लग्न गाठ - दि एडव्हान्स बुकिंग भाग 71

Story Of Two Friends


लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग
भाग ७१
सानू बाई माहेरी गेल्या .. गावातल्या सगळ्या लोकांना आमंत्रण गेले लग्नच्या पूजेचे .. इकडे विलास रावांनी आणि सुधा ने सगळ्यांना फोन करून पूजेचे आणि रिसेप्शन ने आमंत्रण दिले .. सुशांत चे काका काकू, आत्या मामा ,त्यांची मुले .. सगळे यायला तयार झाले . सुशांत च्या घराला पण लायटिंग केली ... सुशांत ने त्याच्या मित्र मैत्रणीना आमंत्रण दिले .. अवनी च्या घरी जाऊन आमंत्रण दिले .. आशिष .. प्रतिभा , आणि प्रभाकर तर आज रात्रीच तयारीला येणार होते .. पाहुण्याची रेलचेल सुरु झाली होती .. सुशांत ला आता आपण नवरदेव झालोय याचे फिलिंग आले होते .. मामे भावंड .. आत्ये भावंडं .. सानू वरून चिडवत .. तयारी चालू झाली होती .. मान पान. देण्या घेण्याचा वस्तू खरेदी .. खूप सारी काम चालू होती ..
सुधा आणि विलास दोघे कामामध्ये एकदम बिझी झाले.. नवर देवाचे आई बाबा म्हणून त्यांची वेगळीच गडबड दिसत होती .. प्रत्येक गोष्ट नीट आणि व्यवस्थित कशी पार पडेल याकडे लक्ष देत होते .. सुशांत च्या रूम मध्ये मोठा बेड आला .. ड्रेसिंग टेबल .. ऍडिशनल वॊर्डरॉब आले .. सानू च्या स्वागताची जय्यत तयारी झाली .. सानू ला मोठे सोन्याचे मंगळसूत्र घेण्यात आले .. लग्न नसून सुद्धा लगीन सराई मात्र सुरु होती ..
तिकडे आशिष आणि अवनीचे शॉपिंग पण झाले होते .. सगळ्या ऑर्डर्स देऊन झाल्या होत्या .. आणि आता दोघेही आपल्या लग्नाची वाट बघत होते मनापासून .. आनंदाने ..
आज आशिष ची बॅचलर पार्टी होती .. आशिष च्या मित्रांनी त्याला गळ घालून पार्टी द्यायलाच सांगितली होती .. आशिष च्या च मित्राच्या हॉटेल मध्ये पार्टी होती ..
आशिष ने सुशांत ला कॉल केला
आशिष " सुशांत येतोय का माझी मित्रांबरोबर पार्टी आहे ?"
सुशांत " दादा .. wow !! बॅचलर्स पार्टी .. सही .. "
आशिष " मेल्या हळू बोल ना .. मी पण ना कशाला तुला सांगतोय काय माहित ?"
सुशांत " मला सोड रे .. अवनी ला सांगितलंस का ?"
आशिष " ए .. काय आता सगळ्या गोष्टी तिला विचारून करू का ?"
सुशांत " विचारू नकोस .. पण सांग तरी "
आशिष " मी बघतो माझे काय करायचं ते .. तू सानू ला विचारून येणार असलास तर ये " आणि रागाने फोन कट केला त्याने
सुशांत " मी पण येतो .. पण सानू ला सांगू नको .. " समोरून सुशांत ने कॉल केला
आशिष " आता का ? आता का ? आला मोठा सज्जन "
सुशांत " पण घरी काय सांगू ?"
आशिष " ते तुझे तू बघ रे ... मला कशाला विचारतोस ? आता काय लहान आहेस का तू ?.. मी ना उगाच तुला सांगितले "
सुशांत " ए दादया चिडक्या .. उगाच नाही तुला अवनी ठाकूर म्हणते .. जरा तुझ्या मना च्या विरुद्ध कोण गेले कि लगेच चीड चीड करतोस .. वेळेत सवय बदल ... समोर अवनी आहे ... सावनी सारखी गरीब गाय नाहीये ती .. "
आशिष " तू मला घाबरवतोस काय ? मी बरोबर तिला हॅन्डल करतो .. "
सुशांत " काय काय करणार आहोत आपण ?"
आशिष " ओह गॉड सुशांत ... तू ना नकोच येउस .. इट्स बॅचलर पार्टी .. बाकी मला काही माहित नाहीये .."
सुशांत " अरे हो ना .. मी कधी गेलो नाही ना अशा पार्टीज म्हणून विचारतोय "
आशिष " म्हणूनच बोलावतोय तुला ..
Traditionally a group of close male friends throw the bachelor party in the groom\"s honor. ... Typical bachelor parties involve at least one (or a few) nice meals at restaurants, drinking and bar hopping, and some daytime activities like playing or watching live sports, hiking or fishing, or hanging by the beach or pool.
सुशांत " ओके .. मग मी येतो ... मला वाटलं .... "
आशिष " काय वाटलं ते नको सांगुस .. मला माहितेय तुला काय वाटले असेल ते .. आणि एक गावभर डंका करू नकोस .. उगाच तू जसा अंदाज काढलास ना तसाच बाकीचे लोक अंदाज काढत बसतात .. आमचा ग्रुप एकदम सही आहे .. सगळ्यांनी दिलेल्या बॅचलर्स पार्टी .. त्यामुळे आता मला देणे भाग आहे "
सुशांत " माझी काय मदत लागली तर सांग .. तयारी करायला "
आशिष " बोंबा बोंब न करता ये म्हणजे झाले "
सुशांत खूप एक्ससाईट झाला होता .. फर्स्ट टाइम अशा ठिकाणी तो जाणार होता .. आशिष ने नक्की त्याला बोलावून बरोबर केलंय का चूक हा प्रश्न आशिष ला पडला होता .. कारण त्याने लग्न केले असले तरी त्याचा लहान भाऊ होता ..आणि तो हि ६ वर्षांनी लहान .. त्याला पण अशी मज्जा करायला मिळावी हाच हेतू होता बिचार्याचा
सुशांत " आई .. ते आज मी रात्री उशिरा घरी येईन .. मित्र मित्र भेटणार आहोत "
सुधा " कोण कोण आहे रे ?"
सुशांत ने पुढच्या पुढे त्याच्या मित्रांची नावे सांगून टाकली .. सुशांत म्हणजे गुडबॉय चा कळस होता .. असा रात्री अपरात्री बाहेर कधी गेलाच नाही तो .. सुधालाच नवीन होते .. नाही म्हणता तिने विलास च्या कानावर घातलेच .. कि सुशांत रात्री म्हणे उशिरा येणार आहे .. मित्रां बरोबर जाणार म्हणतोय
विलास ने सुशांत ला बोलावले स्टडी मध्ये
विलास " कुठे पार्टी आहे ?
सुशांत " नाही .. पार्टी नाहीये .. आम्ही जस्ट कट्ट्यावर बसणार आहे "
विलास " ठीक आहे .. हे घे कार्ड घेऊन ठेव .. बिल पे करायला लागते ग्रूम ला "
सुशांत " नाही बाबा .. नाहीये पार्टी "
विलास " सुशांत ... मी तुझा बाप आहे हे विसरू नकोस .. कळलं ना .. "
सुशांत " आई ला नका सांगू .. " आणि पळाला तिथून
रात्री मस्त जीन्स टी शर्ट एक जीन्स चे जॅकेट स्पोर्टस शूज घालून त्याच्या बाईक वर बसून साहेब पार्टी च्या इथे पोहचले .. आशिष मस्त ब्लेझर घालून एकदम होस्ट ऑफ द पार्टी तयार होऊन आला ..
मग दोघे पार्टी हॉल ला गेले ..आशिष च्या सर्व फ्रेंड्स नि टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले .. सगळे त्याला " काँग्रट्स .. काँग्रट्स .. म्हणत होते ..
सर्व मित्रांनी मिळून टाळ्या वाजवून एक सुरात
" काँग्रॅच्युलेशन्स .. अँड सेलिब्रेशन्स .. असे ओरडत होते ...
मग आशिष नेच सांगितले " हा सुशांत .. त्याचे पण लग्न झालंय पण अजून तो मॅरीड बॅचलर आहे .. तसे सगळे जोर जोरात हसू लागले .. पण सर्वांनी सुशांत साठी पण टाळ्या वाजवल्या .. सर्वांनी त्याला पण काँग्रट्स केले ..
मग शॅम्पेन ची बॉटल आशिष ने एक आणि सुशांत ने एक दोघांनी ओपन केली .. अँड देन पार्टी स्टार्ट ..
मग आशिष ला खान्द्यावर उचलून त्या हॉल मध्ये सर्वांनी फिरवली .. मग सुशांतच्या नंबर ..मज्जा .. बॉईज मज्जा चालली होती .. खाणे पिणे .. म्युसिक , डान्स .. कल्ला चालला होता .. वाटले तसे डान्स करत होते .. आरडा ओरड .. हसी मजाक .. आठवणी .. एकदम लै भारी पार्टी चालली होती . मग नाचून खेळून दमले तसे सगळे गाणी म्हणायला बसले .. त्यांचा स्वतःचा बॅंड असल्या सारखा .. गाणे म्हणायाला बसले ..
(https://www.facebook.com/100064046344626/posts/194257202719157/)
मी एक लिंक दिलीय कशी बघायची ते तुम्ही बघा .. लिहून टाईप करून बघता आली तर बघा .. पण हीच लिंक बघा .. त्यांनी कसा कल्ला केला हे आहे त्यात
सुशांत खूप मज्जा करत होता .. गाणी म्हणायला त्याला खूपच आवडायचे आणि अशी संगत भेटल्यावर तर काय बघायलाच नको .. आशिष पण घसा फाडून गाणी म्हणत होता .. दादाला अशी मज्जा करताना बघून सॉलिड हसायला येत होते त्याला .. दोन वाजता पार्टी संपली .. आशिष फुल टूल झाला होता .. सुशांत तेही जबरदस्तीने त्याला पोरांनी घ्यायला लावली म्हणून घेतली होती पण तीच त्याला भारी पडत होती फर्स्ट टाईम असल्यामुळे ..
आशिष ने बिल पे केले .. सर्वजण आपापल्या घरी निघाले .. हे दोघे पण बाहेर आले
आशिष " तू आता माझ्या घरी चल .. बाईक वर कसा जाशील घरी .. "
सुशांत " नको जातो घरी .. मावशी ने मला असे बघितले तर ओरडेल मला "
आशिष " मी पण आलो असतो तुला सोडायला घरी पण मला मावशीने असे बघितले तर ती मला ओरडेल "
सुशांत " दादा .. जाम सही मज्जा आली रे .. सही पार्टी होती एकदम .. आपण पुन्हा करूया "
आशिष " ए गप ए.. हि अशी पार्टी एकदाच करायची असते "
सुशांत चे डोके मरणाचे जड झाले होते .. तेव्हड्यात त्याचा मोबाइल वाजला
सुशांत " हॅलो कोण ?"
समोरून " मोबाईल स्क्रीन वर दिसत नाही का कोण आहे ते ?"
सुशांत " नाही बघितले नाही ? कोण बाबा का ?"
विलास " नशीब आवाज ओळखता येतोय अजून "
सुशांत फोन वर हात ठेवून आशिष ला सांगू लागला " बाबांचा फोन आहे .. काय सांगू ?"
आशिष " तू तुझे बघ रे .. मला काय विचारतो ?माझं नाव नको सांगू ?"
विलास " मागे बघ .. मागे .. गाडीत आहे मी .. येशील गाडी पर्यंत का येऊ आणायला .. "
सुशांत ने मागे बघितले तर विलास कार घेऊन त्याला न्यायला आलेले
सुशांत " आयला .. दादा .. बाबा आलेत मागे आपल्याला न्यायला "
आशिष " मेल्या घरी सांगून आला होतास कि काय ?"
सुशांत " नाहि रे ते बाबांना न सांगताच कळले .. मी कधी असा रात्री बाहेर जात नाही ना .. म्हणून कळून गेले त्यांना "
आशिष " जा मग .. आता .. "
सुशांत " चल .. आता तू पण ..काय शिव्या खायच्या त्या दोघांनी खाऊ "
आशिष " तू ना... नालायक आहेस .. एक नंबर .. माझि पण वाट लावलीस .. आता ... "
सुशांत " तू कसा जाशील मग घरी ? मला तर सगळेच फिरताना दिसतंय .. तू पण एका जागी उभा राहा ना जरा "
आशिष " च्यायला आज जरा जास्तीच झाली .. मला पण तू नीट दिसत नाहीयेस .. "
सकाळी जाग आली तेव्हा .. आशिष गेस्ट रूम मध्ये आणि सुशांत त्याच्या बेडरूम मध्ये झोपला होता.
आशिष डोळे चोळत उठला तेव्हाच त्याला कळले कि आपण सुशांत च्या घरी आहोत आता मावशी काका चांगलेच फ़ैलावर घेतील .. तो उठला आणि फ्रेश होयला बाथरूम मध्ये गेला .. बाथरूम मधून बाहेर आला तर अवनी लिंबू पाणी घेऊन उभी
अवनी " गुड मॉर्निंग "
आशिष (मनातच ) " अवनी दिसतेय इथे काय अजून उतरली नाही वाटतं माझी ?"
अवनी " मग कशी होती बॅचलर्स पार्टी ?"
आशिष " तू इकडे कुणीकडे ? आणि तुला कोणी सांगितले ?"
अवनी " चेक युअर फोन "
आशिष ने मोबाइल बघितला .. कॉल डिटेल्स चेक केले तर आऊट गोइंग कॉल्स मध्ये अवनी चा नंबर होता आणि कॉल पिरियड २ तास होता "
आशिष ला काहीही आठवत नव्हते .. तो तिच्याशी काय काय बोललांय .. काहीच आठवत नव्हते .. कॉल केलाय तिला हे पण माहित नव्हते ते "
अवनी ने लिंबू पाणी दिले .. आणि त्याने गप पणे घेतले
आशिष " चल .. सोडतो तुला घरी .. "
अवनी " नाही मी तुझ्याकडे येणार आहे .. आज आईंनी बोलावलंय .. मेहंदी ची डिझाईन फायनल करायचीय "
आशिष " ठीक आहे .. चल मग .. मी आलोच "
अवनी "नाही मी नाश्ता केलाय .. तू सुशांत ला उठव .. मी डिश भरते .. मावशी काका त्यांच्या कामाला गेलेत "
आशिष " ओके .. तू चिडलीय का ?"
अवनी फिदी फिदी हसायला लागली " नाही .. उलट तू किती माझ्यावर प्रेम करतोस आणि जे तू कधीच अजून पर्यंत बोलला नव्हतास ना ते सगळे मला कळले "
आशिष " च्यायला !! मला काय बोललो हे सुद्धा आठवत नाहीये .. सॉरी "
अवनी ने त्याच्या गळ्यात हात टाकला आणि त्याच्या कपाळावर किस केला .. " आय लव्ह यु .. "
आशिष " काय बोललो मी एवढे .. कि तू चक्क चिडली नाहीस .. मी बॅचलर पार्टी थ्रो केली .. आणि तुला सांगितले पण नाही तरीही "
अवनी " हो ना .. खर तर मी चिडायला पाहिजे पण ना नाही येत आहे चिडायला .. "
आशिष सुशांत च्या रूम मध्ये गेला .. तसाच बेड वर झोपला होता ..
आशिष " सुशांत उठ .. चल .. नाश्ता करून घे "
सुशांत पण डोळे चोळत उठला .. आशिष ने त्याला पण लिंबू पाणी दिले .. आणि त्याला खाली बोलवले त्याने नाष्ट्याला
दोघे अंघोळ करून ब्रेकफास्ट ला खाली आहे
सुशांत " अरे अवनी .. तू इकडे .. काय रे दादा .. तिला बोलावून घेतलीस का ?\"
आशिष " हो .. म्हटलं .. भूक लागलीय नाश्ता पाहिजे तर लगेच आली ती "
तिघांनी नाश्ता केला .. आशिष घरी जायला निघाला
सुशांत " अवनी ... सानू ला सांगू नकोस काय प्लिज .. मी सांगेल तिला नंतर आरामात "
अवनी " ओके .. "हसली " आधी मोबाइल चेक कर .. नाहीतर तूच सांगून दिले असशील "
सुशांत " अच्छा !! म्हणजे असे झालं का ? दादा "
आशिष " चल बाय .. आराम कर आज .. भटकू नको उन्हा तान्हाचा .. उद्या जायचय ना सानू ला आणायला .. "
सुशांत " हो .. अवनी तुझी झाली का तयारी "
अवनी " येस .. ऑल सेट .. आज मेहंदी ची डिझाईन फिक्स करतेय .. कि झाले सगळे .. मग उद्या माझी जाऊ बाईला आणायला जायचंय .. अरे हो .. मावशीने एक निरोप ठेवलाय तुझ्यासाठी .. अंघोळ करून १२ वाजता .. देवळात बोलावलंय तुला ..घरचे सगळे तिकडेच गेलेत .. आम्ही पण १२ वाजता तिकडेच भेटू "
हे दोघे निघून गेले
सुशांत ला अजून झोपावं वाटत होते म्हणून तो पुन्हा झोपून गेला ..

🎭 Series Post

View all