लग्नाचा ५०वा वाढदिवस

मग काय, तुम्हाला आईनी लाडावून ठेवले होते. आळशी कुठले, ममाज बॉय होता तुम्ही.हो पण या या ममाज बॉय चा आज्ञां कारी नवरा म्हणजेच, जोरू का गुलाम झालाना इतक्या वर्षात.पुरे पुरे म्हणे गुलाम, जरा काही जास्ती काम सांगितलं की कसे चिडायचा, राग तर नेहमी नाका वर ,नाकाचा शेंडा लाल, मग मी पण तुमचे नाव ठेवले होते.काय, ॽकाय सांगहो रागात तुमचा चेहरा खराब दिसायचा की मी तुम्हाला सदानंदऐवजी चिडका बिब्बा असे म्हणायचे म्हणजे मनातल्या मनातकाय? चिडका बिब्बा, असे म्हणताच दोघेही हसायला लागले.
?लग्नाचा चा 50 वा वाढदिवस .


सकाळचे साडेपाच वाजले, सुमती बाई ना जाग आली . उठुन देवाला हात जोडले व प्रातर्विधी उरकून चहा ठेवला, तोपर्यंत सदानंद उठून आले .

सुमतीने त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असे म्हणत चहाचा कप हातात दिला
.सेम टू यु असे म्हणत त्यांनी चहा☕ घेतला.
चहा पिऊन ते गच्चीवर फिरायला गेले .व सुमती बाहेर बागेत फुले? काढायला गेल्या.

ते दोघे परत आले तोपर्यंत घरातले बाकी सर्वजण उठून आले व एका सुरात मुलगा ,सून ,नातू, नात ,यांनी लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा देत टाळ्या वाजवल्या.
. हर्षिताने आजी आजोबा दोघांचा एकत्र फोटो घेत व्हाट्सअप केले.

कामावर निघता निघता सून निशाने ,"आई बाबा बरोबर सात वाजता आपण हॉटेलला पोहोचु .आई तुमची साडी काढून ठेवली आहे" सगळे गेस्ट सरळ हॉटेलातच येतील.
अगं कशाला इतका खर्च उगाचच?
होऊ द्या हो इतका छान दिवस आहे. आराम करा, नेहमी तर आपण घरीच करतो .आणि हो रिटर्न गिफ्ट ची बॅग भरून ठेवली आहे
.आम्ही ऑफिस मधून सहा पर्यंत घरी येतो ,असे सांगून सर्वजण आपापल्या उद्योगाला गेले.

आंघोळ पूजा होताच सदानंद हॉलमध्ये आले. सुमतीने नाश्ता आणला.
"अरे वा ssआज शिरा केला आहे गोडाचा, एक चमचा खात त्यांनी म्हटले."
सुमतीबाई त्यांच्याकडे पहात होत्या, डोळ्यानेच कसा झालाय? विचारताच त्यांनी हसत हसत नेहमीच्या स्टाईल मधे"हं छान झालाय प s,ण"असे म्हणताच सुमतीला हसु आले.
"अहो पन्नास वर्ष झाली तरी तुमची ही प-ण ची सवय अजूनही ही गेली नाही."
\"अगं बस जरा आज खरं खरं सांगतो तुला.\"

सुमती बाई बसल्या
खरं सांगू तुझ्या हातचा शिरा खाता खाता इतकी वर्ष झाली की आईच्या हातची चव ही मी आता विसरलो. किंवा तू तिच्या च सारखा बनवते असे समज.
"मग दरवेळेस शिरा केला की हा पsण का असतो"?
\"ते ? तुला मुद्दाम चिडवायला. तुला सांगू "तू पहिल्यांदा शिरा केला तेव्हा मी म्हटले छान झालाय प ssण " , नी मग तु नाकाचा शेंडा उडवून हुं करून आतगेली,. तुझा तो अविर्भाव ,तो नखरा मला इतका आवडला कि मग तुला चिडवायला तो प ssण मी मुद्दामच लावायला लागलो, असे म्हणत सदानंद हसायला लागले.

तू अशीच चिडली ना कि मग मी तुला ना "गुस्से मे है मेरी सुमो फायटर\" असे म्हणायचो.

"हो कां ?तुम्हाला काय वाटले मी चिडकी, सुमो फायटर आणि तुम्ही काय होता"??
\"तू पण तर नेहमी माझे बाबा असे, आणि माझा दादा असा, नेहमी गुणगान करत राहायची.
मग काय, तुम्हाला आईनी लाडावून ठेवले होते. आळशी कुठले, ममाज बॉय होता तुम्ही.

हो पण या या ममाज बॉय चा आज्ञां कारी नवरा म्हणजेच,
जोरू का गुलाम झालाना इतक्या वर्षात.

\"पुरे पुरे म्हणे गुलाम, जरा काही जास्ती काम सांगितलं की कसे चिडायचा, राग तर नेहमी नाका वर ,नाकाचा शेंडा लाल, मग मी पण तुमचे नाव ठेवले होते.\"
\"काय, ॽकाय सांग\"
हो --रागात तुमचा चेहरा खराब दिसायचा की मी तुम्हाला सदानंदऐवजी चिडका बिब्बा असे म्हणायचे . म्हणजे मनातल्या मनात.
\"काय? चिडका बिब्बा, असे म्हणताच दोघेही हसायला लागले.

,"ए तुला आठवतं का एकदा आई बाजारात गेलेली असताना, तू दूध तापायला ठेवून बाहेर शेजारणीशी गप्पा मारत बसलीआणि विसरून गेलीस , पातेले जळून कोळसा झाले होते,"
\"हो ना आणि मग ते पातेले मी लपवून ठेवले आईनां कळू नये म्हणून पण, कसे ते त्यांना समजूनच गेले, पण त्या काही बोलल्या नाही.
अगं ते मी माझ्या हाताने झाले म्हणून सांगितले म्हणून .
अच्छा ---तरीच म्हटलं.

"आणि तुम्हाला आठवतं का? सासुबाई. वन्संकडे गावाला गेल्या होत्या त्या दिवसात एकदा माझी तब्येत बरी नव्हती ताप होता, तुम्ही खिचडी केली होती".
हो-- आठवते ना मुगाच्या डाळी ऐवजी उडदाच्या डाळीची, पाणी ही खूप जास्त झाले होते,
तरी बरी लागली हो तापामध्ये तुम्ही खाऊ घातले ना एवढे प्रेमाने.

"आणी पोळ्या आठवतात?असे म्हणून सदानंद हसायला लागले.
मी काय करणार आईंने मला कधी पोळ्या सांगितल्याच नाही करायला.
आणि नेमका तेव्हाच गॅस संपला होता शेगडीवर पोळ्या करणे म्हणजे किती कठीण असते.
"हो ना मला ऑफिसला उशीर होत होता तू एक पोळी केली तीच जळली,
"ही आपण टॉमी कुत्र्याला देऊ.\"? दुसऱ्या पोळीच्या वेळेस तेच झालं.
ही पोळी जॅकी ला ,ती टाॅमी ला मग मला वाटले या सदाला काही मिळणार आहे कि नाही?

आता सुमती लाही हसू येऊ लागले.
इतकी वर्ष कशी सरली कळलेच नाही.
सुमती चा हात हातात घेत सदानंद म्हणाले, "तू इतकं छान सगळ संभाळल, म्हणूनच छान आयुष्य गेलं."
"पुरे झालं कौतुक, उठा आता संध्याकाळी हॉटेल ला जायचं न? मग कपडे पाहून ठेवा, नाहीतर वेळेवर मला शोधायला लागतात."

ए-- तुला आठवतं का पहिल्यांदा आपण हॉटेलमध्ये गेलो होतो.??
"हो आठवते ना ,त्यांनी लिंबू पाणी आणून ठेवले शेवटी, मला वाटले ते प्यायसाठी ठेवले, आपणं नाही कां गोडाचे जेवण झाल्यावर शेवटी लिंबू पिळून पाणी पीतो?सदानंदाचा हसताना पाहून,
,,"पण आता नाही हो असे होणार"

. \"होय ग गमतीजमती असतात त्या सगळ्या, आता आठवलं की हसू येते \".

रात्री पार्टी संपल्यानंतर घरी आल्यावर सुनबाई ने दोघांची दृष्ट काढली व गुड नाईट म्हणत झोपायला गेली.

सदानंद सुमती कडे पहात.म्हणाले \"छान झाली न पार्टी\",
\"हो न किती छान ,केक काय, हार काय ,केवढ कौतुक केले सर्वांनी,उखाणा काय बाई. मला तर ,लाजल्या सारखेच झाले.
ए हॉटेलात घेतला तसा एक उखाणा घे ना.
\"तुम्हालाही घ्यावा लागेल?
बरं!
आधी तुम्ही घ्या.
बर.

" पन्नास वर्ष लाभला तुझा छान सहवास,
सुमो फाइटर ला देतो शिर्‍याचा घास."

असं का ? बरं ,तुम्हीपण ऐकाच मग.

"चिडवायला नांव ठेवले चिडका बिब्बा,
सुमती च्या आयुष्याला तुमच्या मुळे च शोभा".
काय जमलं की नाही?
अरे वा मस्तच की .?
"नेहले पे देहला, शोभतेस माझी बायको" असे म्हणताच दोघे हसायला लागले.
,_____________________

लेखिका सौ.प्रतिभा परांजपे