुंफलेल्या वाटा.स्वरा एक संवेदनशील, पुस्तकप्रेमी तरुणी. आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगाकडे ती साहित्यिक दृष्टिकोनातून पाहायची. आर्यन एक व्यावहारिक, तंत्रज्ञानप्रेमी तरुण. त्याच्यासाठी भावनांपेक्षा तर्काला अधिक महत्त्व. त्यांची पहिली भेट एका मित्राच्या साखरपुड्याच्या समारंभात झाली. स्वरा लग्नाच्या संकल्पनेवर चर्चा करत होती, "प्रेम हे स्वाभाविक असायला हवं, जबरदस्तीचं नाही." आर्यनच्या मते, "लग्न ही एक जबाबदारी आहे, प्रेम केव्हाही निर्माण होऊ शकतं." दोघांचे विचार विरोधाभासी, पण त्याच रात्री दोघांमध्ये संवादाचा ओलावा निर्माण झाला.
यापुढे दोघे अधूनमधून भेटू लागले. स्वरा त्याच्या तर्कशुद्ध विचारसरणीने भारावली, तर आर्यन तिच्या संवेदनशीलतेकडे आकर्षित झाला. दोघांच्या गप्पांमध्ये रात्री निघून जात, पण प्रेमाची कबुली कुणीच दिली नाही.
"तुला खरंच प्रेमावर विश्वास नाही का?"एके दिवशी स्वराने आर्यनला विचारलं,
, "माझ्या मते, प्रेम ही एक निवड असते. आपण कोणावर प्रेम करायचं हे आपल्यावर अवलंबून असतं."तो थोडा हसला आणि म्हणाला
स्वराला वाटलं, हा माणूस कधीच तिच्यासाठी मोकळं होणार नाही. तिने मनात ठरवलं जास्त गुंतायचं नाही.
पण नियतीला वेगळंच काही मंजूर होतं.
स्वराच्या घरून लग्नाचा प्रस्ताव आला. तिला ठरवून दिलेल्या मुलाशी लग्न करावं लागणार होतं. ती संभ्रमात होती. आर्यनला आपली जाणीव करून द्यावी का? की त्याने आधीच तिला आपली निवड सांगितली होती?
, "माझं लग्न ठरलंय."तिने आर्यनला शेवटचं भेटायचं ठरवलं. एका कॅफेमध्ये त्याला भेटून म्हणाली
पहिल्यांदाच आर्यनच्या चेहऱ्यावर भावना स्पष्ट दिसल्या. काही क्षण शांततेत गेले. मग तो म्हणाला, "आणि तू खुश आहेस?"
"तुला काय वाटतं?"स्वरा शांतपणे म्हणाली,
तो काही बोलला नाही. स्वरा उठली आणि निघाली.
"थांब."ती बाहेर पडताना तिला मागून आवाज आला
ती वळली. आर्यन तिच्या समोर येत म्हणाला, "स्वरा, मी प्रेमावर विश्वास ठेवत नाही असं म्हणायचो, पण तुला गमावण्याची भीती वाटतेय. हे प्रेम नसेल तर अजून काय असेल?"
"म्हणजे तुला ही निवड हवीय?"स्वराच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि तिने विचारले
"हो. आणि मी ती पूर्ण जबाबदारीने स्वीकारतो," तो हसत म्हणाला.
स्वराचं मन हलकं झालं. एका गुंतागुंतीच्या प्रवासानंतरही शेवटी आर्यनने स्वतःहून तिला स्वीकारलं होतं, ही भावना तिला सुखावणारी होती. पण समोर अजूनही एक मोठा प्रश्न होता तिच्या कुटुंबाचा.
"पण माझ्या घरी हे कसं पटवू?" ती चिंताग्रस्त स्वरात म्हणाली.
आर्यन शांतपणे म्हणाला, "पटवू. तुझ्या सोबत उभं राहायचं ठरवलंय तर शेवटपर्यंत तुझा हात धरणारच."
स्वराने घरच्यांशी बोलायचं ठरवलं. तिने आई-वडिलांना आर्यनविषयी सांगितलं. पहिल्यांदा त्यांचा विरोध झाला. "तुम्ही दोघं वेगळ्या स्वभावाचे आहात, हे नातं टिकेल का?" तिच्या वडिलांनी विचारलं.

"हो. कारण प्रेम हा एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न नाही, तर स्वीकारण्याचा प्रवास आहे."स्वराने आत्मविश्वासाने उत्तर दिलं,
तिच्या या उत्तराने घरच्यांना काहीसं विचारात टाकलं, पण तरीही त्यांच्या मनात शंका होती. त्यांनी आर्यनला भेटायचं ठरवलं.
आर्यन घरी आला, तेव्हा त्याने अत्यंत शांत आणि आत्मविश्वासपूर्ण उत्तरं दिली. "होय, आम्ही वेगळ्या स्वभावाचे आहोत. पण तीच तर खरी गंमत आहे ना? तिच्या कल्पकतेमुळे माझं आयुष्य रंगतदार होतं, आणि माझ्या स्थिरस्वभावामुळे तिच्या कल्पनांना आधार मिळतो. आम्ही वेगळे आहोत, पण त्यामुळेच एकमेकांना पूरक आहोत."
स्वराच्या वडिलांना त्याच्या शब्दांमधील प्रामाणिकपणा जाणवला. काही दिवस विचार केल्यानंतर त्यांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली.
लग्नाचा दिवस उजाडला. स्वरा सुंदर साडीमध्ये एखाद्या कवितेसारखी भासत होती, तर आर्यन तिला पाहून पहिल्यांदाच भावनांनी भारावलेला दिसत होता.
"आज तरी मान्य कर, की प्रेम केवळ निवड नाही, ते हृदयाने उमलणारं नातं आहे," स्वरा त्याला हसून म्हणाली.
आर्यनने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यांमध्ये बघत म्हणाला, "प्रेम ही सर्वांत सुंदर जबाबदारी आहे."

त्यांच्या लग्नाच्या विधी सुरू झाल्या. मंत्रोच्चारांच्या नादात आर्यनच्या मनात विचारांचं वादळ उठलं. तो पूर्वी लग्नाला केवळ जबाबदारी समजायचा, पण आज या क्षणी त्याला जाणवत होतं,ही जबाबदारी निवडलेलीच नव्हे, तर ती आपसूकच मनाशी घट्ट रुतलेली आहे.
स्वरानेही त्याच्याकडे पाहिलं. तिनेही कल्पना केली नव्हती की आर्यन कधी अशा प्रकारे प्रेम व्यक्त करेल. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. दोघंही एकमेकांकडे पाहून हसले.
"तू लग्नगाठ बांधण्यावर विश्वास ठेवायचास, मी प्रेमाच्या बंधनावर. पण आज आपलं प्रेम आणि लग्न दोन्ही एका बंधनात बांधलं गेलं."
"हो, आणि आता हे नातं दोघांनी मिळून फुलवायचं आहे."आर्यन हलकं हसत म्हणाला,
विवाहविधी पूर्ण झाले. दोघांनी एकमेकांचा हात हाती घेतला, आयुष्यभरासाठी.

समाप्त