लग्न गाठ - दि एडव्हान्स बुकिंग भाग 74

Story Of Two FriendsFriends
लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग
भाग ७४
सुशांत " एक काम करतो .. हि फुलं .. बिलं काढून टाकतो .. चालेल का तुला ?"
सानू " हो चालेल कि .. मी ना तोपर्यंत आत जाऊन चेंज करून फ्रेश होऊन येते ... हे हेवी ड्रेस मध्ये काही सुचत नाही "
सुशांत ती बोले पर्यंत बेड वरची फुल पाकळ्या काढायला सुरुवात केली त्याने .. मग मस्त ac सेट केला .. तोपर्यंत सानू सिम्पल नाईट ड्रेस घालून आली .. केस पण एकदम नॉर्मल वेणी बांधून .. सगळं मेक अप काढून नॊर्मल बनून आली ..
सुशांत फ्रेश होऊन आला .. सिम्पल व्हाईट कुर्ता पायजमा घालून फ्रेश होऊन बसला ..
सानू " आता फ्रेश वाटतंय ना .. मी आज इकडेच सोफ्यावर झोपते ... " असे बोलून ती सोफ्यावर आडवी पडली पण
सुशांत " तिकडे झोपायची काही गरज नाहीये .. "आणि तिला उचलूनच त्याने बेडवर आणले
तिला प्रेमाने कुरवाळत बेड वर स्वतःच्या जवळ घेऊन बसला .. कधी डोक्यावर ... कधी गालावर .. किशी मिळत होती ..
सुशांत " सानू .. दोन गोष्टी अजून डोक्यातून जात नाहीयेत ?"
सानू " कोणत्या ?"
सुशांत " तुझी एक्साम राहिली .. आणि दुसरे म्हणजे लंडन ला तुला मला काही केल्या नेता येत नाहीये .. बाबांनी एकदा डिसिजन घेतला कि मला एकट्यालाच पाठवणार म्हणजे आता ते बदलणार नाहीत .. आणि आता मी त्यान्ना विरोध पण करू नाही शकत आहे .. कारण पुन्हा तेच तेच नको .. त्यांनी आपले लग्न आपले प्रेम स्वीकारलंय हेच त्यांनी खूप केलंय ...
सानू " हम्म्म ... खरं आहे .."
सुशांत " पहिल्या हनिमून च्या रात्री पण माझ्या कडे तुला देण्यासाठी काही नव्हते आणि आता ऍनिव्हर्सरीला पण नाहीये .. सॉरी "
सानू ने त्याच्या गळ्यात हात टाकले " सुश .. तू आहेस ना माझ्या जवळ .. माझा म्हणून हेच माझ गिफ्ट आहे .. मला खरंच काही काही म्हणजे काहीच नकोय "
सुशांत " मला ना तुला काही घ्यायचं असले ना कि ते माझ्या पैशांनी च घेतलेलं असावे असे वाटत ... बाबांकडून पैसे घेऊन तुला कोणता दागिना मी माझ्याकडून गिफ्ट म्हणून देण्यात काय अर्थ आहे असे वाटत .. आणि आज पण मी रिकाम्या हातीच आलो .. "
सानू " सुश .. नकोय मला काही .. खरंच .. आणि मला पण तू तुझ्याच पैशांनी घेतलेलं जास्त आवडेल .. "
सुशांत " थोडक्यात काय मिसेस सावनी सुशांत सरदेशमुख .. तुमचा नवरा अजून बेरोजगार आहे "
सानू " ऐक न मी एक मागू .. देशील मला "
सुशांत " बोल ना "
सानू " मला अवनी च्या लग्नाला अवनी कडे २ दिवस जाण्याची परमीशन देशील प्लिज .. तिची ईच्छा आहे तशी
सुशांत " ओके .. तुला जायचंय ना मग जा .. माझि परमीशन वगैरे घ्यायची गरज नाही "
सावनी " असे कसं .. तुम्ही माझे धनी आहेत आता " आणि हसायला लागली
सुशांत " सानू ... " बोलता बोलता छोटे छोटे किस चालू होतेच
सुशांत " सानू .. तू ना मला एक दिवस जाम शिव्या घालणार आहेस ?"
सानू हसतच " का ?"
सुशांत " मी असा विचार करतोय .. आपले हनिमून आणि फर्स्ट नाईट मी लंडन वरून आल्यावर करायचे " आणि पुन्हा छोटसा किस
सानू " का ?" असे ती पटकन बोलली .. नंतर लाजून " म्हणजे ... नक्की काय म्हणायचंय तुला "
सुशांत " सॉरी ना .. बघ ना अजून एक रुपया कमवत नाही .. हनिमून करायचा अधिकार नाही असे वाटतं मला "
सानू ला त्याला काय बोलावं तेच कळेना ..
सुशांत " हॅलो माय डार्लिंग वाईफ .. डू यु ह्याव एनी ऑब्जेक्शन ऑन धिस ?"
सानू " मग मला इकडे का आणलेस? .. मी तिकडे सोफ्यावर झोपले होते ना ?"
सुशांत " पण मला तू अशी जवळ हवीय ना .. म्हणून ... "
सानू " म्हणजे आता ऑफिस टाकून झाल्यावरच का ?"
सुशांत " अगदी तसेच नाही .. म्हणजे मी लंडन ला गेलो ना कि एक पार्ट टाइम जॉब करेल .. मग बघू .. मी लंडन वरून आल्यावर "
सानू " खरंतर तुझा अभिमान वाटतोय मला .. ठीक आहे .. मी आहे तुझ्या बरोबर .. " "
तिला घट्ट जवळ घेऊन शांतपणे दोघे झोपले. दोघेही ऑफिशिअली घरातल्यांच्या परमिशन ने एक झाले होते तेवढच सध्या त्यांना बास होते
ती पण एकदम रिलॅक्स .. आता कसलीच चिंता , भीती मनात नव्हती .. दोघांनाही .. जे पाहिजे ते मिळाले होते ..त्यामुळे दोघे एकदम शांत होते .. मन शांत झाले होते .. दोघेही दमल्यामुळे मस्त झोपून गेले ..
सानूने जी चिट्ठी सुशांत ला दिली होती ती वाचायची राहिली होती .. आणि सानू गाढ झोपल्यावर सुशांत ला जाग आली आणि आठवण आली त्या चिठ्ठीची ..
हळूच त्याच्या वॉलेट मधून ती चिठ्ठी काढून वाचू लागला
प्रिय नवरोबा ,
तुला चिडवायचं म्हणून नव्हते मी रडत .. खरंच .. मला तुझी खूप आठवण येत होती .. मध्यरात्री २ ते ४ आपण फोनवर बोलत होतो ..तेही तू शुद्धीत नसताना .. तू बेशुद्धीत असताना सुद्धा तुझ्या तोंडी माझे नाव यावे आणि प्रत्येक दोन मिनिटा नंतर तू सानू आय लव्ह यु असे म्हणत होतास .. हे मी कमीतकमी हजारदा ऐकले असेल .. एवढं प्रेम करणाऱ्या नवऱ्या ला मी किती मिस करत असेल तू विचार कर .. तुला खोटे खोटे रागवायचं होतं मला कारण तुला ड्रिंक्स चा खूप त्रास होत होता .. शरीर थकले असताना देखील तू झोपत नव्हतास .. आणि मी जवळही नव्हते .. मोबाईल स्क्रीन वरून मिळणाऱ्या हजारो किस मी मिस केले .. असे वाटले काश कि मी आता तुझ्या बरोबर असते .. तुला उठवायला म्हणून कॉल केला .. आणि तू बोललास पहिलेच वाक्य " बोल सानू .. " आणि माझ्या तोंडातून शब्दच बाहेर पडेना ..इतके भरून आले होते .. १०० वेळा काय लाख वेळा सुद्धा तुझ्या नावाचा जप करायला आवडेल मला .. तरीही ते तू माझ्यावर करत असलेल्या प्रेमा पेक्षा कमीच असेल ..
तरीपण तुझ्या इच्छे साठी लिहायचा प्रयत्न करतेय .. आज संध्याकाळी मेहंदी काढायची आहे .. त्या आधी जेवढ्या वेळा लिहून होईल तेवढे लिहेन ..
( तिने I LOVE YOU ) असे मोठे लिहले होते आणि त्यात बारीक अक्षराने लव्ह यु असे छान सुबक अक्षरात लिहले होते ) १००० वेळा पेक्षा जास्त तर नक्कीच असेल )
चिठ्ठी वाचून आणि त्यात तिने केलेली कोरीव काम खूपच छान दिसत होते .. सुशांत एकदम खुश झाला .. तिला पुन्हा कुशीत घेऊन झोपला ..किती लाड करू आपल्या बायकोचे असे झाले होते त्याला ..
दुसऱ्या दिवशी सुशांत सकाळीच उठून कुणीकडे तरी बाहेर गेला होता .. सुधा प्रतिभा कडे गेली होती आणि विलास ऑफिस ला .. दुपारी सुशान्त डायरेक्ट जेवायला घरात आला .. दोघे मस्त एकत्र जेवले .. किचन आवरून सानू बेडरूम मध्ये गेली तर त्यांच्या बेडरूम च्या वॉल वर सानू ने केलेली कालची कलाकृती त्याने फोटो फ्रेम मध्ये टाकून आणली होती आणि लावली होती.. सानूने १००० वेळा लिहलेल्या कलाकृती ला अजरामर करून टाकले त्याने .
--------------------
हळू हळू पै पाहुणे आशिष च्या घरी गेले .. सुधा लगेचच तिकडे बिझी झाली .. आशिष च्या लग्नाची जय्यत तयारी सुरु झाली होती .. सुधा सकाळी जायची ते डायरेक्ट रात्रीच यायची .. कधी कधी तर तिकडेच राहायची .. ठरल्या प्रमाणे .. हळद खेळले .. सावनी अवनी ची करवली झाली .. मागे पुढे करायला होती .. सुशांत दादाची तयारी करायला होताच ..
आशिष अवनी चे लग्न आधी पासून प्लॅन करून केलेले असल्यामुळे प्रत्येक विधी आवडीने आणि सवडीने पार पडत होता .. सगळे पाहुणे मंडळी जे जे काय सांगतिल ते सगळे प्रतिभा आणि प्रभाकर करत होते .. त्यांच्या घराला पण मस्त डेकोरेट केले होते .. आशिष च्या रूम चे रूप पालटले होते .. मोठा बेड .. ड्रेसिंग टेबल बसले .. गॅलरीत अवनी ला पाहिजे म्हणून एक झोपाळा लावला होता आशिष ने .. त्यात दोघेच मस्त बसून झोके घेऊ शकतील .. अवनी ने तिच्या आवडीचे सामान एक एक करून आल्रेडी इकडे शिफ्ट केले होते .. त्यात एक मोठा पिंकी टेडी होता .. एक दोनदा रात्री आशिष त्याला बघूनच घाबरला होता आणि डोक्यावर हात मारून हसत होता ..
लग्ना नंतर अवनी मॅडम माझी काय अवस्था करेल याचा विचार करून मनात गुदगुदल्या होयच्या त्याला .. अवनी सध्या खूप बिझी .. सारखी केळवण करत होती .. बॅग्स भर भरून सामान आशिष कडे आधीच पाठवले जायचे ..
आशिष " अरे ए .. आता किती सामान पाठवतेस ? आपल्या दोघांना झोपायला तरी जागा राहू दे ना रूम मध्ये .. "
अवनी " ते तुझे स्पोर्ट्स चे सामान बाहेर काढ .. बॅट .. स्टंप .. तिकडे किती जागा अडकून राहिलीय "
आशिष " नाही यार अवनी .. ह्या टेडी हाकलव .. दोनदा घाबरलो मी रात्री .. "
अवनी " आशु .. असू दे ना त्याला .. किती क्युट आहे तो "
पिघळला रे पिघळला आशु .. असे करून त्याच्या रूम ला पॅक करून टाकले तिने ..
तेवढयात प्रतिभा दोन मोठ्या बॅग्स घेऊन आली
प्रतिभा " आशु .. ह्या बॅग्स ला कपाटात ठेवून टाक?"
आशिष " काय आहे त्यात ?"
प्रतिभा " अरे हे अवनी ला घालायला ड्रेस आणलेत .. "
आशिष " आई .. अग किती शॉपिंग करतेय .. ते बदगुल जाड झाले तर होणार नाहीत तिला ..सध्या जोरात केळवण चालू आहेत तिची .. "
प्रतिभा " असू दे रे .. मीच तिला सांगितलं .. लग्नच्या सीजन ला डाएट नको पाळू "
आशिष " आता त्या गेस्ट रूम मध्ये मीच शिफ्ट होतो.. एवढं सामान टाकलंय तुम्ही "
प्रतिभा " आशु .. काय चाललंय ना तुझे ? किती बडबड करतोस .. हो बाजूला "आणि कपाटाचे दार उघडून तिने स्वतःच बॅग्स आता टाकल्या आणि निघून गेली बाहेर
आशिष बघतच बसला
सावनी दोन दिवस आधी अवनी कडे राहायला गेली होती .. सुशांत पण आशिष च्या घरी आला होता .. घरात जोरदार तयारी चालू होती .. आज रात्री आशिष ची हळद होती .. जोरदार डि जे च बसवला होता आणि बायका मुले पुरुष मंडळी नाचत होते .. सुशांत आणि आशिष दोघे शेजारी शेजारी बसून आपल्या बायकोला मिस करत डान्स बघत बसले होते.
आशिष " सुशांत .. खरंच तुला माझ्या बरोबरच यायचंय का हनिमून ला .. नाही म्हणजे आता लग्न होऊन १५ दिवस होयला आले तरी अजून कुणीकडे गेला नाहीस ?"
सुशांत " हो .. मी ठरवलंय ? तुझ्या मागे मागेच येणार आहे ?"
आशिष " ठीक आहे .. मग दे पासपोर्ट दोघांचे मी उद्या बुकिंग करतोय ?"
तसा सुशांत " नाही रे ,, जस्ट किडींग .. आणि तू म्हणतोस ते खरं आहे .. ह्या दोघी गप्पा मारत बसतील आणि आपल्याला बघत बसावे लागेल .. तू जा .. मी आता नाही जाणार आहे .. माझा वेगळा प्लॅन आहे "
बोल बोलता आशिष च्या लग्नाचा दिवस उजाडला ..सावनी आणि सुशान्त लग्नात चांगलेच मिरवत होते ..
दोन दिवसांनी सानू त्याला दिसत तर होती पण त्याच्या वाट्याला येत नव्हती .. कारण ती अवनी च्या लग्नच्या गडबडीत होती .. खूप साऱ्या जवाबदाऱ्या तिने स्वतःवर घेतलया होत्या..
काल लग्न .. आज सकाळी पूजा आणि आता संध्याकाळी मोठे रिसेप्शन असे ग्रँड वेडिंग झाले होते .. आता रिसेप्शन अल्मोस्ट झाले होते .. बाहेरची लोक येऊन गेले होते .. आता नातेवाईकच बसले होते .. सानू अवनी च्या जवळ बसली होती आणि सुशांत तिला लांबूनच बघत होता ..
अचानक त्याने गाणे लावले आणि त्याचा डान्स सुरु झाला

दो नैन सतारे
है चाँद सा मुखड़ा
क्या कहना उसका.. अफरीन
दावत में जैसे हो साही टुकड़ा
उसके जैसी ना कोई नाज़नीन
शाही जोड़ा पहन के
आई जो बन ठन के
वही तो मेरी स्वीटहार्ट है
शरमाई सी बगल में
जो बैठी है दुल्हन के
वही तो मेरी स्वीटहार्ट है
शाही जोड़ा पहन के
आई जो बन ठन के
वही तो मेरी स्वीटहार्ट है
शरमाई सी बगल में
जो बैठी है दुल्हन के
वही तो मेरी स्वीटहार्ट है

लगता है शादी घर में
उसके आने से जैसे
चलके आई है खुशकिस्मती
सारी महफ़िल की वो जान बनी है
क्या कहना उसका.. अफरीन
मुफ़लिस के दिल का अरमान बनी है
उसके जैसी ना कोई नाज़नीन
शाही जोड़ा पहन के आई
जो बन ठन के
वही तो मेरी स्वीटहार्ट है
शरमाई सी बगल में
जो बैठी है दुल्हन के
वही तो मेरी स्वीटहार्ट है

🎭 Series Post

View all