Jan 28, 2022
स्पर्धा

#लघुकथा स्पर्धा#प्रेमकथा ❤️love needs understanding❤️

Read Later
#लघुकथा स्पर्धा#प्रेमकथा ❤️love needs understanding❤️

 

 

 

मिहिरा आणि निशांत दोघेही एकमेकांवर भरभरून प्रेम करायचे..दोघेही एकमेकांचा जीव की प्राण अस घट्ट नातं होतं... 
पण म्हणतात ना जिथे समजूतदारपणा कमी पडला तिथे नात्यात फूट पडली.


असच काहीस मिहिरा आणि निशांत मध्ये झालं आणि काही कारणास्तव  त्या दोघांचा ब्रेक अप झाला...


निशांतला नोकरी लागायला अजुन थोडा वेळ होता त्यानी तस मिहिराला बोलून दाखवल..


“मिहिरा आपण काही महिने थांबू, माझ्या नोकरीच पक्क झालं की घरी सांगून मग लग्नाच ठरवू...”


“नो वे निशांत, अजून किती दिवस थांबायचं मी?...माझीही काही स्वप्न आहेत जी मला पूर्ण करायची आहेत...अजून किती दिवस थांबायचं, घरचेही आता माझ्यासाठी स्थळ बघायला लागलेत, मी त्यांना काय सांगू..??”
“हे बघ, मी बोलतो ना त्यांच्याशी..”


“काहीही नको, मला तुझं काही खरंच वाटतं नाही”
“मिहिरा माझं तुझ्यावर खरच प्रेम आहे ग, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत...आय लव यू मिहिरा...


मला थोडा वेळ दे, काहीतरी नक्की छान होईल...

निशांतनी मिहिराला सगळं समजावून सांगितलं तिला वेळ मागितला पण मिहिरा थांबायला तयार नव्हती....


याच गोष्टीवरून रोज त्यांच्यात खटके उडायला लागले,रोज भांडण व्हायला लागली.. शेवटी कंटाळून ती त्याला सोडून गेली.....


मिहिरा निशांतला कदाचित विसरली असेल पण निशांत... तो सतत तिला आठवून आठवून रडत बसायचा..... 


प्रेम... विश्वास... भावना...
यावरचा विश्वास उडून गेला होता त्याचा....
जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिनी जर थोडं समजून घेतलं असतं तर...थोडा वेळ दिला असता तर... स्वतःवरच प्रश्नांचा वर्षाव करायचा...ते सततचे प्रश्न त्याच्या डोक्याचा भुगा करायचे...त्याच मन अस्वस्थ व्हायचं, रात्र रात्र जागून काढायचा...  मनाची घालमेल कुणाला कळत नव्हती...तो कुणाला काही बोलतही नसे..


बघता बघता दिवस सरत गेले..


निशांतला चांगल्या कंपणीत नोकरी मिळाली...बघता बघता वर्ष उलटली...
 घरच्यांनी लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात केली...
पण निशांतने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता....
 घरचे नेहमी मागे लागायचे पण निशांत नेहमी टाळाटाळ करायचा.... 
 एकदा त्याच्या आईने त्याला न सांगताच मुलीकडच्यांना बोलावलं....
निशांतला ऑफिस मधून यायला वेळ होता सगळी वाट बघत बसले होते..
संध्याकाळी निशांत घरी आला, घरात मंडळी बघून तो सगळं समजला पण सगळे असल्यामुळे तो टाळाटाळ न करता गप बसला.... 


“निशांत हे मिस्टर देशमुख, ह्या त्यांच्या मिसेस आणि ही मैथिली यांची एकुलती एक मुलगी...”
निशांतने चेहऱ्यावर खोट स्मितहास्य दाखवत नमस्कार केला...
सगळ्यांच बोलणं सुरू होत पण निशांत गप्प बसून होता...
 घरच्यांनी खुप आग्रह करून  त्या दोघांना बोलण्यासाठी बाहेर पाठवले..


दोघेही बाहेर गेले पण निशांत काहीच बोलला नाही, मैथिली एकटीच बोलत होती, तिनी स्वतःबद्दल त्याला सगळं सांगितलं..निशांत गप्पच आहे कदाचित त्याचा बोलण्याचा मूड नसेल अस समजून मैथिलीनी दुसऱ्या दिवशी भेटण्याचा निर्णय घेतला....

 


दोघेही आपापल्या घरी गेले..
उद्या तिला नकार कसा द्यायचा हाच विचार तो रात्रभर करत होता....
दुसरा दिवस उजाडला, दोघेही संध्याकाळी ४ वाजता कॉफी शॉप मध्ये भेटले....
दोघांचं हाय हॅलो झालं, निशांतनी कॉफी ऑर्डर केली, तो विषयाला हात घालणार तितक्यात त्याच्या फोनची रिंग वाजली.. त्याने चेक केलं तर मित्राचा फोन होता, निशांत मनोमन आनंदीत झाला आता आपल्या इथून जात येईल,काहीतरी कारण देता येईल या विचाराने गदगदून गेला..
“अहो, फोन घेताय ना..


तिच्या आवाजाने तो विचारातून बाहेर आला आणि फोन रेसिव्ह केला...


“हा मित्रा बोल...”
“निशांत लवकर साई मंदिर जवळच्या हॉस्पिटलमध्ये ये,आईला ऍडमिट केलंय...”
“ओके ओके येतो...”
निशांतने फोन ठेवला..


“मैथिली अग मला जावं लागेल, आय एम सॉरी आपलं बोलणं नाही झालं पण मला आता अर्जंट निघायचं आहे...”
“काही हरकत नाही, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी येऊ का तुमच्यासोबत...तुम्ही कुठे आणि कशासाठी चाललात माहीत नाही पण तुम्हाला सोबत म्हणून मी येऊ शकते, इफ यू डोन्ट माईंड..”
“अग मी हॉस्पिटलला चाललोय, मित्राची आई ऍडमिट आहे..”
“ओके, चला मग..”


“दोघेही हॉस्पिटलमध्ये जायला निघाले
पूर्ण वेळ शांतच.... कोणीच काहीच बोलल नाही....
हॉस्पिटल आलं....
“चल भराभर वरती जाऊया..”
 “अहो नको उगाच सगळ्यांचा गैरसमज होईल, मी थांबते खाली तुम्ही या जाऊन..."


निशांतनी फोर्स केला पण मैथिली खालीच एका बाकावर बसली.. 
तिथे मित्राशी भेटून त्याची मदत करून निशांत परस्पर निघून गेला, मैथिली फ़ोन वर बोलत असल्यामुळे तिला कळलंही नाही..


निशांतला बॉसचा फोन आला होता बॉसनी अर्जंट बोलावून घेतलं होतं म्हणून तो तिथून परस्पर निघून गेला..
एक फाईल अर्जंट तयार करून द्यायची होती, निशांतला त्या कामाला दोन ते तीन तास लागले...
काम झाल्यानंतर बॉसनी त्याला प्रमोशनच लेटर दिल... निशांतला परदेशी जाण्याची संधी मिळाली.....


तो खूपच खुश झाला...


“ जा, निशांत घरी सगळ्यांना ही आनंदाची बातमी दे, ते सगळे तुझी वाट बघत असतील...”
बॉसच्या बोलण्यावर निशांत
“ओह शीट..”
करत तिथून पळत सुटला..


इकडे मैथिली निशांतची वाट बघत बसली होती, आता थोड्यावेळाने येईल म्हणता म्हणता आठ वाजले...
निशांत धावत पळत हॉस्पिटलला पोहोचला...

ती निघून गेली असेल, असही त्याला वाटल पण जर थांबली असेल तर... तो लगेच इकडे तिकडे बघितलं,
ती तिथेच बाकावर आडोश्याला बसून होती.... त्याला काय बोलाव सुचतच नव्हतं...
तो 
"सॉरी ग... मी विसरुनच गेलो होतो... मला वाटल तू गेली असशील...
तू गेली का नाहीस...? मला फोन तर करायचा ना....."
ती "अरे मला वाटल तुम्ही याल लगेच...
आणि फोन करायला... तुमचा नंबर आहे का माझ्याकडे...
मनात आला तुमच्या घरी तुमच्या बाबाना विचारावा नंबर...
पण मग ते तुम्हालाच ओरडले असते नंतर...
आणि माझ्या घरच्याना विचारल असत तर त्यांचा पण तुमच्याविषयी गैर समज झाला असता...
वरती जाव वाटल पण नाही गेले....
आणि तूम्ही बोलला होतात ना येतो...
मग ...."
आय एम सॉरी, मी अग..  मी ऑफिसला गेलो होतो, बॉसचा फोन आला आणि मी तुला न सांगता परस्पर निघून गेलो...आय एम एक्सट्रेमली सॉरी..
“इट्स ओके..
तिला काय बोलाव हेच समजत नव्हतं.... ती गप्प राहिली

पण तीच मन आवडल त्याला...
"मला आवडली तू." निशांत न राहवून बोलला
 "अहो पण अस अचानक... आपण अजुन काही बोललो पण नाही...
तूम्ही ओळखतही नाही मला अजुन नीट... लगेच अस ठरवायच कारण..?"
“हो....कारण आहे.... पण मला एक सांगायचा आहे तुला.....”
माझं एका मुलीवर खूप प्रेम होत... ती ही करत होती....
पण लग्नासाठी ती तयार नव्हती... तिला माझ्या प्रेमा सोबत...माझे पैसे... नाव... प्रसिधी... हेही हव होत...
पण तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हत... मी तिला थोडा वेळ मागितला...
पण तोही ती द्यायला तयार नव्हती... शेवटी ती मला सोडून गेली ....
त्यानंतर माझ प्रेम आणि विश्वास सर्व निरार्थक वाटू लागल....
म्हणून मी नेहमी लग्नाला टाळाटाळ करायचो... तुलाही नकार द्यायचा हेच ठरवल होत मी.
पण आज जे झाल... त्याने माझे डोळे उघडले...
जिच्यावर मी इतक प्रेम करत होतो... ती ने मला कधी वेळ दिलाच नाही...
आणि आज माझ्या फक्त एका शब्दावर.... तू इतका वेळ थांबलीस...
आणि मी विसरलो होतो हे ऐकूनसुद्धा तू मला समजून घेतलस....
कदाचित प्रेम होण्याला अजुन वेळ असेल आपल्यात.... पण मला तुझा स्वभावच आवडला....
ते पुरेस आहे आपल्या संसारासाठी.... हो ना...."
"जर तुलाही मी आवडलो असेल तर....सांग?" तीनी हळूच नजर खाली केली...
त्याला तिच उत्तर समजल.... त्याने लगेच आईला फोन केला....
“हॅलो आई...
“बोल निशु, झालं का तुमचं बोलणं, आवडली का मुलगी, कशी वाटली तुला, हे बघ निशु मुलगी चांगली आहे तू नीट बोल तिच्याशी तिला सगळं खर खर सांग, समजून घेईल रे ती तुला...”
“आई..आई अग थांब जरा..किती ते तुझं बोलणं, आता थोडावेळ शांत रहा...
आई आमचं जास्त बोलणं नाही झालं पण मला मुलगी पसंत आहे"
बाकी सगळं आपण घरी बोलू मी मैथिलीला सोडून घरी येतो...
निशांतनी मैथिलीला घरी सोडलं आणि तो घरी गेला...
“आई..आई..”
“आलास, बस...मी पाणी आणते...
“आई बस मला तुला काही दाखवायचं आहे...”
“मैथिलीच्या भेटीने अगदी आनंदीत दिसतोस...”
“नाही ग,अजून एक कारण आहे, त्याने हातातला लिफाफा काढून आईच्या हातात ठेवला..”
“काय रे डायरेक्ट पत्रिका घेऊन आलास की काय?..”
“प्रमोशन लेटर आहे आई,मला दुबईला जॉइनिंग करायची आहे ..”
हे सगळ ऐकून निशांतच्या आईला आनंद तर झालाच पण डोळेही भरून आले...
“अग आई मी आताच तुला सोडून नाही जाणार आहे, अशी रडू नकोस..”
“नाही रे बाळा रडत नाही आहे,हे तर आनंदाचे अश्रू आहेत..खुप खुप मोठा हो...
“मैथिलीचा पायगुण चांगला आहे ती तुझ्या आयुष्यात आली आणि तुझी प्रगती झाली...खरच अगदी गुणाची पोर आहे, तिला सांगितलं की नाही, सोबत होती ना ती तुझ्या...”
“अग आई तिला सांगायचं राहून गेलं, भेट झाली की सांगेन...”
“का?... भेट व्हायची वाट का बघतोस ,फोन कर आणि सांग..
“ओके ..म्हणत हसत हसत रूममध्ये गेला..
महिन्याभरात निशांत आणि मैथिलीचा साखरपुडा झाला...आता दोघेही एकमेकांना भेटायला लागले, एकमेकांशी वेळ घालवायला लागले....
दोन महिन्यानंतर लग्न झालं... आणि निशांत आणि मैथिलीचा संसार सुरू झाला...
फिरायला म्हणून दोघेही महाबळेश्वरला गेले...तिथे एकमेकांना सोबत वेळ घालवून परतत असताना स्टेशन जवळ अचानक निशांतचे पाय थांबले..
“काय झालं निशांत, थांबलात का?..”
निशांतनी हाताने इशारा केला...

 


मैथिलीनी त्या दिशेने बघितलं तर एक साडी घातलेली बाई झाडाखाली बसून रडत बसली होती..
निशांत तिच्या कडे बघत स्तब्ध उभा होता...
“निशांत कोण आहे ती...
मैथिली बोलत होती पण निशांतच लक्षच नव्हतं..
शेवटी तिनी त्याला हलवून भानावर आणलं आणि विचारलं..
“कोण आहे ती?....


पाणावलेल्या डोळ्यांना लपवत निशांत बोलला.


“मिहिरा...माझं पाहिलं प्रेम..”
“काय?..”मैथिली आश्चर्य व्यक्त करत किंचाळली..
“मग चला ना तिच्या जवळ..


मैथिली धावत धावत मिहिरा कडे गेली...तिचे डोळे पुसत तिला पाणी प्यायला दिल...
मिहिरा काही विचारणार तितक्यात तिची नजर निशांत वर खिळली...
कुठलाही विचार न करता मिहिरा त्याला बिलगली....
काही क्षणासाठी मैथिली ओक्वॉर्ड झाली ती पाठमोरी होऊन उभी राहिली...
निशांतनी मिहिराला शांत केलं आणि तिला सविस्तरपणे सगळं विचारलं..


मिहिरा शांत होऊन सगळं बोलू लागली...
“आपल्या ब्रेकअप नंतर माझी एका मुलाशी ओळख झाली तो खुप श्रीमंत आहे म्हणून मी पणत्याची मैत्री स्वीकारली...हळूहळू तो माझ्या प्रेमात पडला..मला प्रपोज केलं, मी पुरती वेडे झाले होते, मी लगेच होकार  देऊन टाकला, आणि काही महिन्यातच आमचं लग्न झालं...
पण लग्नानंतर मला त्याचा काही गोष्टी कळल्या आणि मला धक्काच बसला...तो दारू पिऊन तमाशा करतो, मारहाण करतो, त्याचे इतर मुलीशी...


शी...बोलायला पण लाज वाटते मला...


आज मी त्याच घर सोडून आले पण आता कुठे जावे समजत नाही म्हणून इथेच बसून होते...
हे सगळं ऐकून निशांतला खूप वाईट वाटलं..


मैथिलीनी पण पाठमोरी होऊन सगळं ऐकलं तिच्या मनात मिहिराबद्दल राग नाही तर काळजीच होती..
ती पलटली मिहिराच्या बाजूला जाऊन बसली...


“मिहिरा तू एकटी नाही आहेस, आम्ही आहोत तुझ्या सोबत..
आमच्यासोबत चल तू आमच्याकडे...
मिहिरानी आश्चर्याने मैथिलीकडे बघितलं...
“मिहिरा, शी इज माय वाईफ मैथिली.. काही दिवसांपूर्वी आमचं लग्न झालं...


मिहिरानी मैथिलीचा हात हातात घेऊन 
“यु आर लकी... निशांतसारख्या मुलाशी तुझं लग्न झालंय...
मिहिरा तू थोडा समजूतदारपणा दाखवला असतास ना तर आज जे मला मिळालंय ते सगळं तुझ्याजवळ असत....
तिघेही निशब्द झाले.. 


समाप्त::


 लग्न करण्यासाठी प्रेम हे गरजेच असतच...
पण त्यापेक्ष्याही... एकमेकांना समजून घेण जास्त गरजेचं आहे... प्रत्येक वेळी परिस्थिती सारखीच नसते...

सगळे दिवस सारखे नसतात, सुखा नंतर दुःख, दुःखानंतर सुख...हा निसर्गाचा नियम आहे त्यातून कोणाचीच सुटका नाही..
मिहिरानी थोडा समजूतदारपणा दाखवला असता तर आज परिस्थिती वेगळी असती....
नात्याला वेळ देता यायला हवा, त्याची नितांत गरज आहे...
तुम्हाला काय वाटतं कंमेंट मध्ये नक्की कळवा


धन्यवाद

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing