लग्न गाठ - दि एडव्हान्स बुकिंग भाग 63

Story Of Friends
लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग
भाग ६३
सुशांत ने ती चिठ्ठी वाचली .. प्रत्येक शब्द वाचताना डोळ्यांतून महापूर वाहिला .. तो उठून बाहेर जायला निघालाच होता तर त्याला तिथेच चक्कर आली धाडकन खाली पडणार तर विलास ने त्याला कसे बसे सावरले .. विलास नि त्याच्या तोंडावर पाणी मारले .. तस त्याने डोळे उघडले .. विलास ने ताबडतोब डॉक्टरांना फोन करून घरी बोलावून घेतले ..
एकदम शॉक बसल्यामुळे आणि वीक नेस मुळे असे झालेय डॉक्टरांनी सांगतले .. महिन्यात तो नीट जेवला नव्हता .. झोपला नव्हता .. कशी बशी परीक्षा दिली होती त्याने .. आता हे सगळेच बाहेर आले ..
डॉक्टरांनी २ दिवस ऍडमिट करा म्हणून सजेस्ट केले म्हणून विलास ने ताबडतोब त्याला ऍडमिट करून घेतले .. सुधा ने रडून रडून घर डोक्यावर घेतले होते .. आणि आता खरंच तिला सानू चा रागही येत होता .. का असे वागायचं तिने ? हिच्या नादात माझा मुलाला काही बरे वाईट नको होयला .. शिवाय उद्या तिला काही झाले तर सगळा दोष सुशांत स्वतःवर घेईल .. प्रॉब्लेम कमी न होता वाढतच जाणार होता ..
माणसाचा हा एक स्वभाव फार विचित्र आहे .. समोरच्या ला दोष लावून मोकळं होयचं .. समोरचा असा का वागला ह्याचा विचार करत नाही ..
सुशांत ला डॉक्टरांनी सलाईन लावली होती ..
विलास " सुशांत .. तू टेन्शन नको घेऊस बाळा .. आपण तिला लवकरच शोधून आणू .. "
सुशांत " बाबा .. मी चुकलो .. मी असे कसे तिला सोडले .. असे कसे मी तिला जाऊन दिले .. बाबा ती खूप घाबरट आहे .. अनोळखी लोकांनां घाबरते ती .. कशी आणि कुठे असेल ती .. बाबा एक महिना झाला .. एकटी .. " पडल्या पडल्याचं तो बोलत होता ..
विलास " अरे तू असा घाबरून नको जाऊस .. ती .. कुणीकडे असेल यावर विचार कर ना जरा ... बाकी काही नको विचार करुस "
सुशांत ने आदित्य ला फोन लावला
सुशांत " आदित्य सर .. "
आदित्य " बोला सुशांत सरदेशमुख .. परीक्षा झाल्यावर तुमची जॉइनिंग होती .. हे विसरलात वाटतं ?"
सुशांत " सर सावनी .. आहे का तिकडे ?"
आदित्य " का ? सावनी तुझ्या बरोबर नाहीये का ? अरे हो मी विसरलोच .. तुमचे वडील बोलले मला .. सबनीस वकिलांच्या मुलीशी लग्न ठरलय नाही का ? मग कधी आहे लग्न ?"
सुशांत " सर .. सावनी आहे का तिकडे ?"
आदित्य " नाहीये "
सुशांत " आली होती का ?"
आदित्य " हो आली होती .. रिझाईन करून गेली .. "
सुशांत " का रिझाईन केले तिने ?"
आदित्य " मला म्हणाली .. मी तुमच्या कडे काम केलेलं माझ्या नवऱ्याला आवडत नाही .. तो इथे नसताना मी तुमच्या अंडर काम करणे बरोबर नाही .. मला बॉण्ड मधून मुक्त करा "
सुशांत " आता कुणीकडे आहे ती ?"
आदित्य " मी कशाला तिच्यावर पाळत ठेवू ? आय डोन्ट नो "
सुशांत " सॉरी सर .. मी भेटेन तुम्हांला लवकरच .. काही गैर समज नको .. “
तेवढ्यात विलास ने फोन घेतला
विलास " हॅलो आदित्य .. मी विलास बोलतोय .. सावनी बद्दल काही कळलं तर प्लिज मला कॉन्टक्ट कर .. इट्स अ हम्बल रिकवेस्ट "
आदित्य "ठीक आहे "
सुशांत " याचा अर्थ ती पुण्यात असावी .. ती गेली होती सरांकडे .. बाबा मी निघतो लगेच पुण्याला “
विलास " थांब रे .. अजून तुझी तब्बेत ठीक नाहीये "
-------------------------------
इकडे सुधाने आशिष ला फोन लावला
सुधा " आशिष .. अवनीला सावनी बद्दल काही माहित असेल तर सांगायला सांग ना .. तुला काही सांगते का बघ ना .. सुशांत खूप काळजीत आहे "
सुधा " पण गेली कुणीकडे ती ?"
आशिष " तिने अवनी ला कॉन्टक्ट नाही केलाय .. अवनी च सारखी रडत असते .. तिला खूप भीती वाटतेय .. इथे लग्न डोक्यावर आलंय आणि ती इतकी अपसेट आहे "
सुधा " त्यावेळी माझेच चुकलं .. ती निघाली होती तेव्हा मी तिला थांब म्हणून बोलायला पाहिजे होते .. "
आशिष " मावशी .. ते दोघे खरच ग्रेट आहेत .. काकांची तब्बेत बिघडली तेव्हा सुशांत खूप घाबरला होता .. आणि तब्बेत आपल्या प्रेमा मुळे बिघडलीय असे वाटून दोघे ठरवून वेगळे झाले होते .. सुशांत मला म्हणाला होता कि ती बाबांकडे जाणार आहे म्हणून .. आणि आता हे काय ऐकतोय .. सगळे नवीनच आहे "
सुधा " अरे .. तिचे वडील पण खचून गेलेत .. असा मूर्ख पणा नको होता करायला तिने .. आता सुशांत ला ऍडमिट करायची वेळ आलीय .. घाबरून गेलाय तो "
आशिष " मावशी राग नको मानूस .. तुम्ही दोघांनी खूपच परीक्षा घेतलीत त्यांची .. देवाने इतके कठोर कोणाशी वागू नये .. साधे एकमेकां बरोबर रहायला मिळावे म्हणून काय काय केले त्यांनी .. शेवटी सेपरेट झाले .. कालच भेटला होता सुशांत .. अग कसा झालाय तो .. आतल्या आत मरतोय तो .. "
सुधा रडायलाच लागली " काय करू अरे .. गेलो होतो तिच्या वडिलांकडे .. ते पण जरा ऐकून घेत नव्हते .. आपली मुलाची बाजू असून सुद्धा दोन वेळा गेलो आम्ही "
आशिष "ठीक आहे .. मी बघतो ... माझे काही CA मित्र आहेत पुण्यात .. तिने नोकरी केली तर CA कडेच करेल ती .. बघतो .. काही कळलं तर कळवतो "
--------------------------
शेवटी न राहून आशिष अवनी ला भेटायला आला ..
आशिष " चल जरा बाहेर राउंड मारून येऊ "
अवनी " नको रे .. माझा मुड नाहीये.. कंटाळा आलाय "
आशिष " चल ना पिल्लू .. काय अशी करते ? पाणी पुरी खायला नेतो तुला "
अवनी " अरे वाह .. आज चक्क पाणी पुरी .. सानू ला पण पाणी पुरी आवडायची .. आम्ही महिन्यातून एकदा त्या गाडीवर खायला जायचो .. सहा झाल्या तरी नाही झाल्या .. करून दोन जास्तीच्या खायचो .. शिवाय सुकी पुरी वेगळी " आणि अवनी ने डोळे पुसले ..
आशिष " यार .. अवनी .. रडून ती येणार आहे का परत ?"
अवनी " नाही ना .. पण कशी येईल मग ... त्या सुशांत ची तर मला चीड येतेय .. नालायक मला फोन करून विचारतो .. सावनी कुठाय म्हणून .. "
आशिष " अवनी .. एक मिनिट त्याला शिव्या घालून ती येणार आहे का ? तू त्याची मैत्रीण आहेस ना मग कर ना त्याला मदत .. नक्की सानू तुला काय बोलली सांग ना .. तू मला पण सांगत नाहीस .. आपल्यात नो सिक्रेट्स असे ठरले होते ना .. हे बघ तू मला जर काही सांगितलेस तर आपण तिला शोधून काढू .. सुशांत ला ऍडमिट केलय .. मरायला आलाय तो .. शेवटी तो देवदास झालाच "
अवनी " त्याच्या मुळेच ना पण .. असा कसा यार सोडू शकतो तो .. "
आशिष " सॉरी पण आपण त्याचे मित्र आहोत .. मी तर मोठा भाऊ आहे .. आपण अशा वेळी त्याच्या मागे भक्कम उभे राहिलो पाहिजे .. तू प्लिज तुला जे माहितेय ते मला सांग .. दोघांना एकत्र आणण्यासाठी काहीतरी करू आपण "
अवनी " ठीक आहे चल बाहेर जाऊ "
दोघे बाहेर गेले .. आणि एका ठिकाणी गप्पा मारत बसले ..
अवनी " त्या दिवशी जेव्हा तिचे बाबा आले होते .. त्या दिवशी .. सावनी वॉश रूम ला जाते म्हणून सांगून तिकडून बाहेर न पडता हॉटेल च्या किचन मध्ये लपली .. लेटर वाचल्यावर बाबांची तब्बेत तर नाही ना बिघडायची अशी भीती होती तिला .. लेटर वाचल्यावर ते खूप रडले .. तिने पहिले .. मनातल्या मनात खूप वेळ सॉरी सॉरी बोलत होती ती .. बाबांनी अख्ख्या हॉटेल मध्ये तिला शोधली पण किचन पर्यंत नाही गेले .. शेवटी राग- रागात ते हॉस्पिटल कडे जाताना तिला दिसले .. तिने आधीच मला फोन करून ठेवला होता .. मी शेजारच्या मुलीची गाडी आणली होती .. तिला डबल सीट घेतली .. मी आमच्या वर्गातल्या शेहनाज चा काळा ड्रेस मागून आणला होता तो तिला घालायला दिला .. तिला घेऊन आम्ही हॉस्पिटल च्या खाली गेलो .. मी खालीच पार्किंग मध्ये थांबले .. ती एकटीच वर गेली कारण तिला सुशांत च्या बाबांना पण जायच्या आधी तिला एकदा बघायचे होते ..
वडिलांच्या मागे मागे दबकत ती गेली .. जेव्हा सुशांत च्या बाबांच्या रूम च्या इथे गेले तेव्हा .. तू आणि सुशांत आत मध्ये होतात .. आणि सुशांत खूप रडत होता .. आणि बाबांना सांगत होता कि मी सावनी ला सोडायला तयार आहे .. तुम्ही सांगाल ते ऐकायला तयार आहे .,, तुम्ही काळजी करू नका .. हे दोघांनी ऐकले .. आणि सुशांत च्या बाबांची क्रिटिकल तब्बेत बघून तिचे बाबा तसेच निघून गेले ..
सावनी ने पण सुशांत ला डोळे भरून बघितले .. त्याला रडताना पाहून तीचा जीव तळमळत होता .. आणि ती पण खाली निघून आली .. बराच वेळ रडत होती .. म्हणत होती ,, माझ्या मुळे सुशांत च्या फॅमिली मध्ये प्रॉब्लेम झालाय .. उगाच आम्ही असे वागलो .. आमचा पळून जाण्याचा निर्णय खूपच चुकला ग .. मग आमच्या शेजारच्या वाडीत एका काकूं कडे मी तिची रहायची सोय केली .. आणि त्यांना सांगितले कि आई ला पण सांगू नका .. ती परीक्षा होई पर्यंत तिथेच होती .. आपण दोघे कॉलेज ला गेल्यावर ती मागून यायची .. सुशांतच्या वर्गातच मागे शेहनाज च्या जागी बसून तिने परीक्षा दिली.. पण शेवटचा पेपर झाल्यावर ती मला सुद्धा भेटली नाही .. निघून गेली .. कुणीकडे गेली मला माहित नाही .. दोन दिवसांनी मला एक अननोन नंबर वरून मेसेज आला " हॅलो अवनी .. इट्स मी सावनी .. सॉरी तुला न सांगताच गायब झाले .. मी व्यवस्थित आहे .. माझी काळजी करू नकोस .. माझी रहायची आणि नोकरीची सोय झालीय .. मी आता सेल्फ डिपेंडेंट आहे .. मी तुझ्या कडे राहिले होते हे प्लिज कोणाला सांगू नकोस .. काळजी घे .. तुझ्या लग्नाला मी नाही येऊ शकत .. एन्जॉय कर .. माझे बेस्ट विशेष आहेतच तुझ्या मागे "

🎭 Series Post

View all