लघुकथा वाईट वेळ सर्वच सांगते

TIme will reavel the truth

आशा पळून जाणार होती एका मुलाबरोबर,लग्न करायचे होते तिला त्याच्याशी ..भरलेल्या डोळ्यांनी घरावर नजर फिरवत होती.. आई वडील भाऊ झोपले होते.. तो आला बाईक घेऊन  ,तिने लगेच लिहिलेले पत्र आईच्या डोक्यापाशी ठेवले आणि जड मनाने निघून गेली त्याच्यासोबत... बेभान होऊन चालवत होता गाडी अचानक अपघात झाला... हेल्मेट घातल्यामुळे तो वाचला ..पण आशाच्या डोक्याला जबर मार लागला ..पाय  गुडघ्यापासून तुटून पडला.... आशा त्याला आवाज देऊ लागली,पण तो लगेच  पळून गेला.बेशुद्ध झाली ती...दुसऱ्यादिवशी भानावर आली..आई वडील भाऊ तिच्याजवळ बसले होते.आशाला खूप पश्चाताप झाला होता एका अनोळखी व्यक्तिवर खरं प्रेम केल्याचा,विश्वास ठेवल्याचा  ..शेवटी वाईट वेळच सांगून गेली तिला आपलं कोण आणि परकं कोण.