लढाई अस्तित्वाची... भाग-3

कथा एका अश्या अस्तित्वाची ज्यात किती तरी संकट रोज येतात

भाग- १ वाचण्यासाठी क्लिक करा खालील लिंक वर...

https://www.irablogging.com/blog/ladhai-astatvachi-part-1_5135

भाग - २ वाचण्यासाठी क्लिक करा खालील लिंक वर...

https://www.irablogging.com/blog/ladhaiastitvachi-part--2-_516

“आई काही काय बोलताय. ती आमच्या जीवनातील खतं अजिबातच नाही आणि राहीला प्रश्न दुसऱ्या अपत्याचा तर माझा याला सरसकट विरोध आहे. मी माझ्या मोक्षालाच शिकवुन मोठ करेल.” “ऐ बाई, ईथे झाशीची राणी बनण्यात काही अर्थ नाही. प्रॅक्टीकल विचार कर.” “जो विचार करायचा होता तो मी चांगलाच केला आहे.” “आई-मोक्षा दोघीही जरा शांत व्हा. काय बोलतो आहे आपण याचा जरा भान ठेवा आणि हो आई तुला सांगुन देतोय दुसऱ्या बाळाच विचार आम्ही अजिबात करणार नाही. तिच आमच प्राक्तन आहे. आमच बघु आम्ही तिला कस घडवाच.” घरच वातावरण थोड चिघडल होत. मुक्ताला धिर देवुन सगळी आपआपल्या घरी परतली. अचानक कानावर कधी न पडलेले सगलेच आवाज़ तिच्या कर्णपटलावर मारा करित होते. ती काही वेळेपुरती गोंधळुन गेली. कानात होणाऱ्या आवाज़ाच्या मारामुळे ती बरेचदा श्रवणयंत्र काढुन फेकायची. कधी कधी जोरात आवाज़ आला की लगेच कान बंद करून द्यायची. तिला तिच्या यंत्रासाठी फ़्रेडली करणे हे मोठ आह्वान होत. लहान मुल चिडचिड तर करणारच. पण अगदी लहान वयात तिच्या कर्णबधिरत्वाचे निदान झाल्यामुळे तिला त्याचा खूप फ़ायदा झाला. संजय आणि मुक्ता तिच्याशी अगदी साधा संवाद साधुन तिला आजुबाजुच्या वस्तुंची ओळख करून दयायचे. ऐकु येणारी मुल जस आपल्या आजुबाजुचे आवाज़ आणि परिसरातील लोक यांच्या माध्यमातुन शिकतात तशी ती हि शिकु लागली. शिवाय ओरल ऑरल प्रशिक्षणाचाही तिला भरपुर फायदा झाला. तिला हळुहळु त्या श्रवण यंत्राची सवय झाली. पण आपला नेहमीप्रमाणे दिवंगत आणि पुढारी समाजाने तिच्या पुढ़े आणि तिच्या पालकांपुढ़े बरेच संकट उभे केले. सोसायटीत तिच्या अपंगत्वाची माहिती कळताच लोक तिला दयेच्या नजरेने बघु लागले. मुल तिला बहिरी म्हणून चिडवु लागले. कधी तिच्या भोवती गोकळा करून तिच्यावर हसायचे तर कधी तिला धकलायचे. कुणीही तिच्याशी खेळायचे नाही. एखाद्या कार्यप्रसंगात गेल कि तिथे ही लोकांची कुजबुज सुरु व्हायची. तिला आणि पर्यायाने तिच्या पालकांना “पाप केल असाव मागच्या जन्मी म्हणून अस लेकरु जन्माला घातल देवाने”, असे भाष्य करायचे. पण तरी त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल. लोक काहीही म्हणो तिला प्रत्येक कार्यप्रसंगाला न्यायच आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळवायच हाच नियम केला. कोणी काहीही म्हणो आपल्या लाडोला एकट करायच नाही या मतावर ते दोघ शेवटपर्यन्त ठाम होते. प्रिती मुक्ताला नेहमी म्हणायची,” तू हि कर्णबधिरत्वाच बी॰ई॰डी॰ कर म्हणजे मोक्षाला त्याचा पुरेपुर फ़ायदा होईल पण त्याच ट्रेनिंग सेंटर मुंबईलाच उपलब्ध होत. मग काय संजयच्या खूप आग्रहानंतर तिने कर्णबधिरांच्या बी॰एड॰ ला तिने अॅडमिशन घेतली. प्रवास सोपा नव्हता. ती आणि मोक्षा दोघी मुंबईच्या एका फ्लॅटमध्ये शिफ़्ट झाल्या. संजय नागपुरलाच होता. तो हफ़्तातुन तिकडे यायचा. ईकडे तिने मोक्षासाठी एक बाई लावुन घेतली ती तिला वाचा-भाषा प्रशिक्षणाला आणन-नेन करायची आणि मुक्ता येईस्तोर तिचा सांभाळ करायची. त्यांना एक वर्ष तिथे काढायच होत. मुक्ताने मोठया ज़िद्दीने नव्या स्थानी , नव्या लोकात आपला ज़िद्दीचा संसार उभा केला. दिवसभर काॅलेज करायच आणि आल्यानंतर मोक्षाचा अभ्यास घ्यायचा हेच तिचे दिनचर्य होते. त्यात ती सतत बाहेरच्या जगाशी संपर्कात राहावी म्हणून ती तिला वेगवेगळया community functions मध्ये सहभागी व्हायची. आपल्या मुलीला हव तेवढ किंवा त्यापेक्षाही जास्ती प्रोत्साहन एका आईने एका मुलीला दिला. तशी ती बरेच शब्द बोलयची पण तिच्या उच्चारणात खूप अस्पष्टता असायची पण तिला काय म्हणायच आहे हे तिच्या परिचयाचे लोक समजु शकत होते. अपरिचीत लोकांना तिची भाषा कळणे जरा अवघड होत. ती बोली भाषे बरोबरच सांकेतिक भाषेचा ही प्रयोग करायची पण मुक्ताचा भर जास्तीत जास्त बोलीभाषेवर होता जेणे करुन तिला भविष्यात वावरतांना त्रास होणार नाही. आता वेळ होती तिला शाळेत घालायची पण कोणत्या? विशेष शाळेत कि सामान्य शाळेत? हा मोट्ठा प्रश्न त्यांच्या समोर होता. काहींच मत होत विशेष शाळा कारण तिथे सगळीच मुल तिच्यासारखी असणार होती म्हणजेच कर्णबधिर असणार होती आणि सामान्य शाळेत तिला समावेशित शिक्षण मिळणार होत. तिथे तिला सांकेतिक भाषा आणि मातृभाषा या दोघांचही शिक्षण मिळणार होत. ईथे तिला सामान्य मुलांप्रमाणे सर्वांगिण विकासात मदत मिळणार होती. त्यांनी दोन्ही पर्यायावर खूप विचार केला शेवटी निर्णय त्यांनाच घ्यायचा होता. तिचा सर्वोतोपरी आणि सर्वांगिण विकास फक्त सामान्य शाळेतच शक्य होता. पर्याय खूप कठीण होता पण कर्णबधिर आहे म्हणून तिने मूकबधिरांच्या शाळेत शिकावं यापेक्षा सामान्य मुलांसारखं सामान्य मुलांच्या शाळेत शिकवायचं. तिच्यात व्यंग असलं तरी ती इतरांप्रमाणे बुद्धीने आणि कर्तृत्वाने मोठी आहे. आपलं मूल कशात तरी कमी आहे. तिच्यात कसलं तरी व्यंग आहे, हे कमीपण माणसाला जगताना वेळोवेळी अपमानित करतं. समाज त्या कमीपणाचा विनोद करतो. हे अपमानित जगणं, वा अशा हास्यास्पद जगण्याला समोरं जाण्याऐवजी आपण सक्षम बनायचं एवढंच त्या आईला माहीत होतं. तिने आपल पुर्ण आयुष्य आपल्या आवड़ी-निवडी, हौसी गवसी सगळ बाजुला सारल आणि फक्त एकच ध्येय स्वतः पुढे ठेवल. वर्षभर कसरत करून ते दोघ हि नागपुरला परत आले. वयाची पाच वर्षें पुर्ण झाली होती. उन्हाळयात काही तरी विरंगुळा म्हणून तिने तिला swimming class लावायच ठरवल. मोक्षा फ़ार आनंदी होती. आपण हि पाण्यात मज्जा मस्ती करावी अशी तिची कधीची इच्छा व्हायची. मग काय दोघी माय लेक़ी पहाटे ५:३० लाच swimming ला जायच्या. पूलमध्ये उतरायच्या आधी ती श्रवणयंत्र काढुन ठेवायची फक्त आणि फक्त बघुन बघुन ती प्रॅक्टिस करायची. तिच ओष्ठ वाचन एवढ ज़बरदस्त आणि वेगवान होत कि कंठातन ध्वनी यायच्या आधीच पुढचा व्यक्ति काय बोलणार आहे ती ओळखुन घ्यायची. एवढी तरबेज, बुद्धिने अतिशय तल्लख आणि तिक्ष्ण दृष्टिची धनी होती मोक्षा... कुणाला विश्वास नाही होणार पण केवळ पाच दिवसात सर् रास पोहायला शिकली. एका इन्द्रियात कमतरता होती पण बाकिंच्या इन्द्रियात कमालीची जादु होती. देवाजवळ प्रत्येक समस्येच तोड़ असत. त्याने तिला एका इन्द्रियात व्यंग दिल पण तिच सहाव इन्द्रिय अस सक्रिय केल होत कि एक सामान्य व्यक्ति किंवा अतीबुद्धिमानी व्यक्ति जवळ सुद्धा अशी अलौकिक बुद्धिमत्ता नसावी. तिच्याच वयातील सामान्य म्हंटली जाणारी मूल दहा दिवस होवुनही डिपमध्ये जायला घाबरायची आणि ती भरभर जाऊन चार - पाच राऊंड मारुन यायची. ती अशीच कमालीची चोखंदाज. नागपुरातील सोमलवार शाळेत त्यांनी चौकशी केली. सध्याच्या काळात ती शाळा मुलांच्या विकासाच्या दृष्टिकोनातुन परिपूर्ण होती. त्यांना कुठलीही शिफारस किंवा कोणाचीही हाजी हाजी करावी लागली नाही शिवाय अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग) अधिनियम १९९५ या केंद्र शासनाच्या कायद्याने अपंग व्यक्तींना जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी, पूर्ण सहभाग व हक्कांच्या संरक्षणाची हमी दिलेली आहे. पण तिच्या विकासाचा आढावा आणि तिची पूर्वचाचणी घेवुन शाळा व्यवस्थापनाने मोक्षाची अॅडमिशन स्वीकारली. घरात आनंदाची लहर होती. मुक्ताची खरी परीक्षा सुरु होणार होती. शाळा सुरु झाली. सुरवातीला शिक्षकांच्या आणि ईतर मूलांच्या गतीला तोड देणे तिला कठीण जात होते पण कानातल्या यंत्राच्या साहाय्याने शिकण्यासाठी केलेली धडपड ही महत्त्वाकांक्षी या शब्दाला लाजवेल असाच हा मुक्ता आणि मोक्षाचा प्रवास होता. सुरुवातीला वर्गातील मूल तिला चिडवायची, त्रास द्यायची. मुद्दाम तिला एकट पाडायचे.

क्रमशः

किती ना सहन कराव लागल असेल एका ईवल्याश्या निरागस जिवाला. स्वतःच अस्तित्व स्थापनाची हि परीक्षाच म्हणाव आणि त्याहुनही मोठी परीक्षा होती त्या आईची जीने आपल आयुष्य तिच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी झोकुन घेतल. बघुया हा रोमांचक प्रवास...

Stay tune.... पुढचा भाग आपल्या भेटीला लवकरच... धन्यवाद!!

©️®️सौ. अश्विनी रोशन दुरगकर.

🎭 Series Post

View all