लग्न झालं म्हणून माहेर तुटत नाही

माहेरची ओढ, आठवणी लग्नानंतर ही कार्य आहे तशीच पार पाहून जबाबदारी स्विकारावी.

                     लग्न दोन परिवार एकत्र येऊन कुटुंब वाढीस लागते.आनंदाचे,हास्याचे क्षण एकत्र साजरे करतात.लग्ना आधी मीना सर्वांची काळजी घेत असे.काकूला बर नसले की तीची औषध,आजीच्या गोळ्या आठवणीने घरी आणत असे.अजिंक्य ला अभ्यासात नोट्स कश्या काढायच्या याबद्दल सांगत असे.स्नेहाला गायनाच्या क्लासला घेऊन जात असे.बाबांना आॅफिसच्या कामात डाॅक्युमेंट टॅली करून देत असे.

                पण आता मीना लग्नासाठी उभी होती.तीचे लग्न निश्र्चित झाले होते.तीने सर्व काम करण्याची तीची जणू सवय होऊन गेली होती.मीना च्या लग्नाला आता १ महिना होत होता.तीने माहेरी जाण्याची परवानगी मागितली.तीला मिळाली.तीने नेहमीप्रमाणे सर्व कामे पार पाडली.माहेकडच्यांना कौतुक वाटले.मीना लग्न झाले तरी आपल्याला आठवणीत ठेवून आपला विचार करते.सगळ्यांनी मीना घरी आली म्हणून तीच्या भवती गोलाकार बसले होते.ती कशी आहे तिकडे.विचारपूस करू लागले.मीना ही सर्व काही छान चालू आहे असे म्हणाली.
                   नंतर मीना दोन दिवसांनी सासरी गेली.ती सासरच्या मंडळींना पण आपलुकीने आपलसं करत त्यांची मन देखील जिंकत होती.परत दुसरा महिना संपत आला मीनाने पुन्हा माहेरी जायचे सांगितले.असे ती सलग सहा महिने जात राहीली.न राहवून पुढच्या वेळी संजयने तीला प्रत्येक महिन्याला माहेरी जाण्याविषयी विचारले.मीना ने सांगितले.महिन्याला टॅली हिशोब बाबांना करून देणं,आजी आणि काकूला औषधे आणून देणे महिन्याभराची याकरता जाणं हिताचे होते.लग्न झालं म्हणून मी माझे माहेरच सर्व काही सोडून नाही देऊ शकत अथवा लग्न झालं म्हणून माहेर तुटत नाही.
                   जिथे ऋणानुबंध कायमस्वरूपी जुळले जातात.ते एका क्षणाने परके नाही होत जरी मी तिथे नसली तरी आठवण मात्र मनात कायम आहे.संजयनला मीना बद्दल आणखीनच आदर वाढला.तो तीला तू उत्तम पणे सासर आणि माहेरची जबाबदारी पार पाडत आहेस.मी तूझ्या नेहमी पाठीशी उभा आहे.तुला कसली गरज वाटली की निःसंकोचपणे मला सांग मी ती माझ्या परीने पूर्ण करेन.तु जसा विचार करतेस तसे मी पण जबाबदारी पूर्वक विचार करेन.
                  मीनाला हे ऐकून खूप आनंद झाला.दोघेही एकमेकांच्या साथीने संसारात पुढे जात होते.त्यात मीना चे माहेर कडचे देखील सामील होते.संजयला जसे त्याचे आई-बाबा तसेच सासू-सासरे समजून त्याने दोन्ही घराची जबाबदारी मीना आणि संजय ने उत्तम पद्धतीने सांभाळली होती.
                  मीनाच्या माहेरकडच्यांना मीना सासरी सुखात आहे.याचा आनंद तर होताच पण ती ज्या पद्धतीने माहेरचे पण पाहत होती ते पाहून लग्न झाले तरी मीना आपल्याच साठी आहे हा आनंद त्यांना मनोमनी सुखावत होता.
         खरं आहे लग्न झालं म्हणून मुलींचे माहेर तुटत नाही तर तिथे धाव घेण्यासाठी तिथे राहत नसताना सुद्धा मन मात्र त्या आठवणींमध्ये अनेकदा भेट देऊन जात असते.