लग्नाचे वाजलेले तीन तेरा

माझंच लग्न ...☺️????????????????

लग्नाचे वाजलेले तीन तेरा …


माझं लग्न म्हणजे दुसरं महाभारत म्हणला तरी चालेल … एकतर माझ्या अंगात भूत ,  कॉलेज शिकायचं , पण अडाणी गावं , त्यातली माणसं त्यापेक्षाही अडाणी ..  तेव्हा म्हणजे मागच्या तेरा एक वर्षात गावात अशी परिस्थिती, दहावी झाली की उरकून टाका मुलींची लग्न , काय करणार शिकून , शिकल्या तरी चूल नि मुलंच करावं लागणार ..  त्यात शेतकऱ्यांची अठराविश्व दारिद्र्य कोणाला माहीत नसेल असं नाहीचं .  मागे अजून दोन भावंडे .. त्यांचं शिक्षण , घरात खाणारी तोंडे दहा नि कमावणारा एक , त्यातही बेभरोसे शेती … पिकलं तर पिकलं , नाहीतर खंडित ..
त्या वडिलांना तरी काय बोलणार ..  कॉलेज शिकायचं म्हणलं तर तालुक्याला जावं लागणार , महिन्याचा पास साडे तीनशे रुपये …रानात केलेल्या माळव्याचे पैसे आठवड्यातून एकदा बाजार निघायचा , कधी दोनशे तर कधी तीनशे ….चुकून कधी दर लागला तर पाचशे रुपये हाती यायचे…  आठवड्याची मिळकत , तेवढा एसटीचा महिन्याचा पास …
घरातील छोटे मोठे खर्च बघायचे की मी कॉलेज शिकायचं…  राहून गेलं शिक्षण पैशाअभावी .. तरीही मनात वाटायचं मिळेल शिकायला .. नुकतीच दहावी झालेली  , लांबलचक केस , कायम दोन वेण्या घालायची सवय .. मग शाळा सुटली तरी , घरी दोन वेण्याचं असायच्या ..  मावशीने तिच्या मुलींचे दिलेले ड्रेस तेच घरात वापरायचे..
कोणी स्थळ आलं , की मी साडी कधीच नेसायचे नाही मुद्दामहून ..  अशीच दोन वेण्यावर गेले तर मला नापसंत करतील नि लग्न जुळणारचं नाही , पण व्हायचं मात्र उलट ...दुसऱ्या दिवशी त्यांचा होकार यायचा ..  मला समजायचंच नाही .. असं वेंधळ्यासारखं गेलं तरी पसंद कसं करतायत …
पण माझं नशीब बलवत्तर असायचं , घरची काहीतरी खुसपट काढायचीत म्हणजे त्याची नोकरी किंवा त्याचं दिसायला माझ्यापेक्षा डावं असणं ,  नि त्या मुलाकडील मंडळीला नकार दिला जायचा …

मी मात्र खुश..  बरं झालं , कॉलेज शिकायचा चान्स वाढला ..पण म्हणतात ना विधात्या लिखित पुढे कोणाचं काय चाललंय , आमचं हे ध्यान पदरी पडायचं होतं , ते आमच्याचं नशिबी.... दुसरीकडे कुठे जातंय होय ..
ठरलेली दोन तीन लग्न मोडली होती यांचीही , का तर गळ्यात हे माझ्याच पडणार होते समजून घ्या ..???? … माझा लग्नाला असलेला नकार बघता , आई वडील कांड करूनच आले , कधी कधी वाटतं बरं झालं इथं लग्न झालं , काय माहित नाहीतर कसला कोण पदरात पडला असता .. ???? मग कशाचं लिहिते मी नि कशाचं काय , आणि कशाचं माझं गिटार .( धूळ खात पडलंय बिचारं , बीना प्रॅक्टिस चं ???? म्हणजे आता चालू केलंय मी पुन्हा , hope लवकरवचं डेमो दाखवायला मिळावा )
तर मग , आई वडील यांच्याकडे गेले , नि डायरेक्ट लग्नचं ठरवून आले , मुलगा दिल्लीला असतो , द्राक्षांच्या बागा आहेत , बस ????...दिल्ली बघून आई वडिलांनी लग्न ठरवलं माझं ..
मुलगी कशी आहे दिसायला , तर आई बोलली , माझ्यासारखीच आहे .. झाली मुलीची पसंती पण झाली ..
घरी मी तोच ड्रेस ,दोन वेण्या .. कपडे धूत होते ..आई आली बोलली उठ साडी नेस , का ते सांगायला तयार नाहीत ..
लग्नाला हो म्हणायचं नाहीतर घरातून बाहेर व्हायचं , हे तेव्हाचे कायदे … मनात म्हणलं जाऊदे तसही शिक्षण काही व्हायचे नाव नाही , कोणाशीही करायचं लग्न मग , याच्याशी केलं काय बिघडलं …
झालं महिन्यानंतरची तारीख ठरवली लग्नाची, लग्न आमच्या घरी , यांचं गाव एक भावकी , लग्न उद्यावर नि आज गावतली दोन जण देवाघरी , भाऊबंदकी जाम खट्याळ, मुद्दामहून यांच्या चुलत्याने त्याच्या मुलीचं लग्न त्याच दिवशी घेतलं ..
गावात सुतक , त्यात दोन लग्न , गावातील सगळी मंडळी तिकडच्या लग्नाला , इकडचे टेम्पो रिकामेचं.. श्रीवंदनाचा घोडा रद्द , बँड रद्द .. का तर गावात सुतक … काय बोलायचं आता ..

नवरदेव, बिना दाढी करता लग्नात , गावात सुतक … ( आता यांनी  दाढी केली असती तर कोणी केस तर नसती न केली , पण नाही स्वतःच खरं करणारी माणसं ही )
मी पण बिचारी , डोक्यावरून ओघळ ये पर्यंत तेल थापलेली लग्नात .. पावडर तेवढी लावली असेल , ना मेकअप ना पार्लर , तेव्हा कुठे मुली एवढ्या फॅशनेबल होत्या , गावातल्या मुली त्याहून मागे .. आणि मी गावचीच (आता काळ बदलला आहे )
झालं वऱ्हाड आलं , लग्न लागलीत .. जावई बापूंनी जेवणाचा एक घासही खाल्ला नाही , ( आता विचारलं की का नाटकं करत होता ,खाल्ल का नव्हतं काही लग्न लागल्यावर , तर म्हणतात , मला नव्हतं लग्न करायचं तुझ्याशी , अरे देवा … ???? का नव्हतं करायचं हे विचारलं तर म्हणतात , दाखवली एक नि लग्न लावलं एकीबर ...आता हे कुठलं कारण झालं बरं ..काहीही ???? .. ती आडगी जमात म्हणतात ना ती ही , काय बोलणार यांच्या पुढं , का रुसून बसलं होतं कोनास ठाऊक , हा आठवलं यासाठी नव्हतं काही खाल्लं की , लोकांना सांगण्यासाठी ,सासरचं पाणी देखील पिलेलं नाही आम्ही , ???? , काय पण माणसं राव .  जमाना कुठे चालला , ही बसलेत अजून पाण्यावर )
यांच्या गावातली नाहीत पण नदीपलीकडच्या गावातील मात्र सगळी ओळखिची माणसं लग्नाला आली होतीत , ते कसं पुढे येईल लिखाणात ..
जाम रडले सासरी येताना , अजूनही गावात माझंच नाव निघतं वैशाली इतकं कोणी रडलं नसेल लग्नात , ???????? ( काय करायचं राव लग्नासाठी अजून तयार नव्हते मी , वय होतं का ते लग्नाचं , चला जाऊद्या ???????? आता तो विषय)
लग्न होऊन सासरी ज्या दिवशी आले , ते सासरच्या गावातून नाहीच , आमचं घर नदीकडेला गावच्या मळयात ..  गावात जाऊन पुन्हा घरी रानात यायचं म्हणल तर .. जास्तीचा प्रवास करावा लागला असता .. म्हणून मग  मला ,नव्या नवरीला यांनी नदीपलीकडच्या गावातून घरी आणलं , कारण बाहेरुन गावावरून यायचं म्हणलं की यांच्या स्वतःच्या गावापेक्षा नदीपलीकडंच गाव यांना घरापासून जवळ पडत असे .. आणि अजूनही तेचं आहे ..... नशीब नदीला तेव्हा पाणी नव्हतं ..  पोहत चल म्हणले असते नाहीतर ???????? …

रात्रीच्या अंधारातून जवळ फक्त एक दोन बॅटरी .. घरातील माणसं माझी पाठराखीण आणि मी … कुठे तुम्ही ऐकलं असेल का नवी नवरी त्या नदी शेजारी असलेली स्मशान भूमि पार करून सासरी आलेली …पण मी मात्र धडधाकट आले होते..( अजूनही घराच्या दारात उभं राहिलं की पलीकडच्या गावातील कोणाला अग्नीला दिलेलं दिसतं , ???? आणि म्हणे भूतं बीतं असतात … नवरदेव आमचे रात्रीच्या दोन दोन वाजता भरलेली नदी पार करून येतात , मित्रांच्या पार्टीवरून , भुतंच भ्यायला लागली असतील लोकांना आता )
लग्नात दिलेली भांडी ,वस्तू त्या अंधारातून , मोकळ्या नदीतून आणली जात होती … दोन वस्तूतील एखादी वस्तू हमखास तुटलेली असायची त्या अंधारातून येताना , मी नवी नवखी काय बोलणार ...तसंही लोकांना दुसर्याने दिलेल्या वस्तूची किंमत कुठे असते तेव्हा ( मला अजूनही आठवत आहे , वडिलांनी ३५ हजार कर्ज उचललं होतं तेव्हा माझ्या लग्नाच्या खर्चासाठी )
सासरी दुसऱ्या दिवशी उठून बघतो तर .. बाहेर धो धो पाऊस , नदीला तुडुंब पाणी .. आता ना नदीपलीकडच्या गावातील लोकांशी सम्पर्क ..( गावातील लोकांपेक्षा त्या नदीपलीकडील गावातील माणसं जास्त ओळखायची , या सर्वांना , संबंध खूप कमी गावातील लोकांबरोबर ..)
ना स्वतःच्या गावातील लोकांबरोबर , इकडे पाणी तिकडे चिखल अशी परिस्थिती  …
घरातून बाहेर पडायची सोय नाही बिलकुल … लग्न होऊन सासरी आले तेव्हांच नव्हे … नंतर केव्हाही माझं, आमच्या राहत्या ठिकाणावरून  सासरी जाणं झालं की पाऊस कायम ठरलेला …

तेव्हापासून सगळे ओळखतात … मी गेले म्हणलं की पाऊस हा हमखास येणारचं .. " वैशाली , तू बाई पाऊसंच घेऊन येतेस येताना " असं म्हणतात सगळेजण…
अजूनही येतो ,???????? ????  नुसतं मी महाराष्ट्र मध्ये मिरज रेल्वे स्टेशनवर पाऊल टाकलं , की रिमझीम का होईना पाऊस आलेलाच असतो ..( प्रूव्ह साठी नेक्स्ट टाइम म्हणजे आता कोरोना संपल्यावरचं गावी गेले नि पाऊस आला ,व्हीडिओ बनवेन )
लग्नाचे चार दिवस झाले, पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता... , सत्यनारायण पुजा करायची होती … सासरी कुलदैवत पालीचा खंडोबा .. देवदर्शन झाल्याशिवाय पूजा नाही , आता नदीपलीकडून जायचं म्हणलं तर तिकडे पाणी , आणि गावातून जायचं म्हणलं तर चिखल ...कस करायचं ..
तरीही घरची मंडळी मिळून कसतरी चिखलातून वाट काढत गावात पोहचलो ..  देवदर्शन करून येईपर्यंत मोठ्या दिरांना मागे पुजेची तयारी करायला सांगितलं होतं … देवदर्शन करून माघारी यायला अंधार झाला , तिकडे पुजेची तयारी चालू होती…
माझ्या एका हातात लग्नातील लाल रंगाची चप्पल  , दुसऱ्या हातात शालू पकडलेला , चिखलात खराब होवू नए म्हणून , माझ्या मागोमाग सासरे बॅटरीचा उजेड दाखवत , पुढे नवरदेव …
घर जवळ आलं म्हणून सासरे पुढे गेले नि हे माझ्या मागे , ते पुढे जातायत न जातायत तोवर मागे मी धप्प .. त्या चिखलात … चप्पल एकीकडे ,मी एकीकडे .. नि तो शालूचा लांबलचक पदर चिखलात लोळत एकीकडे … वा वा ...सासर्यांनी विचारलं ,काय झालं पडला काय ?
आता त्यांना काय सांगणार , नाही म्हणले , नि उठले माझी मी , नवरोबांनी हाथ मात्र दिला नाही उठ म्हणून , बॅटरी मात्र दाखवत होते ..
घरी आल्यावर तशाच चिखलाच्या साडीवर पूजेला बसले , उशीर करून चालणार नव्हतं कारण , जो भटजी आणला होता पूजा वाचण्यासाठी .. तो मोठ्या दिरांनी नदीपलीकडून पाण्यातून धरून आणला होता ..????  बाहेर रिप रिप पाऊस चालु होता , जर पाऊस वाढला तर भटजीचं जाणं अवघड झालं असतं , नि दुसऱ्या दिवशी त्याला दोन लग्न लावायची होतीतं …

पाऊस असल्याने लाईट नव्हती.. कंदील नि बॅटरीच्या उजेडात पूजा चालू होती … आई कडंच कोणीही आलं नव्हतं , कारण इकडच्या लोकांना तशी गरज वाटली नसावी ,बोलवावं नि तिकडच्या लोकांनाही यावं… नि सासरही खुप लांब माहेर पासून .. त्यामुळेही असेल कदाचित ( माहेरी काही पाहुनी मात्र रुसलेली , पूजेला देखील सांगितलं नाही आता मि कोणत्या तोंडाने काय सांगू, का बोलवलं नाही , कारण काय होतं , अचानक घेतली , पाऊस होता म्हणून नाही सांगितलं , दुसरं काय बोलणार )
पाठराखीनही दुसऱ्या दिवशी लगेच गेली , थांबली नाही … कारण पावसामुळे आमचं जाणं थटलेलं, नि तिच्या घरी तीची मुलं , त्यांचं कोण बघणार ..
खरंतर कुठले रीतिरिवाज झालेच नाहीत माझ्या लग्नाचे , मांडव परतवणी वगैरे , इकडे हरियाणा यायच्या आदी दोन दिवस जायला मिळालं तेवढं सासरी … लग्नाची कबुलीचं ह्या बोलीवर झालेली की तुमची मुलगी दोन दोन वर्षे नाही येऊ शकणार गावी ..
दोनचे काय तीन वर्ष झाले तरी गावी जानं होत नाही , गेले तरी मोजून चार दिवस रहायला मिळतं ,
लग्न झाल्यानंतर वडिलांचे शब्द आठवतात , "एकदा लग्न झालं की दिल्या घरी मेलं "
मग त्यांचे शब्द खरे करून दाखवणे , हेचं आपलं कर्तव्य … खरी गृहिणी तिचं जी सुखी असते आपल्या संसारात ..( आता काही अपवादात्मक असतात लग्न ,नाहीत टिकत )


आणि तसंही मी होतेचं किती आईजवळ , लहानपणापासून सवय होती आईशिवाय रहायची , त्यामुळे लग्न झाल्यावर फारसा फरक पडला नाही , सगळे विचारायचे तुला कस जमतं , एकटीला रहायला .. येत नाहीस लवकर इकडे ,वगैरे वगैरे ..

माझं उत्तर ,आहे सवय मला .
आणि कसं असतं, जसं जसा काळ पुढे सरकतो .. सासरच घर हेचं आपलं घर याची जाणीव होते .. मग आईच्या घरचा उगाचा हट्ट कशाला …
आणि वयपरत्वे एक गोष्टही समजली , मला लहानपणी वाटायचं , मी आईजवळ राहते , मग आईला का आठवण येत नाही तिच्या आई ची .. का तिला वाटतं नाही माहेरी जावं ..
त्याचं उत्तर आज समजतंय , ती गुंतलेली असते , आई वडिलांनी बसवून दिलेल्या संसारात , मुलाबाळांत …


धन्यवाद …


©vaishu patil ..