लग्न गाठ - दि एँडव्हान्स बुकिंग भाग 67

Story Of Two Friends


लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग
भाग ६७

सुशान्त ने ती पाच हॉस्टेल ची लिस्ट घेतली .. आणि एकेक करून सगळ्या हॉस्टेल वर गेला .. तिथल्या सिक्युरिटी ला फोटो दाखवून विचारू लागला कि ह्या मॅडम इथे राहतात का ?? एक दोन ठिकाणी नाही म्हणून सांगितले .. दोन ठिकाणी माहिती देण्यास नकार दिला .. ..
फिरून फिरून वैतागला होता .. शेवटी एका हॉटेल मध्ये बसला .. काहीतरी खायला पाहिजे म्हणून इडली सांभार ऑर्डर केली आणि पटपट खाऊन घेतले.. सकाळ ची दुपार झाली तरी सानू बद्दल काही ठोस माहिती मिळेना .. नक्की कुणीकडे शोधावे .. आधी राहते कुठे ते शोधावे का आधी नोकरी कुठे करतेय ते शोधावे .. काही कळेना .. थकला होता .. सानू ला बघण्यासाठी त्याचे डोळे तरसले होते
त्यातले एक हॉस्टेल हे बाजीराव रोड वर होते आणि श्रीमंत दगडूशेट हलवाई मंदिराच्या जवळ होते .. ना राहून सुशांत ला सारखे वाटे कि सावनी राहिली तर या हॉस्टेल वरच राहील . कारण ते दोघे बऱ्याचदा या मंदिरात यायचे .. आजूबाजूचा परिसर पायी चालले होते .. पण वॉचमन पैसे पुढे करून सुद्धा असे सांगेना कि या मॅडम इथे राहतात कि नाही म्हणून .. सुशांत ने ठरवले कि आता ती काम कुणीकडे करतेय ह्याचा शोध लागणे म्हणजे नामुश्कील आहे . कारण पुण्यात खूप CA आहेत .. पण सेलेक्टड ५ हॉस्टेल त्याच्याकडे होते .. तर त्याने या बाजीराव रोड वरच्या हॉस्टेल च्या समोर बसून रहायचे ठरवले
तेवढ्यात त्याला आदित्य चा कॉल आला
आदित्य "सुशांत .. हडपसर ला अमोघ काळे म्हणून CA आहेत .. त्यांच्याकडे सावनी नावाची मुलगी काम करतेय .. मी वर्णन विचारले तर ती सावनी तुझ्या सानू सारखीच वाटते .. तिची माहिती कोणालाच सांगू नये असे स्ट्रिक्टली HR ला सांगितलंय तिने .. तिचा फोटो पण रेकॉर्ड मध्ये नाहीये .. हे मला त्यांच्या ऑफिस बॉय कडून कळले .. तो आधी माझ्या कडे कामाला होता .. मी ऍड्रेस सेंड करतो .. तू जाऊन बघ पाहिजे तर ""
सुशांत "थँक यु सर .. खूप करताय तुम्ही माझ्या साठी "
आदित्य "मी सावनी साठी करतोय .. कारण ती तुझ्या बरोबर च छान दिसते ..लवकर दोघे एकत्र व्हा .. आणि माझ्याकडे कामाला कधीही जॉईन होऊ शकता इफ यु वॉन्ट .. "
सुशांत "थँक यु सो मच .. जस्ट प्रे फॉर मी सानू मला मिळू दे .. बास .. बाकी काही नकोय मला सध्या "
आदित्य " ठीक आहे .. मी त्या अमोघ ला कॉल केला असता .. पण त्या पेक्षा तू डायरेक्ट गेलास तर बरे पडेल "
सुशांत " हो .. हे काय मी निघालोच आहे "
जणू अंगात वीज संचारावी तसा सुशांत हॉटेल मधून बाहेर आला .. आणि बाइक वर बसून हडपसर च्या दिशेने जाऊ लागला
आखें मेरी हर जगह
ढूंढे तुझे बेवजह
ये मैं हूँ या कोई और है मेरी तरह..
कैसे हुआ.. कैसे हुआ..
तू इतना ज़रूरी कैसे हुआ
कैसे हुआ.. कैसे हुआ..
तू इतना ज़रूरी कैसे हुआ
क्या हाल हो गया है ये मेरा..
सानू ची नुसती खबर लागली आणि ह्यची बेचैनी एकदम वाढतच गेली होती .. आनंद .. दुःख .. विरह .. बेचैनी . थोडासा राग .. सगळे उचंबळून येत होते .. सानू भेटली तर तिला उचलून गाडीवर टाकून घरी नेईल .. काय करू काय नाही असे झाले होते त्याला .. डोळ्यातून पाणी बरसतच होते .. आता या क्षणी जीव घ्या पण माझि सानू मला द्या अशीच मनस्थिती झाली होती त्याची ..
अर्धातास ट्राफिक .. सिग्नल पार करत सुशांत अमोघ काळे यांच्या ऑफिस च्या रिसेप्शन वर पोहचला .. मला सावनी ला भेटायचंय असा मेसेज आत गेला.. तो अमोघ कडे मेसेज गेला .. रिसेप्शनिस्ट ने त्याला कॉन्फरंन्स रूम मध्ये बसवले ..
सुशांत चेअर वर पाय हलवत अधीर पणे सावनी ची वाट बघत बसला होता ... आत मधे अमोघ आला
अमोघ " हाय माय सेल्फ अमोघ काळे .."
सुशांत ने त्याला उठून शेक हॅन्ड केले .. सुशांत सरदेशमुख "
अमोघ " काय काम होते ?"
सुशांत " मला सावनी ला भेटायचंय ? तुम्हांला नाहि .. बहुतेक रिसेप्शन वरच्या मॅडम नि उगाच डिस्टरब केले तुम्हांला .. "
अमोघ " तेच विचारतोय .. तिच्याशी काय काम आहे ?"
सुशांत " सॉरी .. इट्स माय पर्सनल थिंग .. प्लिज कॉल हर "
अमोघ " ती अशी कुणाला भेटत नाही .. अशी तिचीच ईच्छा आहे .. मागेच तिने क्लिअर सांगितलेय कि मी कोणत्याही ऑफिस क्लाएंट ला भेटणार नाही म्हणून "
सुशांत " मी तिचा नवरा आहे .. "
अमोघ " काहीतरी गडबड आहे मिस्टर सुशांत .. माझ्याकडे काम करणारी सावनी अनमॅरिड आहे .. "
सुशांत " प्लिज एकदा बाहेर बोलवता का ? हि माझी सावनी नसेल तर मी लगेच निघून जाईल "सुशांत आऊट ऑफ पेशन्स होत होता
अमोघ " सॉरी .. सावनी ची तशी तयारी नाहीये .. ती नाही जात कोणा समोर "
सुशांत " तिला कॉल लावा आणि सांगा कि सुशांत आलाय .. ती धावत येईल "
अमोघ " मिस्टर सुशांत .. तुम्ही जाऊ शकता .. मला जे तुम्हांला सांगायचंय ते सांगून झालंय .. प्लिज डोन्ट वेस्ट माय टाईम "
सुशांत ने मोबाइल मधून तिचा फोटो दाखवला .. "हि आहे का ती ?"
अमोघ ने फोटो बघितला ..
सुशांत ने मुद्दामून लग्नाचा पण फोटो दाखवला ... अवनी आणि आशिष बरोबर हसत खेळत असताना पण दाखवला .. "हि आहे का ती? .. हि असेल तर प्लिज बाहेर बोलवा .. आय बेग यु मिस्टर अमोघ .. "
अमोघ ने फोटो बघितले आणि त्याला तिथेच बसवून तो त्याच्या केबिन मध्ये गेला आणि त्याच्या केबिन मध्ये सावनी ला बोलावून घेतले .
सुशांत चा श्वास टांगणीला लागला होता .. आता सावनी येणार .. मला दिसणार .. "
सावनी ने डोअर नॉक केले .. मे आय कम इन " म्हणतच आत गेली ..
अमोघ " मी तुमच्या वर केस टाकणार आहे मिस सावनी "
सावनी " का ? सर "
अमोघ "तुमच्या बायो डाटा मध्ये तुम्ही चुकीची माहिती दिलीय आम्हांला "
सावनी " हमम .. "
अमोघ " तुम्ही सांगितले कि तुम्ही अनमॅरीड आहात ?"
सावनी " तुम्हांला कसे कळले ? .. बाहेर तुमचे गेस्ट आलेत .. कॉन्फरन्स रूम मध्ये आहेत .. जा जाऊन भेटा त्यांना "
सावनी कॉन्फरन्स रूम मध्ये आली ..
एकदम सिम्पल ड्रेस .. केसांची साधी वेणी .. ना टिकली .. ना कानात .. ना हातात .. ड्रेस वर जॅकेट ज्यात तिचा गळा दिसत नाहीये .. डोळे खोल गेलेले ..
सुशांत ची काय वेगळी अवस्था नव्हती .. केस दाढी .. वाढलेली .. डोळे खोल गेलेले .. जरा बारीक च झाला होता तो ..
त्याला बघूनच कॉन्फरन्स च्या काचेला टेकून रडायला लागली ती .. आणि तो बसल्या बसल्या चेअर वरच बसून रडत होता ..
अजूनही दोघे सावरले नव्हते .. कोणचं कोणाशी बोलत नव्हते
सावनी " काय हे कसा दिसतोय तू .. रडतच ... काय अवस्था ( हुंदका) ... करून घेटलीय तू ..(पुन्हा हुंदका ) "
सुशांत " तू फार वाईट आहेस .. तू का असे केलंस .. का मला सोडून गेलीस "
सावनी " आपण दोघांनी ठरवून सेपरेट झालोय .. ना .. विसरलास का तू .. बर ते जाऊ दे .. तिने डोळे पुसले .. बाबा कसे आहेत ?"
सुशांत " बरे आहेत .. ठीक झालेत आता .. ऑफिस ला पण जायला लागलेत "
सावनी " काळजी घे त्यांची .. कधी आहे तुझे लग्न "
सुशांत "सानू .. मी मारेल तुला .. काहीपण प्रश्न विचारू नकोस .. मी आता खूप रागात आहे .. तू का असे केलेस .. तुला आई बाबांकडे जायला सांगितले होते ना .. तू इकडे का आलीस ? आणि अशी एकटी ? एवढी ब्रेव्ह झालीस का आता तू ?"
सावनी "होयला लागला मला ब्रेव्ह ... बाबांना किती त्रास देऊ .. "
सुशांत " चल... मी तुला घ्यायला आलोय.. "
सावनी " नाही .. आता नको .. सुशांत .. तू जा .. तुझे आई बाबा सांगतील ते कर .. मी नाही येणार .. मी तुमच्या घराण्याला शोभणारी नाहीये.. मी वीक पडायच्या आत तू जा .. प्लिज जा ...."
सुशांत " सानू यार सगळे प्रॉब्लेम सॉल्व झालेत .. आई बाबांनी आपले प्रेम , आपले लग्न स्विकारलंय .. तुला आत ते सुन मानतात .. तुला आणायला आम्ही तुमच्या घरी गेलेलो तेव्हा कळले कि तू नाहीयेस तिकडे .. चल निघूया .. चल "
सावनी " नक्की का ? का तू मला पळवून नेणार आहेस कुणीकडे मागच्या वेळे सारखे ..मला आता पळून नाही यायचंय कुठेच .. त्यामुळे सगळेच दुखी होतात .. "
सुशांत " नाही खरंच चल .. अवनी पण खूप नाराज आहे .. तिच्या लग्नात आपल्याला जोडीने डान्स करायचाय "
सावनी धावतच सुशांत जवळ आली आणि त्याच्या मिठीत गेली .

https://www.youtube.com/watch?v=Pd2Umm_ehBs&ab_channel=AMRshorts.net

ओ करम खुदाया है
तुझे मुझसे मिलाया है
तुझपे मरके ही तो
मुझे जीना आया है
ओ तेरे संग यारा ख़ुश रंग बहारा
तू रात दीवानी मैं ज़र्द सितारा
ओ तेरे संग यारा ख़ुश रंग बहारा
मैं तेरा हो जाऊं जो तू करदे ईशारा

कहीं किसी भी गली में जाऊं मैं
तेरी खुशबू से टकराऊं मैं
हर रात जो आता है
मुझे वो ख्वाब तू..
तेरा मेरा मिलना दस्तूर है
तेरे होने से मुझमे नूर है
मैं हूँ सूना सा एक आसमान महताब तू..
ओ करम खुदाया है
तुझे मैंने जो पाया है
तुझपे मरके ही तो
मुझे जीना आया है
ओ तेरे संग यारा ख़ुश रंग बहारा
तू रात दीवानी मैं ज़र्द सितारा
ओ तेरे संग यारा
ख़ुश रंग बहारा
तेरे बिन अब तो ना जीना गवारा

मैंने छोड़े हैं बाकि सारे रास्ते
बस आया हूँ तेरे पास रे
मेरी आँखों में तेरा नाम है पहचान ले..
सब कुछ मेरे लिए तेरे बाद है
सौ बातों की इक बात है
मैं न जाऊंगा कभी तुझे छोड़ के ये जान ले
ओ करम खुदाया है
तेरा प्यार जो पाया है
तुझपे मरके ही तो
मुझे जीना आया है
ओ तेरे संग यारा ख़ुश रंग बहारा
तू रात दीवानी मैं ज़र्द सितारा
ओ तेरे संग यारा ख़ुश रंग बहारा
मैं बहता मुसाफ़िर तू ठहरा किनारा
(आपल्या वाचक धनश्री साळुंखे शिरसाठ यांनी हे गाणे सजेस्ट केले जे कि आपल्या सुशांत च्या सिचवेशनला परफेक्ट मॅच झाले .. प्लिज एकदा हे गाणे ऐका . लिंक शेअर केलीय शिवाय वर्ड पण लिहलेय जे कि एक्सट्रा आहेत .. )
सावनी ( रडतच ) सुश !! मला वाटले आता तू मला कधीच भेटणार नाहीस .. मी खूप मिस करत होते तुला .. (हुंदका) .. मी थकले रे आता .. हे सगळे फार कठीण आहे तुझ्या शिवाय लाईफ नको वाटते रे .. का असे झाले आपल्या बरोबर .. "
सुशांत च्या पण डोळ्यांतून पाणी येत होते " मी तर फक्त श्वास घेत होतो म्हणून जगलोय .. सानू .. पुन्हा जर असा पण सेपरेट होण्याचा निर्णय घेतला ना तर माझ्या कानाखाली जोरात वाजव... माझ्या पासून लांब जाऊ नकोस ..नकोय मला काही .. मला फक्त तू हवीय .. घट्ट मिठीत घेत तो बोलत होता ..
सावनी " तुला आधीच सांगते .. लंडन ला जा नाहीतर अमेरिकेला जा .. मला सोडून अजिबात जायचं नाही .. मी आता अजिबात नाही राहणार लांब ... आणि हे काय ? केस दाढी का वाढवलीस ?"
सुशांत "शेवटी मला देवदास बनवूनच सोडले तुम्ही लोकांनी .. "
सावनी "आणि मी पारो .. मला वाटले आता तुला चंद्रमुखी भेटली "
सुशान्त "आग लोगो त्या देवदास ला .. चल जाऊ .. आज सर्वेश च्या फ्लॅट वर राहू .. आणि मग उद्या घरी जाऊ .. मग पूजा आणि रिसेप्शन आणि मग आपल्याला कोणीच सेपरेट नाही करणार “
सावनी "चल .. मी बॅग घेऊन येते .. "
सुशांत "रिझाईन करून ये .. पुन्हा नाही इकडे येणार आहोत आपण कधीच "
सावनी ने सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या .. होई पर्यंत संध्याकाळ झाली ..
जाता जाता अमोघ काळे बाहेर सुशांत ला आणि सावनी ला भेटायला आला
अमोघ " मिस्टर सुशांत धिस इज टोटली अनप्रोफेशनल बिहेविअर .. शिवाय तुमच्या वाइफ ने आम्हांला चुकीची माहिती दिली त्या बद्दल मी त्यांच्यावर केस पण टाकू शकतो ?"
सुशांत ला आता सानू भेटली होती तर त्याला आता या अमोघ ला काय बोलावे तेच कळेना .. त्याने वॉलेट मधून बाबांचे (विलास ) चे विझिटिंग कार्ड काढून त्याच्या हातात दिले .. " हे माझे वकील आहेत .. तरीही तुम्ही केस टाकणार आहेत का ?"
अमोघ ने विलास चे कार्ड बघितल्यावर हडबडला
सुशांत " मिस्टर अमोघ .. सध्यातरी मी खुश आहे .. माझिया बायको मला सही सलामत भेटलीय .. आज तर माझा चिडायचा मूड अजिबातच नाहीये ... उलट मी तुमचे आभार मानतो कि तुम्ही माझ्या बायकोला नोकरी दिलीत .. तिच्या सर्व टर्म्स आणि कंडिशन तुम्ही मान्य केल्यात ... थँक यु सो मच "
अमोघ " ओह .. आय सी .. यु सेड युअर नेम as सुशांत सरदेशमुख .. " आणि हसायला लागला
सुशांत " येस .. हे माझे वडील आहेत .. तर केस च्या भानगडीत नाही पडलात तर तुमच्यासाठी बरे पडेल .. दोन दिवसांनी आमचे मॅरेज रिसेप्शन आहे .. इन्व्हिटेशन आताच देऊन ठेवतो " बी माय गेस्ट "
अमोघ " ओह.. ग्रेट .. काँग्रट्स "
सुशांत सावनी ला घेऊन सर्वेश च्या फ्लॅट वर आला ..
अजूनही दोघे मेंटल ट्रॉमा मधेच होते ..
सुशांत " थोडा वेळ आराम कर .. मग रात्री जेवायला बाहेरच जाऊ "
सावनी " घरी फोन केलास का ?"
सुशांत " नाही आता तू फ्रेश हो .. मग करू .. जरा टिकली वगैरे लाव "
सावनी आता मध्ये गेली तर बेड वर सगळे तिचे कपडे पसरलेले ...

🎭 Series Post

View all