लग्न गाठ - दि एडव्हान्स बुकिंग भाग 54

Story Of Two Friends


लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग
भाग ५४
सुशांत " ठीक आहे .. एन्जॉय..."
सुधा " पण आता तुम्ही दोघे घरातच थांबा .. बाहेर नका फिरू "
सुशांत " हो नाही जाणार आहे कुणीकडे .. घरीच आहे?"
सावनी घरात गेली फ्रेश होऊन चेंज करून आली
सानू " सुश .. आई नाहीयेत .. कधी येणार आहेत कळलं का ?"
सुशांत " हो .. आताच फोन केला होता .. ते रात्री येतील "
सानू " ठीक आहे .. तू चहा घेशील का ?"
सुशांत " नको आता .. डायरेक्ट जेवणच जेवू .. "
सानू " मी आता चहा करतेय थोडासा .. म्हणजे कामाला लागते ... दोघांनी चहा घेतला .. आणि सानू किचन मध्ये गेली .. ..मग दोघे एकत्र बसून जेवले ..
जेवण झाल्यावर किचन कट्टा .. भांडी कुंडी सगळे स्वच्छ करून झाले .. मग बसली सुशांत समोर ... तोपर्यंत सुशांत ने आज त्याला वेळ मिळाला तर मॅक्स ला अंघोळ घातली .. त्याला खेळवले .. त्याचे खाणे पिणे बघितले .. आणि तो हि दमला होता ..
जेवण झाल्यावर दोघे सोफ्यावर बसले
सानू " ऑइल मसाज करू का ? "
सुशांत " नको .. बस नुसतीच .. तू पण दमली असशील ना "
सानू " हमम .. इतकी नाही .. पण थोडी दमले "
सुशांत " सानू .. यार काय करायचं .. एक वर्ष म्हणजे खूप आहे यार .. मी नाही राहू शकत एक वर्ष लांब .. "
सानू " हो ना .. मी पण नाही राहू शकत .. नुसता विचार केला ना तरी धडकीच बसते मला "
सुशांत " आपण ना एक काम करू .. एक्साम झाली ना कि पलायन करू .. नको वाटतंय यार हे सगळे .. तू नसशील माझ्या बरोबर तर माझे अभ्यासात तरी लक्ष लागणार आहे का ?"
सानू " नको ना असे करुस .. एकच वर्ष आहे .. माझ्या साठी पण खूप कठीण काळ असणार आहे तो .. पण हे सगळे तुझ्या भल्यासाठी आहे रे .. त्यामुळे तू हा कोर्स करावास असे मला सुद्धा वाटते ..
सुशांत " पण मला तूला ऐकटी ला सोडून जायला नको वाटतंय .. इकडे कोणी आपल्या भावना .. आपले प्रेम समजूनच घेत नाहीये .. मुद्दामून आपल्याला लांब करण्यासाठी करतायत असा उगाचच फील येतोय मला " बोलता बोलता तिचा हात त्याच्या हातात होता .. हातावर तो किस करत होता .. ती मधेच तिच्या हातांनी त्याच्या केसात हात फिरवत होती .. दोघे आरपार एकमेकांच्या डोळ्यांत बघत बोलत होते ..
सावनी " कदाचित ते आपल्या दोघांच्या भल्या चा जास्त विचार करत असतील .. आणि त्यांना मनवायला आपल्याला काहीतरी करावे लागणारच आहे ना "
तेवढ्यात मॅक्स चा भुंकण्याचा आवाज आला ..
सुशांत " चल येतेस का ? मॅक्स ला राउंड मारायचा आहे .. तो आवाज देतोय "
सावनी खुद्कन हसली " तुला भारी कळतं तो काय बोलतो ते "
सुशांत " हमम.. ज्याच्यावर आपले प्रेम असते ना त्याचे न बोलता पण सगळे कळते.. "
सावनी " हमम... "
सुशांत " १२ वीत असल्या पासून तुला नुसता लांबून पहिले पण मला बरोबर कळले होते कि नाही कि तुला पण मी आवडतो म्हणून "
सावनी च्या डोळ्यातले भाव बघूनच ती आता लाजतेय त्याला कळत होते
सुशांत " ए सानू .. सांग ना . तू मला कधी पासून लाईक करत होतीस .. असे एका दिवसात आपण पहिल्यांदा बोललो आणि लगेच त्याच दिवशी आपण पळून गेलो .. असे तर नाही होऊ शकत "
सावनी " जा ना तू .. मॅक्स ला फिरवून आणतोय ना .. तो वाट बघतोय "
सुशांत " चल ना तू पण चल .. बोलत जाऊ "
दोघांनी घर लॉक केले आणि मॅक्स ला चेन मध्ये टाकून दोघे निघाले ..
सुशांत " आय एम वेटिंग फॉर अन्सर "
सावनी " आता काय सांगू ... नको ना .. आता कशाला हवय तुला ?"
सुशांत " अरे असे नाही करायचं .. आय वॉन्ट टू नो .. "
सावनी " फर्स्ट डे ऑफ युअर इन कॉलेज ... व्हाईट लायनिंग टी -शर्ट .. ब्लू जीन्स ....अँड ब्लॅक सॅक .. त्या बॅग वर लिहले होते आय एम कूल "
सुशांत " आयला... एवढे डिटेलस .. मला पण आठवत नाहीयेत .. सांग ना अजून सांग ना "
सावनी “त्या दिवशी मी एकटीच कॉलेज ला चालले होते .. कारण अवनी मामाकडे गेली होती .. मी स्कार्फ बांधला होता चेहऱ्याला .. मला मी एकटी कॉलेज ला जायचं असले कि भीती वाटायची .. आणि मी माझ्याच तंद्रीत जात होते तर माझी ओढणी सायकल च्या चाकात अडकली आणि मला माझ्याच ओढणीचा फास बसला होता .. कदाचित तू मला वाचवलं नसतेस तर .. माझ्या चेहर्या समोर अंधारी यायला लागली होती .. माझा गळा आवळला जात होता .. श्वास कोंडत होता .. माझा स्कार्फ माझ्या चेहऱ्यावरचं होता .. तू आलास आणि माझि अडकलेली ओढणी चाकातून बाहेर काढून दिलीस .. तुझ्या आदिदास च्या बॉटल मधले पाणी प्यायला दिलेस .. एवढ्या जवळ कोणीतरी अवनी सोडली तर तूच आला होतास .. किंवा मी माझ्या डोळ्याने पहिल्यांदा एवढया जवळून तुलाच पाहिले असेल .. आणि मग तूच डोळ्यांतून मनात उतरलास .. शांत .. कोणाशीच जास्त बोलायचं नाहीस तू .. माझं चोरून लक्ष असायचं .. अभ्यासाकडे जास्त फोकस होता तुझा .. कधी तरीच हसण्याचा आवाज यायचा तुझा आणि मला धस्सच होयचं .. माझि नजर तुलाच शोधत असायची .. एक वेगळीच ओढ लागली होती मला .. पाणी देताना तुझा झालेला हलका स्पर्श आठवून तर पोटात गोळाच यायचा माझ्या.. तू एक टक माझ्या डोळ्यांत बघत होतास ना त्या दिवशी ? तुला आठवतंय का ? "
सुशांत हसून " हो .. किती सुंदर आहेत तुझे डोळे .. आणि स्पेशली .. पापण्या .. किती मोठ्या आहेत .. असे वाटते बघतच बसावे त्यांच्या कडे .. अजुनपण .. "
सावनी " तू आधी पाहिले होतेस का मला ?"
सुशांत " मग काय ? अवनी आणि तू दोघी सायकल वरून कुणीकडे तरी जात होतात .. तेव्हा तुम्ही आमच्या घरा वरून गेला होतात .. आणि मोठ्यांदा खिदळत होतात .. म्हणजे बोलत अवनीच होती पण तू खूप हसत होतीस .. आणि मला हसतानाची तू मला इतकी आवडलीस .. कि मी लगेच माझी सायकल काढली आणि तुमच्या मागे मागे उगाचच भटकू लागलो .. .. असे वाटू लागले कि पुन्हा तू दिसावीस .. पण तू दिसली नाहीस .. नंतर मी बाबानं बरोबर चाललो होतो एकदा तेव्हा कॉलेज च्या बाहेर तुम्ही दोघी दिसलात .. मग दुसऱ्या दिवशी मी या कॉलेज ला आलो .. आणि CA ला ऍडमिशन घेतली .. आधी बाबा मला लॉ ला पाठवत होते .. पण मी त्यांना तिथेच धक्का दिला होता .. सगळ्यांना वाटले मी आशिष दादाला बघून CA होयच ठरवलंय .. पण मी तुला तिथे बघितली होती म्हणून मी ऍडमिशन घेतले होते .. आणि त्या दिवशी ती तू आहेस मला माहीतच नव्हते .. कारण तू नेहमी अवनी बरोबर असायचीस ना .. मी मदत ,म्हणून पुढे आलो .. तर तुझे डोळ्यांत बघतच बसलो .. आणि मग पाणी पिताना चेहरा दिसला.. इतका खुश झालो होतो त्या दिवशी .. तु माझ्या इतक्या जवळ असल्यावर मला माझ्या हृदयात होणारी हलचल जाणवायची .. कधी कधी तुला ना पाहताच मला कळून जायचं कि या मुलींच्या घोळक्यात तू आहेस .. माझ्या मनाला आधी कळायचं कि तू इथे आस पास आहेस म्हणून . तुला खोटे वाटेल .. मी असे कितीदा चेक केलंय .. माझ्या बरोबर तो समीर असायचा बघ .. मला मनात कसे तरी होयला लागले ना कि मी स्वतः मागे ना बघता त्याला विचारायचो " ती अवनी आहे का रे मागे ?" मग तो बघून सांगायचा मला " हो रे .. आहे .. " मी मुद्दामून त्याला अवनी बद्दल विचारायचो .. कारण अवनी बरोबर तू असतेसच हे मला माहित असायचे .. तुझे नाव पण कोणी घेतलं ना कि मला धस्स होयच .. क्लास मध्ये तुझी नोटबुक सर सगळ्यांना दाखवायचे .. कि किती छान नोटबुक ठेवलीय .. असे लिहा .. तर मला काय च्या काय आनंद होयचा.. काय सॉलिड कनेक्शन होते ना आपले ..
बोलता बोलता दोघांनी हात हातात घट्ट घेतले आणि चालत होते .. आज दोघेही आठवणीत गेले होते .. कॉलेज च्या गमती जमती आठवत होते .. कसे एकमकांना न कळत चोरून बघायचे .. नेहमीच्या वेळेत .. नेहमीच्या जागेवर बघायचे आणि नाही दिसले एकमेकांना तर जीव कसा त्रासून जायचा ..
पाहता तूला विसरलो जगाला
एका क्षणात झालो दिवाणा
ना दिसता तुझा चेहरा
श्वास होई माझा गहिरा

न बोलता माझी होतीस तू
न सांगता वाट पाहिलीस तू
पाहता तुला माझी झालीस तू
अशी काय जादू केलीस तू

स्पर्शण्या तुला आतुर मन
एका नजरेत फितूर तन
आसुसला मी दे होकार तू
मिटू दे अंतर दे अधिकार तू
अशीच काहीशी दोघांच्या मनाची स्थिती होती
---------------------
दोघे गाडीत बसून एक तास प्रवास करून एका मस्त रेस्टोरंट ला आले .. आशिष ने रेस्टोरेंट चा टेरेस सगळा बुक केला होता .. बॅक साईडला ला मस्त लेक व्यूह होता .. त्यामुळे मस्त गार हवा होती .. आणि त्याच्या मित्राचेच रेस्टोरंट असल्याने सेफ होते ..
आशिष " चलो मॅडम .. नाऊ गेट रेडी फॉर सर्प्राइझेस .. एकाही गोष्टीला नकार घंटा लावायची नाही बस .. जस्ट एन्जॉय .. ओके .. आय जस्ट वॉन्ट टू स्पेंड सम नाईस टाइम विथ यु .. "
आशिष ने कार चे दार उघडले आणि तिला जमिनीवर पायच ठेवून दिला नाही .. डायरेक्ट दोन्ही हातात उचलून घेतले .. अवनी नको नको म्हणतच होती आणि चक्क लाजत पण होती .. पण आज आशु काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हता ..
आशु ने तिला एका रूम मध्ये पाठवले .. आत जा गम्मत आहे तुझ्यासाठी .. आतून एक मुलगी युनिफॉर्म घातलेली बाहेर आली आणि तिला घेऊन गेली ... ती स्पेशल ब्युटिशियन होती .. तिने अवनी ला तयार केले .. इंग्लिश वेडिंग गाऊन असावा तसा पार्टी वेअर ड्रेस .. पीच कलर चा .. ऑफ शोल्डर होता .. फार सुंदर आणि एलिगंट होता .. मॅचिंग जुलरी आणि मस्त हेअर स्टाईल .. करून अवनी तयार ..

🎭 Series Post

View all