लग्नाचा वाढदिवस....

Marriage anniversary celebration is a great feeling....and surprise s also....

लग्नाचा वाढदिवस.......

लग्नाचा वाढदिवस कशाला म्हणतात हे शिला आणि विजय ला माहीत च नव्हते,...गेले कित्येक दिवस ते दोघे दुसऱ्यांचा विचार करत करत जगत होते,...खूप कष्टाळू असे दोघे....चला तर बघुया त्यांचा जीवनाचा प्रवास व लग्नाचा वाढदिवस कसा साजरा होतो ते.....

विजय सर्वसामान्य घरातील मुलगा ,त्याच्या आईला कधीही न दुःख देणारा,,,अशातच शीला सोबत त्याचे लग्न झाले,शीला ही सर्व गुण संपन्न मुलगी,जेवढं प्रेम विजय त्याच्या आई वर करायचा त्याही पेक्षा जास्त प्रेम शीला करायची,सासूबाई खूप लाडाची होती तिच्यासाठी...सासरे नसल्यामुळे सासूबाई च राज्य होत,पण शीला जसं सासूबाई म्हणायची तस च करत होती,व सर्वांची लाडकी झाली होती,अगदी सासूबाई ची सुध्धा ....

घरात सासूबाई च्या व्यतिरिक्त एक दिर व नणंद देखील शीला ला होती,दिर व नणंद दोघेही शीला सोबत चांगले वागत नसे,का तर त्यांची आई म्हणजेच शिलाची सासूबाई त्या दोघां पेक्षा शीला ला चांगल म्हणायची म्हणून,, ते दोघे शिलाचा खूप राग करायचे....

विजय तर शीला पेक्षा जास्त त्याच्या भावंड कडे व आईकडे लक्ष देत असे,शीला बिचारी घर कामात व्यस्त तर विजय त्याच्या तुटपुंज्या नोकरीत व्यस्त राहायचा...दोघांना एकमेकांसोबत बोलायला वेळ च मिळत नसे....

शिवाय घरात शीला च्या विरोधात तिचे दिर व नणंद दोघेही नेहमी विजय चे कान भरून द्यायचे म्हणून विजय व शीला यांच्या मध्ये थोडेफार वाद व्हायचे...मग काय कितीतरी दिवस अबोला राहायचा,व त्यांचे नाते दूर व्हायचे...

दिर व नणंद चे लग्न होईपर्यंत हे असेच शीला आणि विजय च्या आयुष्यात चालू होते,जेव्हा त्या दोघांची लग्न झालीत तेव्हा कुठे शीला व विजय चा संसार फुलला...आणि दोघांमध्ये ताळमेळ ही सुरळीत झाला,पण या सगळ्या मध्ये वेळ फार निघाला...

शीला व विजय यांना मुल झालीत,मुलांसाठी खूप कष्ट घेतले त्यांनी,त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले,गरिबीतून समोर आलेले शीला व विजय स्वतःचे आयुष्य विसरून च गेले होते,कायम दुसऱ्यांचा विचार करणारे दोघे,स्वतःसाठी कधी जगलेच नाही...पण त्यांचा मुलगा हा खूप समजूतदार होता,त्याने लहान पना पासून आपल्या आई बाबा ला कष्ट करतांना पाहिले होते,

आणि त्याने मग आपल्या आई बाबा ला एक सरप्राइज द्यायचे ठरविले,म्हणजेच त्यांचा लग्नाचा ४०वा वाढदिवस येणार होता,त्या दिवशी काहीतरी विशेष करण्याचे त्याने ठरविले यामध्ये त्याच्या पत्नी ने देखील सहकार्य केले...

आणि ज्या दिवशी आई बाबांचा लग्नाचा वाढदिवस होता त्या दिवशी छान पैकी एक केक बोलावला,दोघांना नवीन कपडे घालायला लावले,मस्त पैकी आजू बाजू चे काही लोक बोलावले,व केक कापायला लावला,,नंतर सर्वांनी मिळून छान गिफ्ट दिले...

आपल्या मुलाने इतके छान सरप्राइज दिले हे पाहून शीला व विजय च्या डोळ्यात अश्रू आले,व आपण आज खूप आनंदी आहे असे म्हणत त्यांनी मुलाला व सुनेला आशीर्वाद दिला...

आजकाल या सर्व गोष्टी खूप कॉमन आहेत परंतु शीला व विजय करिता ज्यांनी कधी स्वतःला वेळ च दिला नाही त्यांच्या साठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या...आणि म्हणूनच त्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रु वाहत होते....

अशा प्रकारे शीला व विजय च्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला गेला.....


Ashwini Galwe Pund....