लग्न गाठ - दि एँडव्हान्स बुकिंग भाग 65

Story Of Two Friends


लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग
भाग ६५
सुशांत " हो .. माझि काळजी नको करुस .. तू आई बाबांकडे लक्ष दे .. तू नको येउस .. मला काही मदत लागली तर मी फोन करेन .. तुझे हि लग्न जवळ आलंय .. आणि अवनी दुःखी आहे .. सॉरी दादा .. सॉरी "
आशिष " हो ना ती खूप अपसेट आहे .. कशातच तिला इंटरेस्ट नाहीये .. सानू पाहिजे तिला पण .. "
सुशांत " बोलली मला ती ... मला म्हणाली .. दोन दिवसात मला सानू माझ्या डोळ्यांसमोर पाहिजे .. "
आशिष ( मनातच ) " या अवनी ला पण ना .. कशाला ह्याला ह्या विषयावर छेडले तिने .. "
सुशांत " बरं . चल .. ठेवतो मी "
आशिष " मेसेज करत रहा "
------------------------------
विलास " नमस्कार दांडेकर !( सुशांत चा बॉस म्हणजे आदित्य चे बाबा )
दांडेकर " नमस्कार .. सरदेशमुख ..आज कशी आठवण काढलीत "
विलास \" हो जरा कामच आहे तसे .. म्हणून अर्जेंट मध्ये कॉल केला "
दांडेकर " हा बोला .. काय सेवा करू आपली "
विलास " आमच्या सून बाई बद्दल माहिती पाहिजे होती .. "
दांडेकर " सावनी सुशांत ...एवढंच नाव सांगायची ती .. "
विलास " हमम .. "
दांडेकर " खूप गोड सुनबाई आहे तुमची .. मी अगदी तशीच माझ्या मुलाला मुलगी शोधतोय .. "
विलास " ती आली होती का तुमच्या कडे ?"
दांडेकर " खरं तर .. तिने मला सांगितले होते कि मी आले होते हे कोणाला सांगू नका .. पण आता तुम्ही स्वतः फोन केलात म्हणून सांगतो .. गेल्या महिन्यात .. सुशांत आणि सावनी ची रजा संपून जॉइनिंग होते .. तुमच्या सुपुत्राने साधा एक कॉल करून पण सांगितले नाही कि तो जॉईन होणार नाहीये .. माझ्या कामाची खूपच अडचण केली त्याने ..
विलास " ते मला हार्ट अटॅक आल्यामुळे त्याला सवडच नाही मिळाली .. "
दांडेकर " मान्य आहे .. पण त्याने मला कळवायला नको का ? सांगा "
विलास " हो बरोबर आहे तुमचं .. "
बिचारे विलास .. एडव्हा मोठा साहेब पण सगळीकडून सुशांत मुळे मान खाली घालावी लागत होती
दांडेकर " आता तुमच्या सून बाई विषयी बोलतो .. तिचे पोस्टिंग आदित्य च्या हाताखाली होते आणि एक वर्ष भर नोकरी सोडायची नाही असा बॉण्ड तिने साईन केला होता .. त्या दिवशी अचानक आली आणि म्हणाली .. मला ह्या बॉण्ड मधून मुक्त करा .. मी म्हटले तिला सुशांत नसला तरी तुला तुझे वर्ष पूर्ण करायला काय प्रॉब्लेम आहे .. तू तुझा बॉण्ड पूर्ण कर ... वर्ष झाले कि जा कुणीकडे जायचंय ते .. तर म्हणाली ... सुशांत ला मी आदित्य सरांच्या अंडर काम केलेलं आवडत नाही .. उद्या उठुन काही प्रॉब्लेम नको.. मला त्याला नाराज करायचं नाहीये .. मला नक्कीच दुसरीकडे जॉब मिळेल ..मग मी तिला सांगितल बॉण्ड पूर्ण नाही झाला तर ५००००/- भरावे लागतील .. तर मला म्हणाली मान्य आहे .. माझे डॉक्युमेंट्स मला द्या .. मी तुमचे सगळे पैसे देईन .. थोडे थोडे करून .. तर मी तिला म्हणालो .. मी काही सावकार नाहीये .. व्याजावर पैसे द्यायला .. हा व्यवहार आहे ...
शेवटी मी तिला आदित्य ला भेटायला लावले .. मग आदित्य ने तिला दोन महिन्यांपूर्वी परफॉर्मन्स बोनस दिला असे दाखवले .. आणि ते पैसे परत फिरवून तिचा बॉंड मोकळा केला आणि तिचे डॉक्युमेंट्स परत दिले .. मग कुठे गेली माहित नाही”
विलास " कुठे जॉब करतेय आता काही सांगू शकाल का ?"
दांडेकर " नाही असे नाही सांगता येणार .. पुण्यात किती CA आहेत .. तरी मी आमचा एक ग्रुप आहे .. त्यावर व्हाट्स अँप करून विचारतो . काही कळले तर सांगेन तुम्हांला "
विलास " ठीक आहे ... खरतर.. तुमचे धन्यवाद कसे मानावे हेच कळत नाही .. माझ्या मुलाला आणि सुनेला खूप सपोर्ट झाला तुमचा "
दांडेकर " खर सांगू .. सुशांत मला खूप आवडला .. हिरो आहे एकदम .. आणि सावनी वर त्याचे खूप प्रेम आहे .. दोघांचेही एकमेक्नावर आहे.. त्यांचा संसार बघून खूप आनंद होयचा मला .. एकदा आदित्य चुकून तिला सानू बोलला तर त्याला सुशांत म्हणतो .. तिचे नाव सावनी आहे .. “सानू “फक्त मी बोलतो .. तुम्ही तिला सावनीच हाक मारा ....माझा लेक आदित्य असा भडकला होता तेव्हा .. मग मी त्याला म्हटले कि तो प्रेम करतो तिच्यावर प्रोटेक्टिव्ह आहे तिच्या बाबतीत .. सुशांत आल्यावर त्याला पगार वाढवून देणार होतो मी .. खूप छान मन लावून काम करायचा तो .. "
विलास " हो तसा सिन्सिअर आहे तो .. सानू तर हुशारच आहे .. माझ्या कडून चूक झाली त्यांना समजून घ्यायला उशीर झाला ..."
दांडेकर " जाऊदे .. चालायचंच .. काही वेळा होतं असे "
विलास " आता दोघे एकत्र व्हावेत म्हणून जीव वर खाली होतोय .. माझि तब्बेत बिघडली म्हणून दोघे सेपरेट झाले .. आणि आम्हाला वाटले मुलगी तिच्या वडिलांकडे आहे .. आज आणायला गेलो होतो तेव्हा कळले कि ती एकटीच नोकरी करायला गेलीय .. आता कुठे राहतेय .. कुठे नोकरी करतेय .. काहीच माहित नाही .. त्यांचे मोठे रिसेप्शन करणार होतो .. तर असे झाले "
दांडेकर " बघतो मी .. कळून जाईल .. होईल ठीक .. काळजी नसावी .. मी बघतो मला काय करता येईल "
विलास " हो ठीक आह ए.. थँक यु "
दांडेकर " थँक यु नका म्हणू.. सुशांत कडून खूप काही शिकण्यासारखे हे मी आदित्य ला नेहमी सांगतो .. तो नक्कीच तिला शोधेल ..
--------
चार तास सावनीच्या आठवणीत .. काळजीत .. जस जसा पुण्याच्या दिशेने जवळ येत होता .. सानू त्याला जास्त आठवत होती आणि त्याच्या रक्ताचं पाणी पाणी होत होते .. तिच्या आठवणीने श्वास कोंडून येत होता
https://www.youtube.com/watch?v=5jLhd8gUVeI&ab_channel=LyRicalWoRld
ओ..
तेरे मेरे दरमियां हैं बातें अनकही
तू वहाँ है मैं यहाँ क्यूँ साथ हम नहीं] x 2
फैसले जो किये
फासले ही मिले
राहें जुदा क्यूँ हो गयी
ना तू ग़लत, ना मैं सही
ले जा मुझे साथ तेरे मुझको ना रहना साथ मेरे] x 2
ले जा मुझे.. ले जा मुझे..
थोड़ी सी दूरियां हैं
थोड़ी मजबूरियां हैं
लेकिन है जानता मेरा दिल हो..
इक दिन तो आएगा अब तू लौट आयेगा तब
फिर मुस्कुराएगा मेरा दिल
सोचता हूँ यहीं
बैठे बैठे यूँही राहें जुदा क्यूँ हो गयी
ना तू गलत, ना मैं सही
ले जा मुझे साथ तेरे मुझको ना रहना साथ मेरेx 2
ले जा मुझे.. ले जा मुझे..
यादों से लड़ रहा हूँ
खुद से झगड़ रहा हूँ
आँखों में नींद ही नहीं है हो..
तुझसे जुदा हुए तो
लगता ऐसा है मुझको दुनिया मेरी बिखर गयी है
दोनों का था सफ़र
मंजिलों पे आकर राहें जुदा क्यूँ हो गयी
ना तू गलत, ना मैं सही
ले जा मुझे साथ तेरे मुझको ना रहना साथ मेरे x 2
ले जा मुझे.. ले जा मुझे..
सुन मेरे खुदा बस इतनी सी मेरी दुआ
लौटा दे हमसफ़र मेरा जाएगा कुछ नहीं तेरा
तेरे ही दर पे हूँ खड़ा जाऊं तो जाऊं मैं कहाँ
तकदीर को बदल मेरी मुझपे होगा करम तेरा..

(गाण्यातला प्रतेय्क शब्द सुशांत च्या मनातल्या भावना ओरडून सांगतोय .. शब्द नि शब्द वाचा .. ऐका .. खूप मस्त गाणे .. लिंक पण दिलीय ..)
सावनी च्या विरहात सुशांत सर्वेश च्या फ्लॅट वर आला .. सानू बरोबर घालवलले सगळे क्षण जसे च्या जसे त्याच्या डोळ्या समोर येऊ लागले होते .. पहिल्यांदा या फ्लॅट वर घेऊन आला तेव्हा बावरलेली घाबरलेली सानू .. हळू हळू त्याच्यात मिक्स होणारी सानू .. रडणारी .. कधी हसणारी .. कधी लाजणारी . सानू .. किचन मध्ये जेवण करताना तिला मारलेली मिठी .. सोफ्यावर बसून तिच्याकडून तेल लावतानाची ती .. बाथरुम मध्ये कपडे धुताना केलेली मजा ..तिच्यावर पाणी उडवले तरी लाजून बाहेर पळून जाणारी सानू .. बेडवर बसून अभ्यास करणारी सानू .. आठवणींचा उमाळा त्याला भरून आला होता .. हॉल च्या फरशी वर बसून सानू चा फोटो हातात घेऊन सुशांत ओरडून ओरडून रडला ... " सानू ... व्हेअर आर यु ... प्लिज कम बँक ... " तसाच बेडरूम मध्ये आला .. कपाट उघडले .. सानु चे सगळे कपडे त्याने बाहेर काढले .. बेड वर पसरवले .. आणि तिच्या कपड्यांना कवटाळून तो त्यांच्यावर आडवा पडला ..
तिकडे आशिष जागा .. इकडे विलास जागे .. सुधा जागी .. अवनी जागी .. सुशांत जागा .. सावनी चे आई बाबा जागे .. शेखर जागा .. पण आपली सानू आहे कुठे ? ती जागी आहे का ? झोपली ..कोणालाच काहीच माहित नव्हते .. सर्वांचे मन एकच सांगत होते ती पुण्यात आहे ..कारण पुण्यात ती राहिलीय .. आणि नोकरी च्या निमित्ताने का होईना तिने एकटीने प्रवास केलाय .
दुसऱ्या दिवशी सकाळी आशिष अवनी ला भेटायला गेला .. नक्की सुशांत जवळ ती काय बोलली .. ? कारण हा असा अचानक का पळून गेला .. ह्याचे कोड त्याला हि पडले होते
मालती "अरे आशिष .. आज सकाळी .. नाही म्हणजे हल्ली तू रात्री येतोस ना ?"
आशिष "अवनी कुठं आहे .. मला बोलायचं होते तिच्याशी ?"
मालती "अवनी .. अंघोळीला गेलीय बस ना .. मी चहा करते तुझ्या साठी"
आशिष "नको .. मी अवनी करेल चहा .. तिच्या हातचा नाही पिला तर रुसून बसते ती "
मालती जरा हसलीच .. "बरं ठीक आहे ? बाकी .. ते तुमच्या लग्नाचा ड्रेस फिक्स करून टाका ना .. काल गेलेले ना शॉपिंग ला .. काय झाले ? पसंत नाही आले का ?"
आशिष "ऐका ना मला अवनी नाहीये तर दोन महत्वाच्या गोष्टीवर बोलायचे होते .. आता वेळ आहे का तुमच्या कडे ?"
मालती "हो आहे .. बोल ना "
आशिष "ते म्हणजे आता सुशांत आणि सावनी चे असे झाले .. त्यामुळे अवनी चा मूड थोडा ऑफ आहे .. तिला कशातच इंटरेस्ट नाहीये ..."
मालती "हो .. झाले ते खूप वाईट झाले ? "
आशिष "काल .. सुशांत ला ऍडमिट करावे लागले .. सावनी तिच्या आई बाबांकडे नाही गेलीय .. ती सध्या कुणीकडे आहे माहित नाहीये .. काल रात्री सुशांत ला डिस्चार्ज घेतला आणि मी जाणार होतो तिला शोधायला त्याच्या बरोबर .. पण त्याला मी नको होतो .. तो एकटाच निघून गेला .. "
मालती "आणेल तो .. तिला .. ती पण व्यवस्थित असेल रे .. त्याचे टेन्शन नाहीये .. तिला सासरचे लोक घरात घेतील का पण ? नाहीतर पुन्हा तेच ?"
आशिष "हो आता तयार आहे ते .. तर मी काय म्हणत होतो .. मी अवनीची परीक्षा होई पर्यंत थांबलोच होतो .. म्हटले अवनी टेन्शन फ्री झाल्यावर लग्न करू .. म्हणजे जास्त एन्जॉय करता येईल .. पण झाले उलटेच अवनी चा पण मूड नाहीये आणि माझा पण तो लहान भाऊ आहे.. तर लग्न थोडे पुढे ढकलायचे का ? काय वाटतं तुम्हांला .. मी जस्ट विचारतोय .. तुम्ही टेन्शन नका घेऊ .. मी अवनी साठी म्हणतोय .. तीच जर खुश नसेल तर मी कसा खुश असेल "
मालती "आशिष .. खरंच तुला सांगते ...अवनी ने नक्कीच गेल्या जन्मात काहीतरी पुण्य केले होते म्हणून तिला तू भेटलास .. अरे किती तिचा विचार करतोस .. "
आशिष "माझा जीव आहे ती .. आणि ती खुश नसेल ना तर मी काल रात्रभर तोच विचार करत होतो .. जरा सुशांत आणि सावनी चे नीट झाले असते .. तोपर्यंत थांबलो असतो नाहीतर "
मालती "हे बघ आशिष ..प्रत्येका च्या आयुष्याचा संघर्ष वेगळा असतो .. त्यामुळे दुसऱ्याच्या दुःखाचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे आपल्यावर आहे .. परीक्षा झाल्यावर तुमचे लग्न करायचे हे गेल्या वर्षीच आपण ठरवले होते .. त्यात आता पत्रिका पण वाटून झाल्यात .. आता तारीख बदलू नये असे मला वाटते .. अवनी ला मी आज समजवते .. तीला सगळ्या गोष्टी नीट समजवाव्या लागतात .. आणि लग्नाला अजून २२ दिवस आहेत .. होईल तो पर्यंत सगळे ठीक .. "
गाण्याचे शब्द एक्सट्रा आहेत .. भाग तुकड्यांमध्ये आहे म्हणून लहान वाटेल पण नाहीये लहान अल्मोस्ट मोअर दयान १८०० वर्ड्स आहेत ..
अजून एक ५ ऑगस्ट या डेट ला दोन भाग दिसत आहेत आणि ४ ऑगस्ट ला दिसतच नाहीये .. वाचकांनी हे लक्षात घयावे हि रोज एक भाग अपलोड होत आहे.. डेट वाईज बघता त्यामुळे असे वाटते कि भाग नाही पोस्ट केला .. तर तसे नाहीये ..
सगळ्यांच्या कॉमेंट्स वाचून खूप छान वाटतंय .. स्टोरी आवडतेय हे सर्वांना हे वाचून खूप आनंद होतोय मला .. सगळे ओपन पॉईंट्स हळू हळू क्लोज करत स्टोरी पूर्ण करणार आहे .. लिहून झालीय .. शेवट पर्यंत वाचा
गेल्या वर्षी सुशांत सिंग ची न्यूज आली आणि त्याचा माझ्यावर खूप इफेक्ट झाला होता .. धक्काच होता एक प्रकारे .. सुशांत सिंग ला एक प्रकारे ट्रिब्युट देण्यासाठी सुशांत ला या स्टोरीत आणले होते .. थोडासा घाबरट .. थोडासा बालिश .. इमोशनल .. रोमँटिक ..इंटिलिजंट .. फॅमिली मॅन .. अभ्यासू .. नक्की काय हवंय हे समोरच्याला एक्सप्रेस करून सांगता न येणे .. मनातल्या मनात स्वप्न बघणारा .. तीन वर्ष फक्त लांबून पाहून पाहून प्रेम करणे ह्याला एक वेगळेच पेशन्स पाहिजेत .. असे सगळे पैलू जे कि सुशांत सिंग चे असावे असा न्युज मधून कळलेला सुशांत ... ह्या स्टोरीत टाकण्याचा प्रयत्न करून ते पात्र रंगवले तुम्हांला आवडले का ? ते मला नक्की सांगा.

🎭 Series Post

View all