लाडीलवाळी परी ....

ईरा एक प्रेरणा

लाडीळवाळी परी...!!

     आज घर फारच सुंदर दिसत होत.घराची सारी स्वच्छता साफसुत्री झाली होती..दारातील सुबक रांगोळीने लक्ष वेधले होते... पारिजातकाची हळुवार ओघळणारी फुल रेखीव रांगोळीवर ठीपकत होती..गुलाबाचा टवटवीतपणा दवबिंदूनी चमकत होता..देवघरातील सुवासिक अगरबत्तीने मन प्रसन्न होत होते..हे सारे वातावरण आनंददायी करण्यास कारणीभूत होती  घरातील हसरी परी...गोड निरागस चेहरा...चमचमणारे केस.. वेड लावणारे हास्य...चित्याची चपळाई....लाघवी बोलणे...माणस जोडणारा संवाद ह्या सा-या गुणांची नजाकत फक्त परीकडेच होती..त्यामुळे तीच घरात असण बकूळ फुलांचा वास होता... परी लहानपणापासूनच चाणाक्ष होती... कधी तिने आईला त्रास दिला नाही..हसत खेळत परी मोठी झाली ...एखाद्या रोपाला सार सुख मिळाव तस...परी शाळेला जायाला लागली की ..पटापट तिचे पापे घ्यावे असे वाटत...शाळेतही गुरुजनांना आवडणारी.. शाळेतिल प्रत्येक कार्यक्रमात तिची हजेरी म्हणजे उस्फुर्ततेची लाटच.. ..
    परी सहावीच्या वर्गात शिकत होती..स्वावलंबनाचे सारे धडे तिच्याकडून शिकावे हे तिच्या कामावरुन समजत होते..आईला घरकामात मदत करणे तिची रोजची सवय होती...स्वयंपाकात मदत करणे..जेवणातील पदार्थाची चौकसबुद्धीने पहाणी करणे.. भांडी धुणे...ती नीटपणे ज्या त्या जागेवर ठेवणे..घरातील झाडलोट...अंगण लोटणे..सडा सारवणाने ते चांगले करणे...छोटीशी पण उठावदार रांगोळी रेखणे...इतकी सारी कामे लहान वयातच लिलया करणे हे मोठेपणी गृहलक्ष्मीचे संकेत होते...
     एके दिवशी शेजारची आजीबाई परीला हाक मारु लागली..ये परे..! मला जरा चालताना मदत कर ये.. परी चटकन जाउन आजीबाईला फिरण्यास मदत करत..तिच्याबरोबर छान छान गप्पा मारत.. मग आजीबाई हळुच परीची  पापी घेत.. हे असे  परीसाठी नित्याचच होत...घरी आजी आजोबांना वेळेवर जेवण व औषधे देणे..त्यांची सेवा करणे..हे परीच्या मनाला सुखावणार होत...परीच्या मैत्रींनिंचा वाढदिवस असला तर परी खुपसारी चॉकलेट  , वही व पेन वाढदिवसाला भेट देत असत..सर्वांचा वाढदिवस साजरा करण परीला खुप आवडत असे...मोठ्या व्यक्तींना आदराने बोलवणे...घरात आलेल्या प्रत्येक व्यक्तिंचा  आदरातिथ्याने पाहुणचार करणे हे परीचे ठरलेल काम असते .सणसमारंभात हिरेरीने भाग घेंऊन सणवार मोठ्या दिमाखात साजरा करण्यात परीचा सहभाग वाखाणण्याजोगा असतो.दिपावलीच्या सणात फराळ तयार करण्यास पटपट मदत करत असत ..केवळ आपला फराळ झाला म्हणून ती गप्प बसत नसत शेजारी व मैत्रिणींचा फराळ करण्यास ती अग्रेसर असत.....हे सार अभ्यास सांभाळून ती करत असत..अशी ही सर्वगुणसंपन्न परी प्रत्येकांच्या घरी हवीच हं..!! घर समृद्धीसाठी...कुटुंबातील प्रत्येकाला प्रेरणा देण्यासाठी ...!! कुटुंबात चैतन्य निर्माण करण्यासाठी ...!!

थांबा , हं...!! परी घरात लगबगीने गेली..निरांजनाचे तबक घेऊन आली...समोर प्रथम प्रेरणा देणारे ईराचे  व्यासपीठ , आम्हा सर्वांची दिल धडकन म्हणजे वाचकवर्ग , लेखक व आदरणीय लेखीका , आईवडिल , बाहिणभाऊ या सर्वांचे परीने मनोभावे औक्षण केले..व ही दिपावली तुम्हा सर्वांना भरभराटीची व आनंदाची जावो अशी मनःपुर्वक प्रार्थना परीने केली...!! किती गोड आसते हो ..लहानपणाचे जीवन ...पण त्यात पुढील आयुष्याचे प्रतीबींब दिसावे एव्हडे सर्वसमावेशक गुण असणे खरोखरच सारे अद्दभूत असते ...!!

    परीच्या या हरहुन्नरी व प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वाला सलाम....!!

                ©नामदेवपाटील ✍