लग्न गाठ - दि एडव्हान्स बुकिंग भाग 70

Story Of Two Friends

लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग
भाग ७०
अवनी " आशु ... किती क्युट आहेत हे दोघे .. डीप इन लव्ह .. खरं सांगू सावनी . तू खरोखर ब्रेव्ह निघालीस .. उद्या आशु पासून एक दिवस पण लांब जायची वेळ आली ना तर मी वेडी ... "
आशिष " शु... स्टॉप ... प्लिज असले काही बोलू नकोस .. प्लिज .. "
आशिष चा हृदयाचा ठोका चुकला होता .. सुशांत आणि सावनीच्या वाट्याला आलेली परीक्षा आपल्या वाट्याला कधी येऊच नये असे वाटून गेले त्याला .. ते शब्द हि ऐकवत नव्हते "
आशिष " तब्बेत कशी आहे आता तुझी ?"
सुशांत " एक दम ठणठणीत .."
अवनी " ते दिसतंच आहे .. काय ग्लो आलाय .. हा .. असा काय काल आणि आज मध्ये फरक पडला ??"
सुशांत " किती मोठा फरक आहे .. काल रात्री सानू कुणीकडे आहे मला माहित नव्हतं .. आणि आज तीचा हात माझ्या हातात आहे .. "
आशिष " तुला फोन केल्यावर आदित्य ने मला कॉल केला होता .. बहुतेक सावनी हडपसर मध्ये आहे म्हणून .. मी अवनी ला घेऊन निघालोच होतो तर दांडेकरांनी काकांना(विलासला) सांगितले कि सुशांत ला सावनी भेटलीय .. हडपसर ला आहे ... "
सुशांत " आयला .. सॉलिड फिल्डिंग लावली होती सगळ्यांनी "
आशिष " मग काय ? तुला काय वाटते ? यावेळी तुला कुठे पळून जाऊन द्यायचे नव्हते आम्हांला " आणि हसू लागला ?"
अवनी " सॉरी सुशांत .. मी पण खूप बोलले ना तुला .. खरं सांगते .. सानू तिच्या आई बाबांकडे नाहीये हे मला माहित होते .. मी तुला सांगायला पाहिजे होते पण सानू ने मला शपथ घातली त्यामुळे .. "
सावनी जरा घाबरली आता तो चिडेल " जाऊ दे ना आता हा विषय नको ना .. आता सगळे सुरळीत होतंय ना "
सुशांत " हो तेही आहेच म्हणा ... केवळ लहान वयात लग्न केले म्हणून एवढ्या परीक्षा द्यायच्या .. तरी सानूचे वर्ष माझ्या मुळे गेलेच फुकट .. आता तिची CA ची परीक्षा राहिलीय ... "
आशिष " होईल रे सगळे ठीक .. तू करशील सगळे नीट .. यु आर माय चॅम्प .. "
आशिष " सुशांत .. तुला एक सांगू .. मला एक वेगळेच टेन्शन होते .. कि माझ्या लग्ना आधी तुला बाळ झाले तर .. माझ्या पोराला तुझ्या पोराला दादा किंवा ताई बोलावे लागले असते .." आणि हसायला लागला .. विषय सिरिअस होतोय असे बघून त्याने शिताफीने विषय हंसी मजाक कडे वळवला
आशिष " मग आता दादाच्या लग्नात छोटा भाऊ बायको घेऊन मिरवणार "
सुशांत " बस काय आता .. बघ असा डान्स करतो तुझ्या लग्नात .. " आय एम अ डिस्को डान्सर "
अवनी " अरे .. सानू ला जमेल असा डान्स कर .. "
सुशांत " अरे अवनी .. मला डान्स येतच नाही .. सगळे हसतील .. मी गाणे म्हणू का ?"
अवनी " नो ... आय वॉन्ट डान्स फ्रॉम माय देवर आणि देवरानी .. धिस इज ऑर्डर फ्रॉम बडी ठकुरायन " आणि हसायला लागली
सावनी " तुमची इच्छा पूर्ण होईल ठकुरायन ... "
गप्पा गोष्टी हसण्याच्या आवाजांनी हॉटेल दणाणून सोडले त्यांनी ..
एवढ्याश्या घरात रात्री सगळे सतरंजी टाकून झोपले .. आत मध्ये लेडीज .. बाहेर जेन्टस .. काय मज्जा करत होते .. सगळे आनंदात होते ..
विलास " उद्या .. शॉपिंग करू पुण्यातच .. "
दिवाकर : पूजा करू गावात "
विलास " रिसेप्शन करू आपल्या गावात हॉटेल ब्लू डायमंड ला "
आशिष " मग सगळे आमच्या कडे या .. माझ्या लग्नाची तयारी "
प्रतिभा " माझ्या सुनेचे पण स्वागत ग्रँड करणार आहे आम्ही .. आशिष तर वाट बघतोय केव्हा पासून "
प्रभाकर " नुसता आशिष नाही .. आम्ही तिघे हि "
मालती " आणि मी वाट बघतेय .. कधी हिचे हात पिवळे होतात त्याची "
सुधा " अवनी ... मग काय रेडी का ? सून बाई बनायची तयारी झाली का?"
अवनी " हो काकु .. केलीय तयारी .. आता जेवण पण येतं मला सगळे बनवता "
प्रतिभा " अग तू फक्त ये ... बाकीचे करू आपण मॅनेज .. जेवणाचे टेन्शन नको घेऊस "
प्रतिभा “ आपल्या दोघींना सुना बाकी चांगल्या मिळाल्या .. "
प्रभाकर " मग आपली पोरं पण तर भारी आहेत ..आमचा आशिष थांबल्या सारखा त्याला बायको चांगली भेटली .. मला तर वाटलं आता कशी सून मिळतेय काय माहित ?"
सुधा " हो मग .. सुशांत आणि आशिष आहेतच नक्षत्र .. मी येणारच आहे ८ दिवस आधी .. ग्रहमग .. सवाशीण सगळे करायचं तुझ्या लग्नात आशु .. हळद खेळायची "
अवनी " सावनी तू माझ्याकडे ये .. माझि करवली "
सुशांत " सावनी मला सोडून कुठेच जाणार नाहीये .. सावनी पाहिजे असेल तर सुशांत ला पण घेऊन जावे लागेल .. आमच्या दोघांचे आताच ठरलेय . कि आता एक क्षण पण लांब नाही राहायचं "
अवनी " ए सुशांत .. गप बस.. बायको नंतर आधी माझि मैत्रीण आहे ती .. ती आठ दिवस माझ्याकडे राहील .. तू जा ना तुझ्या दादा कडे "
आशिष " बरं बघू .. काय करायचे ते नंतर .. "
दिवाकर " उद्या शॉपिंग झाली कि मी सावनी ला घेऊन जाईन .. मध्ये एक दिवस मंडप वगैरे घालायला जाईल .. तुम्ही सगळे पूजेच्या दिवशी सकाळी या .. पूजा झाली कि सावनी ला घेऊन या तुमच्या घरी .. "
सुशांत " अरे काय हे .. सगळे जण तिला माझ्या पासून लांब घेऊन जाताय ?"
दिवाकर " अहो जावई .. फक्त दोन रात्र .. मग तुमच्या कडेच आहे ना ती .. "
सुधा " सुशांत आता तू काहीतरी खोडा घालू नकोस .. आम्ही ठरवलंय सगळे बरोबर .. गावी पूजा .. इकडे रिसेप्शन .. "
विलास " मला तर अजून विश्वासच बसत नाही कि माझ्या सुशांत चे लग्न झाले म्हणून .. "
दिवाकर " नाहीतर काय ? सावनी पण नालायक कार्टी .. पळून जाईल असे स्वप्नात पण वाटले नव्हते "
विलास " हे बघा दिवाकर .. तुम्हांला एकदाच फायनल सांगतो .. माझ्या सुनेला एक शब्द बोलू नका .. "
दिवाकर " हे बघा विलास राव ..... तुम्ही माझ्या जावयाला काही पण बोलताय ते मला चालणार नाही "
प्रभाकर " अरे विलास .. आणि दिवाकर तुम्ही काय लहान मुलानसारखे भांडताय ... "
आशिष आणि सुशांत माकडा सारखे एकमेकांकडे बघत होते.. आतमध्ये सगळ्या बायका खो खो हसत होत्या
दोघांपुढे काय बोलून फायदाच नव्हता
दुसऱ्या दिवशी पूजेचे कपडे .. सानू आणि सुशांत चे रिसेप्शन चे कपडे .. आशिष अवनी च्या लग्नाचा शालू आणि त्याचा ड्रेस .. त्याच्या रिसेप्शन चे ड्रेस .. अशी सगळी शॉपिंग केली .. दिवाकर रावांनी विलास रावांबरोबर वावरायला स्वतःला ब्लेझर शिवला .. बायकोला मस्त साडी घेतली ..
आज सगळे आनंदी होते .. अवनी आणि सावनी दोघी हातात हात घालून शॉपिंग करत होत्या .. हे कसे दिसेल .. हे छान दिसेल का ? असे इशारे करून करून आपापल्या पार्टनर ला विचारत होत्या .. निखळ आनंद ओसंडून वाहत होता.. आशिष आणि सुशांत दोघे त्या दोघींना खुश बघून खुश होत होते .. आपली पोरं खुश आहेत हे बघून सगळी सिनिअर मंडळी खूप खुश होत होते आणि फायनली दुसऱ्याच्या सुखातच आपले सुख आहे हे सर्वांना पटले होते
शॉपिंग झाल्यावर आशिष अवनी मॅक्स ला घेऊन निघून गेले .. विलास आणि सुधा .. दिवाकर आणि नंदा एका गाडीतून गेले .. सानू आणि सुशांत दोघे बाईक वरून सुशांत च्या घरी गेले .. त्या रात्री सगळे सुशांच्या घरी राहिले कारण खूप उशीर झाला होता ..
दुसऱ्या दिवशी सुशांत कार ने सोडायला जात होता पण दिवाकर ऐकत नव्हते .. नको आता आम्ही जाऊ .. तुम्ही आराम करा .. असे म्हणून शेवटी विलास रावांनी ड्रायवर बरोबर गाडी पाठवली आणि सून बाईला कार नेच पाठवायची तयारी केली
सुशांत " सानू .. फक्त दोन रात्र .. मग तू कुठेच जायचं नाहीस .. आधीच सांगून ठेवतो .. "
सावनी " हो .. अजून लंडन मॅटर पेंडिंग आहे .. बाबां काय बोलले नाहीत त्या बद्दल "
सुशांत " हो ना .. मानेवर तलवार अजून आहेच .. "
सावनी " बरं .. जाऊ दे .. आता हे पुढ्यात आहे ते एन्जॉय करू .. आपल्या लग्नाला त्यांनी स्वीकारलंय .. माझ्या आई वडिलांना जसे आहे तसे त्यांनी स्वीकारलय हे खूप केलंय त्यांनी .. आणि आपण त्यांना आधीच बोलून बसलोय ना कि सुशांत जाईल म्हणून .. त्यामुळे बहुतेक आता ते ऐकणार नाहीत .. तर या विषयावर प्लिज वाद नको .. तू दोन दोन महिन्यांनी मला भेटायला ये "
सुशांत " हा एक महिना जीव गेला माझा .. तू नव्हतीस बरोबर तर .. " तिला मिठीत घेऊन तो बोलत होता ..
सावनी " हा पण तेव्हा टेन्शन होते ना .. आता तसे काही टेन्शन नाहीये "
सुशांत आणि सावनी जायची वेळ झाली तरी बेडरुम मध्ये बोलत बसले होते .. शेवटी सुधा ने आवाज दिला
सुधा " सुशांत .. अरे त्यांना जायचंय .. त्यांना पण तयारी करायचीय ना .. .. बाकीचं नंतर बोला "
सुशांत "हो .. हो .. आलोच "
सुशांत " सानू .. आय विल मिस यु "
सानू " मी पण .. लवकर ये मला घ्यायला .. "
सुशांत " हो .. मी आलो असतो आत्ताच .. पण बाबा जाम चिडतील .. "
सानू " नकोच आता येऊस .. आता गावात सावनी चा नवरा म्हणून ये .. "
सुशांत " हमम .. फायनली .. सानू आपल्या लग्नाला एक वर्ष होयला ३ डेज राहिलेत .. एक वर्षात आपण ठरवलेल्या पैकी बऱ्याच गोष्टी अचिव्ह केल्या "
सावनी " हमम .. मग आता आपल्या ऍनिव्हर्सरी च्या दिवशी आपली ऍडव्हान्स बुकिंग लग्न गाठ मध्ये कॅनव्हर्ट होणार "
सुशांत " हमम .. येस .. "
सावनी " चल . निघू का .. आई बाबा वाट बघत असतील खाली .. "
सुशांत " बाय .. आय विल मिस यु .. "आणि तिच्या कपाळावर किस करून त्याने तिला बाहेर पाठवली .

क्रमशः

🎭 Series Post

View all