हिरावूनी दुसऱ्याचा आनंद मला होई परमानंद

बायकांची तऱ्हा
आजकाल ना निखळ अशी स्तुती कोणी कोणाची करताना आढळतच नाही...होय....मी बायकांबद्दलच बोलती आहे...पुरुषांना अशा स्तुतीची गरज काही वाटतच नाही...त्यांचे विषयच वेगळे...पण आपले नाही ना तसे..

खरेच ना दुसऱ्या बद्दल चांगले बोलून त्याला आनंद ना मिळू देण्यातच काही लोकं आनंद मानतात...आणि कोणी चुकून स्तुती केली की तीसरी आपली अक्कल पाजळून त्या क्षणभंगुर आनंदाचा झटक्यात भ्रमनिरास करणार..

काही रोजचीच उदाहरणे....
१) कुण्या एखाद्या चाळीशितल्या बऱ्यापैकी maintained असलेल्या स्त्रीने छान one piece घातला ...तर तिचीच जराशी स्थूल समवयस्क म्हणणार..."बाई...काय गा हे या वयात...आमच्याकडे नाही बाई ह्यांना आवडत असे राहायला आता"...खरे तर हिच्या देहाला one piece suit होत नाही म्हणून तिच्या ह्यांना ते आवडत नाही...वयाचा काही एक संबंध नाही...

२)कुणीतरी दुसरीने सकाळी झुंबा class or yoga class जॉइन केला असेल आणि ती तो एन्जॉय करतही असेल पण आपल्याला सकाळच्या उशिरा उठण्याच्या सवयीमुळे झुंबा जॉइन ना करता यायचे शल्य खालील शब्दात व्यक्त होते.
"आमच्याकडे बाई सकाळी सकाळी यांना गरमागरम चहा
आणि नाष्टा लागतो...इथे कुणाला वेळ आहे सकाळी कवायत करायला"...

३)कुण्या तीसरीने अमेझॉन संगतीने घरच्या घरी jwellery बिझनेस सुरू केला तर तिला साधे all the best म्हणणे सोडाच पण तिच्याच तोंडावर म्हणतील "मला नाही बाई आवडत असले बिझनेस करायला...१० पैकी ७ बायका आजकाल तेच करतात" खरे असेलही पण हे सगळे १० पैकी ज्या ३ उरलेल्या बायकाच बोलतात ज्यांना बिझनेस कशाशी खातात ते माहीत नाही.

४)कुण्या चौथिला parlour मध्ये जाऊन नीटनेटके राहण्याची जास्त आवड असेल तर तिच्या बाबतीत खालील संवाद कानी पडतो."नवरा बक्कळ कमावतो म्हणे,आणि मुळात सुंदर असलेल्यांना सतत parlour मध्ये जायची गरज नसतेच मुळी".हे म्हणणारी भले दिसायला शुर्पणखा का असेना...

५)कुण्या पाचवीला सोन्याचे दागिने (तिचे स्वतःचे स्त्रीधन) घालायची आवड असली की एखादी विचारशून्य म्हणणारच..."मला तर बाई सोन्याचे तेच तेच दागिने घालायला अजिबात आवडत नाही .आजकाल बाहेर एवढी artificial jewellery फॅशन मध्ये आहे" कारण या बाईकडे दोन तोळ्याच्या मंगळसूत्र शिवाय काहीही नाही.

माझे म्हणणे तुम्हाला एखाद्या विषयी चांगले बोलता येत नसेल तर राहू देत ना...पण वाईट बोलून तिचे मन तर दुखवू नका ना.

कुणाला one piece madhye comfortable आणि confident वाटत असेल,कुणाचे health issues झुंबा अगर योगाने solve होत असतील,कुणाच्या अंगातला रॉकटसिंग बिझनेसमन स्वस्थ बसू देत नसेल,कुणाला parlour मध्ये जाऊन relaxed वाटत असेल तर कुणाला तिने घातलेल्या सोन्याच्या दागिण्यात तिच्या माहेरचा ओलावा जाणवत असेल....राहू द्या ना हा आनंदी क्षण काही काळ तिच्यासोबत....

__शब्दसुधा
सुधा मुळीक