लग्न गाठ - दि एडव्हान्स बुकिंग भाग 69

Story Of Two Friends
लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग
भाग ६९
तेवढयात कबाब में हड्डी आया कोई .. सुशांत ला तिला सोडायचेच नव्हते .. त्याचा फॉर्म्युला " मरूदे .. जाऊदे .. वाजवून वाजवून जातील .. " असाच त्याचा विचार चालू होता .. पण खूपदा बेल वाजल्यावर नाईलाजाने उठला ..
सानू तर दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवून च होती
सुशांत " थांब आलो ... कोण आलय ते बघतो .. पाकटवून येतो .. "
सानू " म्हणजे ?"
सुशांत " म्हणजे घालवून येतो .. त्याला मानाने हाकलवून येतो परत .. अजून स्वीट डिश सेशन बाकी आहे माझा "
सानू " नको आता जेवून येऊ "
सुशांत " आता .. मला भूक नाहीये .. "
सानू " जा ना .. दार उघड .. किती बेल वाजतेय "
सुशांत चे शर्ट इन चे आऊट झाले होते.. वरची एक दोन बटन निघाली होती .. स्वतःची अशी झालेली दुरा अवस्था बघून आनंदला होता तो ..
सुशांत मनातच ( चला आता मी नवरा झालोच .. फायनली .. सावनी इज रेडी टू बीकम वाईफ )
अत्यानंदाच्या परमोच्च क्षणातून तो आता दार उघडल्यावर पुन्हा धरतीवर आपटणार होता हे त्याला माहित नव्हते ..
दार घडल्यावर आश्यर्यच नको वाटायला कोण आले असेल ????
खुद्द त्याचे आई आणि बाबा
विलास " कुठे आहे सानू .. मला कळले तू तिला घेऊन इथे आलास ते .. "
सुधा " सानू .. ए सानू .. "
सानू अजून बेड वर लोळत होती .. कदाचित राहिलेला सेशन पूर्ण होईल या हेतूने
सुधा चा आवाज ऐकून ताडकन उठून बसली .. आणि पटकन वॉशरूम मध्ये पळाली
सुशांत " आहे ती फ्रेश होतेय .. तुम्ही इकडे कुणीकडे आलात ?"
विलास " आता तू आणखी कुठे गायब होयच्या आधी आलो ..
सुशांत " नाही .. .. आम्ही आताच आलो "
सुधा " जा तू फ्रेश हो .. आपण बाहेर जाऊ जेवायला सगळेच .. मग बघू काय करायचं ते "
तोपर्यंत सानू केस नीट करून फ्रेश होऊन बाहेर आली
सुधा ने लिटरली तिला मिठीत घेतले .. आणि दोघी रडल्या ..
सुधा " सॉरी बाळा .. माझे चुकले तेव्हा .. आई म्हणून मी तुला जाऊ नकोस .. थांब म्हणून बोलायला पाहिजे होते .. चुकलंच माझे "
सावनी " राहू दे ना आता तो विषय आई .. तेव्हाची वेळच तशी होती म्हणायचं आणि सोडून द्यायच "
विलास " कशी आहेस बाळा ? सॉरी माझ्या कडून पण .. आता दोन दिवसात पूजा आणि रिसेप्शन .. मग तुम्ही पाहिजे तसा संसार करा .. "
सावनी ने जाऊन विलास च्या पाय पडली .. विलास ने पण तिला मना पासून आशीर्वाद दिला " सौभाग्यवती भव "
सुशांत " थँक यु बाबा "
विलास " तू गाढवा .. “आणि एक दणका त्याचा पाठीत घातला विलास ने .. पुन्हा जर असा पळालास ना तर बघच आता "
सुशांत " बाबा .. केवढ्या जोरात मारताय .. लागलं ना "
विलास " मग काय मजेत मारत नाहीये मी .. तुझ्या लक्षात राहिले पाहिजे पळून जाताना... म्हणून हा फटका मारलाय "
सुशांत " मागच्या वेळी आई ने कानाखाली मारली आता तुम्ही पाठीत दणके द्या .. ते हि बायको समोर "
विलास " बायको येऊ देत नाही तर उद्या पोरं होऊ देत .. असा वागलास ना तर रट्टे च मिळतील तुला "
सावनी खाली मान घालून हसत होती
सुशांत " तू काय हसते ग .. उद्या तुझ्या बाबांकडे गेलो कि बघू मग तुझी काय हालत होते ते "
तेवढयात पुन्हा बेल वाजली
सुशांत ने दार उघडले तर नाम लिया और शैतान हाजीर .. तसे सावनी चे बाबा आणि आई हजर
सावनी धावतच जाऊन आईला बिलगली .. बाबांना बिलगली.. बाकी कसले झाले नाही तरी रडण्याचे सेशन तेवढं झाले ..
सावनी " बाबा .. किती तब्बेत खराब झालीय तुमची ?"
नंदा " काय बाई .. तू मूर्ख .. अशी अचानक गेलीस कुठे .. कसे आम्ही जिवंत राहणार .. जीवाला घोर लावला होतास नुसता .. आणि एक पाठीत धपाटा बसला
आता सुशांत हसत होता
विलास " अहो हळू .. माझी सून नाजूक आहे "
बघा प्रगती कशी आहे विलास राव चक्क माझी सून
दार उघडेच होते तर मॅक्स चा आवाज .. मॅक्स असा आवाज काढत होता कि असे वाटायचं ( सानू ... ) असा तो जणू सानू सानू ओरडतच डायरेक्ट घरात .. आणि साक्षात सानू ला बघून मॅक्स ने डायरेक्ट तिच्याकडे झेप टाकली .. आणि तिच्या चेहऱ्यावर मॅक्स च्या हजारो किस तिला मिळत होते ..
सानू " अरे हो रे .. मॅक्स .. हळू ना .. मी आहे .. " असे बोलत होती .. तो शेपटी हलवत हलवत शेवटी तिने त्याला खाली बसून घट्ट मिठीत घेतले तेव्हा शांत झाला .. "
सुशांत च्या पण डोळ्यांत पाणी आले सावनी ला मनसोक्त भेटल्यावर मॅक्स सुशांत कडे गेला .. आणि ओरडत होता (सानू .. ) जसे काय त्याला सांगत होता .. सानू भेटली ..
सुशांत " होय .. होय .. रिलॅक्स .. आता आहे ती इकडेच .. नाही जाणार कुणीकडे ?.. बाबा हा खाली कुठे होता? "
तेवढयात दारात आशिष आणि अवनी
आशिष " मी घेऊन आलोय त्याला .. अरे काय हा .. सानू .. सानू .. हाक मारतोय लिटरली "
सुशांत " अरे हो ना .. बघितलेस ना .. सानू ने त्याला पण दिवाना बनवलंय "
अवनी आणि सावनी लिटरली दोघी एकमेकींना ओरडून .. रडून .. गळाभेट घेत होत्या .. उड्या मारत होत्या ...काय तो आनंद .. सावनी च्या येण्याने सगळे मेंबर खुश झाले होते
विलास " चला बरे झाले .. सगळे आले ते .. आता आपण बाहेर जेवून घेऊ .. मग बोलू "
तेवढयात प्रतिभा आणि प्रभाकर मालतीला घेऊन आले.. मग काय मज्जाच मज्जा झाली.
सगळे हॉटेल मध्ये बसून एकत्र जेवले .. गप्पांना पूर आला होता .. मोठी लोक वेगळ्या गप्पा मारत होते .. इकडे हे चौघे चांडाळ चोकडी आपली मजा मस्ती चालू होती ..
चौघांच्याही आनंदाला पूर आला होता .. अवनीच्या चेहऱ्यात लक्षणीय बदल झाला होता आणि तिच्या आंतरिक ख़ुशी मुळे आशिष सुखावला होता आणि आता स्वतःच्या लग्नासाठी सज्ज झाला होता .. सुश तर काय बाबा खुश च खुश होता .. त्याचे एक स्वप्न होते कि लग्नगाठ म्हणजे फक्त नवरा बायको एकत्र न येता दोन कुटुंब एकत्र येऊन हा सोहळा पार पाडतात .. तसे आता दोन्ही कुटुंब एकत्र आली होती आणि आनंदात होती आणि त्याच्या लग्नच्या पूजेवर आणि रिसेप्शन वर मोठं मोठ्याने डिस्कस करत होते .. हा खास क्षण मनात कोरून ठेवावा असा आनंद त्याला देत होता .... सानू ने बाजी मारलीच .. एक महिना सुशांतच्या घरी राहिली पण तिची इतकी सवय झाली होती सुश च्या आई बाबांना आणि मॅक्स ला कि ती गेल्यावर ती ची कमतरता दुसरे कोणी भरून काढू शकत नाही हे कळलेच होते त्यांना ..
विलास " सुश !! "
तसे सगळे हसायला लागले .. आता मुद्दामून सुशांत ला ते सुश हाक मारत होते ..
विलास " मग सुश .. शलाका ला तुझ्या पूजेला आणि रिसेप्शन ला बोलवायची कि नाही ?"
सुधा " अहो .. काय हो .. आता कशाला त्याला त्रास देताय .. आता माझ्या मुलाला मी अजिबात दुःखी नाही बघणार हा आधीच सांगून ठेवते "
विलास " तू थांब ग सुधा .. त्याला बोलू दे ना .. त्याची लहानपणी ची मैत्रीण आहे ती .. काय रे ? हो ना ? विसरलास का ? सानू ला भेटवं तिला "
सुशांत ने सानू कडे बघितले कि ती कधी रिऍक्ट करतेय ते
सुशांत " हा .. बोलवू ना .. त्यात काय ? ती ला पण कळू दे कि मी कोणामुळे तिला रिजेक्ट केलंय ते "
विलास " त्या दिवशी तुला मी म्हटले ना कि आपल्याकडे शलाकाचे आई बाबा येणार आहेत .. त्याच दिवशी मी तुला खरं तर हे सांगायला आलो होतो कि शलाका ने तुला रिजेक्ट केलंय .. कोणीतरी राज अरोरा टीव्ही ऍक्टर आहे त्याच्या बरोबर ती करणार आहे लग्न "
सुशांत " थँक गॉड .. चला म्हणजे माझ्या डोक्यावरचं हे पण ओझं गेलं .. आता ती यात खुश असेल कि तिने मला रिजेक्ट केलंय तरी चालेल मला "
दिवाकर " आणि सावनी .. शेखर पण लग्न करतोय .. आपल्याच गावातल्या मुली बरोबर "
सावनी मान खाली घालून खुद्कन हसली .. सुशांत ने तिचा हात घट्ट हातात घेतला होता .. टेबल च्या खाली ..
मालती " मग आशिष ... आता तुमच्या लग्नाची शॉपिंग करून टाकू उद्याच .. "
आशिष " नक्कीच .. उद्या सगळे लक्ष्मीरोड ची दुकानं पालथी घालू .. "
दिवाकर " पूजेची शॉपिंग आमच्याकडून "
विलास " रिसेप्शन ची शॉपिंग आमच्याकडून "
मोठ्या लोकांच्या पुन्हा गप्पा सुरु झाल्या
अवनी हळू आवाजात " या दोघांमध्ये एवढी मैत्री कशी काय झाली ?"
आशिष " सुशांत आणि सानू च्या प्रेमाने त्या दोघांच्या परिस्थिती मध्ये असलेला फरक गायब केला .. शेवटी काय ? माणसाला माणसाची किंमत कळली पाहिजे "
सावनी " खरं सांगू अवनी .. सगळे माझ्या सुश ला दोष देतील कि त्याने मला सोडले वगैरे .. पण ना तुला सांगते ... एक वर्षांपूर्वीची मी आणि आताची मी यात खूप फरक आहे .. किती घाबरट होते मी .. नवीन माणूस समोर आला कि हात पाय थरथर कापायचे .. पण आज बघ .. मी एक महिना हॉस्टेल ला राहून .. नोकरी मिळवून .. बस ने प्रवास करून .. स्वतःच्या पायावर उभी आहे .. याचे सगळे क्रेडिट माझ्या सुश ला आहे .. आणि त्याने मला एक वर्षांपूर्वीच सांगितले होते कि एक दिवस आपण सगळे एकत्र असू .. हे जेव्हा होईल ना तेव्हा आपल्या प्रेमाचा विजय होईल .. अँड सी ..दयाट डे ह्याज arraived .. "
सुशांत " आणि मी एक सांगू का अवनी .. सावनी माझ्या बरोबर असते ना तेव्हा मी वेगळाच सुशांत असतो .. माझे सगळे निर्णय बरोबर ठरतात .. सगळे छान होते .. ती नसेल ना माझ्या बरोबर तर सगळे चुकीचे वाटायला लागते .. आता पण बघ एक महिना सानू माझ्या बरोबर नव्हती ना तर माझा जणू कॉन्फिडन्स च गेला होता .. ती माझी स्टेन्थ आहे "
आता त्यांचे प्रेम ना परिपक्वतेकडे झुकत चालले होते .. आशिष आणि अवनी च्या प्रेम मध्ये आशिष मॅच्युअर्ड असल्यामुळे त्यांच्यात अवखळपणा होता पण अंडरस्टॅण्डिंग जबरदस्त होती .. तसे हे दोघेही वयाने लहान असल्यामुळे आधी भीती मग नक्की कसे वागावे .. चूक का बरोबर .. घरातले स्वीकारतील कि नाही . या सगळ्यांत फसले होते .. तरी पण त्या दोघांनी बऱ्यापैकी निभावले होते .. अनेक चढ उतार सहन करत शेवटी खुलून एकमेकां बद्दल बोलण्या इतपत स्थिरता आली होती ..
सुशांत ने अजून पण तिचा एक हात टेबल खाली घट्ट पकडून ठेवला होता आणि तिला ते आवडत होते .. आता जगा ची फिकीर नव्हती ..

🎭 Series Post

View all