लग्न गाठ - दि एडव्हान्स बुकिंग भाग 49

Story Of Two Friends And Their Marriage


लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग
भाग ४९
किती तो आनंद त्यांना जगाचा विसर पडला .. आपण चपला स्टॅन्ड जवळ आहे आणि बाकीच्या लोकांचा जाण्या येण्याचा रस्ता अडवलाय हे हि लक्षात नाही आणि आशिष आणि सुशांत मगाच पासून हातची घडी घालून त्यांच्याकडे बघत आहे याची पण शुद्ध नाही
अवनी ला आशिष दिसला .. अवनी धावतच आशिष जवळ गेली ..
अवनी "तुला माहित होते ना .. तरी तू मला सांगितले नाहीस ना आशु
आशिष " मग कसे वाटले हे सरप्राईज ?" आशिष भुवया उडवत हसतच विचारत होता
सुशांत पण सावनी कडे बघून तेच विचारत होता
अवनी आणि सावनी ने दोघींनी परत एकदा एकमेकींना मिठी मारली आणि " एकदम भारी ... "
आशिष " अरे हळू .. केवढ्यांदा ओरडताय दोघी .. लोक बघतायत आपल्याकडे "
सुशांत त्याच्या बाजूला होता
अवनी " ए हाय .. कसा आहेस ? कसले मस्त .. आणि गोड दिसताय दोघे ... " आणि अवनीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतच होते .. आनंद पण असा डोळ्यांतून वाहू शकतो याची तिला बहुदा पहिल्यांदाच अनुभूती झाली होती ..
रडतच तिने आशिष च्या खांद्यावर डोके ठेवले
अवनी “ आशु .. मला खूप आनंद झालाय तरी पण डोळ्यांतून पाणी येतंय .. माझा मेक अप खराब नाही ना झाला .. नाहीतर सुंदर दिसायच्या नादात बंदर दिसायची मी "
चौघे हसायला लागले
सावनीचा पण भावनांचा बांध फुटला होता .. तिचे रडून नाक लाल झाले होते
आशिष " चला तिकडे छोटेसे हॉटेल आहे तिकडे बसून गप्पा मारू .." सुशांत कडे बघून " दोघीही मला वाटले खुश होतील .. या दोघी रडक्या आहेत .. आपली दोघांची चॉईस चुकली का रे ? "
अवनी " आशु ... मार खाशील हा आता ? " आणि तिने अजूनच जोरात घट्ट त्याचा हात कोपरा पासून पकडला .. आणि अचानक तिला सकाळीच आईने दिलेला प्रसाद आठवला .. आणि एकदम त्याचा हात तिने सोडून पण दिला ..
आशिष ला पण ते जाणवलं .. पण सध्या त्याने दुर्लक्ष केलं ..
सावनी आणि सुशांत मागून हळू हळू चालत येत होते .. सावनी सॅन्डल नीट घालत होती म्हणून पूजेचं ताट सुशांत ने हातात पकडलं होते .. मग तिचा दुपट्टा तिने नीट केला .. तिने हाताने तिचे छोटुसे मंगळसूत्र दिसतंय ना याकडे बघितले .. आणि डोळ्यांनेच त्याला विचारले " सगळे ओके आहे ना " आणि सुशांत ने पण अगदी सहज तिचा दुपट्टा अजून नीट केला .. सॅन्डल घालून झाल्यावर तिच्या हातात ताट दिले .. मग दोघे चालत होते ..
एकमेकांची काळजी घेत वावरताना पाहून आशिष आणि अवनी खुश झाले ..
अवनी " आशु .. सावनी आणि सुशांत छान सेट झालेत ना एकमेका बरोबर .. किती क्युट दिसतायत दोघे एकत्र .. देव करो दोघे नेहमी असेच एकत्र राहू दे "
आशिष " हमम .. खर आहे .. सुशांत ला मानले पाहिजे .. ती ला एकदम बदलून टाकले त्याने .. नाहीतर खालीच मान असायची तिची .. तुला माहितेय म्हणूनच असे म्हणतात कि डोन्ट फॉल इन लव्ह .. राईज इन लव्ह .. आणि दोघेही लिटरली ग्रो झालेत प्रेमात .. दिसतंय दोघांच्याही वागण्यात "
अवनी " आशु .. कधी कधी ना तू खूप जास्त छान बोलतोस .. असे वाटतं ऐकत बसावं तू बोलतोस ते ... वाह काय मस्त थॉट आहे " डोन्ट फॉल इन लव्ह .. राईज इन लव्ह ... आशु .. सॉरी मी मगाशी तुला बोलले कि मार खाशील म्हणून "
आशिष " हेच तुझ्या आईला म्हणायचे होते ग राणी .. जेव्हा आपण इतर कोणा बरोबर असतो ना तेव्हा जरा रिस्पेक्ट दे . आणि हसू लागला .. "नवरा आहे मी तुझा “असे ती तुला सांगत होती .. अर्थात मला काही फरक पडत नाही .. बिकॉज आय नो यु आर इनोसेंट अँड क्रेझी .. अँटिक पीस .. जो कि मला खूप खूप आवडतो .. " आणि त्याने तिचे गाल हाताने ओढले
अवनी " आशु ... माझ्या सारख्या क्रेझी मुलीला सांभाळणे खूप कठीण काम आहे .. आणि हे तूच करू शकतोस फक्त .. बाकी तो मै मेरे माँ कि भी नहीं सुनती "
आशिष " ते माहितेय मला ... पण .. पण ... आजचा महत्वाचा मुद्दा तुझ्या आईने सांगितलेला बरोबर आहे."
अवनी " हो कळलंय मला ... मी प्रयत्न करतेय ना "
आशिष " हो .. ना .. मी कुठे काय म्हणतोय .. मला काही रिसपेक्ट वगैरे नकोय .. आय जस्ट वॉन्ट अनलिमिटेड लव्ह फ्रॉम यु माय डार्लिंग अँड आय एम गेटिंग दयाट .. हे सगळे तुझ्यासाठी बोलतोय मी .. तुझ्या मागे तुला नावे ठेवतील लोक .. बाकी काही नाही "
अवनी " आज आता हा विषय निघालाच आहे ना म्हणून मी बोलते आता .. तुला सांगते आशु म्हणून मी का ऍडव्हान्स बुकिंग करू म्हटले होते कळले का ? लग्न झाले ना कि मुलींना खूप रिस्ट्रिक्शन येतात .. तू आणि मी गेले दहा महिने जे एकत्र घालवलेत ना त्यामुळे आपला बॉण्ड इतका मजबूत झालाय ना कोणीही कितीही मला नाव ठेवले ना तरी तुला काही फरक पडणार नाही ... बिकॉज यु नो मी इन्साईड अँड आऊट ... कारण मी बोलले काहीही .. वागले कशीही तरी मी तुझ्या साठी क्रेझी आहे ह्यावर तुझा माझ्या पेक्षा विश्वास बसलाय .. आणि सेम विथ मी ... आता आपण खरे लाईफ टाईमचे गर्ल फ्रेंड बॉय फ्रेंड आहोत .. लग्न हा विधी आहे फक्त "
आशिष " हो रे .. अवनी .. बिग थॉट आहे हा .. आपण आय थिंक या विषयावर बोललो होतो .. मी तुला म्हणत होतो कि आधी लग्न करू .. लग्न झाले कि लाईफ टाईम चे गल्फ्रेन्ड बॉयफ्रेंड... तेव्हा मला तुझा हा मुद्दा फारसा पटला नव्हता पण आज पटतोय. "
अवनी " मला काय आवडते .. तुला काय आवडते माझे टँट्रम्स .. माझा विकनेस .. माझे दुःख .. आनंद सगळे माहित झालेय .. काहीच लपलेले नाहीये .. त्यामुळे जे आहे ते अगदी पारदर्शक ..
आशिष " येस .. तुला सांगू अशी वैचारिक चर्चा पण आपण छान करू शकतो हे आजच मला कळतंय .. अवनी .. तू ना कधी खूप लहान वाटतेस .. कधी खूप मोठी वाटतेस .. कधी अल्लड .. कधी परिपक्व .. तू ना कुठे होतीस ग ? इतक्या उशिरा का मला भेटलीस .. लहान पाणीच भेटली असतीस ना तर मी लहान पाणीच लग्न केले असते तुझ्या बरोबर "
अवनी " ए .. मी अजूनही लहानच आहे "
आशिष "बरं बाई .. माझे बेबी आहेस तू .. माझे पिल्लू आहेस तू "
अवनी " नाही हा .. मी बायको आहे तुझी .. एकदा लग्न झाले ना कि बघ .. मी मिरवणार .. मिरव मिरव मिरवणार ... समद्यांची जिरवणार "
आशिष " बाकी कोणाची पण जिरव .. पण माझी जिरवू नकोस म्हणजे झाले "
अवनी " काय ?"
आशिष " हौस ग .. लग्नाची हौस "
अवनी फिदी फिदी हसू लागली .. " आशु .. आता फक्त २ महिने .. मग आपण २४ तास बरोबर राहू ना .. मज्जा येईल ना "
आशिष " हो ना ... मला तर असे झालेय कधी एकदा परीक्षा होतेय तुझी .. म्हणून तर तुझा खूप अभ्यास घेतलाय करून .. कारण जस जसे लग्न जवळ येईल ना आपली मनस्थिती बिघडण्याचे चान्सेस आहेत "
अवनी " आता उद्या पासून माझे ट्रेनिंग सुरु होईल .. साडी .. पंजाबी ड्रेस .. ओढण्या .. दुपट्टे .. कधी कधी मला वाटते .. कोणी हे डिसाईड केले असेल रे कि लग्ना नंतर साडी घाला . वगैरे .. सर्वांना सावनी सारख्या मुली जास्त आवडतात "
आशिष " हा विषय वेगळा आहे .. आपण बोलू निवांत ते येतच आहेत आपल्याकडे "
सुशांत ने दोन पाण्याच्या बॉटल घेतल्या एक अवनीला दिली आणि एक सावनीला दिली ..
आशिष " मग सुशांत कसे चाललंय तुमचे दोघांचे ? "
सुशांत " काय विचारू नकोस ? आमची वाट लागलीय ती लागलीच आहे .. एवढंच समाधान आहे कि दोघे एकत्र आहोत "
सावनी चे डोळे लगेच पुन्हा भरले
आशिष " अचानक इकडे घरी येण्याचा निर्णय कसा काय घेतलास ?"
सुशांत ने कालच्या सगळ्या दिवसाचा आढावा दोघांना दिला
अवनी " यार .. एक सावनी चे बाबा खडूस होते ते कमी पडले आता तुझे बाबा पण असे वागायला लागले .. काय झालंय काय ह्या मोठ्या माणसांना .. आज मला पण माझ्या आईने कानफटवली .. आणि आता इतकी चिडून बसलीय कि माझा फोन पण घेत नाहीये .. "
आशिष " रिलॅक्स .. अवनी .. काय तू अजून पण तोच विचार करत बसलीय ?"
सावनी " काय बोलतेस ? काकू ? अशा कशा काय वागल्या ? किती प्रेमळ आहेत त्या "
आशिष " काय ऑर्डर करूया ... टॉपिक बदलला त्याने
सुशांत " साबुदाणा वडा आणि चहा चालेल का सानू तुला ?"
आशिष " अवनी " तुला काय पाहिजे ग ?"
सावनीने मान हलवून होकार दिला .. आणि अवनीने पण तेच असे खुणावले ..
सुशांत " अवनी ... काय ग आज जरा वेगळ्या मूड मध्ये आहेस वाटतं ? आज तुझी टगेगिरी दिसत नाहीये .. एकदम सावनी घुसली काय तुझ्यात ? मला तर आज तू सावनी ची बहीण असल्या सारखीच वाटतेय " आणि हसू लागला
आशिष \" सुशांत मग काका काय म्हणाले ?" आशिष ने पुन्हा मुद्दामून विषय बदलला
सुशांत " काकांनी आम्हाला दोघांना एक वर्षा साठी वेगळे करण्याचा प्लॅन जोरात करून ठेवलाय "
आशिष " हमम .. मग तू काय ठरवलंय ?"
सुशांत " मी सध्या त्यांना हो म्हटलंय .. म्हणजे एक्साम होई पर्यंत काही रामायण होणार नाही आणि सानू ला जाणून घ्यायला त्यांना पण वेळ मिळेल "
आशिष " हमम .. आणि काही प्रॉब्लेम आला तर सरळ उठून आपल्याकडे ये .. आता कुठे गायब नको होऊस .. खूप रिस्की आहे ते "
सुशांत " अरे आम्हांला दोघांना तर जाम मज्जा आली .. काहीतरी ऍडव्हेंचर झाले माझ्या कडून " आणि हसू लागला
आशिष " उगाच नाही तुला प्रेम वीर म्हणालो "

🎭 Series Post

View all