लग्न गाठ - दि एडव्हान्स बुकिंग भाग 77 अंतिम भाग

Story Of Two Friends


लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग अंतिम भाग
भाग ७७

सुशांत "बाबा , मी दर दोन महिन्याला इकडे येणार आहे आधीच सांगतोय .. मी जास्त दिवस सानू शिवाय नाही राहणार .. माझे ऍडव्हान्स मध्ये तिकिट्स बुक करून ठेवा म्हणजे स्वस्त पडतील "
विलास " दोन महिन्यात .. काय वेड लागलंय का ? लंडन आहे ते .. त्या कोर्स च्या फीज पेक्षा जास्त खर्च येण्या जाण्या वर घालववतो काय ? त्या पेक्षा तू आल्यावर ऑफिस चा सेट अप करून ठेवतो .. आल्यावर ग्रँड उदघाटन करू "
सुशांत " काय हो बाबा .. एक वर्ष .. ती इकडे काय करेल .. आणि मला पण बोअर होईल ना .. काय तुम्ही .. असले प्लॅनिंग केलेत .. सानू ला घेऊन गेलो असतो ना तिकडे "
विलास " अरे हो .. आता मी काय करणार सांग .. तू आधी बोलला असतास तर मी पाठवली असती तिला .. तू आता काळजी करू नकोस .. तिला मी रोज माझ्या ऑफिस ला नेत जाईल.. तिला लॉ शिकवतो .. हुशार आहे ती कळेल तिला लगेच .. किंवा पाहिजे तर इकडचा चांगला कोर्स लावतो .. शिवाय आई बरोबर NGO चे काम पण करेल ती "
मागे सानू दिसली विलास ना
विलास " हो कि नाही ग सानू ? तू राहशील ना इकडे ?"
सावनी " ते दोन नाही पण ४ महिन्यांनी तरी एकदा बोलावाल का त्याला ? एक वर्ष खूप होईल .. " बिचारीने खाली मान घालून सांगून टाकले
विलास " बर ठीक आहे .. सुशांत ४ महिन्यातून एकदा येशील तू .. आणि मी आई आणि सानू तुला भेटायला एकदा येऊ .. .. मग तर ठीक आहे "
सुशांत " ठीक आहे .. जरा नाराजीतच पण ठीक आहे त्यातल्या त्यात बेटर ऑफर आली होती "
सुशांत रूम मध्ये गेला ..
सुधा " चल .. सानू आपण रवा लाडू बनवू .. सुशांतला देता येतील बरोबर "
सावनी " आणि ते शंकरपाळ्या पण बनवू का मी ? त्या पण आवडतात त्याला "
सुधा " चालेल कि ? दोन्ही बनवू "
----------------------
उद्या सुशांत जाणार होता .. पॅकिंग अल्मोस्ट झालीच होती .. सानू ने आता तिचे अश्रू लपवले होते .. त्याला आनंदात पाठवायचे म्हणजे तो छान अभ्यास करेल ..
सुशांत " सानू .. ये ना जवळ बस ना जरा .. यार हा दिवस आलाच साला .. मला नको होता हा दिवस .. पण मी नाही अडवू शकलो या दिवसाला .. सॉरी "
सावनी "अरे सॉरी काय सॉरी .. हे बघ सुश .. आता असा नाराज होऊन नको ना जाऊस .. ठीक आहे .. आणि चार महिन्यांनी येणार आहेस ना तू .. "
सुशांत " चार महिने सानू .. एक महिना आपण भेटलो नव्हतो तर काय हालत झाली होती माझि.. यार हे नको वाटतंय सगळे "
सावनी " नको ना असा त्रागा करुस .. छान होईल सगळे .. मी राहीन ठीक इकडे .. रोज मला एक व्हिडीओ कॉल करायचा पण .. आणि नो पार्टी विथ फिमेल फ्रेंड्स .. तिकडे सगळे डायरेक्ट गळ्यात पडतात .. आणि सारखे किस करतात .. तू जरा सांभाळून रहा .. आधीच माझा हँडसम नवरा .. सगळ्या मागे लागतील याचे टेन्शन आलय मला "
सुशांत " गप ग .. काहीपण बोलते .. तुझा माझ्या वर विश्वास नाही का ?"
सावनी " तू कसा म्हणायचास तिकडे आदित्य सर बाबत " इट्स नॉट अबाउट यु .. इट्स अबाऊट देम "
सुशांत हसायला लागला .. तिच्या गळ्यात हात टाकून " डोन्ट वरी जान !! आय एम ऑल यूअर्स ओन्ली "
सावनी ने त्याला मिठी मारली " सुश .. जेवायचा आळस करू नकोस .. आणि ब्रेकफास्ट अजिबात स्किप करायचा नाही .. "
सुशांत " होय .. आणि तू पण .. जे आवडतंय तेच कर .. उगाच आई ने सांगितले म्हणून काय पण करू नकोस .. तू तुझ्या मर्जीची मालक आहेस .. पाहिजे तर अवनी कडे जात जा .. आता तुझी स्कुटी पण आणलीय इकडे .. तुला पाहिजे ते तू कर .. कळलं ना "
सावनी " माझी काळजी नको करुस .. माझ्या बरोबर आई बाबा आहेत .. तू तिकडे एकटा कसा राहशील ?"
सुशांत " तेच तर ना यार .. किती बोअर होतंय मला विचार करूनच .. तू चिडली नाहीस ना .. यार या टेन्शन मुळे माझे कशातच लक्ष नव्हते लागत "
सावनी " त्याचं काय घेऊन बसलास .. तू आता या कोर्स वर लक्ष दे .. छान मार्क्स पडले पाहिजेत .. बाकीचं सोड "
सुशांत " यार मी पण ना .. हनिमून पण नाही fisrt night पण नाही केली .. आता एका रात्रीत काय काय करू "
सावनी हसू लागली
सावनी " आता इकडे ये .. मी तुला मस्त ऑइल मसाज करते .. तू छान झोप .. बाकीचा विचार नको करुस "
सुशांत तिच्या मांडीवर डोके ठेवून बेड वर आडवा पडला .. ती मसाज करत करत बसून राहिली .. त्याला जरा झोप लागली .. पण हिच्या डोळ्यांत आता तो उदया पासून दिसणार नाही म्हणून टेन्शन होत ..
सकाळीच अवनी आशिष .. प्रभाकर प्रतिभा भेटून गेले .. दिवाकर नन्दा भेटून गेले .. आणि दुपारीच हे जेवण झाल्यावर सगळे एअर पोर्ट ला निघाले
विलास " सुशांत .. काळजी घे रे तिकडे .. आणि सानू ची काळजी नको करुस .. अभ्यासात लक्ष दे "
सुधा " लाडू आणि शंकरपाळ्या खाशील .. खाणे चुकवू नकोस रे बाळा "
सुशांत " हम .. हम .. एवढेच बोलत होता "
आई बाबांच्या .. देवाच्या पाया पडला .. मिठी मारून झाली .. "
सुशांत " मी आलोच "आणि पुन्हा त्याच्या रूम मधे गेला ..
सानू दाराच्या मागे रडत होती
सुशांत " सानू .. यार रडू नको ना .. मला सांगते आणि आता तूच रडायला बसली .. "
सानू ने त्याला घट्ट मिठी मारली " सुश .. मला तुझी खुप्प आठवण येईल .. मला रोज एक कॉल कर .. " आणि डोळे पुसत होती .. पण अश्रू काय थांबतच नव्हते ..
सुशांत च्या पण डोळ्यांत पाणी आले होते " यार .. इट्स नॉट ईझी .. हे वर्ष आपल्याला जाम थकवणार आहे .. तू काळजी घे तुझी .. आणि तिच्या कपाळावर .. गालावर .. किस करत होता तो .. माझि काळजी नको करुस .. मी राहील व्यवस्थित .. सॉरी सानू .. तुला सोडून जातोय .. प्लिज रडू नको ना .. "
सावनी " सॉरी नको ना म्हणूस .. तू काय मुद्दामून सोडून जातोय का मला "
सुशांत " यार असे वाटतंय ? कुठेतरी तुला घेऊन पळून जावे .. नको वाटतंय यार मला "
सावनी " नाही हा .. आता असा नाही विचार करायचा .. आता हे फेस करू दोघे जण मिळून "
दोघे बाहेर आले .. चेहऱ्यावरूनच दिसत होते आतमध्ये रडलेत .. विलास आणि सुधा पण वाईट वाटले
विलास " सानू .. रडू नकोस बाळा ... तो येईल चार महिन्यांनी .. ठरलंय ना आता .. जाताना हसत जाऊ दे बरं त्याला .. तुझा हसरा चेहरा बघून गेला तर लक्ष लागेल त्याच "
सानू ने होकारार्थी मान हलवली ..
मग चौघे एअर पोर्ट ला गेले .. थोडा वेळ थांबले बाहेर .. बसून चहा पाणी घेतले .. मग सुशांत आत मध्ये निघाला .. आई बाबांना सानू ला बाय करून सुशांत आत मध्ये गेला .. इमिग्रेशन .. करून त्याची फ्लाईट येणार तिकडे जाऊन बसला .. खूप दुःखी होता ..
इकडे तो आत गेला आणि जे सानू सुधा च्या खांद्यावर डोकं ठेवून जे रडू लागली .. कि बघायलाच नको ..
सुशांत ने सानू ला मेसेज केला .. त्याला माहित होते आता ती खूप रडत असेल " सानू , रडू नकोस हा जास्त .. आता अर्ध्या तासात हा नंबर बंद होईल .. मी तिकडे गेलो कि तिकडचे नंबर कळवतो "
विलास " चला मग आपण निघायचंय का ?"
सानू " थांबलो असतो थोडा वेळ .. त्याची फ्लाईट जाई पर्यंत "
तेवढ्यात अवनी आणि आशिष आले धावतच
अवनी " सॉरी .. सॉरी .. आम्हांला ट्राफिक लागले .. उशीर झाला का ? सुशांत आत गेला का ?"
सावनी रडतच अवनी च्या गळ्यात पडली .. हो आताच आत गेला .. फ्लाईट जायला एक तास आहे अजून "
आशिष ने डिकीतून बॅग काढली
विलास " बरं झाले आलास .. नाहीतर आता उशीर झाला असता "
सुधा " अहो पण हिला आत मधले जमेल ना "
विलास " जमेल ना .. ती काय बावळट आहे का ?"
सावनी ला काही क ळेचं ना .. काय करतायत हे लोक "
विलास " सावनी .. हे घे तुझा पासपोर्ट .. तिकीट .. फर्स्ट कॉउंटर .. लेफ्ट साईड .. लगेज दे .. तिकडूनच इमिग्रेशन कर .. आणि जा आत .. सुशांत ला दिसणार नाहीस अशी बस .. त्याच्या शेजारचा सीट नंबर तुझा आहे .. जा पळ .. एक तास आहे अजून "
सावनी " हे काय बोलताय तुम्ही दोघे .. मला भीती वाटतेय "
अवनी " अरे डिअर .. तुला पण त्याच्या बरोबर पाठवतात ते .. सुशांत ला सरप्राईझ आहे .. जा आता वेळ नको घालवू "
तिथेच सगळ्यांना नमस्कार करत बसली
आशिष " सानू जा .. आता .. वेळ कमी पडेल .. जा लवकर "
सानू ला काही कळे ना .. एक तर साडी घातली होती तिने .. पटपट सामान ट्रॉलीत टाकून दिले आशिष ने आणि तिला आत पाठवली .. सानू घाबरत घाबरत .. सर्व प्रोसिजर करून फायनली सुशांत बसला होता तिथं पर्यंत पोहचली .. तिने बाहेर सुधा ला फोन करून सांगितले " मी सुशान्त च्या मागे आहे .. मला दिसतोय तो "
सुधा " आधी दिसू नको त्याला "
सावनी मागे असावी असे सुशांत ला त्याचे मन सांगू लागले .. त्याला ती आसपास असली कि जाणवायचं .. त्याने उगाचच एक दोनदा मागेही वळून पहिले .. हे काय होतंय आपल्या बरोबर .. त्याला कळेना .. त्याला असे वाटले कि कदाचित तो सानू ला मिस करतोय म्ह्णून असे होतंय .. इकडे सानूच असणे शक्यच नव्हते ..
तरी पण आता बोर्डिंग सुरु होणार म्हणून त्याने पुन्हा एकदा सानू ला कॉल केला .. तर सानू काही फोन उचलेना .. त्याने त्याला अजूनच बेचैनी होत होती .. सानू बसली होती तिकडे तो उगाचच मागे पण बघत होता .. ती बरोबर चुकवायची.. शेवटी आत मध्ये गेला .. त्याच्या सीट वर जाऊन बसला .. नाराजच होता .. मोबाईल मध्ये काहीतरी बघत बसला ..
तेवढ्यात सानू मागून आली .
सानू " एक्सक्यूझ मी .. जरा आत जाऊ देता का प्लिज .. विंडो सीट माझी आहे "
सानूचा आवाज ऐकून सुशांत ताडकन उठला ..
सुशांत " अरे ए .. तू .. इकडे आत मध्ये कशी आलीस? "
सानू " सरप्राईज .."
सुशांत ने तिला ओढूनच मांडीवर बसवले " अरे हे काय आहे ?
सानू “आय डोन्ट नो .. तू बाबांना कॉल कर लवकर "
सुशांत ने विलास ला कॉल केला
सुशांत " बाबा .. आय लव्ह यु .. थँक यु .. यु आर द बेस्टेस्ट फादर इन द वर्ल्ड "
विलास " थँक यु माय सन ... मग कसे वाटले सरप्राईझ .. ?"
सुशांत " काय सांगू बाबा .. (रडतच ) आय डोन्ट ह्याव वर्डस "
सुधा " नालायका .. आता कळले का .. आपल्या माणसांने सोडून गेल्यावर किती दुःख होतं ते .. १० महिने माझ्या पासून लांब राहिलास ना म्हणून हि छोटीशी गम्मत केली "
सुशांत " सॉरी ना आई .. आता नाही असे करणार परत कधीच .. लव्ह यु आई .. यु आरमाय फेव्हरेट "
अवनी " सुशांत .. आता सावनी चे लगेज मी भरलंय .. म्हणजे काय काय कपडे भरले असतील इमॅजिन कर .. "
आशिष " सुशांत .. आता हनिमून .. आधी कर म्हणजे अभ्यासात लक्ष लागेल "
सुधा " येताना फक्त सर्टिफिकेट आणा दोघे जण .. नाहीतर आम्हांला नातवंड आणाल "
विलास " तसा आशिष ने मला आजोबा बनवायला सुरुवात केलीय .. तू तुझा निर्णय घे .. तुला काही सांगत नाही आता "
सुशांत आणि सानू दोघेही " काय ? अवनी ... ग्रेट काँग्रेचुलेशन .. दादा .. लगेच बाजी मारलीस पण "
आशिष " म्हणेज काय ? माझे आधीच ठरले होते .. लग्न झाले कि अवनी ला बिझी करवून टाकायचे .. नाहीतर ती मला क्रेझी करून टाकेल "
सुशांत "बडी ठाकुरायन!!! ठाकूर !!! यार .. आता हे आठवलं ना कि खूप हसू येतंय .. दादा काँग्रॅच्युलेशन फॉर पझेशन ऑफ प्लॉट “
आशिष "आता तू कसली वाट बघतोय रे .. तू तर पझेशन घेऊन बसलाय आधी तरी... "
सुशांत "माझ्या प्लॉट च पझेशन मिळालं पण घर बांधायची परमिशन मिळत नव्हती .. आता NOC घेऊन आलोय "
अवनी " सुशांत माझ्या जाऊ बाईची काळजी घे काय ? जरा जरी त्रास दिलास ना आता तर गाठ मोठ्या वाहिनीशी आहे हे लक्षात ठेव "
सुशांत "वाहिनी साहेब !! काळजी नसावी .. तुमची जाऊ बाई आता माझ्या कस्टडी मध्ये जपून ठेवेन तिला .. "
सगळे हसायला लागले
तेवढयात एअर होस्टेस आली " प्लिज स्विच ऑफ द फोन सर "
सुशांत " ओके ओके .. गाईज .. फोन बंद करतोय आता .. आई बाबा .. काळजी घ्या एकमेकांची .. दादा आणि अवनी काळजी घ्या एकमेकांची .. बाय "
सावनी "आई बाबा , दादा अवनी .. टेक केअर .. विई विल मिस यु "
सगळे " बाय .. टेक केअर .. एन्जॉय .. आलं दि बेस्ट "
सावनी अजूनही सुशांत च्या मांडीवर बसली होती
सुशांत ने बसल्या बसल्याच तिला मिठीत घेतले
सुशांत " ओह सानू .. किती खुश आहे मी काय सांगू तुला .. "
सानू "मी पण .. दोघे एकत्रच असणार आता .. मी आता अशीच तुझ्या मांडीवर बसून येणार तिकडे "
सुशान्त " आय डोन्ट माईंड माय डार्लिग " आणि अजूनच घट्ट पकडले त्याने तिला
सुशांत तिच्या काना जवळ " थोडा प्लॅन चेंज करतोय मी .. लंडन वरून आल्यावर हनिमून करण्या पेक्षा लंडन ला गेल्यावर केललं जास्त बेटर होईल का ग ?"
सानू लाजून हसत होती
सुशांत " अरे उडवा रे फ्लाईट .. लवकर पोहचवा तिकडे आम्हांला.... बरीच कामं पेंडिंग आहेत आमची " दोघे हातात हात घेऊन एकमेकांच्या डोळ्यांत हरवले होते .. आणि दोघे हसत होते ..
दिल इबादत कर रहा है
धड़कने मेरी सुन
तुझको मैं कर लूं हासिल
लगी है यहीं धुन

दिल इबादत कर रहा है
धड़कने मेरी सुन
तुझको मैं कर लूं हासिल
लगी है यहीं धुन

जिंदगी की शाक से लूँ
कुछ हसीं पल मैं चुन
तुझको मैं कर लूं हासिल
लगी है यहीं धुन

जो भी जितने पल जियु
उन्हे तेरे संग जियु
जो भी कल हो अब मेरा
उसे तेरे संग जियु

जो भी साँसें मैं भरु
उन्हें तेरे संग भरु
चाहे जो हो रास्ता
उसे तेरे संग चलू

दिल इबादत कर रहा है
धड़कने मेरी सुन
तुझको मैं कर लूं हासिल
लगी है यहीं धुन..

मुझको दे तू मिट जाने
अब खुद से दिल मिल जाने
क्यों है ये इतना फासला

लम्हे ये फिर न आने
इनको तू ना दे जाने
तू मुझपे खुद को दे लुटा

तुझे तुझसे तोड़ लूं
कहीं खुद से जोड़ लूं
मेरी जिस्मो जाँ पे आ
तेरी खुशबु ओढ़ लूँ

जो भी साँसें मैं भरु
उन्हें तेरे संग भरु
चाहे जो हो रास्ता
उसे तेरे संग चलू

दिल इबादत कर रहा है
धड़कने मेरी सुन
तुझको मैं कर लूं हासिल
लगी है यहीं धुन..

बाहों में दे बस जाने
सीने में दे चुप जाने
तुझ बिन मैं जाऊ तो कहाँ

तुझसे है मुझको पाने
यादों के वह नजराने
इक जिनपे हक हो बस मेरा

तेरी यादों में रहूँ
तेरे ख्वाबो में जगु
मुझे ढूंढें जब कोई
तेरी आँखों में मिलू

जो भी साँसें मैं भरु
उन्हें तेरे संग भरु
चाहे जो हो रास्ता
उसे तेरे संग चालू

दिल इबादत कर रहा है
धड़कने मेरी सुन
तुझको मैं कर लूं हासिल
लगी है यहीं धुन..

https://www.youtube.com/watch?v=fKIJhHUW-G0&ab_channel=SonyMusicIndiaVEVO
(गाणे जरूर ऐका .. अमेझिंग सॉंग आहे .. आणि नक्की सांगा मला कसे वाटले हे गाणे ..)
पाच वर्षां नंतर
आशिष ला पहिला मुलगा त्याचे नाव त्यांनी अवनीश असे ठेवले .. जो कि दोघांना .. नाही नाही पाच जणांना प्रतिभा आणि प्रभाकर .. मालती आणि आशिष आणि अवनी इतक्या सगळ्यांना खूप थकवतो .. मालती ने शेवटी घर आशिष च्या घरा जवळ घर घेतले .. कारण त्याची मुलगी अमिषा पण तर होती .. दोघांना सांभाळले जायचे नाही .. अवनी आता ऑफिस ला जाऊ लागली .. ती आशिष च्या मांडीवर बसूनच काम करते .. दोघात एक चेअर पुरते त्यांना .. फक्त मीटिंग असली कि दुसरी चेअर लावतात .. अजूनही आशिष च्या केबिन मध्ये CCTV लावले नाहीत त्याने .. एडव्हान्स बुकिंग च्या वेळी झालेला फायदा लक्षात घेऊन CCTV नसलेलेच बरे हे त्याला पटले होते .. आणि अत्यानंदात संसार करत होते .
सुशांत आणि सावनी एक वर्ष कोर्स करून तिकडेच एक वर्ष जॉब पण करून आले आणि खूप सारे पैसे कमवून आणले.. इकडे आल्यावर विलास ने मोठे ऑफिस थाटून दिले ...ओपनिंग विलास आणि सुधाच्या हस्ते च केले .. ३ वर्षां नंतर एका गोड परी ने घराचे नंदनवन केले .. तिचे नाव त्यांनी सुशानी ठेवले .. सुशानी चे डोळे सेम सानू सारखेच होते.. ज्या डोळ्यांत सुशांत ला सुकून मिळतो .. एकदा बायकोच्या डोळ्यांत हरवायचा आणि एकदा मुलीच्या डोळ्यांत हरवायचा .. पण जितका चांगला मुलगा .. रोमँटिक नवरा तितकाच... प्रोटेक्टिव्ह डॅड होता तो .. सुशांनीला एकवेळ सावनी नसली तरी चालेल पण सुशांत पाहिजेच असायचा .. आणि तो हि आवडीने तिचे सर्व करायचा .. दिवाकर नंदा .. नातीला भेटायच्या निमित्ताने महिन्यातून एकदा चक्कर टाकतात .. सुधा आणि विलास आता फुल बिझी झालेत सुशानी ला दिवसभर सांभाळावे लागते ना त्यांना .. कारण सानू पण तर ऑफिसला जाते .. सुशांत आणि सानू मिळून ऑफिस सांभाळतात .. दोघेही नामवंत CA झालेत आणि जसे बाबांचे नाव पंचकृषीत प्रसिद्ध होते तसे त्यांचे दोघांचे पण नाव प्रसिद्ध झाले होते .. सानू ने २ वर्षां नंतर पुन्हा नंबर लावलाय .रोज रात्री सुशांत , ८ महिने प्रेग्नन्ट सानू चा हात एका हातात घेऊन.. प्राम मध्ये (बाबा गाडी ) सुशानी आणि मॅक्स ची चेन घेऊन राऊंड मारायला जातात . आणि खूप सारी स्वप्न बघतात .. त्यावर बोलतात आणि पूर्ण करण्याचे प्लॅनिंग करतात.
आठवड्यातून एकदा संडे ला फॅमिली गेट टुगेदर प्लॅन करतात आणि सानू आणि अवनी पोरांना नवर्याकडे सोडून मज्जा करतात .. पाणी पुरी खातात .. आणि हे दोघे माकडा सारखे बघत बसतात.
तर अशा पद्धतीने अवनी आणि सावनी च्या लग्नाची ऍडव्हान्स बुकिंग जी त्यांनी केली होती ती सात जन्माच्या लग्न गाठी मध्ये रूपांतरित झाली ..

समाप्त !!!

नमस्कार वाचकहो !!
फक्त मिशीवाला नवरा नको या कॉन्सेप्ट वर चार ते पाच भागात स्टोरी संपवेल अशा आशेने हि स्टोरी सुरु केली होती आणि सुचत सुचत आज शेवटचा म्हणजे ७७ वा भाग पोस्ट करतेय .. वाचकांना या आधी रडवल.. घाबरवलं .. प्रेमात पाडलं होते .. यावेळी खूप हसवायचा प्रयत्न केला .. कथा कशी वाटली नक्की सांगा .. मनापासून धन्यवाद..
ईरा आणि वाचकांचे आभार !

(हा भाग १९ ऑगस्ट चा आहे .. रात्री पोस्ट केला कि तो १८ चा दिसेल )

🎭 Series Post

View all