Oct 18, 2021
कथामालिका

लग्नाचा बाजार

Read Later
लग्नाचा बाजार
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

लग्नाचा बाजार

इंजीनीयर सुजय आईवडीलांचा एकुलता एक मुलगा , एज्युकेटेड फॅमीली , खुप लाडाकोडात वाढलेला , त्यामुळे तो एकटा कोणताही निर्णय घेत नसे सतत आई नाहीतर वडीलांना विचारुनच कोणतही काम करायचा , आई वडील त्याच्यावर जाम खुश असायचे मुलगा त्यांच्या शब्दा बाहेर नाही अर्थात वळणावर आहे म्हणून खुश असायचे .
आईवडीलांचे जगचं सुजय , कुणाला आवडणार नाही असा मुलगा .
लता आणि शालीनी दोघी जीवाभावाच्या मैत्रीणी लता गरीब परिवारातील तर शालीनी साधारण परिवारातील , बारावीनंतर त्यांचे रस्ते बदलले , लता ने डी एड ला अॅडमिशन घेतली , शालीनीने इंजीनीयरींगला अॅडमिशन घेतली पण दोघींची मैत्री अबाधीत राहीली .
पुढे काही वर्षातच लता शिक्षीका म्हणून शाळेवर लागली आणि आपल्या घरची आर्थिक बाजू वडीलांच्या बरोबरीने सांभाळू लागली गरीब आई वडीलांना तिचा अभिमान होता , आज त्यांची मुलगी शिकून सवरुन नोकरी करत होती , काही वर्षाने त्यांनी शिक्षक असलेल्या मुलासोबत तिचे लग्न लावले , लग्नाआधी तिने होणार्‍या नवर्‍याला विलासला आपल्या घरी ती अर्धा पगार देणार सांगूनच टाकले होते आणि विलासनेही संमती दिली होती तिच्या निर्णयाला .
इकडे शालीनी इंजीनीयर झाली चांगल्या कंपनीत नोकरीला लागली , शालीनीला लहान भाऊ आणि बहीण , वडील एका कंपनीत नोकरी करायचे , शिक्षणाला लागत असलेल्या खर्चामुळे थोडी आर्थीक ओढाताण व्हायची पण शालीनी नोकरीला लागल्यावर त्यांनाही नाही म्हंटलेतरी थोडा आधार झाला , एक खुप चांगल स्थळ .... सुजयचं स्थळ सांगून आले ,
मग काय आईवडीलांना गगन ठेंगणे झाले , एकुलता एक मुलगा आणि आईवडील शिवाय एज्युकेटेड लोकं .... मग काय लगेच लग्न ठरलं .... थाटामाटात शालीनीचे सुजय सोबत लग्न पार पडले आणि शालीनी सुजयच्या घरात आली अर्थात आधीपासून ठरलेच होते ती नोकरी करत राहणार म्हणून तिची नोकरी सुरुच होती , नवलाईचे नऊ दिवस संपलेत .... पहीला पगार आला तसे सहज म्हणूनच सुजयने तिला म्हंटले शालू तुझा पगार तू मला दे .... शालीनी तर चकीतच झाली .... का ? तुला का देऊ पगार ? अगं मी तुझा नवरा ना ? घरातील सगळे खर्च मी करतो .... म्हणून तू तुझा पगार माझ्या हातात द्यायचा .... काही पण सुजय ....! तुझा पगार मी मागीतला का ....? मग तू का मागतोस मला माझा पगार ?
ते काही नाही .. काही खर्च करायचे असतील तर मी करेन पण मी तुझ्या हातात पगार देणार नाही ...! ठामपणे तिने त्याला सांगीतले .
आता मात्र जिद्दीवर गोष्ट आली , बायको असूनही नवर्‍याला नाही म्हणते म्हणजे काय ? लगेच सुजयने आईवडीलांना ही गोष्ट सांगीतली .... तसे त्यांनी शालू ला समजाविले .... शालू बेटा काय अडचण आहे .... तो मागतो तर देना त्याला तुझा पगार .... शेवटी हे घरदार सगळं तर तुझच आहे ना ....!
तुला गरज असेल तसे तो देत जाईल ना पैसे तुला .... कशाला ऊगाच कलह करायचा .... शेवटी वादंग नको म्हणून शालूने नांगी टाकली आणि पगार सुजयच्या हातात दिला ....!
आता तर तिला प्रत्येक तिच्या छोट्यामोठ्या खर्चासाठी सुजयला पैसे मागावे लागायचे .... त्यावरही वादंग चालायचे तुला कशाला हवे पैसे .... खर्च कमी कर .... ज्या गोष्टी फक्त तिच्या त्याच्यामधे असायला हव्या आता त्या गोष्टी सासूसासर्‍यांच्या कानावर टाकून वादंग वाढायला लागले , अजून पुरते एकमेकांना समजलेही नाहीत दोघे आणि इनमीन चारपाच महीन्यातच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप .... मग आपल्या मुलाचा खोटेपणा लपवण्यासाठी शालूवर बोट ठेवू लागले .... कोरोनाची लागण होऊन शालूच्या आईवडीलांना भरपूर आर्थीक फटका बसला , पण तरीही शालूच्या सासरकडच्यांनी तिला आपल्या आईवडीलांना आर्थीक मदत करु दिली नाही .
शालू खरेतर ह्या सगळ्या घटनाक्रमामुळे फारच हळवी झाली .... प्रतिकार करायचा तरी किती .... समाजात नाव असलेलं सासर .... आपलं दुःख सांगीतले तर आईवडीलांना वाईट वाटेल ही भावना .... परत लोकं काय म्हणतील ती फिकीर ... अश्या सर्व कुचंबणा सहन करुन .... मन मारुन .... ती सासरी आला दिवस ढकलत आहे .
गरीब परिवारातील लता सासरी गेल्यावर काही दिवसातच तिच्या सासूने तिचा पगार तिला मागीतला , परिस्थितीचे चटके सहन केलेली लता खंबीर होती , ठाम होती , तिने स्पष्टपणे सासूला सांगीतले , माझा पगार मी कुणाच्याही हातात देणार नाही .... अर्धातर मी माहेरी देईन .... ऊरलेला माझ्याजवळ राहील ... मला हवा तसा मी घरात खर्च करेन .... तुम्हाला काही हवे असल्यास मला सांगा .... मी आणून देईन ...!
सासूच त्या , तिचे स्पष्ट बोलणे सासूसासर्‍यांना आवडले नाही आणि विलासलापण आवडले नाही .... हळूहळू तिचाही पगारासाठी छळ करणे सुरु झाले .... पण खंबीर असलेली लता घाबरली नाही .... तिने मार्ग शोधला .... जवळच असलेल्या पोलीसस्टेशनला जाऊन तिने कंम्प्लेंट केली .... कंम्प्लेंट महीलासेलला म्हणजेच दक्षता समीतीला पाठवण्यात आली .... रितसर तिथून विलास व त्याच्या आईवडीलांना बोलावणे आले .... काही दिवसाच्या कौन्सिलींग नंतर आज लता आपल्या सासरी आनंदाने जीवन व्यतीत करत आहे .... !
लता साठी ह्या गोष्टी सोप्प्या नव्हत्या , तिलाही प्रचंड मानसीक तानाला सामोरं जावं लागलं पण तिचे गरीब आईवडीलही तिच्या पाठीशी ठामपणे ऊभे राहीले ....!
लग्न केलं ते काही अश्या प्राॅब्लेमनी घाबरुन घर सोडायसाठी नाही .... तर अश्या लोकांना धडा शिकवायची गरज आहे ....
कधी कधी काही गोष्टी काही लोकांना कळत नाहीत .... सारासार विचार करत नाहीत .... दुसर्‍यांची भावना समजत नाहीत .... आपण मानसीक रोग लावुन घ्यायच्या ऐवजी आपण आपल्या जवळच्या म्हणजेच आईवडीलांना पुर्ण कल्पना द्यायला हवी .... त्याआधी आपण आपल्याला काय करायचे आहे त्यावर ठाम असायला हवे .... कधी असेही होऊ शकतं आईवडीलही समाजाच्या भीतीने तुम्हाला रोखू शकतात .... पण ते तुमचे आईवडील आहेत आणि तुम्ही तुमच्या गोष्टी त्यांना पटवुन सांगू शकता ....!
खंत बाकी हिच राहते .... आपण आपल्या मुला मुलींचे लग्नं का करतो .... कोणत्या कारणांसाठी .... मग आपणच त्यांच्या संसाराला हातभार होईल किंवा त्यांचा समतोल साधला जाईल किंवा त्यांचा संसार कसा फुलवायचा .... हे न बघता .... आपण हे काय करत आहोत .... ?
30 कथा लिहील्यात आतापर्यंत ... एका मैत्रिणीने म्हंटले मला , स्त्रियांचे प्रश्न " खंत मनातील " तुझ्या 31 कथांनी संपणारे नाहीयेत ... म्हणून विचार केला ... ही खंत मनातील कथा मालिका लिहीतच राहणार अधुन मधुन .... तुम्ही ही तुमच्या जीवनातले प्रसंग आमच्याशी शेयर करा .... तेही कथारुपात मी सादर करेन .... ही कथा ही खरी आहे ... आपल्या वाचकांपैकीच एकीची आहे .

संगीता अनंत थोरात
नागपूर
04/08/2021

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now